श्रीराम समर्थ
समजा, दिवाळीमधें एखाद्य मंदिरावर खूप विजेची रोषणाई केली. हजारों विजेचे गोळे सर्व बाजूला लावले. त्यामधें लहानमोठे, विविध आकाराचे आणि विविध रंगांचे दिवे आहेत. रात्री बटण दाबून सर्व दिवे लागल्यावर कशी मौज दिसते! पण प्रतेक दिव्याला प्रकाश देणारी आणि आवरणारी शक्ति अंतर्यामी असते. तशीच ती सर्वांना सारखी असते. त्याचप्रमाणे या जगाच्या कारभारांत निरनिराळ्या देहांनीं, निरनिराळ्या प्रवृत्तींनीं आणि निरनिराळ्या कृतींनीं नाचणारे प्राणी एकाच आत्म्याच्या शक्तीनें वावरतात. स्थूल दृष्टीला प्राण्याचें बाहेरचें वागणें तेवढें दिसतें. परंतु ज्ञानी माणसाच्या सूक्ष्म दृष्टीला अंतर्यामीं राहून सर्वांना प्रेरणा देणारा आत्मा अनुभवास येतो.
---------प्रा के वि बेलसरे
*********
संदर्भः उपनिषदांचा अभ्यास हे त्यांचेच पुस्तक पान क्र ४०४
*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment