श्री .ज्ञानेश्वर महाराज म्हणाले योगाचे जर कौतुक असेल तर बरव म्हणजे संतोष व्हायला पाहिजे. प्रपंचात संतोषाचे महत्व फार आहे. संतोष या शब्दात तुष हा धातू आहे . तुष तोष म्हणजे तृप्त होणे आणि सम्यक तोष म्हणजे सर्व बाजूने तृप्ती होणे. संतोष ही वृत्ती आहे. ही वृत्ती जो पर्यंत बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून असते तो पर्यंत योग नाही. संतोष म्हणजे आपली परिस्थिती बद्धल तक्रार करण्याची वृत्ती नाहीशी होणे. समाजात कटकट, ऑफिस मध्ये कटकट , घरी अडचणी , सगळीकडे भगभग असतेच त्यात आपले मन शांत ठेऊन संतोष ठेवणे हा योग आहे.
एखाद लहान मूल जर गाडीत बसवलं तर जसं एकसारखि चळवळ करतं तसं आपले मन प्रपंचात असतं. संतोषाचा योग्य म्हणजे तुम्ही तुमचा मनावर हल्ला करा म्हणजे संतोषाचे खरे स्वरूप समजेल. जितका मनुष्य व्यवहारात वर जाईल तितका तो अधिक असंतोषी होत जातो. जितकं माणूस अधिक अधिक मिळवतो तितकं त्याला त्यात दोष दिसायला लागतात. सत्ता संपत्ती अधिकार यातच असंतोषाचा जन्म आहे.
No comments:
Post a Comment