TechRepublic Blogs

Monday, March 31, 2025

आनंद

 *आनंद* 🟧

➖➖➖➖➖➖


काल एक मुलगा आला होता पेढे घेऊन. माझा जुना पेशंट असावा. सोबत त्याचे वडीलही होते. मुलाच्या हातात खव्याचे पेढे तर बापाच्या हातात मलई पेढे. मुलानं माझ्या हातात पेढे दिले आणि वाकून नमस्कार केला.   बापानंही त्याचं अनुकरण केलं. 

"मुलगा दहावी पास झाला.'' बाप बोलला.

"अरे वा, छानच की!....किती मार्क मिळाले?" मी विचारलं.

"बासष्ट टक्के आहेत." मुलगा बोलला.

"फर्स्ट क्लास मिळालाय त्याला." बापानं कौतुकानं मुलाच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं.

"चांगले मार्क आहेत." मी म्हटलं.

"मग काय तर?....गेल्या वर्षी पन्नास टक्के होते. एका वर्षात बारा टक्क्यांची प्रगती म्हणजे चेष्टा नाही."

"खूपच छान....आता पुढं काय करायचं ठरवलंय?" मी विचारलं.

"अजून ठरलं नाही. निकाल आलाय तेव्हापासून पेढेच वाटतोय....आम्हांला सगळ्यांना एवढा आनंद झालाय की बस्स....हा आनंद साजरा केला की बघू पुढं काय करायचं ते."

  आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत अप्पूची एक मैत्रीण आली पेढे द्यायला.

"किती मार्क पडले गं?" मी तिला विचारलं.

"नाईनटीफाईव्ह परसेंट."

"अभिनंदन." मी म्हटलं. मला वाटलं होतं की तिचे मार्क ऐकून तो मुलगा किंवा त्याचे वडील थोडे खजिल होतील. पण तसं काहीच झालं नाही. त्यांनी त्या मुलीलाही पेढे दिले आणि अभिनंदन केलं. "खूप छान मार्क मिळवलेस पोरी, बापाचं नाव केलंस बघ."  मुलाचे वडील बोलले.

ती मुलगी निघून गेली आणि मुलगाही बाहेर गेला.

"याच्या बऱ्याच दोस्तांनाही नव्वद पंचाण्णव टक्के मार्क आहेत. बासष्ट टक्के मार्क मिळवूनही आम्ही पेढे वाटतोय याचं त्यांना  आश्चर्य वाटतंय.तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात चांगले मार्क मिळालेत म्हणणाऱ्या.....बाकी सगळे 'फक्त बासष्ट टक्के मार्क?' या नजरेनं पाहत असतात."

"हो ना?"

"खरं सांगू डॉक्टर?....प्रत्येक मुलाची एक कुवत असते....एक आवड असते. त्या मुलीला पंचाण्णव टक्के मार्क मिळाले म्हणून माझ्या मुलाला तितकेच मार्क मिळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे जगत असतो. आमच्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे त्याला गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बारा टक्के मार्क जास्त मिळालेत..... हा तर आनंदसोहळाच आहे की आमच्यासाठी."

"खरं आहे. आपण आपली तुलना इतरांशी करून स्वतःच्या आनंदात विरजण टाकत असतो.....तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला आवडला." मी म्हटलं.

"हे सगळं अनुभवातून शिकलो डॉक्टर. मी दहावीत असताना मला चाळीस टक्के मार्क पडलेले. त्यामानानं माझ्या मुलाला खूपच चांगले मार्क आहेत. मला चाळीस टक्के मार्क असताना मी त्याला बासष्टच टक्के मार्क का मिळाले म्हणून का रागवावं?"

"ग्रेट."                           

"मला चाळीस टक्के मिळाले म्हणून माझे वडील मला लाख टक्क्याने बोलले होते.... माझ्या मोठ्या भावांना सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त होते ना?"

"ते भाऊ आता काय करतात?"

"एक शिक्षक आहे आणि एक खाजगी नोकरीत आहे."

"तुम्ही शेतीच करता ना?"

"हो! वडिलार्जित दोन एकर होती आता वीस एकर आहे. मी स्वतः अठरा एकर घेतलीय. स्वतःची डेअरी आहे. खताची एजन्सी आहे. गेल्या वर्षी नुसता टोमॅटो चाळीस लाखांचा झाला....शंभर रुपये दर होता बघा तेव्हा टोमॅटोचा."

   आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत मुलगा आत आला आणि वडिलांना हाताला धरून घेऊन गेला.

माझ्या डोक्यात विचार आला की ही माणसं खरी प्रॅक्टिकल. जे आहे त्यात समाधान मानणारी. आनंद उधळणारी आणि आनंद वेचणारी.....आणि जीवनातलं यश अपयश हे केवळ दहावीच्या मार्कांवर अवलंबून नसतं हेही त्यानं सिद्ध करून दाखवलं होतं!


©डॉ.अशोक माळी,मिरज.





Sunday, March 30, 2025

ऋणानुबंध

 !!  म्हातारपण काय आहे  !!

 ! नक्की शेवट पर्यंत वाचन करा !


*_समर्थांनी दासबोधात फार सुंदर वर्णन केलं आहे. त्यांनी ऋणानुबंध हा शब्द घातलेला हे आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे  संबध कींवा बांधला गेलेला. तर महाराज याच्यावर सांगायचे की तुमचं देणंघेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकाविषयी ऋण फीटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. आपलं एकमेका विषयी काहीतरी देणंघेणं असल्या मुळे एकमेकांना मदत करुन ऋण फेडता._*


*म्हातारपण फार चमत्कारिक आहे. तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. परंतु तेच जर आपण व्यवहारातच जर राहीला तर अवघड आहे. नामस्मरण कींवा काही साधन जर तुम्ही तारुण्या पासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं मग पुढे सुखदुःखात त्याला नामाचीच/त्या साधनाचीच आठवण राहील.*


_*म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे. शरीरातील  जीवन शक्ती कमी होते. बसलेले उठवत नाही. उठलेले झोपवत नाही. अंगातली कर्मशक्ती क्षीण होते. बरोबरचे लोक मरण पावतात. तेव्हा माणूस विचलित होतो.*_


*म्हातारपणी जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर फार अवघड आहे. कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नामसाधनाची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं. तेच जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फारच कठीण आहे.*


*म्हणून  भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणायचे एखादी कपड्याची फॅक्टरी आहे आणि त्यात कपड्याला कलर लावायला एक माणूस पूर्वी असायचा. त्याला डायिंग मास्टर म्हणतात.*

*त्याने एकदा कपडा रंगवला की संपलं. परत तो कपड्याचा रंग बदलता येत नाही.*


*तसे माणसचे वय एकदा पंन्नास पंच्चावन्न च्या पुढे गेलं की संपलं. या वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही. आणि म्हणून लहानपणा पासूनच कींवा तारुण्यात च साधनेची आवड पाहीजे नाहीतर कठीण आहे. _माझ्या मते तारुण्याचे कींवा समजायला लागलेल्या वया पासूनच्या कर्माचं रीझलटंन्ट म्हणजे म्हातरपण आहे._*


*कारण जर तुम्ही नीट वागला, चांगल्या कामाची सवय कींवा साधनेचा व्यासंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं. जास्त कष्ट पडत नाहीत. म्हणून जीवनात शिस्त, चांगुलपणा, साधनेची आवड, परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात. आपण म्हणतो म्हातारपणी पैसा असल्यावर कींवा समाजात मान असल्यावर घाबरण्याचे कारण नाही पण खरं तसं नाहीये.*


*याचं उत्तम उदा. पुढे देत आहे. एकदा लोकमान्य पुण्याला  बंडगार्डन मध्ये फीरायला गेले होते. तेथे डॉ.भांडारकर पण आले होते. सकाळची वेळ होती. दोघांची एकमेकां कडे दृष्टादृष्ट झाली. लोकमान्यांना ते पुर्वी शिकवायला होते. लोकमान्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाया पडले. तेव्हा भांडारकरांनी त्यांना लगेच ओळखलं नाही. कोण रे तू असे त्यांनी विचारल्यावर मी बाळ गंगाधर टिळक असं टिळक म्हणाले. तेव्हा भांडारकर म्हणला अरे तु अत्ताच थकलास. लोकमान्य त्यावेळी ५९-६० वर्षाचे होते. ते शांत उभे राहिले. व म्हणाले आपण भाग्यवान अहात. की आपल्याला येवढं जीवन मिळालं.*


*तेव्हा भांडारकर म्हणाले की तु चुकतोयेस. अरे म्हातारपण सुखाचं नाही. शाररीक दुःख, मानसिक दुःख व आपल्या पोरबाळांची दुःख पण सहन करावी लागतात. आणि म्हणून महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या समजत्या वयातच आपलं ध्येय ठरलेलं असावं. म्हणजे मग त्या ध्येयाच्या दृष्टीने पावलं टाकली जातात.*

*मग त्यामुळे माणूस सुखदुःखात पण दुःखीकष्टी होत नाही. म्हणूनच खरंतर आपणच आपले चांगले मित्र वा शत्रू आहोत. उगीच मुलाबाळांसह बायको कींवा नातेवाईकांवर आवलंबून राहणे उपयोगाचे नाही. माझा गुरु हेच माझं धेय्य असावं व त्यांनी सांगितलेले साधन हा मार्ग.*


*मग काय सर्व अलबेल होईल यात शंकाच नाही. भगवदगीतेत भगवंतांनी तेच सांगितलेले आहे की सतत चांगले कर्म करत रहा कींवा, तुमच्या कर्मात मला घाला म्हणजे नामात रहा म्हणजे तो खरा कर्मयोगी होय. आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा कींवा समाज जागृती. ती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावा नुसार ठरवावे.*


*निंबाळ सांप्रदायाचे हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांना एकाने विचारले की तुम्ही नुसते नाम घेत बसता त्यापेक्षा समाजकार्य का करीत नाही. तेव्हा ते म्हणाले की मी येवढे एका खोलीत बंदिस्त राहून जे नाम करतोय त्यामुळे माझ्या आसपास एक चांगले आवरण तयार होते व त्यामुळे लोकांच बर होत असणारच. या माझ्या साधनेने कुठे वा कुठे तरी फायदा होत असणारच. तो कुणाला व कुठे हे मात्र मी सांगू शकत नाही. पण समाजाचं भलं होत असलंच पाहीजे.*


 खळांची व्यंकटी सांडो, "सत्कर्मे रती वाढो"- 

    *ज्याचा अंतकाळ नामात झाला त्याने जिंकलं. असं महाराज म्हणायचे.*

 कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते . कपडे कितीही साफ व चकाचक असले तरी वाईट आणि मळलेले चारित्र्य लपू शकत नाही .......*

 *जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा . मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात . म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा .काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते . म्हणून शब्दाला धार नको आधार हवा .....*

 *आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजा - पाठ , होम - हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही.....(प्रेषक -र.ल.दे.)


🙏🌹 राम  कृष्ण  हरी  🌹🙏

धर्मों रक्षति रक्षितः*

 *भीष्म चुप रहे , कुछ क्षण बाद बोले," पुत्र युधिष्ठिर का राज्याभिषेक करा चुके केशव ... ?*

*उनका ध्यान रखना , परिवार के बुजुर्गों से रिक्त हो चुके राजप्रासाद में उन्हें अब सबसे अधिक तुम्हारी ही आवश्यकता है" .... !*


*कृष्ण चुप रहे .... !*


*भीष्म ने पुनः कहा ,  "कुछ पूछूँ केशव .... ?*

*बड़े अच्छे समय से आये हो .... !*

*सम्भवतः धरा छोड़ने के पूर्व मेरे अनेक भ्रम समाप्त हो जाँय " .... !!*


*कृष्ण बोले - कहिये न पितामह ....!*


*एक बात बताओ प्रभु !  तुम तो ईश्वर हो न .... ?*


*कृष्ण ने बीच में ही टोका ,  "नहीं पितामह ! मैं ईश्वर नहीं ...  मैं तो आपका पौत्र हूँ पितामह ... ईश्वर नहीं ...."*


*भीष्म उस घोर पीड़ा में भी ठठा के हँस पड़े .... !  बोले , " अपने जीवन का स्वयं कभी आकलन नहीं कर पाया कृष्ण , सो नहीं जानता कि अच्छा रहा या बुरा , पर अब तो इस धरा से जा रहा हूँ कन्हैया , अब तो ठगना छोड़ दे रे .... !! "*


*कृष्ण जाने क्यों भीष्म के पास सरक आये और उनका हाथ पकड़ कर बोले ....  " कहिये पितामह .... !"*


*भीष्म बोले , "एक बात बताओ कन्हैया !  इस युद्ध में जो हुआ वो ठीक था क्या .... ?"*


*"किसकी ओर से पितामह .... ?  पांडवों की ओर से .... ?"*


*" कौरवों के कृत्यों पर चर्चा का तो अब कोई अर्थ ही नहीं* *कन्हैया !  पर क्या पांडवों की ओर से जो हुआ वो सही था .... ?*  *आचार्य द्रोण का वध , दुर्योधन की जंघा के नीचे प्रहार , दुःशासन की छाती का चीरा जाना , जयद्रथ और द्रोणाचार्य के साथ हुआ छल , निहत्थे कर्ण का वध , सब ठीक था क्या .... ?* *यह सब उचित था क्या .... ?"*


*इसका उत्तर मैं कैसे दे सकता हूँ पितामह .... !*

*इसका उत्तर तो उन्हें देना चाहिए जिन्होंने यह किया ..... !!*

*उत्तर दें दुर्योधन, दुःशाशन का वध करने वाले भीम , उत्तर दें कर्ण और जयद्रथ का वध करने वाले अर्जुन  .... !!*


🌱🌱🌱🌱🌱🌱


*मैं तो इस युद्ध में कहीं था ही नहीं पितामह .... !!*


*"अभी भी छलना नहीं छोड़ोगे कृष्ण .... ?*

*अरे विश्व भले कहता रहे कि महाभारत को अर्जुन और भीम ने जीता है , पर मैं जानता हूँ कन्हैया कि यह तुम्हारी और केवल तुम्हारी विजय है .... !*

*मैं तो उत्तर तुम्ही से पूछूंगा कृष्ण .... !"*


*"तो सुनिए पितामह .... !*

*कुछ बुरा नहीं हुआ , कुछ अनैतिक नहीं हुआ .... !*

*वही हुआ जो हो होना चाहिए .... !"*


*"यह तुम कह रहे हो केशव .... ?*

*मर्यादा पुरुषोत्तम राम का अवतार कृष्ण कह रहा है ....?  यह छल तो किसी युग में हमारे सनातन संस्कारों का अंग नहीं रहा, फिर यह उचित कैसे गया ..... ? "*


*"इतिहास से शिक्षा ली जाती है पितामह , पर निर्णय वर्तमान की परिस्थितियों के आधार पर लेना पड़ता है .... !*


*हर युग अपने तर्कों और अपनी आवश्यकता के आधार पर अपना नायक चुनता है .... !!*

*राम त्रेता युग के नायक थे , मेरे भाग में द्वापर आया था .... !*

*हम दोनों का निर्णय एक सा नहीं हो सकता पितामह .... !!"*


*" नहीं समझ पाया कृष्ण ! तनिक समझाओ तो .... !"*


*" राम और कृष्ण की परिस्थितियों में बहुत अंतर है पितामह .... !*

*राम के युग में खलनायक भी ' रावण ' जैसा शिवभक्त होता था .... !!*

*तब रावण जैसी नकारात्मक शक्ति के परिवार में भी विभीषण, मंदोदरी, माल्यावान जैसे सन्त हुआ करते थे ..... !*  *तब बाली जैसे खलनायक के परिवार में भी तारा जैसी विदुषी स्त्रियाँ और* *अंगद जैसे सज्जन पुत्र होते थे .... !*  *उस युग में खलनायक भी धर्म का ज्ञान रखता था .... !!*

*इसलिए राम ने उनके साथ कहीं छल नहीं किया .... ! किंतु मेरे युग के भाग में में कंस ,* *जरासन्ध , दुर्योधन , दुःशासन , शकुनी , जयद्रथ जैसे घोर पापी आये हैं .... !! उनकी समाप्ति के लिए हर छल उचित है* *पितामह .... ! पाप का अंत* *आवश्यक है पितामह , वह चाहे जिस विधि से हो .... !!"*


*"तो क्या तुम्हारे इन निर्णयों से गलत परम्पराएं नहीं प्रारम्भ होंगी केशव .... ?*

*क्या भविष्य तुम्हारे इन छलों का अनुशरण नहीं करेगा .... ?*

*और यदि करेगा तो क्या यह उचित होगा ..... ??"*


*ॐॐॐॐॐॐॐ*


*" भविष्य तो इससे भी अधिक नकारात्मक आ रहा है पितामह .... !*


*कलियुग में तो इतने से भी काम नहीं चलेगा .... !*


*वहाँ मनुष्य को कृष्ण से भी अधिक कठोर होना होगा ....  नहीं तो धर्म समाप्त हो जाएगा .... !*


*जब क्रूर और अनैतिक शक्तियाँ  सत्य एवं धर्म का समूल नाश करने के लिए आक्रमण कर रही हों,  तो नैतिकता अर्थहीन हो जाती है पितामह* .... !

*तब महत्वपूर्ण होती है धर्म की विजय , केवल धर्म की विजय .... !*


*भविष्य को यह सीखना ही होगा पितामह* ..... !!"


*"क्या धर्म का भी नाश हो सकता है केशव .... ?*

*और यदि धर्म का नाश होना ही है , तो क्या मनुष्य इसे रोक सकता है ..... ?"*


*"सबकुछ ईश्वर के भरोसे छोड़ कर बैठना मूर्खता होती है पितामह .... !*


*ईश्वर स्वयं कुछ नहीं करता ..... !*केवल मार्ग दर्शन करता है*


*सब मनुष्य को ही स्वयं  करना पड़ता है .... !*

*आप मुझे भी ईश्वर कहते हैं न .... !*

*तो बताइए न पितामह , मैंने स्वयं इस युद्घ में कुछ किया क्या ..... ?*

*सब पांडवों को ही करना पड़ा न .... ?*

*यही प्रकृति का संविधान है .... !*

*युद्ध के प्रथम दिन यही तो कहा था मैंने अर्जुन से .... ! यही परम सत्य है ..... !!"*


*भीष्म अब सन्तुष्ट लग रहे थे......उनकी आँखें धीरे-धीरे बन्द होने लगीं थी .... !*

*उन्होंने कहा - चलो कृष्ण ! यह इस धरा पर अंतिम रात्रि है .... कल सम्भवतः चले जाना हो ... अपने इस अभागे भक्त पर कृपा करना कृष्ण .... !"*


*कृष्ण ने मन मे ही कुछ कहा और भीष्म को प्रणाम कर लौट चले , पर युद्धभूमि के उस डरावने अंधकार में भविष्य को जीवन का सबसे बड़ा सूत्र मिल चुका था* .... !


*जब अनैतिक और क्रूर शक्तियाँ  सत्य और धर्म का विनाश करने के लिए आक्रमण कर रही हों, तो नैतिकता का पाठ आत्मघाती होता है ....।।*


*धर्मों रक्षति रक्षितः*



अहं ब्रह्मास्मि

 चिंतन 

            श्रीराम,

सोहंरुपी बोध हाचि रे कापूर |लाविला मधुर पांडुरंगा||१८|¦. कापूर आरतीच्या निमित्ताने सोहं साधना सांगत आहेत. सोहं साधनेने आपले खरे स्वरूप सच्चिदानंद ब्रह्म तत्व आहे ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन तो दृढ करायचा आहे. कारण भगवंतानी आपल्याला मानवी देह ' मी ब्रह्म आहे' अहं ब्रह्मास्मि ', हे समजून घेण्यासाठीच दिला आहे. म्हणून आपले खरे स्वरूप समजून घेण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. 

         उपासनेच्या माध्यमातून संतांना काय सांगायचे आहे हे समजून घेऊन दिसणाऱ्या सर्व नामरूपात्मक गोष्टींच्या मागे एकमेवाद्वितीय निर्गुण निराकार सच्चिदानंद ब्रह्म स्वरूप आहे हे समजून घेऊन 'ते तत्व मी आहे' 'इथपर्यंत आपल्याला जायचे आहे, आणि त्यासाठी सोहं साधना अत्यंत आवश्यक आहे. 

                       सद्गुरू म्हणतात - निष्काम कर्माच्या              आधाराने जीवन जगत असताना सच्चिदानंद तत्वामध्ये सोहं साधनेने स्थिर झालेली बुद्धी जेव्हा आत्मानुसंधान सांभाळून राहते तेव्हा जीवाला जीव ब्रह्मैक्यरूप योग्याची सिद्धी प्राप्त होते. म्हणजे त्याला जीव - ब्रह्माच्या ऐक्याचा अनुभव येतो व तो स्थितप्रज्ञ होतो.  

                       ||श्रीराम ||

Saturday, March 29, 2025

जगावं कसं ?

 *🙏🏻नेमकं जगावं कसं ?  तर शाळेतल्या एखाद्या शिक्षकासारखं...!* 


*तासन् तास उभं राहून शिकवायची लाज नाही आणि राष्ट्रपती, पंतप्रधान यांनाही मी घडवलय याचा माज नाही....!* 


*अख्खा वर्ग मुलांनी भरलेला असतो; परंतु त्यातल एकही मूल   आपलं नाही... आपण फक्त शिकण्यास प्रवृत्त करणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची...!*


*निकालासाठी एखाद्या वेळी दुसऱ्यांशी वाद होणारच.... परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं मानून दुसऱ्यांशी बोलत राहायचं....,!*


*"पुढे चला... खूप शिका...." असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस....*


*खचाखच भरलेल्या वर्गामधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच...*

*पण कुणावर विशेष लोभ नाही...*

*कोणावर राग तर मुळीच नाही...* 

*कुणाचा द्वेष नाही...*

*कुणाचा तिरस्कार नाही...*

*आपला संबंध फक्त शिकवण्यापुरता... !* 


*कुणी मध्येच शाळा सोडून गेला तर त्याचे दुःख सोसायच...* 

*कुणी मध्येच शाळेत आला तर त्याचं कौतुक करायच...* 

*दोघांसाठी नेहमीच वर्गाच दार उघडायचं...* 

*येईल तो येऊ दे.... जाईल तो जाऊ दे...*


*दहावीला  पोहोचायच्या आधी त्याला पैलू पाडत राहायचे....* 

*प्रत्येक वर्गात थोडावेळ थांबायच ....*

*आळोखे पिळोखे देत, आपलंच वर्ग आहे, असं समजून थोडावेळ रेंगाळायचं....*

*पण त्या वर्गात भावनिक गुंतायच नाही....*

*आपण इथे थांबता कामा नये, हे स्वतःशी बजावत, पुन्हा दुसऱ्या वर्गात पुढच्या "तासिकेला" जायचं....*


*"सिंगल" बेल मारली ,की शिकवण थांबावायचं... "डबल"बेल  मारली की दुसर्‍या वर्गात निघायचं.... बास, इतके साधे नियम पाळायचे....* 

*आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही...!*


*दहावीचा टप्पा म्हणजे शेवटचा स्टॉप आहे....सगळ्यांनी चांगले कौशल्य प्राप्त करून घ्यावे.... असं सर्वांना बजावत स्वतःच  निरोप द्यायचा आणि परीक्षा संपल्या की "मुक्या मनानेच" इतर विद्यार्थ्यांसोबत अध्यापनात रमण्यासाठी निघून जायचं.... !*


*उद्या कोणत्या वर्गात जायचं ?  कधी निघायचं ? कुठल्या मजल्यावर जायचं ? वर्ग कोणता असेल.... ? हे ठरवणारा वेगळाच असतो...*


*उद्या कोणत्या  तासिकेचे निरीक्षण असेल याची माहिती नाही... निरीक्षक कोण असेल याचीही खात्री नाही.... सोबत विद्यार्थी कोण असतील याची शाश्वती नाही...*


*शाश्वत एकच आहे... ते म्हणजे अधयापन...!* 


*आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही... अधयापन कोणाच ना कोणाच तरी सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि चिरंतन...!* 


*आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही... अधयापन मात्र सुरूच राहणार आहे.... निरंतर आणि निरंतर...!*

 💐💐  🙏🏻🙏

Friday, March 28, 2025

अनुभवाची गोष्ट

 श्रीराम समर्थ


नाम जर चिकाटीनं घेतलं तर विचार थांबलेच पाहिजेत, अनुभव घेत नाही हो कोणी काय करावं ? अगदी अनुभवाची गोष्ट आहे. की विचार चालू दे नाम सोडायच नाही. 

         महाराजांचा दृष्टांत फार अप्रतिम आहे याला. महाराज म्हणाले एक बाई नोकरीसाठी रस्त्यावरनं निघाली. जाताना रस्त्यावरनंच जायला पाहिजे आणि रस्त्यावर हजारो लोक असायचेच. तर म्हणाले एक वाईट मनुष्य होता तो तिला पाहून खांकरला. त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, दुसरी एक मैत्रिण भेटली म्हणाली घाई आहे मला. चालत राहिली. हे सगळं होतअसताना चालत राहिली तर स्टेशनवर पोचते ना. तसं चांगला विचार आला वाईट आला तरी नाम चालू ठेवलं तर भगवंतापर्यंत पोचेलच पोचेल म्हणाले. काय महाराजांची बुद्धीमत्ता असली पाहिजे हो. सांगण्याची खुबी काय आहे बघा. आपण काय करतो खाकरला की त्याच्यशी भांडायला सुरवात आणि मित्र भेटला की त्याच्याशी गप्पा ठोकायला सुरवात. शेवटी गाडी चुकायचीच मग नाही का, असं  होतं आहे बघा. तेंव्हा आपण शब्दशक्तीला शरण जावं. ते माझं म्हणणं. शब्द शक्तीला शरण जाणं म्हणजे काय? की शब्दामधे दोन अंग आहेत, एक उच्चार आणि दुसरा अर्थ अशी दोन अंग आहेत शब्दाला. तेव्हा आपण शब्दाला शरण जाणे म्हणजे शब्दाला चिकटून अर्थाला शरण जाणं हे शब्दाला चिकटणं आहे. बरं राम म्हणजे काय ? राम म्हणजे दाशरथी राम नव्हे. आपला एक गडी आहे राम तो नव्हे. राम म्हणजे परमात्माच. मग परमात्मा असा जर राम शब्दाचा अर्थ असेल आणि तो परमात्मा सर्वव्यापी आहे तर तो माझ्यामधे आहे. तर नाम घेताना माझ्या अंतरात जो कोणी आहे मी खरा त्यांचं स्मरण मला व्हायला पाहीजे म्हणजे नामस्मरण बरोबर झालं, नाही का. ही फार मोठी झाली ज्ञानाची भाषा.

         भक्तीची भाषा म्हणजे नाम घेताना ते माझ्या जवळ आहेत कारण मी नामाला धरलं आहे ही भावना ठेवणं. म्हणून म्हणाले 

          'जेथे नाम तेथे माझे प्राण'. 

         मग नाम बरोबर केव्हां चालचं आहे. नाम घेताना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजे नाम बरोबर चाललं आहे. बरं अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजे काय ? जितका मी मला खरा आहे तितके ते मला खरे वाटले म्हणजे अस्तित्वाची जाणीवा खरी आहे. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव वाढवणं हाच परमार्थ आहे. 

         *********



*संकलनःश्रीप्रसाद वामन महाजन*

Thursday, March 27, 2025

संतोष

 श्री .ज्ञानेश्वर महाराज म्हणाले योगाचे जर कौतुक असेल तर बरव म्हणजे संतोष व्हायला पाहिजे. प्रपंचात संतोषाचे महत्व फार आहे. संतोष या शब्दात तुष हा धातू आहे . तुष तोष म्हणजे तृप्त होणे आणि सम्यक तोष म्हणजे सर्व बाजूने तृप्ती होणे. संतोष ही वृत्ती आहे. ही वृत्ती जो पर्यंत बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून असते तो पर्यंत योग नाही. संतोष म्हणजे आपली परिस्थिती बद्धल तक्रार करण्याची वृत्ती नाहीशी होणे. समाजात कटकट, ऑफिस मध्ये कटकट , घरी अडचणी , सगळीकडे भगभग असतेच त्यात आपले मन शांत  ठेऊन संतोष ठेवणे हा योग आहे. 

एखाद लहान मूल जर गाडीत बसवलं तर जसं एकसारखि चळवळ करतं तसं आपले मन प्रपंचात असतं. संतोषाचा योग्य म्हणजे तुम्ही तुमचा मनावर हल्ला करा म्हणजे संतोषाचे खरे स्वरूप समजेल. जितका मनुष्य व्यवहारात वर जाईल तितका तो अधिक असंतोषी होत जातो. जितकं माणूस अधिक अधिक मिळवतो तितकं त्याला त्यात दोष दिसायला लागतात. सत्ता संपत्ती अधिकार यातच असंतोषाचा जन्म आहे.

Wednesday, March 26, 2025

मैत्री दिवस*🤝


🤝 *जागतिक मैत्री दिवस*🤝


खरंच, काय अनोखी गम्मत आहे ना ह्या इंग्रजांनी सुरू केलेल्या दिवसामध्ये.....,

ज्यांच्याशी आपले मैत्रीचे संबंध जुळतात त्यांच्याविषयी भावना व्यक्त करण्याचे वेगवेगळे दिवस..पण फक्त त्यात "मैत्री" या शब्दाचा उल्लेख असायला हवा..


"मैत्री" म्हणजे काय? सोडा हो... व्याख्या काय करायच्यात? खरंतर व्याख्येत बसतं, ते नातं नसतंच कधी.

 रोजरोज भेटतात, रोज एकमेकांशी बोलतात तेच खरे मित्र मैत्रीण असतात, असं असतं का? 

किंवा ते खरंच एकमेकांचे चांगले मित्र मैत्रीण असतात का?

पण महत्वाचं म्हणजे मैत्रीला जात नसते, वेळ नसते, वय नसतं, अट नसते आणि रूपही नसतं. प्रेमाच्या कित्येक पुढे गेलेलं नातं म्हणजे "मैत्री".  

समोरच्याचा त्याच्या गुणदोषा सकट स्वीकार म्हणजे "मैत्री."  जिथे मनातलं बोलताना समोरच्याला आपण गमावू अशी भीती नसते, तिथे असते "मैत्री". 

"मैत्री" ही म्हणजे जगासाठी अदृश्य पण दोघांच्याही मनात ठळक असलेलं खोल नातं. जिथे देणंही हक्काचं असतं अन घेणंही हक्काचं असतं. ते नातं म्हणजे "मैत्री"

 समोरच्याच्या मनाची काळजी स्वतःपेक्षा जास्त घेणे याची जाणीव असणे म्हणजे मैत्री. ही मैत्री कुठे सापडते हो? आयुष्याच्या टप्प्यावर अशी "मैत्री" कुठेही सापडू शकते. कधी आई वडिलांत, कधी मुलांत, कधी बायकोत, कधी नवऱ्यात तर कधी अनोळखी माणसात. 

तसेच "मैत्री" ही फक्त स्टेटस पुरती,फोटो पुरती मर्यादित नाहीये ,पण शब्द पुरणार नाहीत ,लिहायला कागद उरणार नाहीत माझ्या आज पर्यत च्या आणि पुढील आयुष्यात माझ्या साठी "मैत्रीची" व्याख्या हिच असेल की ,मित्र म्हणजे अनेक आधार, विश्वास ,अनेक आपूलकी आणि अनमोल साथ ,जी मला तुमच्या रुपाने मिळाली.😘

तुमचंही आयुष्य अश्याच मित्र-मैत्रिणींनी भरलेलं असू दे. 

जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝❤️❤️🙏🏻

Tuesday, March 25, 2025

मनोबोध

 *भावार्थ मनोबोध*

*श्री रविंद्रदादा पाठक*

संकलन आनंद पाटील

मना मत्सरे नाम सांडू नको हो l अती आदरे हा निजध्यास राहो l

समस्ता मध्ये नाम हे सार आहे l दुजी तुळणा तुळीताही न साहे


*आपले मन हे इतरांच्या गोष्टींना मान्य करायला तयार नसते त्यावेळेला आपल्यातला हवेनकोपणा वाढतो.* *हवेनकोपणा वाढला की द्वेष निर्माण होतो. या द्वेषातून मत्सर निर्माण होतो. भगवंताचे नाम नेमके आपल्या मनाच्या* *आकुंचितपणावरती काम करते. ते आपल्या मनाला व्यापकता द्यायला सुरुवात करते*

*मनाला व्यापकता देते. कसे काय बरे नाम हे मनाला व्यापकता देऊ शकते. नाम हे मनाला सूक्ष्म करत असते. एक गंमत अशी आहे, हा फॉर्म्युला असा आहे की, मन जसजसे सूक्ष्म होऊ लागते तसतशी वृत्ती व्यापक होऊ लागते.*


*भगवंताच्या नामाने अनेक लोकांचा राग नाहीसा होतो. अनेक लोकांच्यातले कामक्रोधादी षडरिपु लयाला जातात. हे कसे होते याचे* *कारण नाम हे मनाला सूक्ष्म करते आणि मन जसजसे सूक्ष्म होते. हरिस्मरणाने,* *हरिप्रेमाने भरून जाते, तसतशी मनुष्याची वृत्ती व्यापक होऊ लागते. जेव्हा वृत्ती व्यापक होते तेव्हा टॉलरन्स वाढतो, इतरांचे दोष सहन करण्याचा जेव्हा आपला टॉलरन्स वाढतो तेव्हा आपल्याला इतरांचे दोष सहन करता येतात. हळूहळू ते दोष आहेत हेच जाणवणे कमी होऊन जाते. जेव्हा मनुष्याचे*

*दोष दिसणेच बंद होते. त्याक्षणी आपली आवडनिवड कमी होते. त्यापोटी निर्माण होणारा* *मत्सरदेखील कमी होत जातो. जेव्हा हे विश्व आपल्याला संपूर्ण दोषरहित दिसू लागेल, त्यावेळेला आपल्या जीवनातून* *मत्सराचेदेखील उच्चाटन होईल. पण हे इतक्या सहजपणे होते असे नाही. त्यासाठी समर्थ म्हणतात की.*

*नामाचा निजध्यास लागला पाहीजे. निजध्यास म्हणजे आपल्या जीवनातील सर्व अवस्थांमध्ये, मनुष्य हा* *साधारणपणे चार अवस्थांमध्ये जगत असतो जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. जागृती म्हणजे ही जी आपली दिनचर्या आहे - सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ही जागृती. स्वप्नावस्था म्हणजे*

*आपण झोपलो आहे, काही तरी स्वप्न बघतो आहोत, ही स्वप्नावस्था. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. तुर्या ही त्याच्या पलीकडची अवस्था, जी फक्त परमार्थाने, गुरुकृपेने अनुभवता येते. या चारही अवस्थांमध्ये जर नाम भरायचे असेल तर त्यासाठी जागृतीमध्ये नामाचा निजध्यास आणि तोही अतिआदराने. आदराने म्हणजे प्रेमाने, केवळ एका संख्येपोटी नाही. केवळ करायचे म्हणून नाही तर प्रेमाने, अत्यंत आदराने*

*जागृतावस्थेमध्ये आपण जितके काळ नामस्मरण करू ते नाम आपल्या स्वप्नामध्ये उतरेल. तेच नाम आपल्या गाढ सुषुप्तीमध्ये उतरेल आणि तेच नाम एके दिवशी आपल्याला तुर्यावस्थादेखील मिळवून देईल.असे हे नामाचे छोटेसे औषध. जसे त्या होमिओपॅथीच्या गोळ्या असतात ना साबुदाण्यासारख्या.*

*आपल्याला त्याकडे बघितले की असे वाटते की, अरे हे काय हे कसले औषध? याने कसे आपले कार्य होईल? पण बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीकडचे रिझल्ट या होमिओपॅथीने मिळतात आणि ही छोटीशी गोळी हे जसे काम करून जाते, तसे भगवंताचे नाम कार्य करते. त्यामुळे समर्थ म्हणतात की,*

दुजी तूळणा तूळिताही न साहे ।


*याच्यासाठी कुठली उपमा द्यावी या नामस्मरणासाठी, हे नामस्मरण आपण अत्यंत आनंदाने अत्यंत निदिध्यासाने आणि आदराने जर आपल्या जागृतावस्थेमध्ये ठेवले तर या नामाची स्पंदने आपली  सुषुप्ती भरून काढतात, स्वप्नावस्था भरून काढतात आणि या नामामध्येच सदगुरू* *आपल्यावरती कृपा करतात, आपली दृष्टी व्यापक करतात, आपली वृत्ती व्यापक करतात. या जगाला दोषरहित बघायची वृत्ती निर्माण करतात. जगातल्या अनेक प्रकारच्या मंडळीना सामावून घेण्याची वृत्ती आपल्या हृदयामध्ये निर्माण करतात. हीच वृत्ती आपली व्यापक होत होत ब्रह्मांडाला भेदून प्रत्यक्ष परमात्मस्वरूप होऊन जाते. तिथे वृत्तीचे दोन्हीही किनारे निघून जातात. अशी अद्भुत क्रांती या नामाने आपल्या आयुष्यात घडते. म्हणून मनापासून अत्यंत तळमळीने, प्रेमाने, निदिध्यासाने या नामाला लागा. हे भगवंताचे नाम परमकल्याणकारी आहे.*


|| जानकीजीवन स्मरण जय जय राम ।।

Monday, March 24, 2025

संडे डिश

 संडे डिश  मंगेश मधुकर   

         

*“बोललं पाहिजे”*

घड्याळात रात्रीचे साडे आठ वाजलेले पाहून आशानं ताबडतोब फोन केला पण अंजूनं उचलला नाही.इतक्यात दारावरची बेल वाजली. 

“सकाळी सातला गेलेली आत्ता उगवतेस.”

“आई,रोजचाच प्रश्न विचारून डोकं पिकवू नकोस.महत्वाचं काम होतं म्हणून उशीर झाला.”

“चकाट्या पिटणं हे महत्वाचं काम नाहीये.”सुरेश कडाडल्यावर बापलेकीत जुंपली.

कॉलेजला जायला लागल्यापासून अंजूचं घराबाहेर राहण्याचं प्रमाण वाढलं. सकाळीच जाणारी अंजू रात्री आठ पर्यंत यायची.आल्यावर सुद्धा फोनवर बोलणं चालूच.मैत्रीणी,मित्र आणि मोबाईल यातच गुंग.घरात अजिबात लक्ष नाही.सगळी कामं आशाच करायची.अंजूच्या बेफिकीर वागण्याची आशाला काळजी वाटत होती.खूपदा समजावलं पण काहीही उपयोग नाही.एकीकडं लेकीचं असं वागणं तर नवऱ्याची दुसरीच तऱ्हा.घरात पैसे देण्याव्यतिरिक्त कोणतीच जबाबदारी घेत नव्हता मात्र जरा काही मनाविरुद्ध झालं की वाट्टेल ते बोलायचा.चिडचिड करायचा.अंजूच्या वागण्याविषयी दोष द्यायचा.आशा सगळं निमूट सहन करत होती.(संडे डिश™)

सुरेश आणि अंजूमध्ये वाद तर रोजचेच.त्यासाठी कशाचंही निमित्त पुरायचं.घरातल्या कटकटी वाढल्या.दोघंही आपला राग आशावरच काढायचे.नवरा आणि मुलीच्या एककल्ली वागण्याचा प्रचंड ताण आशावर होता.सहन होईना अन सांगता येईना अशी अवस्था.सगळे अपमान,अवहेलना ती आतल्याआत साठवत होती.मनमोकळं बोलावं असं तिच्या आयुष्यात कोणीच नव्हतं.शेजारी राहणाऱ्या मंगल बरोबर आशाची छान गट्टी जमायची पण सहा महिन्यापूर्वी मंगल दुसरीकडं रहायला गेली अन आशा पुन्हा एकाकी झाली.हळूहळू तिनं बोलणं कमी केलं.फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची.घरात भांडणं सुरु झाली की कोरड्या नजरेनं पाहत बसायची. मनावरच्या ताणाचे परिणाम दिसायला लागले.तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या.निस्तेज चेहरा,डोळ्याखाली काळी वर्तुळ जमा झाली. खाण्या-पिण्यातलं लक्ष उडालं.वजन कमी झालं.खूप दिवसांची आजारी असल्यासारखी दिसायला लागली.आशामधला बदल आपल्याच धुंदीत जगणाऱ्या सुरेश आणि अंजूच्या  लक्षात आला नाही.आशानं सूड म्हणूनच स्वतःकडे दुर्लक्ष केलं.(संडे डिश™)

एके दिवशी नेहमीसारखी बापलेकीत वादावादी चालू असताना किचनमधून ‘धाडकन’ पडल्याचा आवाज आला.अंजून पाहिलं तर जमिनीवर पडलेली आशा अर्धवट शुद्धित अस्पष्ट बोलत होती.लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले.तीन दिवसांनी घरी सोडलं पण तब्येतीत फारसा फरक नव्हता.डॉक्टरांनी औषधं बदलली पण उपयोग नाही.खरंतर आशाला वैफल्य आलेलं.हताश,निराश मनस्थितीमुळे तब्येत सुधारत नव्हती.नाईलाजाने का होईना सुरेश,अंजु काळजी घेत होते तरी आपसातली धुसफूस चालूच होती.आशाची ही अवस्था आपल्यामुळेच झालीय याची जाणीव दोघांना नव्हती. मन मारून जगणाऱ्या आशाचा त्रास समजून घेणारं कोणीच नव्हतं.वेदना बाहेर पडायला जागा नसल्यानं दिवसेंदिवस आशाची तब्येत खालावत होती. 

---  

वरील घटनेतील ‘आशा’ हे एक प्रातिनिधिक उदाहरण.तिच्यासारखंच  मानसिक ओझं घेऊन जगणारे अनेकजण आहेत.(संडे डिश™) 

नुकताच पावसाळा सुरू झालाय.धो धो कोसळणारं पाणी वाट मिळेल तिथून पुढे सरकते पण तेच पाणी नुसतंच साठत राहिलं तर ??? अनर्थ होईल.तोच निकष मनाला लागू पडतो.

रोज अनेक गोष्टींना सामोरं जाताना अनेकदा मनाविरुद्ध वागावं लागतं.अपमान सहन करावे लागतात.राग,संताप गिळून गप्प बसावं लागतं.नोकरदारांना तर हा अनुभव रोजचाच.या सगळ्या तीव्र भावना बाहेर मनात साठल्या जातात.अशा नकारात्मक भावनांचा साठा वाढत जातो.वेळच्या वेळी निचरा होत नाही.ताणामुळे शारीरिक त्रास सुरू होतात.

पूर्वी मन मोकळं करण्यासाठी नातेवाईक,शेजारी,मित्र-मैत्रिणी अशी जिवाभावाची माणसं होती.एकमेकांवर विश्वास होता.त्यांच्याबरोबर बोलल्यानं मन हलकं व्हायचं.एकमेकांची अनेक गुपितं बोलली जायची.सल्ला दिला घेतला जायचा.थोडक्यात मनातला कचरा वेळच्या वेळी काढला जायचा.आता सगळं काही आहे फक्त मनातलं बोलायला हक्काचं माणूस नाहीये.सुख-सोयी असूनही मन अस्थिर.आजच्या मॉडर्न लाईफची हीच मोठी शोकांतिका.(संडे डिश™) 

बदललेली कुटुंबपद्धती,फ्लॅट संस्कृती आणि मी,मला,माझं याला आलेलं महत्व.यामुळे कोणावर पूर्णपणे  विश्वास ठेवणं अवघड झालंय.मनातलं बिधास्त बोलावं अशा जागा आता नाहीत.खाजगी गोष्टी सांगितल्यावर त्याचा गैरफायदा तर घेतला जाणार नाही ना?या शंकेनं मनातलं बोललंच जात नाही.मनाची दारं  फ्लॅटप्रमाणे बंद करून मग  तकलादू आधार घेऊन जो तो आभासी जगासोबत एकट्यानं राहतोय.*खूप काही बोलायचंय पण विश्वासाचा कान मिळत नाही.*

-- 

रोजचा दिवस हा नवीन,ताजा असतो.आपण मात्र जुनी भांडणं,टेन्शन्स,चिंता,मतभेद यांना सोबत घेऊन दिवसाला सामोरे जातो.शिळं,फ्रीजमधलं दोन-तीन दिवस ठेवलेलं अन्न खात नाही परंतु वर्षानुवर्षे मनात अपमान,राग,वाद जपून ठेवतो.संबधित व्यक्ती अनेक वर्षानंतर जरी भेटली तरी साऱ्या कटू आठवणी लख्खपणे डोळ्यासमोर येतात.भावना तीव्र होतात.राग उफाळून येतो आणि स्वतःलाच त्रास होतो.विचारात लवचिकता आणली तर कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता येतं.(संडे डिश™)

इतरांच्या वागण्याचा स्वतःला त्रास करून घेणं.... 

 *सोडून द्या* 

क्षुल्लक गोष्टींचे ताण घेणं....

 *सोडून द्या* 

ऑफिसचं टेंशन घरच्यांवर काढणं.... 

 *सोडून द्या* 

विनाकारण राग,द्वेष करणं .... 

 *सोडून द्या* 

इतरांचं वागणं नियंत्रित करू शकत नाही.तेव्हा.... 

 *सोडून द्या* 

सगळंच नेहमी मनासारखं होणार नाही तेव्हा.... 

 *सोडून द्या.* 

सर्वात महत्वाचे,

आजचं जग फार प्रॅक्टिकल आहे.वारंवार इमोशनल होणं.... 

 *सोडून द्या* 

आयुष्यात असं कोणीतरी असलं पाहिजे,ज्याच्याशी मनातलं सगळं बिनधास्त बोलता येतं 

हे वाचताना ज्याची आठवण झाली तोच तुमचा जिवलग.हे नक्की...... त्याच्याशी बोला.वेळच्या वेळी भावनांना वाट करून दया.साठवण्यापेक्षा बोलून मोकळं व्हा.*पाणी आणि मनभावना वाहत्या असल्या तरच उपयोगी नाहीतर.......*



Saturday, March 22, 2025

डिफॉल्ट मोड

 *डिफॉल्ट मोड म्हणजे काय?*


 (अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येकाने वाचा!)


डॉ. यश वेलणकर


*तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का..??*🤔🤔


तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात...!!


*आपण शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’असे नाव दिले आहे..!!* 


कॉम्प्युटर सुरू केला की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठराविक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो..!!


 


डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते असे त्यांनीच दाखवून दिले..!!


आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते..!!


आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो..!!


*मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे..??*🤔🤔


माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. *त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते..!!* 


कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते..!!


बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही, शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल..??


सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. *माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते...!!*


आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!


*विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्ये आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात, तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा "डिफॉल्ट मोड" बदलणे आवश्यक आहे..!!*


*त्यासाठीचा एक साधा उपाय हे 👇करून पहा..!!* 


शांत बसा, एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा..!!


ज्यावेळी ही हालचाल समजते त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो तो चांगला श्वास, गुड ब्रेथ..!!


असा गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल?? 


*अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच - दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे.!!*


फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा ...

इंद्रधनुष्य

 *_🍁 एक अतिशय सुंदर कथा. मानसिक तणावात असलेल्या स्त्री ची... अन् तिला समजावणा-या डाॅक्टरची...._*


*एकाकी इंद्रधनुष्य!* 🌈


💫🪐💫🪐💫🪐💫


"काही दोष आहे का डॉक्टर माझ्या शरीरात?"  शांत आवाजात तिनं विचारलं, पण तिच्या कपाळावरच्या फुगलेल्या रक्तवाहिन्या तिच्या मनातल्या तणावाची जाणीव करून देत होत्या.


"अजिबात नाही", मी म्हणालो, "तुमची संपूर्ण शारीरिक तपासणी अगदी नॉर्मल आहे. थोडासा हार्ट रेट जास्त आहे, पण ते कदाचित तुमच्या मनातल्या तणावामुळे असेल".

 

तिच्या मनगटावरच्या जुन्या कापल्याच्या व्रणांबद्दल मी मुद्दामच काही बोललो नाही. आत्महत्येचे प्रयत्न केल्याच्या त्या खुणा होत्या.

 

केवळ चोवीस वर्षांच्या या युवतीला गेले काही महिने सतत डोकेदुखी आणि निद्रानाशाने हैराण केले होते. त्यात आताशा एकदम धडधडणे, भीती वाटणे, घाम फुटणे, अचानक श्वास कोंडणे असे प्रकार सुरु झाले होते. हृदयाच्या तपासण्या अगदी नॉर्मल होत्या.

 

"मग तुम्हाला काय वाटतं? मला वेड लागलं असावं का?" तिनं इतक्या शांत आवाजात विचारलं, की समोरच्याला भीतीच वाटावी. तिच्या डोळ्यातलयी ओल वाढली, आणि हळूहळू त्यात लाली पसरायला लागली. किती विचित्र प्रकार असतो हा, की आपण स्वतःला इतक्या सहज वेडे म्हणू शकतो, पण तेच जर इतर कोणी म्हणालं तर आपण दात ओठ खाऊन भांडायला उठतो!

 

थोडासा तिचा मूड हलका करण्याकरिता मी हसून म्हणालो, "मला भेटणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही किती जास्त किंवा कमी वेड्या आहेत ते मला कळत नाहीये! पण तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला काही खाजगी प्रश्न विचारू इच्छितो".

 

तिनं पर्समधून एक पाण्याची बाटली काढून थोडंसं पाणी पिलं. त्या बाटलीवर एक विचित्र पण सुंदर पेंटिंग केलेलं दिसलं. त्याची रंगसंगती इतकी लोभस होती की तिनं ती बाटली टेबलवर ठेवल्यावर मी काही वेळ ते पेंटिंग निरखून पहात राहिलो.

"विचारा डॉक्टर " ती काही वेळानं म्हणाली.

 

"मला वाटतं तुम्ही खूप मानसिक तणावात आहात. याविषयी बोलण्याची तयारी आहे का तुमची आज?" मी सावधपणे विचारलं.

 

"अवघड आहे ते सांगणं, डॉक्टर! माझं कुणाशी फारसं पटत नाही. म्हणजे मला लोक आवडत नाहीत वगैरे असं काही नाही, पण मला वाटतं की मला फारसं कुणी समजून घेत नाही, माझे विचार वेगळे आहेत, मग मीच सगळ्यांपासून थोडीशी दूर  राहते" ती म्हणाली.

 

"असं सगळ्यांनाच थोड्याफार फरकानं वाटतं" हे मी तिला म्हणणार, तेव्ह्ढ्यातच ती अचानक ताठ बसून, हसून म्हणाली "डॉक्टर, मी तुम्हाला काही खाजगी प्रश्न विचारले तर चालतील का?"

 

हे अवघडच झालं! पण जर तिचा प्रश्न सोडवायचा असेल, तिला बोलती करायची असेल तर हेही करून बघूया, असा विचार करून मी जरासा तिरसटपणेच म्हणालो "बरं, विचारा".

 

"डॉक्टर, तुम्हाला कधी खूप दुःख झालंय का कशाचं? कधी लोकांच्या वागण्याचा खूप त्रास झालाय का?" तिनं विचारलं. 

याचं उत्तर अगदी सोप्पं आहे! जगात कोणीही या प्रश्नांचं "नाही" असं उत्तर देणार नाही, हे मी तिला सांगितलं. "होतो कधीकधी लोकांचा त्रास. दुःखही होतं कधीकधी" मी म्हणालो.

 

लगेच उत्साहानं ती म्हणाली "पण यामुळे तुम्ही बदलून गेला आहात. तुमचा मूळ स्वभाव हा आता दाखवताय तसा मुळीच नाहीये ना? तुम्हाला खूप भरभरून हसायला आवडतं, पण तुम्ही आत्ता हा गंभीरतेचा परका मुखवटा लावून इथे बसला आहात! तुम्हाला आवडत्या लोकांची ताटातूट होण्याची भीती वाटते, म्हणून तुम्ही लोकांना जवळच येऊ देत नाही. 


कदाचित कुणी तुमच्या मनावर खूप ओरखडे काढलेत, जवळ केल्यावर. तुम्हाला प्लास्टिकचा चरचर आवाज अजिबात आवडत नाही. पांढरा रंग तुमचा सर्वात आवडता आहे. तुम्ही खूप स्वाभिमानी आहात, आणि कोणी टीका केलेली तुम्हाला आवडत नाही. 


अतिशय संवेदनशील आहे तुमचं मन, भावनेच्या आहारी पटकन जाण्याची तुमची वृत्ती आहे, पण हे सगळं लोकांपासून तुम्ही खूप खुबीनं लपवता. काहीही झालं तरी कॉम्प्रमाइज न करण्याचा तुम्ही अट्टाहास करता, त्याचा त्रास झाला तर तोही निमूट सहन करता"..

 

बापरे! मी जरासा सावरून तिला मधेच म्हणालो:  "थँक यु, पण आत्ता या वेळी मी तुमचा डॉक्टर आहे आणि तुम्ही पेशंट आहात, तुमचे प्रॉब्लेम आपण सोडवायचा प्रयत्न करूयात, माझ्या स्वभावाचं नंतर बघू". माझा चेहरा मी लगेच "डिफेन्स मोड" मध्ये सेट केला.

 

"रागावू नका, डॉक्टर. फक्त एक शेवटचा प्रश्न विचारते: तुम्ही तणावाखाली असता का नेहमी?"  ती निरागसपणे म्हणाली.

 

"हो, रुग्णांमध्ये इन्व्हॉल्व्ह होणारा प्रत्येकच डॉक्टर अतिशय तणावाखाली जगतो" मी खरं ते तिला सांगितलं.

 

" Exactly तोच माझा प्रॉब्लेम आहे डॉक्टर! मी खूप खूप संवेदनशील आहे. 

नेहमीपेक्षा जरा जास्तच. लोकांच्या भावना मला लवकर कळतात, कुणालाही वाईट वाटत असेल तर मला वाईट वाटतं! ताटातल्या अन्नात मांस असेल तर मला त्या बिचाऱ्या मूक जीवाचं दुःख कळतं, त्याची तडफड जाणवते! त्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी ताकद नाहीये माझ्यात अजून, आणि मला ती नकोय! देवानं मला ही सुंदर जाणिवेची शक्ती दिलीय, पण सगळे मला याविषयी अपराधी ठरवतात.".

 

पुन्हा त्या विचित्र सुंदर बाटलीतून पाण्याचा एक घोट पिऊन ती म्हणाली "मी प्रोफेशनल आर्टिस्ट आहे, डॉक्टर. माझी पैंटिंग्स, क्राफ्ट्स भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. माझा नवरा एका मोठ्या कंपनीत डायरेक्टर आहे, खूप बुद्धिमान आहे, पण त्याला पैसे आणि गुंतवणूक यापलीकडे काहीच सुचत नाही.  तो मला "अपंग"  असल्यासारखा वागवतो, 'being  sensitive  is  the  worst  weakness  in  today's  world' असं त्याचं ठाम मत आहे. 


खरंच, त्याला वाटतं मी वेडी असावी, तो सारखं मला मानसरोग तज्ज्ञांचे सल्ले घायला सांगतो. आम्ही भेटलोही दोन प्रसिद्ध डॉक्टरांना. माझ्यात काही दोष नाही, असं त्यांनी त्याच्या समोर सांगितलं, पण त्याचा काही विश्वास बसत नाही".

 

"त्याचाही दोष नाही. आजकाल जवळपास सगळेच असा विचार करायला लागलेत. एखादी व्यक्ती जरा जास्त सेन्सिटिव्ह, इमोशनल असली, की लगेच ती लोकांच्या थट्टामस्करीचा विषय बनते. माझ्या कॉलेजच्या दिवसांत मी दोन वेळेस 'प्रेम' या शब्दाच्या जादूने भारावून फसले. आता लाज वाटते, पण दुसऱ्यांदा फसल्यावर आत्महत्येचाही प्रयत्न केला मी. सहनच होत नव्हतं त्या वेळेस.


 त्यानंतर मात्र मी कुणातही फार इन्व्हॉल्व्ह होत नाही. लग्न केलं ते त्यानं मागणी घातली, घरच्यांनाही तो आवडला होता, प्रयत्न करूया असं म्हणून. पण तिथेही चुकलं माझं. आता मी पूर्ण वेळ माझ्या आर्ट मध्ये हरवून बसते: पैसे मिळतात म्हणून नाही, तर त्यातून मला oxygen  मिळतो जगण्यासाठी, म्हणून".

 

मी काही तिला थांबवलं नाही. तिचा आजार बाहेर पडत होता हळूहळू!

 

"डॉक्टर, खूप लोकांना न दिसणारी, कळणारी सुंदरता मला दिसते. लोकांना अगदी स्वतःमध्ये असलेले माहित नसतात तेही गुणदोष मला पटकन कळतात. 


माझं जग वेगळं आहे, माझ्या कल्पना वेगळ्या आहेत ते मात्र कुणाला समजत नाही. पैसे, कपडे, जेवण, टीव्ही, राजकारण यांसारख्या गोष्टींत मला कणभरही रस नाही, पण याशिवाय कुणाशीही बोलायची काही शक्यताच नाही! गॉसिप, निरर्थक चर्चा, भंपक आणि वरवरचं कृत्रिम बोलणं आणि वागणं या कचकड्याच्या जगात मी मिसळूच शकत नाही! संगीत, कला, निरागसता, याविषयी मनापासून, पैशाचा, व्यावसायिकतेचा अजिबात संदर्भ न देता बोलणारं कुणी भेटलं, तर मी स्वतःला नशीबवान समजते.. पण असं वाटतं की फारसा कुणाला  विचारच करायचा नाहीये.. सगळ्यांना फक्त रिऍक्ट करायचं आहे, आपापली ठाम मतं मांडायची आहेत".

 

तिचं निदान आता मला कळलं होतं: निव्वळ काळ्या-पांढऱ्याच्या चक्रात अडकलेल्या या जगातलं  ती एक सुंदर, सप्तरंगी एकाकी इंद्रधनुष्य होती!

 

हे काही वैद्यकीय पुस्तकांमधलं शास्त्रीय निदान नाही. पण त्याबाहेरही माणसांचे खूप आकार-विकार आहेत.

 

काही थोड्या, दुर्मिळ लोकांसारखी ती अतिशय वेगळी, जिनिअस या प्रकारात मोडणारी होती. यांचं जगच वेगळं, आणि जगाची त्यांची अनुभूतीही वेगळीच! तरल, सुंदर, भावनांच्या यांच्या जगाची कल्पनाही कमीच लोकांना समजणारी. ज्यांचं अस्तित्वही फार लोकांना माहित नाही, 


कळत नाही, अशा भावभावना, संवेदना यांना कळतात. पण ज्या जगाचे विधिनियम "पाचामुखी परमेश्वर" या तत्वावर आधारलेले  आहेत, त्या "ऍव्हरेज इज नॉर्मल" तत्त्वज्ञानाच्या समाजाला 'वेगळेपण' आणि 'वेड' यातला फरक कसा कळणार? अशा समाजात खूप चांगलं असो अथवा खूप वाईट, दोन्ही "ऍबनॉर्मल", बहुतेक वेळा "वेडेपणा"च समजला जातो!

 

 

काळाच्या पुढे असणारे, समाजाच्या मानाने ज्यांची बुद्धिमत्ता, विचारसरणी आणि आकलनशक्ती या तिन्हींची पातळी फार वरची आहे अथवा वेगळी आहे .अशा लोकांना आपला समाज समजून घेणे तर सोडाच, पण अतिशय विचित्र वागणूक देतो. अशा लोकांना एकाकी पाडले जाते, त्यांच्यावर वेडेपणा, विचित्रपणाचे आरोप केले जातात, त्याची सार्वत्रिक हेटाळणी, थट्टामस्करी केली जाते. असे लोक कधी हैराण होऊन समाजमनाच्या अपेक्षांना बळी पडून त्याचे गुलाम बनतात तर काही स्वतःला खरंच वेडे समजायला लागतात. काही तडजोड करू शकत नाहीत म्हणून आत्महत्या करतात, तर काही आयुष्यभर समाजाशी, त्याच्या गैरसमजांशी लढत राहतात.

 

 

"तुम्ही एकदम नॉर्मल आहात" मी तिला म्हणालो, "तुमचं इतरांशी पटत नाही कारण तुम्ही वेगळया आहात, तुमच्यात इतरांपेक्षा जास्त  चांगलं काहीतरी आहे. अनेक कलाकार, संशोधक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जिनिअस लोकांना असा त्रास होतो. तुम्ही आता फक्त तुमच्या आर्ट कडे लक्ष द्या, लोक काय म्हणतात आणि समजतात याकडे दुर्लक्ष करा. 


अनेक मोठ्या लोकांचं मन, आयुष्य आणि कला त्यांच्यानंतर अनेक दशकांनी समाजाला कळाली. या जगात जसं तत्वाची, नैतिकतेची, आदर्शांची किंवा प्रेमाची भाषा कळूनही न कळणारे लोक आहेत, तसंच वेगळेपण, ओरिजिनॅलिटी देखील सहन न होणारे लोक आहेत. तुम्हाला समजून घेणारं  कुणी भेटलं तर ते तुमचं नशीब समजा, पण  त्यावाचून तुमचं कधी काही अडेल असं मला वाटत नाही. पण जर लोकांनी आपल्याला समजून घेतलंच पाहिजे, स्वीकारलंच पाहिजे असा हट्ट धरला, तर ती मात्र तुमची मोठी चूक ठरेल. मला वाटतं हेच तुमच्या आजाराचं कारण आहे".

 

तिला काही उदाहरण द्यावं म्हणून मी म्हणालो "एखाद्या इंद्रधनुष्याला जर वाटलं की रात्रीच्या अंधारानं आपली तारीफ करावी, तर ते शक्य नाही, कारण रात्रीच्या अंधाराला ते इंद्रधनुष्य कधी दिसतच नाही!".

 

तिला anxiety साठी काही साध्या गोळ्या देऊन मी परत पाठवलं. कौन्सेलर चा नंबर देखील दिला, पण ती नाही जाणार म्हणाली. सुमारे  महिन्याभरानंतर ती परत आली. तिच्या बुद्धिमत्तेचं तेज आणि आधीचाच सुंदर चेहरा यात आता एका उत्फुल्ल, प्रसन्न हास्याची भर पडून ती अगदीच वेगळी दिसत होती. एक गिफ्ट बॅग तिनं माझ्या हातात बळेच खुपसली.

 

"तुमच्यासाठी मी स्वतः बनवून आणलीय.. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की माझी ती पेंटिंग वाली वॉटर बॉटल तुम्हाला खूप आवडलीये. तशीच आहे, पण पेंटिंग वेगळं आहे.. तुम्हाला आवडेल असं" ..

 

उत्सुकतेनं न राहवून मी ती वॉटर बॉटल बॅगमधून काढली, आणि दंगच झालो. फार सुंदर रंगसंगती केली होती तिनं! त्या वॉटर बॉटलवर एका बाजूला एक सप्तरंगी इंद्रधनुष्य होतं, आणि दुसऱ्या बाजूला गर्द निळ्याशार  रात्रीवर चमकणारी चंद्रकोर होती.

 

"त्या दिवशी मला तुमच्या त्या उदाहरणातल्या  रात्रीची दया आली. बिचारीला कधीच इंद्रधनुष्य बघायला मिळत नाही.. म्हणून मी तिला ही चंद्रकोर दिलीय!" 


गूढ पण गोड हसत ती म्हणाली.

 

डॉ. राजस देशपांडे 

न्यूरॉलॉजिस्ट -Pune


*धन्यवाद ☞*

संकलन

*प्रा. माधव सावळे*




🍁🍁🍁🍁🍁🍁

Friday, March 21, 2025

सुंदर उत्तर!

 किती सुंदर उत्तर!

 दोन "पिढ्या" मधील तुलना....... प्रत्येकाने जरूर वाचा 👌👌


 एका तरुणाने त्याच्या वडिलांना विचारले:

 "तुम्ही लोक आधी कसे जगत होता? हो??


 तंत्रज्ञानात प्रवेश नाही

 विमाने नाहीत

 इंटरनेट नाही

 संगणक नाहीत

 नाटके नाहीत

 टीव्ही नाहीत

सिनेमा नाही

 हवाई बाधक नाहीत

 गाड्या नाहीत

 मोबाईल फोन नाहीत?"


 त्याच्या वडिलांनी उत्तर दिले:

 "आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याप्रमाणे -


भक्ती नाही

ज्ञान नाही

संत माहित नाहीत

ग्रंथ माहित नाहीत

शांती नाही

संयम नाही

धर्मनिष्ठा नाही

कुळधर्म-कुळाचार नाही

 प्रार्थना नाहीत

शाकाहार नाही

सण-उत्सव नाही

 करुणा नाही

 सन्मान नाही

 आदर नाही

आदर्श नाहीत

 वर्ण नाही

 लाज नाही

नातीगोती नाहीत

 नम्रता नाही

आरोग्यभान

 वेळेचे नियोजन नाही

 खेळ नाही

 वाचन नाही

सेवा भाव नाही"


 "आम्ही, 1940-1980 दरम्यान जन्मलेले लोक धन्य आहोत. आमचे जीवन एक जिवंत पुरावा आहे:


 👉 खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट घातले नाही.

 👉 शाळा सुटल्यावर संध्याकाळपर्यंत खेळायचो.  आम्ही कधीच टीव्ही पाहिला नाही.

 👉 आम्ही इंटरनेट मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलो.

 👉 आम्हाला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यायलो बाटलीचे पाणी नाही.

 👉 आम्‍ही कधीही आजारी पडलो नाही, तरीही आम्‍ही चार मित्रांसोबत एकच ग्लास ज्यूस शेअर करायचो.

 👉 आम्ही रोज भरपूर भात खात असलो तरी आमचे वजन कधीच वाढले नाही.

 👉 अनवाणी पायी फिरूनही आमच्या पायाला काही लागले नाही.

 👉 आमच्या आई आणि वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर केला नाही.

 👉 आम्ही स्वतःची खेळणी तयार करायचो आणि त्यांच्याशी खेळायचो.

 👉 आमचे आई वडील श्रीमंत नव्हते.  त्यांनी आम्हाला प्रेम दिले, सांसारिक साहित्य नाही.

 👉 आमच्याकडे सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, व्हिडिओ गेम्स, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅट कधीच नव्हते - पण आमचे खरे मित्र होते.

 👉 आम्ही आमच्या मित्रांच्या घरी विनानिमंत्रित गेलो आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला.

 👉 तुमच्या जगाच्या विपरीत, आमचे जवळ जवळ राहणारे नातेवाईक होते त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नातेसंबंध एकत्र आनंदात होते.

 👉 आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये असू शकतो पण त्या फोटोंमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी आठवणी सापडतील.

 👉 आम्ही एक अद्वितीय आणि, सर्वात समजूतदार पिढी आहोत, कारण आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्यांच्या पालकांचे ऐकले.

 तसेच, प्रथम ज्यांना त्यांच्या मुलांचे ऐकावे लागले.

आणि आम्ही तेच आहोत जे अजूनही हुशार आहोत आणि तुमच्या वयात असताना कधीही अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता तुम्हाला मदत करत आहोत!!! 

 🌹🙏🙏🌹

Thursday, March 20, 2025

एकदाचे मोकळे......

 मला मोकळ करा...


संपूर्ण राज्याच राजकारण गलिच्छ करून झाल्यावर , पक्ष पक्षात ठेवला नाही, कीं घर घरात ठेवलं नाही, स्वार्थी राजकारणा पायी, राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाची वाताहत करून झाल्यावर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


आधी वेगळा विदर्भ म्हणून सुरवात करून, वेगळा काही करता येणार नाही समजल्यावर मुबंई च महत्व कमी करून, गैर मराठी माणसांना मुंबई मध्ये मोठे करून सुडाच राजकारण करून झाल्यावर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


मुंडे साहेब गेल्या नंतर खऱ्या अर्थाने ज्यांनी भाजपा महाराष्ट्रात वाढवली होती त्यामधील खरे शिलेदार खडसे साहेब, नंतर तावडे साहेब, नंतर पंकजाताई मुंडे साहेबांचा वारसा घेऊन उभी असताना , एका एका नेत्याला आपल्या वाटेतून बाजूला करून, आज स्वतःबरोबर त्यांना देखील संपवून टाकल्यानंतर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


शरद पवार यांचे राजकारण आता संपले आहें असे म्हणून, आता मैदानात कोणी पैलवानच नाही असे जाहीर करून, १०५ जागा जिंकून सुद्धा पवार साहेबांनी मैदान मारून सुद्धा जिरली नसताना, उद्धव साहेब आजारी असताना शिवसेना फोडून कपट कारस्थान करून झाल्यावर हा बाबा म्हणतोय, मला मोकळ करा...


मी पुन्हा येईन, पुन्हा येईन अशी आर्त किंकाळी देऊन... देऊन.., शेवटी दोन पक्ष फोडून आल्यावर सुद्धा , उपमुख्यमंत्री पदच नाशिबी आलं, आणि सरते शेवटी राज्यान या कपटी पणाला नाकारल्या नंतर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


भाजप सरकार सत्तेत आल्यावर भ्रष्टाचारी लोकांना चक्की पिसिंग, चक्की पिसिंग करायला लावणार म्हणताना ७० हजार पुरावे असताना सुद्धा त्यांनाच मंत्रिपद देऊन, त्यांच्या मांडीला मांडी लावून, स्वतः बरोबर त्यांना सुद्धा घेऊन बुडून गेल्यावर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


मुंबई मधील सगळी आंतरराष्ट्रीय केंद्रस्थाने गुजरात ला घालवून, महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार सुद्धा स्वतःच्या डोळ्यादेखत गुजरात ला पाठवून, शेवटी मुंबई महापालिका गिळणकृत करण्यासाठी, म्हणून शिंदेचा वापर करून झाल्यावर त्यांना देखील नेस्तनाबून कराव असा विचार करून झालेली प्लॅनिंग फसल्यावर, तेच शिंदे डोईजड झाल्यावर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


इतकं सगळं कपट कारस्थान करून झाल्यावर महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने मुकुटपने सगळं पाहून घेतले आणिवेळ आल्यावर एकदाच तुमचा कार्यक्रम करून, तुम्हांला मोकळ केल आहे.

      नाही गरज महाराष्ट्राला असल्या कपटणीतीची, या महाराष्ट्राचीं सुसंस्कृत राजकारणाची परंपरा अखंड राहील तुमच्या मोकळे होण्याने, गलिच्छ राजकारणाचा शेवट पण होइल तुमच्या मोकळ होण्याने म्हणूनच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत मोकळे होण्यासाठी...


व्हा एकदाचे मोकळे......


®विवेक जोशी...✒️

Wednesday, March 19, 2025

आज स्मृतीदिन

 ‘काटा रुते कुणाला’ गाण्याच्या निर्मितीच्या वेळचा हा किस्सा आहे. जितेंद्र अभिषेकींना हवं तसं गाणं तयार होत नव्हतं. शांताबाई थोड्या वैतागल्या, त्यांनी अभिषेकींना विचारलं की त्यांना नक्की काय हवं आहे. तेव्हा ..


*आप काटों की बात करते है हमने फुलोंसे जख्म खाये है,*


*आप गैरोंकी बात करते हमने अपनोसें भी जख्म खाये है*


असा एक शेर त्यांनी ऐकवला, आणि शांताबाईंच्या लेखणीतून शब्द उमटले,


*काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी*

*मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे.*


***


हृदयनाथ मंगेशकर आणि शांताबाईंनी काही कोळीगीतं करायची ठरवली. त्यानुसार त्या भागाचा दौरा करून आले.


 त्यानंतर एक महिना शांताबाईंचा काही पत्ता नाही. एक महिन्यानंतर जेव्हा शांताबाई हृदयनाथांना भेटायला गेल्या तेव्हा ते थोडे चिडले. शांताबाई हृदयनाथांच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागल्या आणि सांगितलं की त्यांना नागिण झाली होती. त्यामुळे त्यांना उशीर झाला. 


बरं त्याही अवस्थेत गाणी कोणती लिहावीत तर, ‘वल्हव रे नाखवा हो’ .. त्यात कोळीबांधवांसाठी त्यांनी ‘दर्याचा राजा’ हा सुंदर शब्द वापरला आहेत.


***


*‘हात नका लावू माझ्या साडीला’* हे गाणं शांताबाईंनीच लिहिलं आहे. हे गाणं मंगेशकरांच्या घरात रचलं. पदराची जी किनार असते त्यासाठी शब्द सुचत नव्हता. तेव्हाच कुणीतरी घरात खायला शेव आणली. 


तेव्हा *‘तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला’* या ओळी प्रकटल्या. 


***


कविता म्हटलं की फक्त प्रेम असं नाही. प्रेमकवितांच्या प्रांतात शांताबाईंनी मुशाफिरी केलीच पण त्याबरोबर लहान मुलांसाठीही *‘किलबील किलबील पक्षी बोलती’* सारख्या सुंदर कविता आणि गाणी रचली. 


गणेशोत्सवाच्या काळात हमखास ऐकू येणारी *‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्री गणराया’* ही गाणी शांता शेळकेंच्या लेखणीतून अवतरली आहेत. घरून निघताना आठवणारे *‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’* हे गाणंही त्यांचीच देणगी. या गाण्यातली *‘ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे’* ही ओळ आली की हमखास डोळ्यात पाणी येतं आणि आपण शांताबाईंपुढे नतमस्तक होतो.


नाट्यसंगीत, लावणी या गीत प्रकारातही शांताबाईंनी आपला ठसा उमटवला आहे. 


*प्रतिभा हा शब्द थिटा पडावा अशा दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई अर्थात ‘शान्ता.ज.शेळके’ यांचा आज स्मृतीदिन.*


*शांताबाईंना शतश: नमन.*


🙏💐🙏💐🙏

Tuesday, March 18, 2025

परमार्थ

 *🌹!! श्रीराम समर्थ !!🌹*


*हर्दा येथील रामाचें मंदिर फार चांगलें चालत असून लोकांना तें एक विश्रांतिस्थान झालें होतें. इंदूरचे महादेवभट रामाचे पुजारी असून पूजा, नैवेद्य,  नंदादीप, उत्सव व आलेल्याला अन्नदान यांसाठीं मंदिराला शेतें लावून दिलून होतीं. थोड्याच कालांत मंदिर फार लोकप्रिय झालें .

 श्री महाराज इंदूरहून हर्द्यास आले. येथे त्यांचा दीड दोन वर्षें मुक्काम झाला. हा सर्व काल फारच आनंदांत गेला, आणि त्या प्रांतांतील पुष्कळ लोक भगवंताच्या कामाला लागले. 

वर्धा येथेंच श्री न.चिं. केळकर हे श्री महाराजांना भेटले. केळकरांचे वडील आणि वडील बंधु अनुग्रहीत होते. कांग्रेसचें अधिवेशन संपल्यावर पुण्यास परत हातांना श्री केळकर दोन दिवस हर्द्यास राममंदिरामध्यें राहित होते. हातांना एका माणसापाशी ते बोलले कीं,  "आम्हाला तुमचा परमार्थ कांहीं कळत नाहीं, पण श्री महाराज हे फार पोलिटिकल (राजकारणी) आहेत एवढें मात्र मी खात्रीनें सांगूं सकतों".*


         *वाईची एक बाई काशीयात्रेला गेली होती. यात्रा आटोपून परत येतांना चंद्रग्रहण आलें म्हणून गंगास्नान करण्याकरिता ती प्रयागला उतरली. 

 ग्रहणाची पर्वणी संपवून ती बाई निघाली आणि हर्द्याला आली, तेव्हा श्री महाराजांच्या चेहऱ्याकडे बघून आश्चर्यांनें ती म्हणाली, "अगबाई ! या बाबांना तर काल मी प्रयागला गंगेच्या वाळवंटामध्यें पाहिले !" कोणी म्हटले,  "महाराज काल इथेंच होते". त्यावर ती बाई म्हणाली, "तें मला माहिती नाहीं. पण यांना मी काल प्रयागमध्यें नक्की पाहिलें"

 हें सर्व ऐकून श्री महाराज बोलले, "बघा, भाऊसाहेब , मी इथून कुठें गेलों का?  पण लोक उगीच कांहीतरी उठवितात!" असें बोलून मोठे अर्थपूर्ण हंसले.*


*!! श्रीराम जयराम जय जय राम!!*


*प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*

Monday, March 17, 2025

शुद्ध आत्मा

 पु.श्री.रामकृष्ण म्हणाले " ज्ञान बाहेरच्या दिवाणखान्यापर्यंत जाऊ शकते. भक्ती अंतरमहालात जाते. शुद्ध आत्मा निर्लिप्त आहे. विद्या आणि अविद्या दोन्ही त्यांत आहेत. पण तो निर्लिप्त आहे. वायूला कधी सुगंध येतो,तर कधी दुर्गंध येतो; पण वायू स्वतः निर्लिप्त असतो. व्यासदेव यामुनेच्या पार जायला निघाले होते. गोपीही तिथे येऊन हजर झाल्या . त्यांनाही पलीकडे जायचे होते. दही दूध लोणी वगैरे विकायला त्या निघाल्या होत्या. परंतु नाव नव्हती. 

कसे काय करावे या विचारात सगळ्या होत्या. अशावेळी व्यासदेव त्यांना म्हणाले की मला खूप भूक लागली आहे. तेव्हा त्या गोपी त्यांना सर्व खवा साय लोणी वगैरे सारे खाऊ घालू लागल्या. व्यासदेवांनी सारे सर्व खाल्ले. हे सगळे आटोपल्यावर मग व्यासदेव यमूनेला संबोधून म्हणाले की ' हे यमुने मी जर काही खाल्ले नसेल तर तुझे पाणी दुभंगेल आणि मधल्या वाटेने आम्ही चालत जाऊ.' आणि अगदी तसेच झाले. यमुना दुभंगुन गेली. मध्ये पैलतीरी जाण्याची वाट झाली. 

त्या रस्त्याने  व्यासदेव आणि गोपी असे सगळेजण चालत पलीकडे निघून गेले. ' मी खाल्ले नाही ' असे जे व्यासदेव म्हणाले याचा अर्थ हाच की ' मी तोच शुद्ध आत्मा आहे ' शुद्ध आत्मा हा निर्लिप्त आहे - प्रकृतीच्या पलीकडे आहे. त्याला क्षुधा तृष्णा नाही, जन्म मृत्यू नाही . तो अजर अमर आहे, सुमेरुवत आहे."

Sunday, March 16, 2025

छप्पन

 छप्पन (५६) या संख्येला मराठी भाषेत वेगळेच महत्त्व आहे. समजा माझे आणि एखाद्याचे भांडण झाले तर, तो किंवा मी असे म्हणतो की, 'अबे जा बे ...तुझ्यासारखे छप्पन पाह्यले .  'माझ्याही मनात हा प्रश्न आला होता की,'छप्पनच का? पंचावन्न किंवा सत्तावन्न का नाही?' 

शंकानिरसनासाठी मी, मराठी भाषेच्या एका प्रसिद्ध, ज्येष्ठ साहित्यिकाला भेटलो. ते मला म्हणाले की, "संत नामदेवांनी ज्ञानेश्वरी संबंधाने लिहिलेल्या ओव्या तू वाचल्या आहेस का?"

"हो. एकतरी ओवी अनुभवावी  तेच ना?'" मी उत्तरलो. 

"बरोबर. त्यात एक ओळ आहे. 'केलासे छप्पन भाषांचा  गौरव'. अर्थ असा की ज्ञानेश्वरीत मराठी भाषेतील छप्पन भाषांमधील शब्द आलेले आहेत. त्यांच्या काळात मराठीच्या छपन्न बोली होत्या. वऱ्हाडी, झाडी, मालवणी, कोंकणी, अहिराणी, माणदेशी, अशा अनेक परंतु छप्पन बोली होत्या. आता एक लक्षात घे. छपन्न प्रकारच्या बोली बोलणारे छपन्न प्रकारचे समाज. प्रत्येकाची रीतभात वेगळी, वृत्ती वेगळी, व्यवहार वेगळा! अशी छपन्न प्रकारच्या मनोवृत्तीची माणसे होती. म्हणून 'तुझ्यासारखे छपन्न पहिले असे म्हणण्याची पद्धत आली."

ते पुढे म्हणाले, " छपन्न प्रकारचे समाज म्हणजे स्वयंपाक करण्याच्या छपन्न रीती .म्हणून 'छपन्न भोग'. छपन्न प्रकारचे नैवेद्य. समाजात एखादी बाई खूप भांडकुदळ, वचवचा बोलणारी, उठवळ स्वभावाची असेल तर ,तिला 'छप्पन टिकल्यांची आवा 'म्हणतात. म्हणजे सर्व छपन्न प्रकारच्या  समाजात जाऊन आपल्या नावाचा दगड पडून आलेली."

पुरुषोत्तम पाठक यांनी  वर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मला जे आठवले ते पाठवले . 

नाना पाटेकरच्या चित्रपटाच्या  "अब तक छपन्न' या शीर्षकामागीलही कारण हेच असेल काय?


Prakash Edlabadkar

Friday, March 14, 2025

आत्मवृत्त

 *कानाचं आत्मवृत्त*


जुळे आहोत आम्ही, सांगत होते दोन कान 

पाहिलं नाही एकमेकांना, मर्यादीत आम्हा मान  ॥१॥


कळत नाही आम्हा, विरुद्ध दिशा का ठेवलयं 

समजत नाही नक्की, आम्ही वाकड काय केलयं ॥२॥


दु:ख नही एव्हढेच, जबाबदारी फक्त ऐकण्याची

शिव्या असो वा ओव्या, शिक्षा शांत राहण्याची ॥३॥


खुंटीगत वागवतात, नेहमी अडकवण्यासाठी आम्हा

काळजी डोळ्यांची, जणू काही केला आम्ही गुन्हा ॥४॥


दोन डोळ्यांच्या कमतरतेशी, आमचा काय संबंध?

कान नाक घसा, अमुचा जुना खासा अनुबंध ॥५॥


अभ्यास मुले करत नाहीत, पण लाल होतो आम्ही

गुरुजींची सटकते, अन पिळलो जातो आम्ही ॥६॥


बिकबाळी, डुल, कुडीसाठी आम्हा टोचायचं 

सुन्दर दिसूनही कौतुक आमचं, कधी नाही करायच ॥७॥


डोळ्यासाठी काजळ अन चेहर्यासाठी क्रिम

आमच्या नशिबी एकही नाही, एखादी चांगलीशी स्किम ॥८॥


 तारिफ़ होते प्रेमात, डोळ्यांची अन गालांची

विसरतात आम्हा जणू, जोडी काय ही कामाची ॥९॥


घाई होते जेव्हा, अन कानावरी पडे जानवे

टेलरची पेन्सिल नाहीतर हेडफोन सांभाळणे ॥१०॥


झाली जरी करमणूक तुमची, अमुच्या जीवावर 

टवकारुनी धर्म पाळतो, काही पडता कानावर ॥११॥


श्रवणशक्तीने यतार्थ झालो, आम्ही कानसेन

आम्हीच निवडतो, लाखातला योग्य तानसेन  ॥१२॥


अनिल ताटके

Thursday, March 13, 2025

आमोर फाटी

 *AMOR FATI - नशिबावरचा विश्वास* ✴️ 🌼


 शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय.

याचा अर्थ आहे "नशिबावरचा विश्वास". 


आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते... अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे... अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे. 


थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला.  त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती. 

एडिसनने त्याला कशी प्रतिसाद दिला असेल असे वाटते?

"अरे देवा, काय हे... माझं नशिबच फुटकं... माझी सगळी मेहनत वाया गेली... " अशी?

की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?

पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला "अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही"

स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला "आग लागली हे बर झालं माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या."


आमोर फाटी खऱ्या स्वरुपात स्विकारणे म्हणजे काय, याच हे उदाहरण म्हणता येईल - नशिबात असलेली गोष्ट आनंदाने स्विकारणे. 

६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.


मी या आमोर फाटी कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकत मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकत आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही.  प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.


# कदाचीत तुमचा जाॅब गेला असेल,


# कदाचीत तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,


# कदाचीत तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तिला असाध्य रोग झाला असेल,


# कदाचीत तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,


# कदाचीत आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,


तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता याला आमोर फाटी म्हणतात.




_संकलन_

*प्रा. माधव सावळे*



म्हातारपण

 !!  म्हातारपण काय आहे  !!

 ! नक्की शेवट पर्यंत वाचन करा !


*_समर्थांनी दासबोधात फार सुंदर वर्णन केलं आहे. त्यांनी ऋणानुबंध हा शब्द घातलेला हे आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे  संबध कींवा बांधला गेलेला. तर महाराज याच्यावर सांगायचे की तुमचं देणंघेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकाविषयी ऋण फीटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. आपलं एकमेका विषयी काहीतरी देणंघेणं असल्या मुळे एकमेकांना मदत करुन ऋण फेडता._*


*म्हातारपण फार चमत्कारिक आहे. तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. परंतु तेच जर आपण व्यवहारातच जर राहीला तर अवघड आहे. नामस्मरण कींवा काही साधन जर तुम्ही तारुण्या पासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं मग पुढे सुखदुःखात त्याला नामाचीच/त्या साधनाचीच आठवण राहील.*


_*म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे. शरीरातील  जीवन शक्ती कमी होते. बसलेले उठवत नाही. उठलेले झोपवत नाही. अंगातली कर्मशक्ती क्षीण होते. बरोबरचे लोक मरण पावतात. तेव्हा माणूस विचलित होतो.*_


*म्हातारपणी जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर फार अवघड आहे. कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नामसाधनाची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं. तेच जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फारच कठीण आहे.*


*म्हणून  भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणायचे एखादी कपड्याची फॅक्टरी आहे आणि त्यात कपड्याला कलर लावायला एक माणूस पूर्वी असायचा. त्याला डायिंग मास्टर म्हणतात.*

*त्याने एकदा कपडा रंगवला की संपलं. परत तो कपड्याचा रंग बदलता येत नाही.*


*तसे माणसचे वय एकदा पंन्नास पंच्चावन्न च्या पुढे गेलं की संपलं. या वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही. आणि म्हणून लहानपणा पासूनच कींवा तारुण्यात च साधनेची आवड पाहीजे नाहीतर कठीण आहे. _माझ्या मते तारुण्याचे कींवा समजायला लागलेल्या वया पासूनच्या कर्माचं रीझलटंन्ट म्हणजे म्हातरपण आहे._*


*कारण जर तुम्ही नीट वागला, चांगल्या कामाची सवय कींवा साधनेचा व्यासंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं. जास्त कष्ट पडत नाहीत. म्हणून जीवनात शिस्त, चांगुलपणा, साधनेची आवड, परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात. आपण म्हणतो म्हातारपणी पैसा असल्यावर कींवा समाजात मान असल्यावर घाबरण्याचे कारण नाही पण खरं तसं नाहीये.*


*याचं उत्तम उदा. पुढे देत आहे. एकदा लोकमान्य पुण्याला  बंडगार्डन मध्ये फीरायला गेले होते. तेथे डॉ.भांडारकर पण आले होते. सकाळची वेळ होती. दोघांची एकमेकां कडे दृष्टादृष्ट झाली. लोकमान्यांना ते पुर्वी शिकवायला होते. लोकमान्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाया पडले. तेव्हा भांडारकरांनी त्यांना लगेच ओळखलं नाही. कोण रे तू असे त्यांनी विचारल्यावर मी बाळ गंगाधर टिळक असं टिळक म्हणाले. तेव्हा भांडारकर म्हणला अरे तु अत्ताच थकलास. लोकमान्य त्यावेळी ५९-६० वर्षाचे होते. ते शांत उभे राहिले. व म्हणाले आपण भाग्यवान अहात. की आपल्याला येवढं जीवन मिळालं.*


*तेव्हा भांडारकर म्हणाले की तु चुकतोयेस. अरे म्हातारपण सुखाचं नाही. शाररीक दुःख, मानसिक दुःख व आपल्या पोरबाळांची दुःख पण सहन करावी लागतात. आणि म्हणून महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या समजत्या वयातच आपलं ध्येय ठरलेलं असावं. म्हणजे मग त्या ध्येयाच्या दृष्टीने पावलं टाकली जातात.*

*मग त्यामुळे माणूस सुखदुःखात पण दुःखीकष्टी होत नाही. म्हणूनच खरंतर आपणच आपले चांगले मित्र वा शत्रू आहोत. उगीच मुलाबाळांसह बायको कींवा नातेवाईकांवर आवलंबून राहणे उपयोगाचे नाही. माझा गुरु हेच माझं धेय्य असावं व त्यांनी सांगितलेले साधन हा मार्ग.*


*मग काय सर्व अलबेल होईल यात शंकाच नाही. भगवदगीतेत भगवंतांनी तेच सांगितलेले आहे की सतत चांगले कर्म करत रहा कींवा, तुमच्या कर्मात मला घाला म्हणजे नामात रहा म्हणजे तो खरा कर्मयोगी होय. आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा कींवा समाज जागृती. ती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावा नुसार ठरवावे.*


*निंबाळ सांप्रदायाचे हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांना एकाने विचारले की तुम्ही नुसते नाम घेत बसता त्यापेक्षा समाजकार्य का करीत नाही. तेव्हा ते म्हणाले की मी येवढे एका खोलीत बंदिस्त राहून जे नाम करतोय त्यामुळे माझ्या आसपास एक चांगले आवरण तयार होते व त्यामुळे लोकांच बर होत असणारच. या माझ्या साधनेने कुठे वा कुठे तरी फायदा होत असणारच. तो कुणाला व कुठे हे मात्र मी सांगू शकत नाही. पण समाजाचं भलं होत असलंच पाहीजे.*


 खळांची व्यंकटी सांडो, "सत्कर्मे रती वाढो"- 

    *ज्याचा अंतकाळ नामात झाला त्याने जिंकलं. असं महाराज म्हणायचे.*

 कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते . कपडे कितीही साफ व चकाचक असले तरी वाईट आणि मळलेले चारित्र्य लपू शकत नाही .......*

 *जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा . मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात . म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा .काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते . म्हणून शब्दाला धार नको आधार हवा .....*

 *आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजा - पाठ , होम - हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही.....(प्रेषक -र.ल.दे.)


🙏🌹 राम  कृष्ण  हरी  🌹🙏

शास्त्र

 

         श्रीराम,

             अध्यात्म शास्त्र अभ्यासाचे अंतिम फल 'स्वरूप दाखवा गुरूराया || हे असते. किंबहुना संत सांगतात, नरदेह प्राप्त झालेल्या सर्वांचे परमध्येय स्वस्वरूप दर्शन हेच असायला हवे.

          आपले सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय? हे शब्दात सांगता येत नाही. तो अनुभव आहे आणि त्या अनुभवापर्यंत फक्त सद्गुरूच घेऊन जातात. जीवाने मुक्त व्हावं हा त्यांचा संकल्प असतो आणि तशी कृपा ते सगळ्या साधकांवर करीत असतात. 

सद्गुरू कृपा तेचि किली |जेणे बुद्धी प्रकाशली |सद्गुरूंची कृपा समजून घेण्यासाठी आपल्या बुद्धीचा विकास आपणच करायचा असतो. त्यासाठीचे मार्ग सुद्धा सद्गुरू, संत आणि शास्त्रानी सांगून ठेवले आहेत. संपूर्ण श्रद्धेने त्यांना शरण गेल्यास मार्ग आपोआप उलगडत जातात. 

       पण आपले काय होते, थोडा परमार्थाचा अभ्यास सुरु केला आणि त्यातील संकल्पना समजायला लागल्या की लगेच मला स्वरूपाचा कधी अनुभव येणार? असं होऊन जातं. अनुभव ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. आपला शिष्य अधिकार संपन्न कधी होतोय, ह्याची सद्गुरू वाट पहात असतात. समर्थ म्हणतात - ऐक शिष्या येथीचे वर्म |स्वये तूचि आहेसि ब्रह्म | ये विषई संदेह भ्रम धरूचि नको || स्वरूप आहेच, ते कुठेही गेलेले नाही पण अविद्येमुळे आपल्याला त्याचे ज्ञान नाही. 

                            ||श्रीराम ||

Wednesday, March 12, 2025

रंग_चाळीशीचे

 रंग_चाळीशीचे

      परवाच फेसबुक वरती एक वाक्य वाचलं," माणसांच खरं जगणं हे चाळीशीनंतरच सुरु होत.".....विचार केला तर यात तथ्य आहे. कारण बालपण निरागस असतं. जगणं म्हणजे काय? हा प्रश्न तेव्हा नसतोच. तारुण्य हे करिअर,लग्न,मुले यांच्या मागे धावत राहतं. आणि शेवटी चाळीशी कधी येऊन टपकते हे कळतंच नाही. मग  या वयात जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत असलेल्या माणसांना जगण्याचे वेध लागतात. जीवन,जगणं याचे खरे अर्थ उलगडू लागतात. राग,लोभ,अपेक्षा यांचे फायदे,तोटे समजू लागतात. याचं वयात भावनांवर थोडा ताबा येऊ लागतो. समाधान,शांती याचं गमक समजू लागतं. स्वतः:साठी देखील जगायचं असतं याची जाणिव होऊन माणूस आयुष्यातील काही क्षण स्वतः:साठी राखीव ठेऊ लागतो. दिवाळीचे पदार्थ संपत आल्यावरच ते जास्त खावेसे वाटतात ...अगदी तसंच आयुष्याचं असतं....ते संपत येत असत...आणि तेव्हाच ते खूप जगावस वाटतं. कारण आयुष्याच्या याच टप्प्यावर या क्षणभंगुर आयुष्याचा अर्थ कळायला लागतो. आपलं आयुष्य हे आपल्यासाठी ही जगायचं असतं....इतरांकडून अपेक्षा करत राहण्यापेक्षा स्वतः:कडून अपेक्षा करुन आनंदी रहायचं असतं....रुसवे,फुगवे सोडून छान प्रेमाने रहायचं असतं.रागावर नियंत्रण ठेवून स्वतः:चं मानसिक आरोग्य जपायचं असतं...आणि जगताना या जगात आपण आणि आपलं आरोग्य हेच खूप महत्त्वाचं असतं. हे सारं याच वयात समजायला लागतं. आणि म्हणूनच माणसाला उरलेलं आयुष्य स्वतः:साठी ,स्वतः:घ्या इच्छापूर्तीसाठी  जगायचं असतं. मनात खोलवर अनेक स्वप्नं गाढलेली असतात. ती पुन्हा जगायची असतात.लोकं काय म्हणतील? हा प्रश्न आता तसा बोथट झालेला असतो. आता फक्त पैलतीर दिसत राहतं. म्हणूनच मरण्याआधी राहून गेलेले क्षण पुन्हा खुणावत राहतात. आणि म्हणूनच चाळीशीचे रंग सुंदर आणि स्वच्छंदी वाटतात......तेच पुन्हा नव्याने खुलू पाहतात. त्यांचं त्या़ंच एक आकाश त्यांना गवसतं.त्यात ते पुन्हा नव्याने विहरत राहतात. त्यांचे त्यांचे थवे तयार होतात.आणि पुन्हा ही गद्य चाळीशी नवा रंग उधळत राहते...त्यांच्या क्षितिजावर....

हो...हे असं व्हायलाच हवं. तऱच जगणं सार्थकी लागतं. या वयात थोडं व्हावं मोकळं...जबाबदाऱ्यांमधून...थोडा मुक्त श्वास घ्यावा....आणि जगावं बेधुंद होऊन....शेवटी मृत्यु अटळच आहे ना! मग तो येण्याआधी घ्यावं की जगून! मला इथे गुलजार यांची एक शायरी आठवते...,

"जो लम्हा साथ है,उसे जी भरके जी लो...कम्बख्त ये जिंदगी,भरोसे के काबील नहीं....

अगदी खरं आहे. जगताना आपण कशाच्या मागे धावतोय,किंवा धावायला हवं हेच माणसाला लवकर कळत नाही. आणि कळलं तरीही अनेक जबाबदाऱ्या त्याला विळख्यात बांधून ठेवतात. आणि म्हणूनच अनेक सुंदर क्षण हातातून निसटून जातात. म्हणूनच रंग चाळीशीचे समजून घ्या. शांत,निरपेक्ष राहून या सुंदर सृष्टीचा,क्षणांचा आनंद घ्या. असं म्हणतात की, वयाला हरवायचे असेल तर ,आपले छंद जिवंत ठेवा. मित्रांना जपा,त्यांच्यासोबत वेळ घालवा. याचं वयात अनेक आजार झडप घालायला येऊ पाहतात. पण जर का आपण चाळीशीचे रंग ओळखून उत्साही जगणं निवडलं ...तर हे आजारही घाबरून पळून जातात. या वयात रागावर नियंत्रण यायलाच हवं. स्वतः:ला जे जे वाटतं ते ते मस्तपणे करता यायला हवं.अर्थात हे सारं सकारात्मक ,आनंद देणारं आणि इतरांना हानी न पोहोचवणारं असावं.जाता जाता इतकंच...

रंग चाळीशीचा उधळून द्यावा...

जगण्याचा उत्सव समजून घ्यावा.

मी सुखी आहे

 समजा, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं की तु सुखी आहेस का? काही जणं आनंदाने हो म्हणतात पण काहींना दुःख लपवून चेहरा हसरा ठेवून सांगावे लागते मी सुखी आहे. अनेकदा परमेश्वर आपल्या संयमाची खूप परीक्षा घेतो. मला तरी असे वाटते की आपण जे ठरवतो ते प्रत्यक्षात घडले नाही की मनाला समजवावे लागते हे आपल्यासाठी नव्हतेच. जे आपल्याला हवं आहे ते मिळे पर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे. अनेकदा, नाती सांभाळण्यासाठी वाद टाळावे लागतात. आपण कितीही योग्य असलो तरी केवळ घराच्या सुखासाठी तडजोड करावीच लागते. कारण, प्रत्येक वेळी उत्तराला उत्तर देणे हा पर्याय योग्य नसतो. म्हणून तर व.पुं.नी खूप छान विचार व्यक्त केला आहे, " चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतिक आहे.." 

 प्रत्येक स्त्री पुरुषांना व्यथा या सतावत असतातच. दिवसभर थकून आल्यावर झोपताना लगेच डोळा लागत नाही. कारण, कोणती ना कोणती व्यथा ही मेंदू पोखरतच असते. अशा वेळी गरज असते ती व्यथा समजून घेणाऱ्या व्यक्तीची. पण त्या व्यथांची गंभीरता ही जर लक्षात आली तरच त्यावरचे उपाय समोर येतात नाहीतर आपण सांगितलेले दुःख हे किरकोळ आहे असे दिसले तर अजून एकाकी वाटते. मग परत व.पु. म्हणतात ते पटते, " आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा. आपल्या व्यथा स्वतःला जेवढ्या तीव्र वाटतात तेवढ्याच त्या इतरांना मामुली वाटतात. हेच एकटेपण, पोरकेपण.." आपल्या हृदया जवळची व्यक्ती जेव्हा कायमची आपल्याला सोडून जाते तेव्हा देखील मनावर संयम ठेवणे गरजेचे असते. कारण, मागे राहिलेल्यांना आधार देण्यासाठी खंबीर बनावं लागतं. 

 प्रोब्लेम काय हो पैसा, मनुष्यबळ यामुळे सुटतात देखील. समाजात आज अशी अनेक लोकं आहेत जे रोज या व्यथांशी सामना करत असतात. कितीतरी वेळा या व्यथांचा अक्षरशः कंटाळा येतो आणि डोळे पाणावतात. पण रडणं सुध्दा वाईट नसते. व.पु.च म्हणतात, " रडणं म्हणजे दुबळेपणाचे लक्षण नव्हे.." आज हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती ना कोणती तरी व्यथा, किंवा एखादी भळभळती जखम ही असणारच. पण त्यांचा विसर हा जरी पडला तरी जेव्हा ते आठवते तेव्हा मन त्या स्मृतीं मध्ये जाते. तरीही आयुष्य थांबते का? तर नाही. उद्याचा दिवस हा आजच्या दिवसांपेक्षा नक्कीच चांगला असेल ही आशा असते.. पुन्हा व.पु. म्हणतात तसं, " सायंकाळच्या संधी प्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.."

विठ्ठल

 *🙏वारी!🙏*


आषाढी एकादशीसाठी वारीची लगबग सुरू झाली की मला हमखास आठवतात ते डॉक्टर गोडबोले. 

मध्यंतरी काही वर्ष माझी बदली पुण्यात झाली होती. तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख झाली होती. 

डॉक्टर गोडबोले हे पुण्यातील एक प्रथितयश डॉक्टर. 

कर्वे रोडला त्यांचं हॉस्पिटल होतं. 

आणि डेक्कनला बंगला. 

प्रॅक्टिस जोरात चालली होती. 

आमची ओळख गेल्या चार वर्षातलीच. 

या भागात राहायला आल्यावर सकाळी फिरायला जाताना आमची ओळख झाली. 

दोघांना फोटोग्राफीची आवड असल्यामुळे मैत्री जुळायला वेळ लागला नाही. 

माणूस एकदम उमदा.  

एवढा यशस्वी डॉक्टर असूनही 

अहंकाराचा स्पर्श नाही. 

एकदम डाऊन टू अर्थ म्हणतात तसा. 

त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला. 

एकदा आईला त्यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करावं लागलं. 

त्यावेळी या माणसाला 

अजून जवळून पाहता आलं. 

हसत खेळत, मिश्किल टिप्पण्या करत आलेल्या पेशंटचा अर्धा आजार पळवून लावत ते. 

हॉस्पिटल मध्ये 

दोन बेड राखीव ठेवले होते. 

अगदी गरीब रुग्णांसाठी. 

उगीच महागड्या चाचण्या नाही. 

अव्वाच्या सव्वा बिल नाहीत. 

सगळ्या रुग्णांशी सारख्याच आपलेपणाने वागणारे डॉक्टर बघताना त्यांच्या बद्दलचा आदर दुणावला. 

वर्षभर काम करणारे डॉक्टर आषाढीच्या वारीसाठी आवर्जून सुट्टी घेत. 

हॉस्पिटलची जबाबदारी दुसऱ्या डॉक्टर मित्रावर सोपवून ते आपली गाडी, दोन सहाय्यक आणि औषधांचा साठा घेऊन वारीच्या मार्गावर निघत. 

जिथे जिथे वारीचा मुक्काम आहे तिथे जाऊन थांबत. 

गरजूंवर मोफत उपचार करत. 

शेवटच्या मुक्कामावरून शेवटचा वारकरी निघाला की पंढरीच्या दिशेने हात जोडून ते परतीच्या प्रवासाला लागत. 

या दिवसात ते वारकऱ्यांबरोबर राहत. 

त्यांच्यात बसून जेवत खात. 

गप्पा मारत. 

हे सगळं मला 

त्यांच्या मदतनिसाने सांगितलं. 

म्हणून यावेळी मी डॉक्टरांबरोबर वारीला जायचं ठरवलं. 

फोटोग्राफीसाठी येऊ का असं विचारल्यावर त्यांनी चला की म्हणून परवानगी दिली. 


माऊलींच्या पालख्या पुण्यातून बाहेर पडल्यावर आम्हीही गाडीतून निघालो. 

गप्पांच्या ओघात मी म्हणालो, 

"डॉक्टर तुमचं खरंच कौतुक आहे. 

इतक्या निस्वार्थ बुद्धीने लोकांची सेवा करायची ते ही स्वतःचे सगळे उद्योग सांभाळून हे सोप्पं नाही. 

परत या कानाची त्या कानाला खबर नाही. 

खरंच ग्रेट आहात तुम्ही!" 

डॉक्टर हसले. म्हणाले, 

"यामागे काही कारण आहे. 

तुला इच्छा असेल तर ऐकवतो." 

मी म्हणालो, 

"सांगा ना डॉक्टर. 

मला खूप उत्सुकता आहे." 

डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. 

"दहा वर्षांपूर्वी मी असा नव्हतो. 

प्रॅक्टिस चांगली चालली होती. 

भरपूर पैसा कमवत होतो. 

फार्म हाऊस, फ्लॅट अशा गोष्टींमध्ये गुंतवत होतो. 

हॉटेलिंग,  परदेश वाऱ्या, मोठ्या गाड्या अशा तथाकथित स्टेटस सिम्बॉलच्या मागे धावत होतो. 

फोटो काढायचे. 

त्यांचं प्रदर्शन भरवायच. 

वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळालेली बक्षिसं मिरवायची. 

आणि आनंद साजरा करायला पार्ट्या करायच्या हे आयुष्य होतं माझं. 

अशातच डोक्यात आलं 

वारीच्या मार्गावर फोटो काढावेत.  

माझा महागडा कॅमेरा घेऊन 

मी गाडी घेऊन निघालो. 

रस्त्यात अनवाणी चालणारे, पावसात भिजणारे, मुक्कामाच्या ठिकाणी गप्पा मारत जेवत बसलेले वारकरी, 

असे वेगवेगळे फोटो काढत होतो. 

ते वारकरी माझ्याशी 

गप्पा मारायला बघायचे. 

मला त्यांच्यात जेवायला बोलवायचे. 

भजनाला बोलवायचे. 

पण त्या गरीब फाटक्या माणसांमध्ये मिसळण माझ्या स्टेटसला शोभणार नव्हतं. 

मी त्यातल्या त्यात एखादं 

चांगलं हॉटेल बघून जेवायचो. झोपायचो. 

अशाच एका मुक्कामी मला 

*आबा पाटील* भेटले. 

सगळ्या वारकऱ्यांसोबत जेवत, 

गप्पा मारत, अभंग म्हणत त्यांच्या बरोबरीने पडतील ती कामं करत होते. 

मी फोटो काढत असताना 

ते माझ्याजवळ आले. 

स्वतःचं नाव सांगून मला जेवायचा आग्रह करू लागले. 

मी झिडकारून लावल्यावरही 

न रागावता माझ्याशी बोलत राहिले. 

पण मी फार प्रतिसाद दिला नाही. 

नंतरही अधून मधून 

ते भेटत राहिले मला. 

शेवटच्या वाखरी गावाच्या अलीकडे पोचेपर्यंत धुंवाधार पाऊस सुरू झाला. आणि गावाजवळ माझी गाडी बंद पडली. 

मी पावसात उभा राहून 

काही करता येतय का ते बघितलं. 

पण गाडी काही सुरू झाली नाही. 

मी मात्र चिंब भिजलो होतो. 

शेवटी कॅमेरा गाडीत ठेऊन गाडी लॉक केली आणि धावत गावाकडे निघालो. 

गावातल्या एका देवळात जाऊन थांबलो. 

कपडे पूर्ण भिजलेले आणि बॅग गाडीत. 

त्यामुळे तसच ओलेता बसून राहिलो आणि व्हायचं तेच झालं. 

थंडी वाजून ताप भरला.  

गावाकडे यायच्या नादात कपडे औषधं सगळंच गाडीत राहिलं. 

तसाच कुडकुडत बसलो होतो. 

तेवढयात आबा पाटील देवळात शिरले. 

माझी अवस्था 

बघून माझ्याजवळ आले. 

म्हणाले कपडे तरी बदलून घ्या. 

म्हटलं गाडीत आहेत. 

तर म्हणाले चावी द्या घेऊन येतो. 

पण विचार केला कोण 

कुठला अडाणी माणूस हा !  

याला गाडीची चावी कशी देऊ ? 

त्यांना माझे विचार कळले असावेत. 

त्यांनी त्यांच्या गाठोड्यातला 

सदरा आणि धोतर काढून दिलं. 

म्हणाले हे घाला. ओले बसू नका. 

मी नाईलाजाने कपडे बदलले. 

त्यांनी त्यांच्याकडची 

तापाची गोळी दिली. 

मी जेवलो का याची चौकशी केली. 

मी काही खाल्लं नाही म्हटल्यावर त्यांनी त्यांच्याकडच्या शिध्यामधून थोडा तांदूळ काढला. 

मागच्या बाजूला आडोसा बघून बाकीच्यानी चूल पेटवली होती. 

त्यातच विनंती करून थोडी पेज बनवली आणि मला आणून दिली. 

खाऊन गोळी घेतल्यावर 

मला थोडं बरं वाटलं. 

पाटील बाजूलाच बसून राहिले होते. 

आता मला 

त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली. 

कुठे राहता काय करता वगैरे विचारून झाल्यावर म्हणालो किती वर्ष वारी करताय? 

तर म्हणाले आई बापाच्या कडेवर बसायचो तेव्हापासून. 

एक वर्षही वारी चुकवली नव्हती त्यांनी. 

माझ्या आत्तापर्यंतच्या वागण्याची मलाच लाज वाटायला लागली होती. 

त्यांची क्षमा मागून त्यांना म्हणालो, 

“मी तुमच्याशी नीट बोललोही नाही आणि तरी तुम्ही न रागावता माझ्यासाठी एवढं केलंत.” 

ते हसले आणि म्हणाले, 

“आज साठ पासष्ट वर्ष वारी करतो आहे. अशा कारणांवरून रागावलो तर ही सगळी वर्ष फुकट गेली म्हणायची. 

वारीला यायचं ते नुसतं पांडुरंगाला भेटायला नाही. ते तर कधीही येऊ शकतो. 

*इथे माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातला देव दिसतो.* 

*माणसं कळायला लागतात.* 

*आपण कुठे आहोत ते समजतं.* 

*एकमेकाशी गप्पा करताना लोकांची दुःख कळतात.* 

*मिळून मिसळून एकमेकाच्या मदतीने काम करायची सवय लागते.* 

*दुसऱ्याला सांभाळून*

*कसं घ्यायचं हे कळतं.* 

*वारी म्हणजे*

*माणुसकीची शाळा असते.* 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 

*अहंकार गळून जातो.*

*मी कोणीतरी मोठा आहे खास आहे ही भावना मनात रहात नाही.* 

आणि माऊलीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हाच अहंकार सोडून जायचं असतं ना ! 

*इथे सगळे एकमेकांना देवा किंवा माऊली हाक मारतात.* 

*दुसऱ्या जीवामधल्या देवत्वाची जाणीव सतत मनात जागी रहाते.* 

*आणि मग आपोआपच नम्रपणा येतो अंगात.”* 


त्यांचं हे बोलणं ऐकून 

मी खजील झालो होतो. 

आता परत 

ताप चढायला लागला होता. 

घरी जाणं गरजेचं होतं. 

पण गाडी चालवायची 

ताकद माझ्यात नव्हती. 

आबांनी खिशातून मोबाईल काढून एक फोन केला. 

मग मला म्हणाले रात्रीपर्यंत व्यवस्था होईल घरी जायची. 

मी आश्चर्याने त्यांच्या तोंडाकडे बघतोय हे बघून ते म्हणाले 

माझा मुलगा येतोय गाडी घेऊन. मी म्हणालो, 

“तुमच्याकडे गाडी आहे ?” 

ते हसायला लागले. 

म्हणाले, 

तीन आहेत. 

भली मोठी शेती आहे. 

फळबागा आहेत. 

एक मुलगा आणि सून डॉक्टर आहेत. 

गावातच  प्रॅक्टीस करतात. 

दुसऱ्या मुलाने शेतीचा अभ्यास केला आणि आता शेतात नवेनवे प्रयोग करतो. 

तो आल्यापासून पिकं जोमदार येतात. फळं पण बाहेरच्या देशात पाठवतो तो”. 

माझं तोंड अजूनच वासलं. 

*एवढं सगळं असूनही तुम्ही या लोकांबरोबर राहता खाता?* 

ते म्हणाले, 

*“अहो माझ्यासारखे कितीतरी असतील या वारीत. स्वतःचं मूळ विसरायचं नसेल तर माणसानं वारीला नक्की यावं”*

रात्री गाडी आली. 

मी निघालो तसे तेही माझ्याबरोबर गाडीत बसले. 

मी म्हणालो, 

“अहो उद्या तुम्हाला दर्शन 

घ्यायचं आहे पांडुरंगाचं. 

तुम्ही कशाला येता. 

वारी अर्धवट राहील तुमची. 

पांडुरंग रागवेल.” 

तसे खोखो हसत म्हणाले, 

*“अहो देव आहे तो.* 

*रागवायला तो काय माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा?* 

मुलगा गाडी चालवेल. 

तुम्हाला काही लागलं तर कोण बघेल? म्हणून येतो. 

आणि दर्शनाच म्हणाल तर 

*तुम्हाला अडचणीत एकटं सोडून घेतलेलं दर्शन मला आणि माझ्या पांडुरंगालाही आवडायचं नाही.* 

तुम्ही निर्धास्त रहा.

मला पुण्याला सोडून माझा फोन नंबर घेऊन ते बाप लेक लगेच घरी निघाले. 

आग्रह करूनही थांबले नाही. 

दोन दिवसांनी त्यांचा फोन आला. 

माझ्या तब्येतीची चौकशी करून म्हणाले, 

*“तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला फोन केला. मुलाच्या नव्या शेतात विहीर खोदताना पांडुरंगाची मूर्ती मिळाली. आषाढीलाच. तुम्हाला टोचणी राहील मला दर्शन घेता आलं नाही याची म्हणून सांगायला फोन केला.”* 

मी स्तब्ध झालो. 

*त्या एका वारीनी माझं आयुष्य माझी मतं संपूर्ण बदलून टाकली.*

माझ्या विचारांची मलाच 

लाज वाटायला लागली. 

तेव्हापासून मी बदललो. 

आणि दरवर्षी वारीत जाऊन त्या सगळ्या भक्तांमध्ये मिसळायला लागलो. 

*जेवढी जमेल तेवढी लोकांची सेवा करायला सुरुवात केली.”*


डॉक्टरांची गोष्ट ऐकून मीही भारावलो. 

नकळत पांडुरंगाला हात जोडले. 

बाजूने जाणाऱ्या वारकऱ्यांचा टाळ चिपळ्याच्या तालातला जयघोष कानावर पडला. 

 *विठ्ठल विठ्ठल !!*

*विठ्ठल विठ्ठल !!*


*आपणा प्रत्येकाच्या जीवनात कठीण प्रसंगी पांडुरंग हजर असतोच, आणि याची जाणीव आपल्याला काही काळानंतर होत असते!*

🙏🌿🛕🌿🙏

नामस्मरण

 *नामस्मरणाने देहबुद्धि जाते*

(हृदय आठवणी:  संकलन आनंद पाटील)


*उकसान गावच्या एका माणसाला महारोग झाला. योगायोगाने*

*श्रीमहाराजांशी त्याची गाठ पडली. श्रीमहाराजांनी त्याचेकडून*

*साडेतीन कोटी जपाचे उदक सोडवले व गोंदवल्यास राहण्यास*

*सांगितले. त्याने सहा वर्षात जपसंख्या पूर्ण केली. जसजशी जपसंख्या पूर्ण होऊ लागली* *तसतशी त्या माणसाची व्याधि झपाट्याने कमी होऊ लागली. आपण लवकरच रोगमुक्त होणार असे त्याला वाटू लागले.*


 *एके दिवशी तो श्रीमहाराजांना म्हणाला, 'महाराज, आपल्या*

*कृपेने मी आता पूर्ण बरा होणार असे मला वाटू लागले आहे. पण मी जो साडेतीन कोटी जप केला त्याची पुण्याई खर्ची घालून माझा रोग मला बरा व्हायला नको आहे.* *माझा देहभोग भोगून संपवायला मी तयार आहे.' त्याचे हे बोलणे ऐकून श्रीमहाराज फार प्रसन्न झाले व म्हणाले, ‘नामस्मरणाने* *माणसाच्या वृत्तीमध्ये आमूलाग्र बदल होतो व त्याला वैराग्य प्राप्त होते, याचे हे धडधडीत उदाहरण आहे.' त्या*

*माणसाकडे वळून श्रीमहाराज बोलले, 'उत्तम चाकरी केली म्हणजे दिवाळीला पगारवाढ तर होतेच, शिवाय मालक दिवाळीचे काही बक्षीसही देतो. तुमच्या उपासनेवर राम खुष होऊन दिवाळीच्या बक्षिसाच्या पोटी तुम्हाला व्याधिमुक्त करीत आहे.

 त्याचा स्वीकार आनंदने करावा.नामस्मरणाने तुम्ही जी पुण्याई संपादन केली ती अबाधित राहिली आहे.*

Tuesday, March 11, 2025

सिद्ध

 श्री.रामकृष्ण परमहंस म्हणाले "सिद्ध" कुणाला म्हणावे ? ज्याचे चैतन्यमय विशुद्ध आचार विचार भगवंताने आपल्या कृपादृष्टीत सामावून घेतले व जो सर्वार्थाने परिपूर्ण आहे असा साधक सिद्धपुरुष ठरतो. पूर्णपणे उमललेले कुठलेही फुल सिद्ध असू शकते. त्या उमलण्यात कृतज्ञता व परोपकारी वृत्ती अशा दोनच गुणांचा अतूट संगम असल्याचे आपण पाहतो. फुलाफुलातील वैविध्य मात्र एकमेव उद्देशाने , भगवंताची सृष्टी फुलकीत करण्याचे अभिवचन देते. फुलांच्या या निसर्गदत्त अवतारात मनुष्यत्वाचीही मनोधारणाही दडलेली आहे. मनुष्य आणि पुष्पजीवनात एक नैसर्गिक साधर्म्य आहे ते म्हणजे स्वतःचे गंधगुण ईश्वरसेवेत व परोपकारार्थ झिजविणे या परिसातून दोघांनाही सिद्धी मिळते हे नक्की. फुलांकडे जीवन ते मनुष्याकडे जीवनपद्धती आहे. फुलांचे जीवन स्वयंभू तर मनुष्याचे इच्छावर्धी. कठोर तपस्येतून त्यांनी भगवंताकडून वरसिद्धी मिळवलेल्या असतात. अत्यंत निग्रही मनोवृत्ती, निर्मळ अंतःकरण व निस्सीम भक्ती ही सिद्ध पुरुषाची प्रमुख लक्षणे मानावीत.

प्राजक्त

 झाडावरुन प्राजक्त ओघळतो,  त्याचा आवाज होत नाही,  याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही'...  "प्राजक्त" किंवा "पारिजातक"  किती नाजुक फुलं..!  कळी पूर्ण उमलली की, इतर फुलझाडांप्रमाणे फुल खुडायचीही गरज नसते. डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रु ओघळावा, तसं देठातुन फुल जमिनीवर ओघळतं.  *"सुख वाटावे जनात,* *दुःख ठेवावे मनात"*  हे या प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं.  एवढसं आयुष्य त्या फुलांचं..! झाडापासुन दूर होतानाही गवगवा करीत नाहीत.  छोट्याशा नाजुक आयुष्यात आपल्याला भरभरुन आनंद देतात.  आणि केवळ आपल्यालाच नाही तर  आपल्या कुंपणात लावलेल्या झाडाची फुलं शेजारच्यांच्या अंगणातही पडतातच की.   खरंच... ! माणसाचं आयुष्यही असंच... एवढसं... क्षणभंगुर प्राजक्तासारखं... ! कधी ओघळून जाईल माहीत नाही.  आज आहे त्यातलं भरभरुन द्यावं हेच खरं...!!

Monday, March 10, 2025

ईश्वराची..

 श्रीस्वामी समर्थ  महाराज अक्कलकोट. 

 लेखांक -७.

 लेखांक- सातवा.

 ************************ 

 श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात त्यांनी नामस्मरणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. तू अनन्यभावाने माझी सेवा कर, मी तुझा योगक्षेम चालविल या शब्दांचा पुनरुच्चार करून स्वामींनी नामस्मरण म्हणजेच  अखंड माळ ,नामजप, नामतप, नामयोग व  भक्ती सतत चालू ठेवावी हाच महाबोध सांगितला आहे. तुम्ही जेवढे नामस्मरण कराल तेवढीच तुम्हाला ईश्वराची प्रचिती मिळेल. " भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे त्यांचे आश्वासनही नामजप करताक्षणीच तुम्हाला आठवते व तीच तुमच्या भक्तीची पराकाष्ठा आहे.  ‘वडाच्या पारंब्या तुम्ही धरून बसा ’ हे त्यांनी का बरे सांगितले असावे? तर या सांगण्यातील मथितार्थ असा की, वड हे अखंडत्वाचे प्रतीक आहे. हे झाड वाढते, मोठे होते व त्या झाडाचा अतिकाय मोठा वृक्ष होतो व त्यास अनेक पारंब्या फुटतात. त्या पुन्हा जमिनीत रुजतात. त्याचा पुन्हा वृक्ष होतो. ही अखंडत्वाची खूण श्री स्वामींनी सांगितली असावी. सद्गुरूंकडून नामोपदेश मिळून सबीज ,दिव्य , संजीवन अशा नामाचे बीज साधकाच्या अंत:करणात रुजते, वाढते व विस्तार होतो तो ही केवळ नामोच्चाराच्या सतत उच्चाराने होतो ही गोष्ट येथे लक्षात ठेवली पाहिजे.

श्री स्वामी समर्थ महाराजांची  हळुहळु पूर्ण भारतभर किर्ती पसरली व त्यामुळे महाराजांकडे नाना धर्माचे अशिक्षित, सुशिक्षित लोक अक्कलकोट येथे येऊ लागले. ह्यांत जिज्ञासू , अतिथी तसेच श्री स्वामी यांची परीक्षा घेणारे लोकही येत असत. श्री स्वामीं महाराजांकडून प्रत्येकास त्याचे अचूक उत्तर मिळे. निरनिराळ्या भाविक लोकांबरोबर श्री स्वामी महाराज त्यांचे भाषेत बोलत व जिज्ञासूंचे समाधान करीत. 

श्री स्वामी समर्थांच्या येणाऱ्या भक्तांत परमार्थमार्गात उन्नती करून घेण्यासाठी येणारे भक्त फार थोडे होते. श्री हरिभाऊ (स्वामी सुत) हे श्री स्वामींचे भक्त ह्यांनी त्यांच्या प्रथम भेटीतच श्री स्वामी समर्थांच्या  सानिध्यात येण्याकरीता त्यांनी आपला मुंबईतील आपला संसार आवरता घेतला. स्वत: चक्रपाणी व त्यांच्या सौ. वैराग्य संपन्नावस्थेत घराबाहेर पडले. त्यांनी चांदीच्या पादुका तयार करून श्री स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून कामठीपुरा (मुंबई) येथे मठ स्थापन केला. श्री स्वामी सुतांनी श्री स्वामी चरित्रावर काव्य केले आहे. श्री स्वामीसुत हे श्री स्वामींच्या हजेरीतच श्रावण वद्य १ ह्या दिवशी पंचतत्त्वात विलीन झाले. श्री स्वामी समर्थ महाराजाचे दुसरे निस्सीम भक्त  " श्री बाळाप्पा महाराज " हे होते.  ते धारवाड जिल्ह्यातील हावेरी या गावचे राहणारे होते.ते आपल्या घरी सावकारी, व्यापार वगैरे उत्तम रीतीने करीत होते.पण एके दिवशी बाळप्पांच्या  मनातही वैराग्याची भावना जागृत झाली व त्यामुळे त्यांना सद्गुरू कोठे भेटेल व मार्गदर्शन करील ही आत्यंतिक तळमळ लागली. त्यावेळी त्यांचे वय केवळ तीस वर्षांचे होते. ते श्री क्षेत्र गाणगापूर येथे आले व  तेथे त्यांनी दोन महिने कडक अनुष्ठान केले. दोन महिन्यानंतर त्यांना असा दृष्टान्त झाला की , " तू अक्कलकोट येथे जाऊन स्वामी सेवा करावी." त्या स्वप्नातील दृष्टांता नुसार ते अक्कलकोटला आले. ते जेव्हा अक्कलकोट येथे आले तेव्हा त्यांना पाहताच श्री स्वामींनी अशी भावना व्यक्त केली की ते दोघेही एकमेकांना साता जन्मापासून ओळखत आहे. त्यांना अत्यंत आनंद झाला व जिवाशिवाची ओळख पटली. श्री बाळप्पा महाराज यांनी श्री स्वामीसेवा एकनिष्ठपणे केली. साधकावस्थेत त्यांच्या दैवी सामर्थ्याची प्रचिती येई. श्री स्वामी समर्थांचे निर्वाणानंतर ते ३२ वर्षे हयात होते.

💐 प्रस्तुती व निवेदन :-

 श्री वामन रूपरावजी वानरे.

 

अनुमान

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*



*परमार्थात  अभिमान  आड  येतो .*


शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत; इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. 

या दोन्ही गोष्टींत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणार्‍याला सद्‍गुरु म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्‍गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. 

आपण भगवंताला शरण जात नाही, कारण आपला अभिमान या शरण जाण्याच्या आड येतो. गंमत अशी की, व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून, ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा, अशी आपली कल्पना असते. 

पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही, मग 'परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही' हे म्हणणे लबाडीचे आहे. 'प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला ?' असे काहीजण विचारतात.

 प्रपंच सचोटीचा असला, तरी त्यात अभिमान असेल तर तो परमार्थ होणार नाही. 'राम कर्ता' म्हटल्याशिवाय, म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय, परमार्थ नाही साधणार. 'मी देही' म्हणू लागलो यात अभिमान आला.

 देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. 'माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू ?' असे वाटते. जो या वासनेचा खून करतो, तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती, ती जन्माला कारण होते. हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले, पण प्रचीतीने हे सर्व जाणावे.


बायकोपोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही, म्हणून बुवा झाला; मठ केला. लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला ! छप्पर गळू लागले ते नीट करण्याची काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केले ? असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचात राहिलेले काय वाईट ! 

थोडक्यात म्हणजे, परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही. जगातले आपले समाधान अगर असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. 

परमार्थात महत्त्व, बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून, वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे.


*१५६ .   परमार्थाला  कोणतीही  परिस्थिती  चालते .   आपली  वृत्ती  मात्र  स्थिर  असली  पाहिजे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, March 9, 2025

अवतारी पुरुष

 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट. 

 लेखांक -८.

 लेखांक - आठवा.

**********************

 श्री वामनबुवा वामोरीकर हे श्री स्वामींचे एकनिष्ठ शिष्य होते. श्री गुरुआज्ञा प्रमाण मानून त्यांनी ‘श्री गुरुलीलामृत’ हा ग्रंथ महाराजांचे जीवनावर  लिहिला. श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज आळंदी हे थोर संत योगप्रक्रिया समजून घेण्यासाठी अक्कलकोटात श्री स्वामींकडे आले तेव्हा श्री स्वामींनी त्यांच्या मनातील भाव ओळखून समाधी लावली व त्यांना योग प्रक्रिया समजावली. श्री माटेबुवा, श्री स्वामी समर्थांची कीर्तन करून सेवा करीत असत. एके दिवशी कीर्तन प्रसंगी श्री माटे म्हणाले ह्या भवसागरातून आम्हाला कोणते चरण पार करतील? एवढे म्हणताच श्री स्वामी समर्थांनी आपले चरण पुढे केले. माटेबुवांचे लक्षात आले की, हे चरण आपणास उद्धरतील व त्यांनी कीर्तनात श्री स्वामी समर्थांचे पाय घट्ट धरले.

प्रसिद्ध क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके हे जेव्हा श्री स्वामी समर्थ  महाराजांच्या दर्शनास आलेत, त्यावेळी त्यांनी आपली तलवार श्री स्वामी समर्थांपुढे ठेवली व श्री स्वामींचे हातातून ती प्रसाद म्हणून मिळावी अशी इच्छा करून महाराजांसमोर बसले. श्री स्वामी महाराजांनी ती तलवार झाडावर टांगून ठेवण्यास सांगितली व असे सूचित केले की, तू करीत असलेल्या कार्यात तुला यश येणार नाही. तेव्हा श्री वासुदेव बळवंतांनी ती तलवार आपल्याकडे वापस घेतली. ते त्यानंतर स्वामींना नमन करून गेले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्याविषयी केलेली भविष्यवाणी पुढे खरी झाली. वासुदेव बळवंत फडके यांनी नंतर जेव्हा  त्यांनी बंड केले ते बंड अखेर विफळ झाले.

अगदी सकाळी महाराजांचे भक्त त्यांना स्नान घालीत व त्यानंतर संध्या वगैरे आटोपून मग स्वामी समर्थ फक्त दोन आचमने घेत. नंतर त्यांना लंगोटी नेसवावी लागे. थोडा फराळ घेऊन त्यांना भक्तांचे दर्शनाकरीता बसवीत. श्री स्वामी समर्थ सर्व दर्शनच्छूंच्या मनातील कामना ओळखून त्यांच्या इच्छा पूर्ण करीत. श्री स्वामींची कीर्ती सर्व भारतभर पसरली व बडोदे, इंदोर, ग्वाल्हेर येथील संस्थानीक अक्कलकोट येथे दर्शनास येत. सरदार विंचुरकर आदी सरदार दर्शनास येत. ते स्वामींचे भक्त झाले. श्री स्वामी समर्थांचे समकालीन अवतारी पुरुष, सकलमत स्थापित श्री माणिक प्रभू महाराज, (हुमणाबाद) श्री नरसिंह सरस्वती (आळंदी), श्री जंगली महाराज (पुणे), श्री बीडकर महाराज हे श्री स्वामी समर्थांचे त्या काळातील अगदी जवळचे शिष्य होत. ह्या सर्वांनी त्या काळात तीन वेळा नर्मदा प्रदक्षिणा केली होती. त्याच वेळी जंगलातून जात असता त्यांना सिंहाची डरकाळी ऐकू आली होती व त्याच बरोबर तोच सिंह त्यांचेसमोर अगदी उभा राहिला तेव्हा श्री बिडकर महाराजांना स्वामींनी त्या रूपात दर्शन दिले. त्यांची भीती नष्ट झाली. श्री बीडकर महाराज अक्कलकोट येथे गेले असता श्री स्वामी समर्थांनी त्यांचेजवळ ते करीत असलेल्या किमयेची दक्षिणा मागितली. श्री बिडकर महाराजांना तांब्यापासून सोने करण्याची किमया अवगत होती. त्यांनी आनंदाने सदर किमयेचे उदक श्रीस्वामी समर्थांचे हातावर सोडले. व किमया करणे बंद केले. महाराजांच्या काळातील फाल्गुन वद्य १० रोजी ह्याच स्वामीभक्ताने देह ठेवला.

💐 निवेदन व प्रस्तुती :- 

 श्री वामन रूपरावजी वानरे.

 

धार्मिक संस्कार

 🙏 सुप्रभात माऊली 🙏



🌹आज चे विचार पुष्प 🌹


🚩 *संस्कारकर्मांचा मूळ हेतू.*🚩


*धार्मिक संस्कार फार चांगले असतात, कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते. प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच. ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही; मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो.* खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नसते; पण त्यातल्या त्यात, *संस्कारकर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे. त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे, कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्काराचा मूल हेतू आहे. संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच, पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे, आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत, त्यांना जेवायला बोलवावे.* लौकिक मात्र वाढवू नये. वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्काराचा मुख्य हेतू. *संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. 'आम्हाला बंधने नकोत' असे म्हणणारे लोक वेडे आहेत.* बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे. म्हणून बंधनांना अतिशय महत्त्व आहे. धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात. सध्या बंधने बुडत चालली आहेत. *पूर्वी धर्मावर श्रद्धा होती, म्हणून इतक्या सुधारणा नसूनसुद्धा स्वास्थ्य होते. पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही.* अलीकडे काही लोक असे म्हणतात की, समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत. पण अध्यात्मविद्या असे सांगते की, नीतिचे नियम कायमच आहेत. ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे. एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल, पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल. धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय. धर्म समाजाला संस्काराच्या रूपाने धरून ठेवतो.


व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय; आणि जो परमार्थाला उपयोगी तोच खरा आणि योग्य व्यवहार होय. *भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले, तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते. जग आडवे का येते, तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून, जगाशी वागताना आम्हाला निःस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही. हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निःस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे. त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे, आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे.* जन्माला येऊन काही करणे असेल तर *भगवंताला न विसरता कर्मे करावी, म्हणजे झाले.*


*नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो.*


🙏राम कृष्ण हरी🙏

Saturday, March 8, 2025

दिगंबर

 श्री स्वामी समर्थ महाराज  अक्कलकोट. 

 लेखांक - १.

 लेखांक - पहिला.

*******************

 श्री स्वामी महाराज यांचा जन्म कोठे झाला व केव्हा झाला याबद्दल निश्चित अशी कोणालाही काहीही माहिती नाही मात्र ते अयोनीज जन्मले  हे त्यांच्या चरित्रावरून समजते. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे अश्विन व ५ बुधवार १८५७ ला आले व  त्यांचा प्रकट दिन हा चैत्र शु. २ आहे. ते दिगंबर (अवधूत) वृत्तीने राहत असत. त्यांचा कार्यकाळ हा १८५६ ते १८७८ हा होता. ते दत्त संप्रदायातील होते व  त्यांना श्री दत्तांचे चतुर्थ अवतार म्हणून ओळखले जातात. श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र ग्रंथ हे श्री स्वामी लिलामृत, श्री स्वामी समर्थ सारामृत व श्री गुरुलिलामृत हे प्रामुख्याने आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रमुख शिष्य हे श्री बाळप्पा महाराज, श्री चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती तसेच रामानंद बिडकर महाराज हे होते. त्याच प्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री संत साईबाबा, श्री संत गजानन महाराज शेगाव, श्री संत सद्गुरू हरिबाबा महाराज फलटण व धनकवडी पुणे येथील श्री शंकर महाराज यांच्यावर विशेष प्रभाव पडला.

           श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेतील चौथा अवतार मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे चवदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला हा अवतार पूर्ण केल्यापूर्वीच  ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले व त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन १३७८ ते १४५८ हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन १४५७ च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले व  त्यानंतर ते सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून  पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात. श्री दत्तसंप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज , दासोपंत, माणिकप्रभू, नारायण-महाराज जालवणकर, चिदंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थांनी स्वत:च ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव ‘नृसिंहभान’ असे भक्तांना

 सांगितल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप श्रीदत्ताचे 

‘चौथे अवतारित्व ’ मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले. 

श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. त्यानंतर साडेतीनशे वर्षे गेली व्यतीत होऊन गेल्यानंतर त्यांच्याभोवती एक वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडत असताना  त्याचा घाव चुकला व  तो वारुळावर पडला व तेव्हा पासून त्या वारुळातूनच श्री स्वामी समर्थ महाराज  प्रकट झाले, असे सांगितले जाते. जेव्हा लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा वर त्या वारुळावर पडला त्यावेळी तो वार श्री स्वामी समर्थांचे मांडीवर लागला त्यामुळेच श्री स्वामी समर्थ आपल्या  समाधीतून जागे झाले. महाराजांच्या अक्कलकोट येथील अवतार समाप्ती पर्यंत तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत होता. श्रीस्वामी समर्थ त्यानंतर श्री काशीक्षेत्री प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी नदीच्या तीरावर आलेत. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज  मंगळवेढे गावी प्रकट झाले. ते नेहमी घनदाट अरण्यात वास्तव्य करीत असत. पण कधी कधी क्वचितच मंगळवेढे गावात येत. त्या गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. जेव्हा श्री स्वामी समर्थ  महाराज गावात आले की ते त्यांना भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून ‘श्री’ अक्कलकोट येथे आले तेव्हा त्या वेळी त्यांनी तब्बल तीन दिवस अन्नग्रहण केले नव्हते. ते सरळ त्यावेळी श्री चोळाप्पा यांच्या घरी गेले. श्री स्वामींचे प्रभावी व तेजोमय रूप बघून श्री चोळप्पा यांना श्री स्वामी समर्थ महाराज एक अद्वितीय अवतार स्वरूप आहे असे त्यांना वाटले व म्हणूनच श्री चोळप्पा   यांनी स्वामींना आपल्या घरी नेले. चोळप्पा यांची पत्नीही खूप धार्मिक व सात्विक प्रवृत्तीची महिला होती म्हणून त्या दोघांनीही श्री स्वामी समर्थ महाराजांचे आत्मीय स्वागत करून व त्यांची यथायोग्य पूजा करून त्यांना भोजन दिले. त्याच दिवसापासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळाप्पांचे घरामधे त्यांची सासू पण होती त्यामुळे ती व त्यांच्या घरातील इतर सदस्य चोळप्पा यांना " एक वेडा घरात आणून ठेवला आहे " असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अगदी थोड्याच दिवसात  अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व त्यामुळे अक्कलकोट येथील सर्व स्त्री पुरुष व आजूबाजूच्या गावातील लोक स्वामीदर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती जडली. श्रीस्वामी समर्थ राजवाडयात कधी कधी जात असत तर स्वामींना जर असे वाटले की आपण आता राजवाड्यातच राहावे तेव्हा ते  राजवाड्यातच चारचार दिवस मुक्काम करीत असे. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले तेव्हा ते  खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. (हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एस. टी. स्टॅंडसमोर आहे.) तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली. बालोन्मत्त पिशाच्चवृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. "आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन," असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता व ते अजानुबाहू व उंच होते. असे बरेच दिवस गेले व स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण सुद्धा भ्रमण केले. ते विविध ठिकाणी , विविध नावांनी प्रसिद्ध होते. सुरुवातीला ते मंगळवेढय़ात आले त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले व आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते तेथेच राहिले.  सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जाती धर्माचे , मुस्लिम व इतर बहुजन समाजाचे  लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण कधी कधी वेळा बालक स्वरूपाचे असे तर काही वेळा ते अतिशय रौद्र रूप धारण करीत असत.त्यांनी अनेकांचा लोकांचा व नकली साधूंचा अहंकार दूर केला व अनेक हट्टी कट्टी लोकांना धडा शिकवून त्यांना सन्मार्गाला लावले. ज्यांची जेवढी महाराजांवर भक्ती होती त्याच अनुषंगाने त्यांनी त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा व आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा राज्य कारभार होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. त्यामुळे साधारण जनतेचा इंग्रजांविरुद्ध त्यांनी आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन व इतरही धर्माचे लोक त्यांच्या दरबारात आपली उपस्थिती देत. त्यामुळे त्यांच्या अवती भवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले व परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकर महाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत. स्वामी समर्थांच्या अवतार कार्याची हकिकत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी वर्णिली आहे ती अशी आहे.


अशा भागिरथीच्या तीरी ।

 कर्दलीवना माझारी ।

 स्वामी निजमानसांतरी ।

 ते निर्विकारी चिंतिता ।। 


तपश्चर्च्या करिता करिता ।

 तत्व येऊनिया हाता । 

प्राप्त झाली तदैक्यता । 

नुरले तत्वता देहभान ॥ 


ऐशापरी लोटता काळ । 

अंगावरी जाहले वारूळ ।।

 दिव्य सतेज सोज्वळ । 

देह निर्मळ झालासे ॥ 


ऐसी स्थिती झाल्यावर ।

 काय घडला प्रकार ॥ 

भावे ऐका सादर । 

सौख्यसार तो आहे ॥


 लाकूडतोड्या एके दिनी ।

 सहज आल त्याच वनी ॥

 वृक्षावरी घाव घालुनी ।

 डाहाळी झणी पाडिली ॥


 डाहाळी पडताच सकळ । 

ढासळून गेले वारूळ ।

 फार जुनाट मूर्ती सोज्वळ ।

 बाहेर तत्काळ निघाली ॥


 आजानुबाहू दिगंबर । 

फांके तपोदीप्ति सुंदर ।

 जैसा पूर्णिमेचा निशाकार । 

सर्वसंचार आनंदवी ॥

 (अ. स्वामी लीलामृत, अ.१, ओवी ६ ते १२)

💐 हा लेख निवेदन व प्रस्तुती :-

 श्री वामन रुपरावजी वानरे.