TechRepublic Blogs

Friday, March 7, 2025

वाटचाल...

 *"परमार्थाची वाटचाल"*

संकलन आनंद पाटील 

*प्रपंच्याच्या सुखासाठी जेवढी धडपड, प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा ईश्वरप्राप्तीसाठी करावयाचा* *प्रयत्न  पुष्कळच सोपा आहे. तिथे निदान पुढे काय होईल अन् काय नाही अशी अनिश्चितता नसते. अंतिम* 

*सुपरिणामाची पूर्ण खात्री असते. शेवट गोड होणार हे माहीत असतें. साधना पूर्ण झाली की सिद्धि मिळणारच मिळणार ! 'ध्येयसिद्धि वा देहपतन' अर्थात् एक ध्येयप्राप्ति तरी होईल किंवा त्या कामी देह तरी जाईल -- अशी* 

*दृढ प्रतिज्ञा करून,  संसारातील इतर  नको असलेली उठाठेव, निंदा नालस्ती अशी सर्व कामें बाजूला सारून, जो कोणी ईश्वरप्राप्तीच्या कठीण कार्यामध्ये* *सतत संलग्न राहील, त्याला निःसंशय परमेश्वराचें दर्शन घडेलच घडेल.* 

*अशा त्या एकनिष्ठ भक्तावर परमेश्वर आपल्या अमूल्य निधीचा, नामस्मरणाचा  असा वर्षाव करील की त्यापुढे ऐहिक विश्वांतील सगळी* *सुखसंपत्ति त्याला अगदी तुच्छ वाटू लागेल. मृत्यूला उल्लंघून तो मोक्षपदाचा अधिकारी बनेल.*


*"म्हणूनच संत सांगतात की, आपली सगळीं आध्यात्मिक*

*साधना, यमनियम, ध्यानधारणा, प्रार्थना आदि गोष्टींचें* *अंत:करणापासून कांटेकोरपणाने पालन करा. असें सतत चालू द्या. मगच तुम्हांला आनंदप्राप्ति होईल. स्वतः* 

*कांहीहि कष्ट न झेलतां केवळ इच्छा करीत राहून, जादूची* *कांडी फिरल्याप्रमाणे आपण आत्मसाक्षात्कारी पुरुष बनावें असें तुम्हांला वाटत असतें.अशी कल्पना बाळगणें*

 *म्हणजे शुद्ध वेडेपणाच नव्हे काय ?" म्हणूनच नितिधर्माचे नियम पालन करत संसार सुखाचा करावा पण तो*

 *भगवंताच्या स्मरणात करावा. प्रपंचात आपले पाऊल चुकीच्या दिशेने पडत आहे असे वाटत असतानाच आपल्या सद्गुरूना स्मरावे व परमार्थाच्या वाटेवर चालावे.  

No comments:

Post a Comment