*मुलंही जातात सोडून .....* 🚶🏻♂️
मुलांना सासरी पाठवलं जात नाही घरातून, पण मुलंही जातात सोडून .....
आपलं घर, आपली खोली, गल्ली, मित्र अन् गाव .....
शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पोटापाण्यासाठी .....
रात्रभर कूस बदलत, बिन झोपेचा, कण न् कण घराचा साठवत राहतो उदास डोळ्यात .....
आपलं जग मागे सोडताना, सर्टिफिकेट अन् कपडे सूटकेसमध्ये भरताना .....
भरलेल्या छातीत, मनाचं मेण होताना .....
आपली बाईक, बॅट, अन् भिंतीवर लावलेले आवडत्या नायकांचे पोस्टर डोळे भरून पहात, ओलसर डोळ्यांनी कसंनुसं हसत मुलगा घराबाहेर पडतो .....
मुलांची पाठवणी होत नाही घरातून, पण मुलंही जातात घर सोडून .....
रेल्वेच्या दारात, बसमधल्या खिडकीतून,
बंद कारच्या काचेतून, विमानतळावर चेक-इन करताना डोळ्यातलं पाणी लपवत,
हसतो मित्रांचा निरोप घेत, दुरावण्याचं दुःख लपवत,
हळूहळू चालत्या रेल्वे सोबत, ओला उबर सोबत, बससोबत किंवा चेक-इन करण्याकरिता नाहीसा होतो मुलगा .....
मुलांची पाठवणी होत नाही घरातून, पण मुलंही जातात घर सोडून...
आता ऐकू येणार नाहीत मित्रांच्या बोलवण्याच्या हाका .....
आणि वाजणार नाही दाराबाहेर खुणेचे हॉर्न .....
घराच्या गेटवर आता जमणार नाही मित्रांच्या हास्यकल्लोळाचा मेळा .....
उंबरठा ओलांडतांना घराचा,
त्यालाही रडावसं वाटतं .....
आईच्या गळ्यात पडून पुन्हा मूल व्हावंसं वाटतं .....
पण जबाबदार्यांचा बंधारा अश्रूंची वाट अडवतो,
मुलगा मग सार्या भावना खोल छातीत दडवतो .....
मुलीच्या पाठवणीच्या कौतुकात,
माहेर तुटण्याच्या दुःखावर,
शेकडो गीतं लिहिली गेलीत...
पण मुलं मात्र घराच्या अंगणातून बॅग घेऊन शांतपणे निघून जातात .....
एका अनोळखी शहरात,
जिथे कोणीही त्याची वाट पाहत नाही .....
अशा कुठल्यातरी एका घरात .....
मुलं मुळातून दुरावण्याचं दुःख शांतपणे सहन करतात ....
*हो, हे खरंच आहे की मुलांची पाठवणी होत नाही घरातून,*
*पण मुलंही घर सोडून जातात.....*
*मुलंही घर सोडून जातात .....*
No comments:
Post a Comment