TechRepublic Blogs

Wednesday, March 5, 2025

संगत झाली

 एकदिवस पु.श्रीगुरुदेव रानडे आंघोळीहून बाहेर आले. त्यांच्या भाच्याने त्यांना सांगितले की सांगलीचा राजा पुस्तकासाठी पैसे द्यावयास आला आहे. गुरुदेव म्हणाले मी आंघोळीहून आल्यावर कशा अवस्थेत असतो ते तुला माहीत नाही का ? त्याला ९ /९.३० वाजता यायला सांग. १९४२ सालची गोष्ट. राजा समोर असे बोलायचे म्हणजे काय हो ! 

माणूस कितीही मोठा झाला म्हणून काय झालं ? तुम्ही जेव्हा या मार्गाला लागता तेव्हा ते साधन    प्राण आहे असे वाटलं पाहिजे . तेथे कोणतीही तडजोड नाही. त्याकरता दृश्याच प्रेम सुटलं पाहिजे. दृश्यात राहावे लागेल पण त्याची किंमत ओळखून राहायला हवं. श्रीमहाराजांचं एक वाक्य आहे " आसक्ती सोडून प्रपंच करावा व तो कर्तव्याचा असावा." 

कर्तव्य म्हणजे ज्या माणसाशी जो संबंध तितकीच त्यांना किंमत द्यायची. अमेरिकेत मुलं जातात बोलाविले तरी येत नाहीत. तेव्हा वाईट वाटण्याऐवजी मी माझे कर्तव्य केलंय , ठीक आहे. त्या कर्तव्यात भगवंताचे स्मरण असेल तर चांगलंच. समाधान राहील. तुमच्या सत्कर्माचं फळ दिसत नाही , ईश्वरावर श्रद्धा असल्याशिवाय तुम्ही कर्तव्य करूच शकणार नाही. 

पण दिसत त्याच्या उलट. सद्गुणांच फळ मिळालच पाहिजे म्हणून पुनर्जन्म मानावा लागतो. व्यवस्था ठेवणारा देव आहे. देह आहे तो पर्यंत प्रपंच राहणार. त्याची बोच जायला नामाची संगत ठेवायला हवी. संगत म्हणजे भेटून गेलेल्या माणसाबद्धल जसं वाटतं तसं नाम घेऊन झाल्यावर संगत झाली  असं वाटतं का ?

No comments:

Post a Comment