TechRepublic Blogs

Monday, March 3, 2025

एक अभंग

 *ज्ञानेश्वरमाउलींचा एक अभंग आहे,*

 'अमोलिक रत्न जोडिले रे

तुज | कां रे ब्रह्मबीज नोळखसी | *नामरुपी अमोलिक रत्न संतांनी आपल्या मुखापाशी आणून दिलेलं असताना आपण ते रत्न धारण करत नाही. आपल्याला नामाचं मूल्य खरंच कळालेलं आहे का, हा खरोखरीच अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचं मूल्य तेव्हाच कळतं जेव्हा आपल्याला त्याची खरी किंमत माहित असते.*

   *एखादा दागिना हरवला तर आपण किती शोधाशोध करतो. तो शोधण्याचा जणू ध्यास लागतो. नाही सापडला तर मनाला चुटपुट लागते. पुढं कित्येक वर्षांनी जरी त्या दागिन्याची आठवण निघाली तरी डोळे पाणावतात, तो* *हरवल्याबद्दल वारंवार पश्चाताप होत असतो, तो हरवायला नको होता, असं वाटत राहतं. त्या दागिन्याचं मूल्य आपणास कळतं कारण त्यासाठी आपण किंमत मोजलेली असते. नामाचं मूल्य*

*कळत नाही कारण आपण* *त्यासाठी किंमतच मोजलेली नाही. संत नरहरी* *सोनार म्हणतात,* *'नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरीरायाचें, नाम फुकट आहे, सहज उपलब्ध आहे, तेव्हा ते घ्या, लुटा आणि जन्माचं सार्थक करा, असा संतांचा आर्जव.*

No comments:

Post a Comment