चिंतन
श्रीराम,
सोहंरुपी बोध हाचि रे कापूर |लाविला मधुर पांडुरंगा||१८|¦. कापूर आरतीच्या निमित्ताने सोहं साधना सांगत आहेत. सोहं साधनेने आपले खरे स्वरूप सच्चिदानंद ब्रह्म तत्व आहे ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन तो दृढ करायचा आहे. कारण भगवंतानी आपल्याला मानवी देह ' मी ब्रह्म आहे' अहं ब्रह्मास्मि ', हे समजून घेण्यासाठीच दिला आहे. म्हणून आपले खरे स्वरूप समजून घेण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे.
उपासनेच्या माध्यमातून संतांना काय सांगायचे आहे हे समजून घेऊन दिसणाऱ्या सर्व नामरूपात्मक गोष्टींच्या मागे एकमेवाद्वितीय निर्गुण निराकार सच्चिदानंद ब्रह्म स्वरूप आहे हे समजून घेऊन 'ते तत्व मी आहे' 'इथपर्यंत आपल्याला जायचे आहे, आणि त्यासाठी सोहं साधना अत्यंत आवश्यक आहे.
सद्गुरू म्हणतात - निष्काम कर्माच्या आधाराने जीवन जगत असताना सच्चिदानंद तत्वामध्ये सोहं साधनेने स्थिर झालेली बुद्धी जेव्हा आत्मानुसंधान सांभाळून राहते तेव्हा जीवाला जीव ब्रह्मैक्यरूप योग्याची सिद्धी प्राप्त होते. म्हणजे त्याला जीव - ब्रह्माच्या ऐक्याचा अनुभव येतो व तो स्थितप्रज्ञ होतो.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment