TechRepublic Blogs

Wednesday, December 3, 2025

नामस्मरण

 *जयश्रीराम 🙏🏻*


*सत्संग व साधना*


आपण सर्व साधक परमार्थाच्या वाटचालीत आहोत. परमार्थाच्या या वाटचालीत देवप्राप्तीचे साधन म्हणजे "सत्संग" होय. संताचा भक्तमेळा म्हणजे सत्संग. आपण म्हणतो कधी कधी वाण तसा गुण. हा चांगला गुण येण्यासाठी सत्संग जरूरीचा असतो. सत्संग हा देवाचा, गुरूचा,संताचा  धरावा. या जगात सत्संग सामर्थ्यवान आहे. जेथे दया,मैत्री व विनय ही लक्षणे वास करतात तेथे संत, साधू व सदगुरू यांचा सत्संग लाभतो. त्यांचा सहवास, त्यांची कृपा हा सत्संग होय. सत्संग हा परमार्थाचा पाया आहे ज्यामुळे आपण सर्व साधक परमार्थाची उच्च पायरी जी साधना आहे ती गाठू शकतो. कारण त्यामुळे आपला अहंकार गळून पडतो तर विनय, क्षमा, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान या गोष्टी कडे आपला कल असण्यास मदत होते. 

सत्संगाने मनुष्य देहाची दुर्लभता कळून येते आणि मग त्यातून भक्तीमार्ग जवळ करून ईश्वरप्राप्तीचे ध्येय निश्चित करतो. यासाठी सद्गुरू, परंपरा व साधना याचा  स्विकार करतो व आपली "साधकावस्था" सुरू होते. म्हणूनच साधना मार्गावरचा महत्वाचा टप्पा म्हणजे सत्संग.  

सत्संगाने ईश्वर प्राप्ती होते म्हणून सत्संग स्विकारताना दुःसंगाचा त्याग केला पाहिजे. दुःसंगाचा म्हणजे काय तर परमार्थावर विश्वास नाही, ज्याच्या मनात कायम शंका, द्वेष,अधर्म आहे, बाहेरून विनय आहे पण अंतःकरणात संताविषयी द्वेष आहे याची संगती म्हणजे दुःसंग. हा सगळा दुःसंग सत्संगाने नाश होण्यास मदत होते. 

यासाठी आपल्या वाणीला   नामाचे साधन द्यावे. नाम हे सत्संगाचे खरे स्वरूप आहे. नामस्मरण या साधनप्रक्रीयेत देव व सद्गुरू उपस्थित असतात.

नामस्मरण हाच सत्संग व नामस्मरण हीच साधना !!!


*🚩🍂जय श्रीराम 🍂🚩*


*सौ. निलिमा कुलकर्णी*

Tuesday, December 2, 2025

मुळापासून सुधारणा

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*वेदाप्रमाणे  नामही  अनादी ,  अनंत ,  अपौरुषेय  आहे .*

शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने, आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यांपैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते.

 शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वत: अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की, साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते; आणि तेरा कोटी जप केला असता, भगवंताचे दर्शन होते. मला आपण महत्त्व देऊ नका; पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो, ते ज्ञानेश्वरमहाराज, एकनाथमहाराज, तुकाराममहाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील, हे शक्यच नाही. 

वेदांना जे परमात्मस्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून ‘ नाम घ्या ’ असे सांगितले.


वेद भगवंताचे वर्णन करतात. नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी ‘ हरि: ॐ ’ असते, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि, तसे नाम हे अनादि. जसा वेद हा अपौरुषेय, तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत, तसे नाम हे अनंत आहे.

 प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले, म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहारविहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ॐ चा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की, आपण नाम घेत जावे.

 किंबहुना, आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे.

 आपण नेमके तेवढेच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्याविरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. 

भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, ‘ मी नाम घेतो आहे ’ हे सुद्धा विसरून जा.


*२०३ .  इतर  साधनांनी  लवकर  साधल्यासारखे  वाटेल  पण  ते  तात्पुरते  असते .  नामाने  थोडा  उशीर  लागेल ,  पण  जे  साधेल  ते  कायमचे  साधेल ,  कारण  नामाने  मुळापासून  सुधारणा  होते .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, November 30, 2025

नाम सत

 नामाच्या बाबतीत त्याच्या खरेपणाची जाणीव कां होत नाही ? आपण स्थळ, काळ आणि निमित्त किंवा कार्यकारणभाव ह्या तीन बंधनात वावरतो. नाम हे त्याच्या पलीकडे आहे. नाम घेताना काळाचा विसर पडणे ही पहिली पायरी. नामाला बसला की की बसला कितीवेळ नाम चाललं आहे याचं भानच राहणार नाही. दुसरी पायरी स्थळाचा विसर पडणे. 

या दोन्हीही पायऱ्या साधणे एकवेळ शक्य आहे पण तिसरा कार्यकारणभाव नाहीसा होणे कठीण आहे. मी नाम घेतो, त्यातून अमुक व्हावे , समाधान मिळावे , ज्ञान व्हावे असे काहीतरी राहतेच. नाम घेण्याला काही कारण नाही असे होत नाही.  विचार केला तर माझ्या "असण्याला" काही कारण नाही. 

मी आहे म्हणजे आहे. त्याला दुसरे कारण नाही . माझे असणे सिद्ध करायला दुसऱ्या कशाची जरुरी नाही. मी का जगतो प्रश्न निराळा.त्याचे काहीतरी उत्तर मिळेल. पण मी का आहे याला उत्तर नाही. तसे नाम केवळ आहे. माझे असणेपण जसे मला जाणवते तसे नामाचे असणेपण जाणवणे , म्हणजेच नामाचे नसणेपण कधीही नसणे ही नामाची वास्तव्यता , सत्यता आहे. 

मी जसा जिवंत आहे तसं नाम जिवंत आहे . ते सत आहे तसेच ते चितही  आहे . हा नामाचा वेगळा चैतन्यमय पैलू आहे . नाम सत आणि चित आणि तसेच ते आनंदमय ही आहे. आनंदाशिवाय  त्यात काही नाहीच.

Saturday, November 29, 2025

पर्यवसान

 *🍁🌹!!श्रीराम समर्थ!!🌹🍁* 


*भिकाऱ्याला पैसे द्यावेत का?*


*भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? यासाठी भिकाऱ्याला पैसे देतांना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काहीही न करण्याची बुद्धी होय. तेव्हा भिकाऱ्याची योग्यता आणि आपली कुवत बघून पैसे द्यावेत, पण कधी नाही म्हणू नये.*

*मला जो पैसा मिळतो तो सारा माझ्या श्रमाचा असतो असे नाही. तेव्हा कोणी आपल्याकडे भीक मागू लागला म्हणजे भगवंताने दान करण्याची संधी मला दिली या भावनेने त्याला काही द्यावे. त्याला वाईट बोलू तर नयेच, दिल्याची आठवण राहणार नाही इतकेच द्यावे. देत गेल्याने देण्याची सवय लागते. भगवंताला सर्वस्व देण्यात शेवटी त्याचे पर्यवसान होते.*


*!! श्रीराम जयराम जय जय राम !!* 


*परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*

Thursday, November 27, 2025

 श्रीराम



प्रति, 

प.पू. सद्गुरू श्रीमहाराज

(माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज),


शिरसाष्टांग प्रणिपात.


उद्या गुरू पौर्णिमा आहे. त्यामुळे आपले स्मरण मला होणे अगदीच स्वभाविक आहे. 


आपले एक प्रसिद्ध वचन आहे. *"जेथें नाम, तेथें माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।"* हे वचन माझं तोंडपाठ आहे, परंतु माझी तितकी साधना नसल्याने, मी देहबुद्धीच्या आधीन असल्याने मला या वचनाची अल्पशी अनुभूती देखील नाही. मला गोंदवल्यात यायला आवडते, आपल्या घरचे अन्न (भोजनप्रसाद ) खायला आवडते. आपल्या सहवासात राहायला आवडते. पण तो योग अनेक दिवसांत आला नाही. आज आपली आठवण अनावर झाली, म्हणून हे पत्र लिहीत आहे. हे पत्र प्रातिनिधिक आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात कमीअधिक प्रमाणात माझ्या सारखीच भावना असेल...!


प्रपंच करताना दिवस कसे पटापट निघून जातात ते कळत देखील नाही. कालच गोंदवल्यात जाऊन आलो असे म्हणता वर्ष कधी होत ते लक्षात देखील येत नाही. आम्ही बेमालूमपणे प्रपंचात गुरफटले जात असतो.....


*आपण म्हणता की अनुसंधान ठेवत जा, पण खरं सांगू महाराज, नेमके तेच मला जमतं नाही. सुखाचा प्रसंग आला की मी किती आणि कसा मोठा झालो आहे असे वाटते आणि दुःखाचा प्रसंग आला की मला आपली आठवण येते. आपण मला अनुग्रह देऊन कृपांकित केले आहे, परंतु मला तसे कायम वाटत नाही. माझी देहबुद्धि मला फसवते आणि ती माझ्यावर स्वार होते. सर्व कळलं असं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच येत नाही. मी नामस्मरण या विषयावर खूप छान चर्चा करतो, चांगलं व्याख्यानही देतो, परंतु माझं नामस्मरण किती होतं, हे आपल्याला माहीत आहेच. जो सर्वज्ञानी आहे, त्यापासून काय लपुन राहणार...?*


*मी या पत्रात काय लिहिणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याशी बोलून माझं मन हलकं होतं, म्हणून हा प्रयत्न.....!  आई पुढे चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली की आई जवळ घेते, मायेने कुरवाळते आणि आपलं बाळ 'द्वाड' आहे हे माहीत असूनही म्हणते, बाळ माझं गुणांचं!!!  हे मायेचे बोल ऐकण्यासाठी माझे कान व्याकुळ झालेत हो महाराज!!* आपण अखिल ब्रह्मांडाच्या माऊली आहात. आपल्या मुलाला जवळ घ्या. मी अनेक वेळा चुकतो, करू नको ते करतो , अनेकांची मने दुखावतो, आपल्याला भूषण होईल असे वागत माही. हे सर्व खरं आहे. पण काय करू महाराज, मला सर्व कळतं पण वळत काहीच नाही हो...... आणि जेव्हां कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते....



*श्रीमहाराज, एक करा.... तुम्हीच काहीतरी करा, जेणेकरून मला यातून बाहेर पडता येईल.... प्रपंचाच्या मोहात पडून अधिकाधिक बुडणारा मी, मला फक्त आपला आधार आहे. ज्याला जगाने दूर लोटलं, त्याला आपण मात्र स्विकारले.... आता आपणच माझे मायबाप!!* 


प. पू. श्रीसद्गुरुंच्या समोर कसं बोलावं, कोणता विधिनिषेध पाळावा याचं ज्ञान आणि भान मला नाही. आपण माझ्या माऊली आहात आणि आईशी कसेही बोललं तरी ती माऊली लेकराला समजून घेत असते, साऱ्या जगाने अंतर दिलं, तरी आई कधीच लेकराला अंतर देत नाही. आणि याच भावनेने हे पत्र लिहिण्याचे धाडस मी केलं आहे....! 


या पत्रामागील माझा भाव आपण शुद्ध करून  समजून घ्यावा आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे ही प्रार्थना!!!



आपला,


दासचैतन्य

सूक्ष्मदृष्टी

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                 

              महाराजांना प्राणिमात्रांविषयी विशेषतः गाई बद्दल फार प्रेम होते. म्हसवडच्या बाजारात गाई विकायला यायच्या. भाकड गाई कत्तलखान्यात दिल्या जात. महाराज त्या गाई विकत घेऊन सोडवून आणत व कोणालातरी पाळायला देत असत. किंवा स्वतःच्याच गोठ्यात ठेवत. एकदा कसाही म्हणाले, आम्ही तुम्हाला गाई देणार नाही. पण का? मी पैसे देतो ना? तरी ते कबूल होईना. महाराज ठाम असल्याचे पाहून ते कसाई म्हणाले, तुम्हाला जर गाईं विषयी एवढेच प्रेम आहे तर, तुम्ही गाईंना हाका मारा. त्या जर तुमच्याकडे आल्या तर आम्ही निघून जाऊ. महाराजांनी होकार भरला आणि...

         ते प्रेमाने गाईंना हाकारू लागले... गंगे ये.. गोदे ये... यमुना ये... कृष्णा ये... आणि काय आश्चर्य त्या अनोख्या सर्व गाई महाराजांकडे आल्यात. मुक्या जनावरांनाही कळते प्रेम ही आंतरिक ओढ आहे.

              महाराजांकडे एक लंगडी गाय होती. ज्या दिवशी महाराज तिला दिसले नाही, तिच्या पाठीवरून हात फिरवला नाही, प्रेमाने हाक मारली नाही तर, ती अतिशय व्याकुळ होत असे. तसाच बत्ताशा नावाचा घोडा होता. त्याच्यावरून महाराजांनी रपेट मारली की, त्याला छान वाटत असे. केवढे हे भूतमात्री प्रेम?

              महाराज अबूच्या जंगलातून नर्मदेच्या कडेकडेने माहेश्वरी आले. महाराजांचा अधिकार जाणून सर्वच लोक त्यांना मान देत असत. त्यांचा होत असलेला थाटमाट पाहून तिथल्या दोन मांत्रीकांना वाटले की, यांना काही मंत्र सिद्धी प्राप्त आहे. आपण शिकलो तर आपलेही महत्त्व वाढेल. म्हणून ते महाराजां जवळ येऊन म्हणाले, अहो बुवा, तुमच्या जवळचा मंत्र आम्हालाही शिकवा की! महाराज म्हणाले, माझ्याकडे एकच तेरा अक्षरी मंत्र आहे. मांत्रिकांना खोटे वाटले. महाराज सहजासहजी मंत्र देणार नाही याची खात्री झाल्यावर, ते महाराजांना डोंगरावर घेऊन गेले. व धमकी देत म्हणाले. बर्‍या बोलाने मंत्र सांगा. नाहीतर परिणामला सामोरे जा.

         मांत्रिकाने आपल्या मंत्राने नाग उत्पन्न केले. नागांनी सर्व बाजूंनी महाराजांना बांधून टाकले. तीन दिवस महाराज तसेच बसले. चौथ्या दिवशी मांत्रिक म्हणाले, जीव प्यारा असेल तर, आता तरी खरे सांगा. महाराज म्हणाले, माझे रक्षण करायला राम समर्थ आहे. पण तुम्हाला मात्र आपल्या मंत्राला मुकावे लागेल. त्यांना वाटले हा बुवा उगाच गप्पा मारतो. थोड्या वेळाने महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणून खाली उडी मारली. सर्व साप मरून पडले. मांत्रिकाची विद्या निष्पळ ठरली. तेव्हा ते दोघेही महाराजांना शरण आले. महाराजांनी त्यांना माफ करून अनुग्रह व राममंत्र दिला. एकाला नर्मदा काठी बारा वर्षे तपश्चर्या करायला सांगितली. व दुसऱ्याला बरोबर घेतले.

          काही दिवसानंतर महाराज उज्जैनला आले. तिथे एक समर्थ भक्त  सरकारी अधिकारी होता. त्याने महाराजांना पाहिले. पण विश्वास बसत नव्हता. त्याने परीक्षा पाहायचे ठरवले. त्याचवेळी त्याचा मुलगा विषमज्वराने आजारी पडला. पाचव्या दिवशी त्याचे जास्तच झाले. नाडी सुटत चालली. त्याला कल्पना सुचली. तो महाराजांकडे घेऊन म्हणाला, महाराज, उद्या आपण माझ्याकडे प्रसादाला यावे.

          मध्य रात्रीच्या सुमारास मुलगा मरण पावला. प्रेत तसेच झाकून ठेवले. दुसऱ्या दिवशी महाराज ५०-५५ लोकांसह ११.३० च्या सुमारास त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. पंगती वाढल्या गेल्या. आता जेवायला बसणार, तोच त्या अधिकाऱ्याची बायको मुलाला घेऊन आली. म्हणाली, महाराज, हा रात्रीच गेला असताना आपण अन्नग्रहण कसे करणार?

           महाराजांनी त्या मृत मुलाला मांडीवर घेतले. त्याच्या छातीवर हात ठेवल्यावर म्हणाले, हा तर जिवंत आहे. देवाचे तीर्थ अंगारा आणावला. मात्रा चाटवली आणि आश्चर्य म्हणजे तो मुलगा हालचाल करू लागला.  वातावरण एकदम आनंदित झाले. अधिकाऱ्याने महाराजांना क्षमा मागितली. साष्टांग नमस्कार केला. महाराजांनी त्याला दास नवमीला सज्जनगडावर जायला सांगितले.

         महाराजांवर किती किती प्रकारचे कठीण, कडू प्रसंग आलेत. पण सर्वातून ते सही सलामत पार पडले. हे संत लोक स्वानंदातच मग्न असतात. काहीही झाले तरी, निवारण्यास राम समर्थ आहे याची त्यांना पक्की खात्री झालेली असते. त्यांना एकच ध्यास असतो....

" बुडती हे जण देखावे डोळा। 

  म्हणून कळवळा येतो मज।।"

       त्यांना दुसऱ्यांची दुःख पहावत नाही." जगाच्या कल्याणा संताच्या विभूती " अशी या संतांची वृत्ती असते. महाराजांना सूक्ष्मदृष्टी प्राप्त झाल्याने त्यांना पुढचे मागचे कळत असे. ते कोणालाही क्षमा करीत. 

           महाराज इंदूरला असताना भैय्यासाहेब मोडक राजा तुकोजी होळकरांना महाराजांचे भेटीसाठी घेऊन आले. होळकर वेश पालटून आले. मनी ठरवले जर यांनी ओळखलं तर हा खरा साधू! महाराजांनी तुकोजींना मोठ्या प्रेमाने आपल्याजवळ बसवले.  उपदेशपर गोष्टी सांगितल्या. तुकोजींचा भ्रमनिरस झाला. ते महाराजांना शरण गेले.

          साताऱ्याहून पंढरपूरला जाताना मध्ये गोंदवले लागते. त्यामुळे बरेच लोक गोंदवल्याला मुक्कामी असायचे. त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सर्व व्यवस्था महाराज स्वतः जातीने करीत असत. त्यासाठी मारुती मंदिर व घर अपुरे पडे. म्हणून महाराजांनी मंदिर बांधायचे ठरवले......

