*🌹!! श्रीराम समर्थ !!🌹*
*हर्दा येथील रामाचें मंदिर फार चांगलें चालत असून लोकांना तें एक विश्रांतिस्थान झालें होतें. इंदूरचे महादेवभट रामाचे पुजारी असून पूजा, नैवेद्य, नंदादीप, उत्सव व आलेल्याला अन्नदान यांसाठीं मंदिराला शेतें लावून दिलून होतीं. थोड्याच कालांत मंदिर फार लोकप्रिय झालें .
श्री महाराज इंदूरहून हर्द्यास आले. येथे त्यांचा दीड दोन वर्षें मुक्काम झाला. हा सर्व काल फारच आनंदांत गेला, आणि त्या प्रांतांतील पुष्कळ लोक भगवंताच्या कामाला लागले.
वर्धा येथेंच श्री न.चिं. केळकर हे श्री महाराजांना भेटले. केळकरांचे वडील आणि वडील बंधु अनुग्रहीत होते. कांग्रेसचें अधिवेशन संपल्यावर पुण्यास परत हातांना श्री केळकर दोन दिवस हर्द्यास राममंदिरामध्यें राहित होते. हातांना एका माणसापाशी ते बोलले कीं, "आम्हाला तुमचा परमार्थ कांहीं कळत नाहीं, पण श्री महाराज हे फार पोलिटिकल (राजकारणी) आहेत एवढें मात्र मी खात्रीनें सांगूं सकतों".*
*वाईची एक बाई काशीयात्रेला गेली होती. यात्रा आटोपून परत येतांना चंद्रग्रहण आलें म्हणून गंगास्नान करण्याकरिता ती प्रयागला उतरली.
ग्रहणाची पर्वणी संपवून ती बाई निघाली आणि हर्द्याला आली, तेव्हा श्री महाराजांच्या चेहऱ्याकडे बघून आश्चर्यांनें ती म्हणाली, "अगबाई ! या बाबांना तर काल मी प्रयागला गंगेच्या वाळवंटामध्यें पाहिले !" कोणी म्हटले, "महाराज काल इथेंच होते". त्यावर ती बाई म्हणाली, "तें मला माहिती नाहीं. पण यांना मी काल प्रयागमध्यें नक्की पाहिलें"
हें सर्व ऐकून श्री महाराज बोलले, "बघा, भाऊसाहेब , मी इथून कुठें गेलों का? पण लोक उगीच कांहीतरी उठवितात!" असें बोलून मोठे अर्थपूर्ण हंसले.*
*!! श्रीराम जयराम जय जय राम!!*
*प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*
No comments:
Post a Comment