TechRepublic Blogs

Saturday, March 8, 2025

मायाभ्रम

 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.

 लेखांक -२.

 लेखांक- दुसरा.

***********************

जेव्हा श्रीनृसिंहसरस्वती  कर्दळीवनातून अदृष्य झाले तेव्हा तेथूनच  श्री स्वामी समर्थ महाराजांचे अवतरण झाले तेव्हा  " महाराज आपण कोठून आलात ? " हा प्रश्न महाराजांना कलकत्ता येथून आलेल्या एका इंग्रज बॅरिस्टर व त्यांच्या सोबत आलेल्या एका पारशी अधिकाऱ्याने जेव्हा विचारले तेव्हा त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले कि , "सुरुवातीला आम्ही कर्दळीवनातून निघालो व त्यानंतर पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बांगला देशात गेलो व तेथे भ्रमण करून कालीदेवीचे दर्शन घेतले त्यानंतर गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर येथे गेलो व तेथे गंगा नदीत स्नान करून पुढे आम्ही गोदावरी तीरावर आलो. तेथे स्नान करून आम्ही  फिरत फिरत हैद्राबादला गेलो. तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर येथे जाऊन मग मोहोळास आलो , तेथून सोलापुरला आलो. सोलापूर येथे काही महिने वास्तव्य केले व मग अक्कलकोटाची वाट पकडली व तेव्हा पासून आम्ही येथेच आहे." (कै. ग.ब. मुळेकर लिखित श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र पृष्ठ ५) मधे श्री स्वामी समर्थ  महाराज मंगळवेढ्यात प्रकटले. याविषयीचा ऐतिहासिक संदर्भ चरित्रकारांनी नोंदविला आहे.


 “शके सतराशे साठात । 

स्वामी जगदुद्धारार्थ ।

 प्रकटले मंगळवेढ्यात । 

साक्षात दत्त अवतारे ॥”

 (अ.स्वा. ली.अ. १ ओवी १६) 


तेथून महाराज श्री माणिकप्रभूंच्या भेटीस आले श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास शके १७७९ च्या आरंभीस आले. श्रीमंत मालोजी राजे त्यावेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते. त्यांची स्वामींच्या चरणी त्यांची अपार श्रद्धा होती. श्री स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य एकूण ४० वर्षे होती. (शके १७६० ते शके १८००) त्यातली २१ वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी दत्तसंप्रदाय बराच वाढविला.


  असे पातकी दीन मी स्वामीराया |

 पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||

नसे अन्य त्राता जगीं या दीनाला |

 समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ||


 श्री स्वामी समर्थ महाराज नंतर तेथून मंगळवेढे, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर अशा गावी रहात रहात अक्कलकोटास आलेत.”

अक्कलसे खुदा पछानना” ह्या बोधवचनाची लोकांनी स्मृती रहावी म्हणूनकी काय स्वामी अक्कलकोटास येऊन प्रकट झाले, असा कोटीक्रम कोणी करतात व त्यास त्यांच्या चरित्रातील एका गोष्टीचा दाखला देतात. एकदा कोणी एक मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदाने स्वामींच्या मठाशी येऊन  “क्यों जी, ये अक्कलकोटके स्वामीं कहॉं है?” 

असे विचारले. तेव्हा त्यास स्वामींनी नेहमीच्या फटकळ भाषेत उत्तर केले ‘स्वामी बैठे… पर, स्वामी तो अक्कलकोटमें है, यहाँ क्या देखता है?” या स्वामींच्या उत्तराने तो सैय्यद समजावयाचे ते समजून एकदम तटस्थ झाला! घटकाभर त्याची उभ्या उभ्याच समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले. त्यातून तो पूर्व स्थितीवर आल्यावर त्याने मुक्तकंठाने स्वामींचे स्तोत्र गायले व त्यांनी अनेक साधना केली , पण त्यानंतर त्यांना हा आनंदानुभव मिळाला नाही. अनेक अवलियांस यापूर्वीही पाहिले, पण आज साक्षात् खुदाचेच दर्शन झाले. “अरे उसी लिये अक्कलके अंदर हरदेमें साहेबकू सच्चा देख लिया, सब जनमका सार्थक हुआ, पलखमें दरया माफक हो गया. किस्मतकी बात हैं मैं आपका बंदा हूं.” इत्यादी कंठउद्गार काढले. यावरून श्रीगुरूंचे निवासस्थान अक्कलकोट किंवा प्रज्ञापुरी हेच योग्य असे स्वामींचे भक्त म्हणू लागले.स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अकलसे खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे 'स्व'रूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार (अघटित लीला) कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. बाकी मायाभ्रम आहे. ते सर्वशक्तीमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी 'अवधूत' म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ॐकारातील पहिला स्वर 'अ'कार, म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, सांप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे, अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम (सर्वोत्कृष्ट) आहेत. स्वामी तपोमय अजर यतिश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि ऋद्धी-सिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम क्रोधादी विकार नाहीत. तसे संकल्प आणि विकल्प नाहीत.ते सर्वसाक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील 'अर्थ', आनंद, प्रेम आणि 'सुख'रूप  आहेत. आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म वअतिविराट वटवृक्षासारखे, वटवृक्षाच्या तळी व मुळात (दत्तनगर मूळ मूळ) आहेत. म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे.``` 

💐 प्रस्तुती व निवेदन :-

 श्री वामन रुपरावजी वानरे.

 

No comments:

Post a Comment