        क्रमशः 

संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

Wednesday, November 26, 2025

प्रवचन

 श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन १ व २


ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की, माझ्यापाशी अनुग्रह घेणार्‍यामध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे, तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का ? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे, हे पूर्ण जाणूनसुद्धा मी त्याला रामरूप पाहिला. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही; नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही. तसेच, मी कुणाचे रक्षण करतो आहे असे मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही, ते भगवंताने केले, तिथे मी जगाचे काय रक्षण करणार ? लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात. कारण ती मोकळी असतात; त्यांना बंधन नाही. विद्वानांच्याबद्दल मला आदर आहे, पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्याबद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. तसेच, मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही. एखाद्या मनुष्याला सांगितले की, 'तुझा डोळा घरी ठेवून तू मजकडे ये,' तर तसे त्याला करता येणार नाही; त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की आपण काळजी करायची नाही; परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की, तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी, जे करायचे ते मनापासून करावे, प्रामाणिकपणा सोडू नये, आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खतपाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते. तसे, लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल. मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते; पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही; म्हणून मी ते प्रकट करीत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कुणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझे मन अस्वस्थ होते, आणि नंतर, ही अस्वस्थता कोठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो. माझ्या माणसाने उगाच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की, भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे. 'मी तुमच्याजवळ आहे' असे मी सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून' परमात्मस्वरूप तुमच्याजवळ आहे' असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरिता सर्व काही करतो आहे; तुम्हांला जे काही होईल, ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानीत नाही ? वास्तविक जे जे काही तुम्ही करताहात ते मीच करतो आहे, माझीच तशी इच्छा आहे, असे मनी दृढ धरून वागावे. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धारच होणार.


श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन - २


आशीर्वाद. गेले सात दिवस चाललेला उत्सव पाहताना मला असे खरे वाटते की आता तुम्हांला सांगायचे राहिलेच नाही काही ! ज्याची आपण पूजा‍अर्चा करतो, त्याचा हेतू लक्षात घेऊनच, त्याचे म्हणणे आपल्याला पटले आहे म्हणूनच, आपण त्याची पूजा‍अर्चा करतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या आज जेवढ्या म्हणून अडचणी असतील, ज्या परिस्थितीत तुम्ही गुंतून गेला असाल, ती परिस्थिती कायम ठेवूनसुद्धा, तिच्यात बिघाड न करता, कसे वागावे हेच मी शिकविले - आणि तुम्ही ते आचरणात आणता असा माझा समज आहे, बरे का ! आपल्याला प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी आहे. मनुष्य जन्माला येतो तोच पराधीनतेत येतो, आणि जातो तोही पराधीनतेतच, हे आपण पाहतो. मग, मनुष्य पराधीन असताना, आपण आपली वृत्ती कशी करावी की ज्याने परमात्मा आपलासा करून घेता येईल ?


ज्या गोष्टीची आपल्याला अत्यंत आवड असते तेच आपण भगवंताजवळ मागणार; आणि अत्यंत आवड जर कोणती असेल, तर ज्यात माझा घात आहे तीच आवड मला निर्माण होते आहे, हे आपण पाहतो. म्हणून, मला सांगायचे असेल तर एकच; मी भगवंताजवळ काही मागण्यापेक्षा, "भगवंता, तू दाता आहेस, तू सर्व उचित करणारा आहेस, योग्य तेच करणारा आहेस, तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा, परमात्मा, तुला योग्य वाटेल ते तू दे, " असे म्हणणे जरूर आहे. "ज्यात माझे कल्याण असेल तेच तू करशील यात शंका नाही; मग मी काहीतरी मागून माझ्याच पायावर मी धोंडा पाडून घेण्यापेक्षा, परमात्मा, तू देशील त्यात मी समाधान मानीन," ही हमी आज आपण भगवंताला देऊ या. मागणारा मनुष्य आपली योग्यता बघून मागत असतो. एखाद भिकारी आला तर 'तुमचे घर माझ्या नावे करुन द्या' असे कधी म्हणायचा नाही; तो म्हणेल , 'मला चार पैसे द्या. एकवेळचे अन्न द्या.' हे जसे तो आपली किंमत पाहून मागतो, तसे दाता कितीही मोठा असला तरी आपली किंमत पाहूनच आपण मागणार ! अहो, तो दाता भगवंत म्हणजे कसा, वस्तूशिवाय समाधान देणारा आहे ! म्हणून, "भगवंता तुला आवडेल ते मला दे; मी जसे व्हावे असे तुला वाटत असेल तेच मला दे, " हेच मागणे जरूर आहे.


जगामधे आपण पाहिले तर दोन प्रकारचे भक्त आहेत. एक भक्त तुमच्या-आमच्यासारखा आहे; तो म्हणतो. "भगवंता तू माझा कधी होशील ? तू माझा होऊन रहा, म्हणजे मला कशाची ददात नाही पडायची. " म्हणजे खोटा खटला केला तरी निकाल माझ्यासारखा लागेल म्हणतो ! दुसरा भक्त आहे तो म्हणतो, "भगवंता, आता माझं उरलं नाही काही. आता मी तुझा होऊन राहीन." यातला फरक तुम्हाला कळतो आहे. 'तू माझा हो' म्हणत असताना, 'मी आहे तसाच कायम राहीन, जे जे मला हवं आहे ते ते तू पुरव !' असे म्हणतो; आणि दुसरा म्हणतो, 'रामा, आता तुझ्याशिवाय मला काही नको, आता मी तुझाच होणार !' आपले मन आपल्याला काय सांगते ? आपण कोणत्या भक्तांपैकी आहो ? आपण पहिल्या भक्तांपैकी असाल तर आपल्याला वर जाणे जरूर आहे. "आतापर्यंत परमात्म्या, मी मागितलेले तू पुरवलेस. आता माझे मागणेही थांबत नाही, तुझे देणेही थांबत नाही. मग वासनेच्या पोटीच माझा शेवट होणार असे दिसते ! तर आता, परमात्म्या, एकच गोष्ट कर - आता मागण्याची बुद्धी मला देऊ नकोस. '


परमात्म्यासारखा दयाळू कोण आहे ? लहान पोर आईच्या मांडीवर असताना आईने चमच्यातून काहीही आणले तरी आऽ करून पिते, असे आपण भगवंताजवळ राहिले पाहिजे खास ! त्या मुलाला खात्रीच असते; आपल्याला मारण्यासाठी आई हे आपल्याला काहीतरी देते आहे अशी शंकासुद्धा त्याला कधी येत नाही ना ? तसे, मी म्हणेन, परमात्म्याने ज्या अवस्थेत आपल्याला ठेवले आहे त्या अवस्थेतच समाधान बाळगणे तुमचे-आमचे खरोखर काम आहे.


पण व्यवहाराची संगत तर सुटली नाही, आणि भगवंत तर हवा, या अवस्थेत आपण काही करणे जरूर असेल तर, व्यवहारात प्रयत्‍न करावा, अगदी आटोकाटीने करावा, पण 'फळ मात्र, भगवंता, तुझ्या इच्छेने काय मिळायचे ते मिळू दे,' असे म्हणून त्यात समाधान मानायचा अभ्यास करावा. तरच तुम्हाला साधेल, नाहीतर नाही साधणार काही; आणि हे जो करील त्याच्या मागे परमात्मा उभा राहील.


मनुष्याचे जीवन अती क्षणभंगुर आहे. आपण पाहतो ना ? किती मोठमोठे होऊन गेले, राम-कृष्णादि अवतार झाले, मोठमोठे सत्पुरुष होऊन गेले; कोणत्या ना कोणत्या निमित्ताने का होईना, पण आज ते दिसेनासे झाले, एवढी गोष्ट खरी आहे. पण अशा सत्पुरुषांनी आपल्या बरोबरीचे असे काही मागे ठेवले आहे की ते त्यांच्या बरोबरीने काम करील.

 देहात असताना ते जे काम करीत तेवढेच काम त्यांची सत्ता करील, एवढी शक्ति त्यामध्ये आहे. ते गेले तरी त्यांची सत्ताच काम करते, त्याचप्रमाणे परमात्मा गेला तरी त्याने आपल्याला वरदान देऊन ठेवले आहे; आणि ते जो जतन करील त्याला मी पावन करीन, त्याचा मी होऊन राहीन, असे वचन देऊन ठेवले आहे. त्याने सांगितले, "तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू एक कर. 

अती दक्षतेने प्रपंच कर, प्रयत्‍नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे औषध सांगतो ते घे." आणि ते औषध जर कोणते असेल तर ते भगवंताचे नाम आहे. त्या नामात राहण्याचा खरोखर तुम्ही अभ्यास करा.


इतक्या अट्टाहासाने मी सांगतो आहे - आणि तुम्ही लोक नाम घेत नसाल अशी शंकासुद्धा मला कधी येत नाही, कारण तुम्ही नाम घेत नसता तर इथे येण्याची बुद्धी तुम्हाला झाली नसती; पण तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा - नामाशिवाय जगणे नाही खरे. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. एकदा तरी भगवंताचे नाम घ्या. 

नाम घेत असताना एक दिवस एक नाम असे भयंकर येईल की भगवंत थरारून जाईल, आणि मी सांगतो, तुम्ही असाल तिथे तो उभा राहील खास ! 'कुठे माझा तो आहे' असे त्याला वाटेल. मी सांगतो हे काहीतरी सांगतो आहे असे समजू नका, बरे का ! त्या नामावर विश्वास ठेवून तुम्ही वागा. नामावरची निष्ठा कशी काम करते हे ज्याचे त्यालाच कळेल. तेव्हा, तुम्हाला एकच सांगणे आहे, ही जी पूजा तुम्ही करता, तुम्हाला सांगितलेले आचरणात आणाल तेव्हाच ही पूजा घेतली असे समजा.

 आणि हे जर कराल ना, तर परमात्मा हात दिल्याशिवाय कधी राहायचा नाही. परमात्म्याला तुम्ही-आम्ही दुःखी रहावे असे कधी वाटत नाही. म्हणून परमात्म्याचे होण्यासाठी एकच त्याच्याजवळ मागू. 'तुझ्या नामात प्रेम दे' एवढेच मागू. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्यामागे परमात्मा उभा राहील हे अगदी सत्य, सत्य त्रिवाचा सांगतो बरे का ! आणि इतके जर केलेत तर पौर्णिमा केल्याचे श्रेय तुम्हाला परमात्मा देईल. आता एकच करा, थोडे तरी नाम घेतल्याशिवाय राहू नका. त्याला मोठी क्रिया आणि विधी असतो असे काही नाही बरे का ! आवडीने, प्रेमाने, भगवंताचे नाव घ्या;


॥ जानकीजीवनस्मरण जयजयराम ॥ 

॥ श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोदवलेकर प्रसन्न ॥ 

|| श्रीराम जय राम जय जय राम ||

आनंदरूप

 *॥ श्री गुर्वष्टकम् ॥*

Guru Ashtakam 

(श्री आद्यशंकराचार्यकृत) 



गुरुच्या चरणी विनम्र का झाले पाहिजे याचा उपदेश या स्तोत्रात आचार्य करतात.प्रत्येकाने तो हृदयात धारण करावा असाच आहे.


*'गृणाति ज्ञानं'* आणि *'गिरति अज्ञानं' इति गुरुः*, अशी गुरु शब्दाची व्युत्पत्ती आहे. आत्मज्ञानाचा प्रकाश देऊन अज्ञानाचा निरास करणारा सद्गुरु किंवा भगवान श्रीहरी हा त्या शब्दाचा अर्थ आहे. 


सद्गुरूंच्या अथवा श्रीहरीच्या चरणकमली ज्याचे मन संलग्न झाले नाही, त्याचा जन्म व्यर्थ होय. जन्माला येऊन जे मिळवावयाचे ते जर मिळविले नाही तर त्या जन्माचा आणि वित्त, वैभव, विद्या, कीर्ती इत्यादी इतर गोष्टींचा काय उपयोग? 


म्हणून सद्गुरूंच्या चरणी अथवा श्रीहरीच्या चरणी मन संलग्न करा असा उपदेश आचार्य या स्तोत्रात करीत आहेत. या स्तोत्राचे वृत्त भुजंगप्रयात आहे.


卐卐卐


*-----------------------------*



*शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं,*

*यशश्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम् ।*

*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे,*

*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*

*।।१।।*


शरीर देखणे आहे,तशीच बायकोही पण सुंदर आहे. वक्ता,लेखक,विद्वान्, प्रेमळ नेता, लोककल्याणकर्ता इत्यादी रूपांनी अनेक प्रकारची कीर्ती आहे,पर्वतप्राय धनाच्या राशी आहेत, सर्व काही आहे, पण मन जर सद्गुरूच्या अथवा श्रीहरीच्या चरणकमली संलग्न झालेले नसेल, तर ते सर्व व्यर्थ होय. 

त्याचा काय उपयोग ? 

त्याचा काय उपयोग ?



*कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं,*

*गृहं बान्धवाः सर्वमेतद्धि जातम् ।*

*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्ये,*

*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*

*।।२।।* 


बायको आहे, पैसा आहे, मुले आहेत. नातवंडे पतवंडे वगैरे सर्व काही आहे. बंगले आहेत. आप्त-इष्ट,सोयरे-धायरे इत्यादी सर्व काही झाले आहे, पण सद्गुरूच्या अथवा श्रीहरीच्या चरणकमली मन लागले नाही, 

तर या सर्वांचा काय उपयोग ?

तर या सर्वांचा काय उपयोग ?



*षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या,*

*कवित्वादि गद्यं सुपद्यं करोति ।*

*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे,*

*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*

*।।३।।*


सांगोपांग वेदांचे अध्ययन केले, शास्त्रविद्या मुखोद्गत केली, उत्तम गद्यांची व पद्यांचीही रचना करतो, कवी म्हणून प्रख्यात झाला, पण सद्गुरूंच्या अथवा श्रीहरीच्या चरणी मन जर लागले नाही,तर या सर्व गुणांचा काय उपयोग?

तर या सर्व गुणांचा काय उपयोग ?



*विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः,*

*सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः।*

*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे,*

*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*

*।।४।।*


परदेशामध्ये मान्यता पावला, स्वदेशात धन्य झाला.सदाचाराने वागण्यात आणि नीतिन्यायाने चालण्यात माझ्यासारखा दुसरा कोणी नाही असेही म्हणतो.पण मन सद्गुरूंच्या अथवा श्रीहरीच्या चरणकमली संलग्न झाले आहे काय? ते जर तसे असेल, तर सर्व काही ठीक आहे. नाही तर या सर्वांचा काय उपयोग ?

तर या सर्वांचा काय उपयोग ?



*क्षमामण्डले भूपभूपालवृन्दैः,*

*सदासेवितं यस्य पादारविन्दम् ।*

*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे,*

*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*

*।।५।।*


संपूर्ण भूमंडलाचा अधिपती झाला, सम्राट झाला.राजे-रजवाड्यांनी ज्याच्या चरणकमलांची सर्वकाळ सेवा केली. हे सर्व काही झाले,पण मन जर श्रीहरीच्या अथवा सद्गुरूंच्या चरणकमली संलग्न झाले नसेल तर याचा काय उपयोग?

याचा काय उपयोग?



*यशो मे गतं दिक्षु दानप्रतापाज्जगद्वस्तु*

*सर्वं करे मत्प्रसादात् ।*

*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्म,*

*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*

*।।६।।*


माझ्या दानधर्माने व पराक्रमाने माझी कीर्ती दाही दिशा पसरली. माझ्या कृपेने कोणतीही जगातील वस्तू हस्तगत होऊ शकते! (असे अभिमानाने बोलतो) पण मन श्रीगुरूंच्या अथवा श्रीहरीच्या चरणी झालेले नसेल तर याचा काय उपयोग? हे सर्व व्यर्थ होय. हे सर्व व्यर्थ होय



*न भोगे न योगे न वा वाजिराजौ,*

*न कान्तामुखे नैव वित्तेषु चित्तम् ।*

*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे,*

*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*

*।।७।।*


माझे मन आता भोगात रमत नाही व योगातही रमत नाही. घोड्यांची पागा मनाला रुचत नाही व प्रिय पत्नीचे मुख अवलोकन करीत बसण्यातही

माझ्या मनाला सुख वाटत नाही. वित्तवैभवातही माझे मन रमत नाही. इतके वैराग्य आहे, पण आचार्य म्हणतात, बाबा रे ! तुझे ते मन श्रीहरीच्या अथवा सद्गुरूंच्या चरणकमली तरी संलग्न झाले आहे का ? तसे जर नसेल तर मग हे वैराग्यही काय उपयोगाचे ?

हे वैराग्यही काय उपयोगाचे ?



*अरण्ये न वा स्वस्य गेहे न कार्ये,*

*न देहे मनो वर्तते मे त्वनर्थे ।*

*मनश्चेन्न लग्नं हरेरङ्घ्रिपद्म,*

*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*

*।।८।।*


अरण्यामध्येही माझे मन रमत नाही व स्वत:च्या घरातही माझे मन लागत नाही. कोणत्याही कामात माझे मन लागत नाही. माझा देह इतका सुंदर बहुमोलाचा, पण त्याचीही आसक्ती आता माझ्या मनात उरली नाही. इतका मी विरक्त झालो आहे,असे म्हणतो, पण श्रीहरीच्या चरणी ते मन लागले असेल तर ठीक आहे. नाही तर या वैराग्याचा काय उपयोग?

या वैराग्याचा काय उपयोग?



*अनर्घ्याणि रत्नानि मुक्तानि सम्यक,*

*समालिङ्गिता कामिनी यामिनीषु ।*

*मनश्चेन्न लग्नं हरेरङ्घ्रिपद्मे,*

*तत: किं ततःकिं ततःकिं ततःकिम्* *।।९।।*


बहुमोलाची रत्ने अर्थात् रत्नजडित सुवर्णाचे अलंकार व केवळ रत्नांचेही हार अंगावर आणि गळ्यात घालून त्यांचे यथेच्छ सुख अनुभविले. कांतेच्या सुखात रात्रीच्या रात्री घालविल्या. सगळे काही केले, पण श्रीहरीच्या अथवा सद्गुरूंच्या चरणकमली मन जर संलग्न झाले नसेल तर, त्या सर्व सुखांचा काय उपयोग?

तर त्या सर्व सुखांचा काय उपयोग?



*गुरोरष्टकं यः पठेत्पुण्यदेही,*

*यतिर्भूपतिर्ब्रह्मचारी च गेही ।*

*लभेद्वाञ्छितार्थं पदं ब्रह्मसंज्ञं,*

*गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम् ।।*

*।।१०।।*


मोठ्या पुण्ण्याने नरदेहाचा लाभ झाला असता जो कोणी या गुर्वष्टकाचे पठण करील आणि ज्याचे मन गुरूंनी सांगितलेल्या वाक्यांवर, 'तत्त्वमसि' इत्यादी महावाक्यांच्या अर्थावर संलग्न झालेले असेल, तो कोणीही असो,ब्रह्मचारी असो अथवा गृहस्थाश्रमी असो, तो संन्यासी असो अथवा सम्राट असो,त्याला अभीष्ट असलेले, ब्रह्म या नावाने ओळखले जाणारे, नित्य आणि निरतिशय आनंदरूप असलेले उत्तम पद प्राप्त होईल.


卐卐卐

Tuesday, November 25, 2025

अनुसंधान

 श्रीराम समर्थ


         खोलींतील अंधार नाहीसा करण्यासाठीं अनेक उपाय केले तरी तो तसाच राहातो; पण नुसता एक दिवा आंत आणला कीं तो आपोआप नाहींसा होतो. अगदीं त्याचप्रमाणें अशाश्वत वस्तूंची आवड नाहींशी करण्यासाठीं शमदमासारखीं अनेक साधनें केलीं तरी तीं नाहींशीं होण्यास कठीण पडतें. पण भगवंताच्या स्मरणाचा सतत अभ्यास केला तर आपोआप नको त्या गोष्टी गळून पडतात.* *अर्थात् सामान्य मनुष्यानें आपल्या प्रपंचांत वैराग्याचें बंड वाढविण्याच्या नादीं न लागतां भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास करणें योग्य आहे. भगवंताचें श्रवण, मनन आणि नामस्मरण करणें याचें नांव अनुसंधान होय.*


             --------- *प्रा के वि बेलसरे*

              *********

संदर्भः उपनिषदांचा अभ्यास हे त्यांचेच पुस्तक पान ९१

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Monday, November 24, 2025

शरणागती

 श्रीगुरुपौर्णिमेनिमित्त*

जय जय वो शुध्दे | उदारे प्रसिद्धे 

अनवरत आनंदे | वर्षतिये ||

श्री. ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या गुरूंना पु.श्रीनिवृत्तीनाथ  माउलीला म्हणतात. सुरवातीलाच  गुरुमाऊलींचा जयजयकार करतात. जगात शुद्ध काही असेल तर ती गुरुमाऊलीची , सद्गुरूंची कृपा आहे. त्या कृपेचा आनंदाचा अविरत वर्षाव करणारी ही माऊली उदार आहे आणि प्रसिद्ध आहे. 

वर्षाव शब्द किती छान आहे. उदार कोणाला म्हणायचे तर आपल्याजवळ किती आहे आणि दुसऱ्याला दिल्यावर किती शिल्लक राहिल याचा विचार न करता जो देतो तो उदार. 

ही माऊली उदार आहे म्हणूनच कृपेचा अखंड वर्षाव करते आहे. हा आनंद कधीही न संपणार आहे. गुरुमाऊलीला प्रसिद्ध अशासाठी म्हटले आहे की परमात्मा निर्गुणातून सगुणात येतो सद्गुरुंच्या रूपाने प्रगट होतो प्रसिद्ध होतो. निर्गुण निराकाराला कसे जाणणार ते सगुण साकार होऊन गुरूरूपाने प्रगटते म्हणून प्रसिद्ध. 

पु.श्री.अखंडानंद स्वामी म्हणाले की परब्रह्म सगुण  साकार झाले ही त्याची मानवावर कृपा आहे. एकदा श्रीमहाराज म्हणाले की संतांनी भगवंताला सगुणात आणले हे त्यांचे आपल्यावर मोठे उपकार आहेत. ते सगुणात आले म्हणजे स्थळ काळ निमित्त याच्या मर्यादेत आले. त्यामुळे त्यांचे चरित्र ही भक्तांना सुसेव्य अशी लीला झाली. कृपा ही मेघवृष्टी सारखी आहे. 

आपल्यावर भगवंताची अथवा सद्गुरुनची कृपा व्हावी असे वाटत असेल तर शरणागती पाहिजे. अहंकार मूळ गेल्याखेरीज शरणांगती नाही. आपण दृश्यात म्हणजे आपल्या मनासारख्या गोष्टी होण्यात त्यांची कृपा समजतो. खरी कृपा अंतरंग बदलण्यात आहे.

Saturday, November 22, 2025

गृहकलह

 श्रीराम समर्थः 


*गृहकलह* 


         जीवनातील प्रतेक व्यक्तीला संसारातील मतभेद अथवा वादविवाद या प्रसंगांना कमी आधिक प्रमाणात तोंड द्यावे लागते. कधी नातेवाईक फार जवळचे असतात तर कधी दूरचे असतात. ती.बाबा या प्रसंगांना *"गृहकलह"* म्हणत असत. त्यांचे असे स्पष्ट मत होत की *'अशा प्रसंगी आपले कितीही नुकसान झाले तरी आपण त्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडावे. गृहकलहाने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते तसेच ती नष्ट पण होते.* एकदा बोलता बोलता ती. बाबा मला [श्रीपाद बेलसरे यांना] म्हणाले की 

*जो प्रारब्धाचा सिद्धांत मानतो त्याने आपले आर्थिक नुकसान झाले तरी त्यातून लवकर बाहेर पडावे. आपल्याला जे मिळणार आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, व जे मिळणार नाही ते देऊ शकत नाही. म्हणून आपल्या सद्गुरुंवर निष्ठा ठेवून आपण त्यातून बाहेर पडावे. या कटकटींचा साधनावर कसलाही परिणाम होऊ देऊ नये.*


               ********* 

संदर्भः *पत्रांद्वारे सत्संग हे* श्रीपाद के. बेलसरे यांचे पुस्तक पान ५३

संकलनःश्रीप्रसाद वामन महाजन

पद

 *पदर आईचा अन् आयुष्याचा.*


खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली 

आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या 

पदराची ओळख झाली.


पाजताना तिनं 

पदर माझ्यावरून झाकला,

आणि मी आश्वस्त झालो ...

तेव्हापासून तो खूप 

जवळचा वाटू लागला


आणि मग तो भेटतच राहिला ... 

आयुष्यभर


शाळेच्या पहिल्या दिवशी 

तो रुमाल झाला


रणरणत्या उन्हात 

तो टोपी झाला,


पावसात भिजून आल्यावर 

तो टॉवेल झाला


घाईघाईत खाऊन खेळायला पळताना 

तो नॅपकीन झाला


प्रवासात कधी 

तो अंगावरची शाल झाला 


बाजारात भर गर्दीत कधीतरी 

आई दिसायची नाही

पण पदराच टोक धरून 

मी बिनधास्त चालत राहायचो ...

मग त्या गर्दीत 

तो माझा दीपस्तंभ झाला


गरम दूध ओतताना 

तो चिमटा झाला


उन्हाळ्यात लाईट गेल्यावर 

तो पंखा झाला


निकालाच्या दिवशी 

तो माझी ढाल व्हायचा.


बाबा घरी आल्यावर, 

चहा पाणी झाल्यावर,

तो पदरच प्रस्ताव करायचा ....


छोटूचा रिझल्ट लागला...

चांगले मार्क पडले आहेत

एक-दोन विषयात कमी आहेत, 

पण ...

पण आता अभ्यास करीन असं म्हणतोय..


बाबांच्या संतापाची धार बोथट होताना

मी पदराच्या आडून पाहायचो

हाताच्या मुठीत पदराच टोक 

घट्ट धरून !


त्या पदरानेच मला शिकवलं

कधी - काय - अन कसं बोलावं

 

तरुणपणी जेव्हा पदर 

बोटाभोवती घट्ट गुंडाळला

तेव्हा त्याची खेच बघून 

आईने विचारलंच,

“कोण आहे ती...

  नाव काय??”


लाजायलाही मला मग 

पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला.


रात्री पार्टी करून आल्यावर ... 

जिन्यात पाऊल वाजताच,  

दार न वाजवता ... 

पदरानेच उघडलं दार.

कडी भोवती फडकं बनून ...

कडीचा आवाज दाबून ...


त्या दबलेल्या आवाजानेच  

नैतिकतेची शिकवण दिली

 

पदराकडूनच शिकलो सहजता


पदराकडूनच शिकलो सौजन्य


पदराकडूनच शिकलो सात्विकता


पदराकडूनच शिकलो सभ्यता


पदराकडूनच शिकलो सहिष्णुता


पदराकडूनच शिकलो सजगता

 


काळाच्या ओघात असेल, 

अनुकरणाच्या सोसात असेल

किंवा

स्वतःच्या "स्व"च्या शोधात असेल,


साडी गेली... 

ड्रेस आला 

पँन्ट आली... 

टाॅप आला

स्कर्ट आला... 

आणि छोटा होत गेला


प्रश्न कपड्याचा नाहीच आहे ,

प्रश्न आहे तो, आक्रसत जाऊन , 

गायब होऊ घातलेल्या पदराचा !


*कारण पदर हे पद नसून , जन्मभराची फक्त आणि फक्त  जबाबदारी आहे . आणि ती जाणीवपूर्वक व नि:स्वार्थपणे - पेलू शकते केवळ आई !* 


*खरं तर - शर्टालाही  फुटायला हवा होता पदर ...*

*पण खरं सांगू ... शर्टाला तो झेपणार नाही !!!*🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Friday, November 21, 2025

जप

 ॥🌹जप🌹॥


 जप करतांना नेहमी त्या परमेश्वराचेच चिंतन करावे -नाम आणि नामी एकरूप आहेत अशी धारणा ठेवावी. आपण ज्याचे नाव घेतो त्याच्याशी ते नाव अभिन्न असते, अर्थात नाम उच्चारताच ज्याचे ते नाव आहे त्याचाच बोध होतो. व्यवहारात हेच होते. तुम्ही एखाद्या माणसाला नावाने हाक मारली की तत्क्षणी त्याची प्रतिमा मनासमोर उभी राहते आणि ज्याला तुम्ही हाक मारता तो लगेच ओ देतो, बोलतो किंवा समीप येतो. जप  म्हणजे दुसरेतिसरे काही नसून अगदी हेच आहे  मात्र तो प्रभूवर चित्त एकाग्र करून आणि योग्य पध्दतीने झाला पाहिजे. माझी हाक त्या प्रभूपर्यत पोहोचेल आणि तो तिला प्रतिसाद देईलच देईल असा दृढ विश्वास असला पाहिजे. आर्ततेने आणि उत्कटतेने केलेली प्रार्थना देखील वर सांगितल्याप्रमाणे फलदायी होते. सतत जप केल्याने मनाला  निश्चिती येते, ईश्वर अगदी समीप  उभा असल्याची खात्री पटते, मन तन्मय होते त्याचे निश्चित अस्तित्व जाणवते. म्हणूनच शास्त्रातील वचन आहे  

"जपात् सिध्दि "-अर्थात  जप केल्याने ईश्वर साक्षात्कार होतो .

।। श्रीराम ।।

🌺🌸🙏🙏🙏🌸🌺

Thursday, November 20, 2025

सद्गुरूंच्या इच्छेवर

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*जो सद्गूरूच्या अंकित झाला त्याचे देहभोग  ग्रहांवर अवलंबून नसून सद्गुरूच्याच अधीन असतात*


    *एका ज्योतिषाने श्रीमहाराजांची कुंडली पाहिली. श्रीमहाराजांननी त्यांना विचारले , ' त्यात तुम्हाला काय दिसले? ' ज्योतिषी म्हणाला , ' महाराज , सध्या आपल्याला साडेसाती आहे. ' श्रीमहाराज बोलले , ' असेना बिचारी ती आपल्या मार्गाने जाईल ! आपण आपल्या मार्गाने जाऊ म्हणजे झाले. ' ज्योतिषी म्हणाला , ' आपल्या कुंडलीत दारिद्र्य योग आहे. ' त्यावर श्रीमहाराज म्हणाले , ' ते खरे आहे. पण दारिद्र्य असून राजाला लाजवील असा खर्च केला हे त्यात कसे दिसेल? ' ज्योतिषी म्हणाला , ' कुंडलीत बुद्धीमत्ता उत्तम आहे ! त्यावर श्रीमहाराज म्हणाले , ' बुद्धीच्या ग्रहावर गुरूची दृष्टी असली पाहिजे. ते पहा. ' इतके सांगून ते पुढे म्हणाले, ' ग्रहांची गती देहापर्यंत असते. ज्याची देहबुद्धी नाहीशी झाली त्याला ग्रहांची बाधा होत नाही. तसेच जो सद्गूरूचा अंकित झाला त्याचे देहभोग ग्रहांच्या बाधा होत नाही. तसेच जो सद्गूरूचा अंकित झाला त्याचे देहभोग ग्रहांच्या गतीवर अवलंबून नसून ते त्यांच्या म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेवर अवलंबून असतात. त्यांच्या इच्छेने शिष्याचे भोग मागेपुढे होतात किंवा सोयीने भोगता येतात. '*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

Wednesday, November 19, 2025

आनंदसागराचा धनी*

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात🙏🌺*


    *आनंदसागर महाराज भगवंताचं नाम मुखामध्ये असू दे असंच सांगतात. आजकाल व्हाॅट्सऍपवर बरेच संदेश फिरत असतात. त्यापैकी एका संदेशात कबीरानं जपमाळ तोडून टाकली कारण जो अगणित देतो त्याचं नाम मोजून का घ्यायचं अशा आशयाचा तो संदेश होता. कबीरांची गोष्ट वेगळी आहे. 

आपल्याला संतांनी दररोज २१६०० इतकं नामाचं माप ठरवून दिलेलं आहे. तेवढं आपण दररोज पूर्ण करायला हवं तरच आपल्याला कबीरांप्रमाणं वागता येईल. काहीजण म्हणतात आम्ही मनातल्या मनात जप करतो , नुसतं ओठ हलवणं बरं वाटत नाही. 

श्रीमहाराज म्हणतात , सतत ओठांची हालचाल असणं ही माझा माणूस असल्याची खूण आहे कारण माझा मनुष्य सतत नामातच असला पाहिजे. संतांनी वैखरीचं महत्त्व सांगितलेलं आहे. वैखरीनं नाम घेण्याची का लाज बाळगायची ? 

थोडंफार नाम झाल्यावर आपण मध्यमेमध्ये पोहोचलोय की काय असं वाटू लागतं. पण हा आपला अहंकारच नामाच्या आड येत असतो. वैखरीनं , टाळ्या वाजवत नामाचा आनंद घ्यावा असं संतांनीच सांगून ठेवलेलं आहे .*

*संदर्भ - आनंदसागराचा धनी* 

*लेखक - रविंद्रदादा पाठक*

Tuesday, November 18, 2025

समंध

 पू.श्री.गुरुदेव रानडे यांचे शिष्य श्री.मंगेशराव रेगे यांच्या श्री.गुरूदेवांचा सत्संग या पुस्तकातील पू.श्री.उमदिकार महाराज यांची गोष्ट. पंढरपुरास जाताना वाटेत संख म्हणून गाव आहे. तेथे श्री.कुलकर्णी  नावाच्या सद्गृहस्थांचे घर होते. त्यांच्या घरात चार पिढ्या एक समंध होता. त्याला रोज एक शेराच्या भाकऱ्या व वरण लागतसे.

 तो जाण्यासाठी कुलकर्णी यांनी बरेच उपाय तंत्र मंत्र करून पाहिले पण उपयोग झाला नाही. श्री.उमदीकर महाराज बैलगाडीतून त्या गावावरून जाणार असे समजतात श्री.कुलकर्णी यांनी महाराजांना  अतिशय आग्रह करून त्या दिवशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुढे जाण्याची विनंती केली. 

अखेर श्री.महाराज त्याचे घरी उतरले. ज्या खोलीत समंध होता तीच खोली श्री.महाराजांना नेमासाठी दिली. बाकीच्यांना ओसरीवर नेमास बसविले. बाहेरच्या मंडळीना त्या खोलीत समंध आहे. तो खोलीत जाणाऱ्यास मारून टाकतो असे समजले. 

असे समजताच ती मंडळी रडू लागली.  रात्रीचे ८.३० वाजले तरी.श्री.महाराज बाहेर आले नाही. सर्व जण श्री.महाराजांना हाक मारू लागले. थोड्या वेळाने महाराजांनी दार उघडले. सर्वाँना आनंद झाला. मग पोठी सुरू झाली. तोच लांब अंगरखा पगडी घालून एक म्हातारा सद्गृहस्थ दरात येऊन पोथी ऐकू लागला.

 महाराजांनी त्याला पुढे  समोर बोलाविले. कापूर लावून आरती करून जा म्हणाले. तो पुढे येण्यास तयार होईना. मग आरती झाल्यावर तो सद्गृहस्थ गेला. तो समंध होता. तो पुन्हा काही त्या घरी आला नाही. हे सगळं झाल्यावर श्री.महाराज म्हणाले "माझे गुरू (श्री.निंबर्गी महाराज) एवढे मोठे असताना तुम्ही भिता  का ?"

Monday, November 17, 2025

गुंतागुंतीचा परमात्मा

 *॥श्रीहरिः॥*


ही गुह्य राजविद्या अर्जुनाला समजावून सांगताना भगवंत आता पुढे म्हणतात, 


*-----------------------------*

॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता नवमोध्यायः 


*मया ततमिदं सर्वं*

*जगदव्यक्तमूर्तिना ।*

*मत्स्थानि सर्वभूतानि* 

*न चाहं तेष्ववस्थितः ॥*

*॥९.४॥*


*न च मत्स्थानि भूतानि* 

*पश्य मे योगमैश्वरम् ।*

*भूतभृन्न च भूतस्थो* 

*ममात्मा भूतभावनः ॥*

*॥९.५॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय नववा राजविद्याराजगुहायोग ९.४ ९.५)


*भावार्थ:- (प्रकृतीच्या) अव्यक्तरूपानं मी हे सर्व जग व्यापलेलं आहे. सर्व सृष्ट पदार्थ माझ्या ठिकाणी आहेत. पण मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही (म्हणजे त्यांच्या आधरावर अधिष्ठित नाही); आणि माझ्या ठिकाणी सर्व भूतसृष्टीही नाही! असा हा माझा ऐश्वर्ययोग (अचिंत्य सामर्थ्य) कसा आहे तो पहा (तसंच) माझं तत्त्व सृष्टीला धारक आणि पोषक असूनही ते सृष्टीवर अधिष्ठित नाही.म्हणजे सृष्टी हा त्या तत्त्वाचा आधार नाही.*


*-----------------------------*


*या श्लोकांमधून ब्रह्मस्वरूप सांगितलेलं आहे.* 

सर्व भूतं माझ्या ठिकाणी आहेत; पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. माझ्या अव्यक्तरूपानं संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे, हा एक चमत्कारच आहे. सर्व विश्व इंद्रियगोचर आहे. त्यात व्यापून उरलेलं ब्रह्म इंद्रियगम्य आहे आणि इंद्रियगम्य नाहीही!

 


ब्रह्म इंद्रियातीत असूनही ते इंद्रियगोचर विश्वाला व्यापून उरलेलं आहे. दृश्य विश्वापेक्षा ब्रह्म कुठेतरी वेगळं असतं तर त्याचं एवढं महत्त्व वाटलं नसतं. गावच्या पाटलाची माडी इतरांपेक्षा थोडी वेगळी, असा प्रकार झाला असता! पण ब्रह्माचं तसं नाही. ते म्हटलं तर व्यापलेलं दिसतं; म्हटलं तर व्यापलेलं दिसत नाही! म्हणजे

मूर्त विश्वाला अमूर्त तत्त्वानं धारण केलं आहे. मूर्त तत्त्व अमूर्तापर्यंत पोचूच शकत नाही. कारण तसं पोचायचं असेल तर मूर्ताला आपलं मूर्तस्वरूपच त्यागावं लागेल!



*परमात्मा कसा आहे?* 

चक्रधर स्वामींनी एक छान दृष्टान्त दिला आहे.


*एकदा* चार अंध एकमेकांच्या आधारानं मार्गावरून जात होते. तेवढ्यात त्यांना एक हत्ती वाटेत आडवा आला. हत्ती हा प्राणी त्यांनी अंधत्वामुळे कधी बघितलेला नव्हता. त्यामुळे या प्राण्याला काय म्हणायचं किंवा त्याचं स्वरूप कसं आहे हे त्या चौघांना समजत नाही. चौघांपैकी एका अंध व्यक्तीचा हात हत्तीच्या शेपटीला लागला. हत्ती हा दोरासारखा आहे असं तो म्हणाला.ज्याचा हात हत्तीच्या पायाला लागला होता त्याला हत्ती खांबासारखा वाटला.तिसऱ्याचा हात हत्तीच्या पाठीकडे गेला. त्याला पाठ म्हणजे भिंत वाटली. तो हत्तीला भिंत समजला. चौथ्या अंध व्यक्तीच्या हातात हत्तीचा कान आला. तो म्हणाला, हत्ती सुपासारखा! 


अशा तऱ्हेनं एकाच हत्तीविषयी चौघा अंध व्यक्तींनी चार वेगवेगळी मतं दिली. त्यावरून त्या चौघांमध्ये वाद निर्माण झाला. भर रस्त्यामध्ये त्या चौघांचा वाद विकोपाला गेला. 


एक डोळस गृहस्थ तिथून जात होता. त्यांचा वाद ऐकून तो थांबला. चौघांचं म्हणणं त्यानं ऐकून घेतलं. मग त्या चौघांना समजावत तो गृहस्थ म्हणाला, 


'हा हत्ती नावाचा प्राणी आहे. सूप म्हणजे याचे कान आहेत. तर दोरी म्हणजे याची शेपटी. जी भिंत वाटली ती याची पाठ आहे. तर खांब म्हणजे पाय आहेत. या साऱ्या अवयवांचा

मिळून एक संपूर्ण हत्ती आहे.'


त्या प्रत्येकाचा अनुभव खोटा म्हणायचा का? मुळीच नाही. पण जेव्हा डोळस व्यक्ती तिथे येते तेव्हा त्यांना हत्तीचं समग्र स्वरूप कळून चुकतं.


*त्याचप्रमाणे* 

आपण जो परमात्म्याला भौतिक वा आत्मिक साधनांनी जाणायचा प्रयत्न करतो तो परमात्म्याचा एकेक अंश असतो.समग्रतेनं त्याचं स्वरूप कळणं शक्य होत नाही. परंतु; *भक्तीमुळे* तोच गुंतागुंतीचा परमात्मा सरळसाधा होऊन जातो.


ही गुह्य राजविद्या भगवंतांनी अर्जुनाला सांगितली आहे. 

हे पवित्र ज्ञान केवळ शाब्दिक नसून अनुभवजन्य आहे. कारण ज्याला कोणतेही अवयव नाहीत,ज्याला कोणत्याही प्रकारचं मूर्त स्वरूप नाही,अशा ब्रह्माचं दृश्यमान स्वरूप विश्वाव्यापी आहे. ही गोष्ट तात्त्विक दृष्टीनंच बघितली पाहिजे. सर्व भूतं माझ्यात स्थित आहेत, पण मी मात्र त्या भूतांत स्थित नाही असं भगवान सांगतात. परमेश्वर सर्वव्यापक आहे.पण तो भूतांच्या शरीरात वास्तव्य कसा करून राहील. मेरूपर्वत मुंगीच्या शरीरात कसा काय वसती करू शकेल?


परमेश्वर असंग आहे. त्यामुळे तो कुणाचा आधार घेत नाही. कर्म एक करतो त्याचा साक्षीदार वेगळाच असतो. एकजण स्वादाची रुची घेत असतो आणि दुसरा स्वादाचं ज्ञान ठेवत असतो. रुची घेणाऱ्यापेक्षा स्वादाचं ज्ञान ठेवणारं एक स्वतंत्र तत्त्व आहे. ते अंशरूपानं जीवात असतं. स्वाद घेणारा पराश्रित असतो. पण स्वादांचं ज्ञान ठेवणारं तत्त्व पूर्णत: स्वतंत्र असतं. 

*हेच ते परमेश्वराचे स्वरूप !*



ही बाब आणखी एका उदाहरणावरून समजून घेता येईल. ज्याप्रमाणे समुद्रात लाटा उसळल्यावर पाण्यात फेस दृश्य रूपात दिसतो,परंतु त्या फेसात पाणी दिसत नाही. त्याचप्रमाणे ही साकार सृष्टी माझ्यातच सामावलेली दिसते, परंतु यात माझा निवास नसतो. अचेतन, निर्जीव गोष्टी चैतन्याच्या आधारेच प्रकट होतात,परंतु त्यात चैतन्य नसतं.चैतन्यामुळेच शरीर जिवंत असतं. परंतु शरीरात जर चैतन्य नसेल तर ते निव्वळ प्रेतासमान आहे.



*सारांश:*

*अमूर्तानं मूर्ताला व्यापून टाकलं आहे. त्यामुळे मूर्तात अमूर्त आहे, पण अमूर्ताला मूर्त कसं काय व्यापणार? म्हणून अमूर्त (परमेश्वर) ज्ञानगम्य आहे. इंद्रियांनी न समजणारा आहे.*



संदर्भ ग्रंथ :-

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

Sunday, November 16, 2025

एकत्यानेंच लग्न

 आज श्री.गुरुपौर्णिमा. ओमकाररुपी श्री.सद्गुरूंना नमस्कार. श्री सद्गुरू हे मोठे ज्योतिषी आहेत. जीवाशिवांच्या कुंडल्या पाहून त्यांचे ऐक्य वर्तवितात आणि मी प्रणवरूप पुण्यस्वरुप आहे या मंत्राने जीवाचे शिवाशी लग्न लावून देतात. हे लग्न लागण्यास जीवाला पुष्कळ पुण्यसंचय करावा लागतो. एखाद्या वधूचे एखाद्या वराशी लग्न लावलेले पुष्कळ लोकांनी पाहिले आहे. पण स्वत:चे स्वतःशीच लग्न लावण्याची श्रीसदगुरूची करामत मात्र तर्काच्या पलीकडची आहे. या लग्नामध्ये प्रथम पंचमहाभुतांची खटपट म्हणजे दृश्याची प्रिती कमी करावी लागते. मग आत्मज्ञानाने कालाचे भान नाहीसे करून,त्याची दृष्टी चुकवून घटका स्थापन करावी लागते. चारी पुरुषारथाचे तेलफळ येते. अहंभावाचे लिंबलोण उतरावे लागते. लग्नातले सर्व विधी पूर्ण झाल्यावर जीव व शिव समोरासमोर आल्यावर वेगळेपणाचा अंतरपाट मध्ये धरून सद्गुरू उभा असतो. घटका भरल्यावर दोघांनाही सावधान म्हणून तो सावध करतो. सहज समाधीने जीवाशिवामधील पडदा बाजूला होतो आणि दोघे एकरूप होतात. श्री.सद्गुरूंनी साधलेला हा मुहूर्त मोठा सुंदर असतो. तेथे तुरिया अवस्था प्राप्त होऊन आत्मस्वरुपाशी गाठ पडते. जीवाला समदृष्टी प्राप्त होऊन तो शांत होतो, त्याचा शब्द बंद होतो. जीवाचे शीवाशी लग्न लावण्याची सद्गुरूंची ही तऱ्हा केवळ और आहे. नवरा पहावा तर ना काळा, गोरा व सावळा. डोळ्याला दिसतच नाहीं. आणि असं हे लग्न. असे एकाएकी एकाबरोबरच एकत्यानेंच लग्न लावणारा सद्गुरुशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही. आंत बाहेर कोठेही पाहायला गेले तर सर्व ठिकाणी तेच भरलेले आहे. हे सद्गुरू आपणास साष्टांग नमस्कार.

जीव व शिव दोघांचे एकरूप होणे हेच त्यांचे लग्न होय. अशी कल्पना करून पू.श्री एकनाथ महाराजांनी हे लग्नाचे रूपक रचले आहे. त्यांना ही साष्टांग नमस्कार. श्री सद्गुरूकृपेने मला वाचावयास मिळाले ते मी येथे श्री.गुरुपौर्णिमा निमित्त प्रसारित केले.

Saturday, November 15, 2025

अंतःकरणात ज्ञान

 अंतरंगाचा 3 रा मुक्काम तो ज्ञानाचा. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात ज्ञान आहे. ते फक्त व्यक्त करायचे आहे. सत्पुरुषांचे म्हणणे आहे प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात ज्ञान आहे. वेदांताचे  म्हणणे आहे की ब्रम्हज्ञान हे गुप्त आहे. परमात्मस्वरूपाचे ज्ञान प्रत्येकामध्ये आहे. पु.श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे मी तुम्हाला कळत नाही म्हणून मी सांगतो असे नाही. तुम्हाला कळतेय तसे तुम्ही वागा हे मी सांगतोय. म्हणून मी तुम्हाला शिकवतोय ही भावना मुळीच नाही त्यांची. काय नम्रता. 

हे जे ज्ञान माणसाच्या अंत:करणामध्ये आहे ते विवेकातून निर्माण होते. साधन चतुष्टयामधे आत्मनात्मविवेक हे पहिले साधन आहे. आत्मा कोणता अनात्म कोणता सार काय असार काय हे बुद्धीचे काम आहे. ज्यावेळेस माणूस विवेकी बनतो त्यावेळेस तो वरील भेद करतो. जशी एखादी गरम वस्तू हातात घेतली की हात पोळताच तो खाली टाकून देतो तसे अनात्म आहे ते सोडून देतो. 

तो विचार करू लागला की जे अशाश्वत आहे ते सोडून देतो.असार आहे ते गेलेच पाहिजे. हे ज्ञानाचे पाहिले लक्षण. विवेकातून वैराग्य. वैराग्य म्हणजे दृश्याचा त्याग- मनाने दृश्याचा त्याग हे जर वैराग्य असेल तर सारखे त्याच्या मागे जाणे हा पुढचा मार्ग आणि ते जर असेल तर भगवंताचे अनुसंधान. 

अनुसंधानात पर्यवसान झाले की अनुसंधानातून तो त्याच्याशी तादात्म्य पावतो. तादात्म्य पावला की काम झाले. नाम घेताना ते कर्मच आहे. त्या कर्माचे पर्यवसान भक्तीत व्हायला पाहिजे. आपण प्रेमाने नाम घ्यावे आणि नाम घेता घेता नाम घेणारा मी आणि मी ज्याचे नाम घेतो तो नामी यांचे तादात्म्य होणे हे ज्ञान आहे. 

चवथा मुक्काम ज्ञानी भक्त. तसा हा मुक्काम नाही ते ऐश्वर्य आहे. यात श्रीगुरुकृपेने उपासनेने ईश्वर दर्शन होते. हे झाल्यावर सुद्धा तो गुरूभक्तीत रमतो. यास ज्ञानी भक्त म्हणतात.

Friday, November 14, 2025

राम सांभाळील

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबा : पू. तात्यासाहेब पेटीवर बसल्यावर प्रथम 'श' ह्या अक्षरावर बोट ठेवायचे. माझ्या हे लक्षात आल्यावर व मी त्यांना याचे कारण विचारले तेव्हां ते म्हणाले, त्याचा अर्थ मी शरण आहे असा आहे. हे (पेटीवर बसणे) श्रीमहाराजांनी सांगितले आहे म्हणून मी करतो. प्रथमच शरण जावे हे चांगले. नंतर ह्याबद्दल मी श्रीमहाराजांना विचारले तेव्हां ते म्हणाले, 'शंभर वेळा माणूस शरण आहे, शरण आहे असे म्हणाला तर एकदा तरी तो भाव येईल'.*


*एका गृहस्थांच्या पत्नीला Schizophrenia (दुभंगलेले व्यक्तित्व) झाला होता. अॅटॅक आला की कधी कधी स्वतःच्या तान्ह्या मुलाला खिडकीबाहेर फेकून देण्याच्या गोष्टी करी, त्यामुळे ते फार त्रासले होते. त्यांनी ही गोष्टी श्रीमहाराजांच्या कानावर घातली तेव्हां श्रीमहाराज म्हणाले की आपण प्रपंच खेळासारखा मानावा. 

त्या मुलाचे प्रारब्ध तसे असेल तर तेच घडेल आणि तसे नसेल तर फेकून दिल्यावरही कोणी त्याला वरच्यावर झेलून धरील. आपण घाबरू नका; राम सांभाळील. पुढे त्या बाईंचा आजार कमी झाला व त्या गृहस्थांचा संसार नीट झाला.*


- *अध्यात्म संवाद*

Thursday, November 13, 2025

खंडित नाम

 नाम सगुणही आहे व निर्गुणही आहे. ती संधी आहे त्यामुळे सगुणाची कास धरत निर्गुणाची कास धरता येते. नंतर सगुणाची कास हळू हळू सोडता येते. हा प्रवास अलगद सोयीचा होतो. शब्द दिसतो म्हणून तो सगुण पण तो गुण आकाशाचा म्हणून निर्गुण म्हणून त्यात परब्रह्माचे गुण आहे.

 पंचमहाभूतात आकाश सुक्ष्मम्ह्णून ते निर्गुण, म्हणून सगुण शब्दाला निर्गुणाची जोड देता येते त्यादृष्टीने नामस्मरण हे साधन सुरक्षित. नामाचं स्वरूपच अखंडच आहे. अनादिकाळपासून ते होत, ते आहे व ते राहणार. अशा अखंड नामाला खंडित आपण करून घेतो.

 आपल्या देहातच नामाचा (आत्म्याचा) नाद अखंड चालू असतो. पण आपल्यास आपल्या वासनेमुळे त्याची जाणीव नसते. ही जाणीव होण्यास सद्गुरू आपल्यात असलेल्या  नामाची (आत्म्याची) जाणीव करून देतात. त्याचा अभ्यास करून हळूहळू त्या खंडित नामास अखंडापर्यंत पोचवावयाचे आपले ध्येय पाहिजे.

Wednesday, November 12, 2025

खडूस मुंबईकर

 खडूस मुंबईकर.


आज सुनीलचा ७५ वा वाढदिवस.त्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत पण हा किस्सा फक्त खास मुंबई स्पेशल "मैदान क्रिकेट" खेळणाऱ्या प्लेअर्सनाच माहिती आहे.


देशातून किंवा परदेशातून रात्री कितीही उशीरा मुंबईत आला तरी मॅचला सकाळी ९ वाजता हजर असायचा हे सर्वांना माहीत आहे.


मुंबईचा माजी विकेटकिपर सुलक्षण कुलकर्णी नेच सांगितलेला हा किस्सा..


तो रिटायर होऊन ४ वर्षे झाली होती. त्याच्या दादर युनियनची अवस्था बिकट होती.जेमतेम ७-८ प्लेअर्स जमत. मी एकदा त्याला भेटलो.प्लेअर कमी पडला तर मला कळवा मी नक्की उतरीन असे आश्वासन त्याने दिले.तीनच दिवसांनी वानखेडे स्टेडियमवर तालीम शील्ड सेमी फायनल होती.समोर होते कट्टर वैरी "शिवाजी पार्क जिमखाना."


नेमका १ जण शॉर्ट होता.पब्लिक बूथ वरून सनीला SOS फोन केला. हा गडी व्हाईट्समध्ये हजर.क्रिकेट सोडून ४ वर्षे झाली होती. पण एकदम फिट्ट होता. अफलातून रनिंग बिटविन द विकेट्स, चपळाई दाखवून रन आऊटचे प्रयत्न, ज्युनिअर प्लेअर्सच्या चुकांवर हक्काने झापणे,कॅप्टन नसताना परिस्थिती प्रतिकूल असताना सूत्रे हातात घेऊन गेम कंट्रोल करणे हे सगळे टेस्ट मॅचचा सिरीयसनेस दाखवून केले.इतकेच नाही तर बॉलिंगचा ९ ओव्हर्सचा पूर्ण कोटा  टाकून त्याच्या स्लो आऊट स्विंगवर चक्क २ विकेट्स काढल्या.


दादर युनियनने मॅच २ रन्सने जिंकली. नंतर ड्रेसिंग रूम मध्ये प्रचंड खुश होऊन सनी वावरत होता.त्याला विचारले की "सर या लोकल मॅच मध्ये इतक्या सिरियसली खेळलात, इतके खुश झालात." 


त्याचं उत्तर होतं..


"अरे वेड्यांनो मॅच शिवाजी पार्क जिमखान्याविरुद्ध होती.." 


ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो दादर युनियन आणि शिवाजी पार्क जिमखाना मॅच म्हणजे भारत पाकिस्तान मॅच.. 


मुंबई क्रिकेटची खरी ताकद म्हणजे मैदान क्रिकेट.. तिथून वर आलेला कोणताही प्लेअर कितीही वय झालं तरी मैदानातच रमतो.


सुनीलला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


आनंद देवधर


Tuesday, November 11, 2025

समाधान

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                  भाग - ११.

                जिजीबाईंच्या घरी महाराजांचा मुक्काम होता. तिथे दर्शणार्थींची खूपच गर्दी होऊ लागली. त्यांच्यापासून सुटका होण्यासाठी महाराज मग रस्त्यावरून पळत सुटायचे. त्यांच्या मागे  मुलं लागायची. अहोऽ! " गुंडोजी बुवा "  म्हणून ओरडत मुले त्यांच्या मागे जात. महाराज पळत पळत दूरवर जाऊन थांबायचे. मुले पोहोचले की, मग महाराज त्या मुलांबरोबर खेळायचे. आणि त्यांना राम नाम घ्यायला लावायचे. सर्व मुले नाम घेत घेत नाचत असत. मुले फारच त्रास द्यायला लागली की, महाराज एखाद्या झुडपाआड लपायचे. शोधूनही सापडायचे नाही. मग मुलं काकुळतीने म्हणायचे, बुवा बाहेर या. आता आम्ही त्रास देणार नाही.

              एकदा इंदूरचे राजे होळकर महाराजांच्या दर्शनाला येत असल्याचे महाराजांना कळविण्यात आले. पण महाराजांना त्यांची भेट घ्यायची नव्हती. त्यांनी काय करावे तर, एका मोलकरणीचे लुगडं नेसले. डोक्यावर पदर घेतला. व जात्यावर दळायला बसले. ओव्याही म्हणू लागले. तेवढ्यात राजे येऊन पोहोचले. त्यांनी इनामदारांजवळ महाराजांची चौकशी केल्यावर आधीच पढवून ठेवल्यानुसार इनामदार म्हणाले, ते बाहेर गेले. कधी येतील सांगता येत नाही.

              निराश होऊन राजे महाराजांच्या समोरून निघून गेले. पण त्यांना महाराजांना ओळखता आले नाही. जिजीबाईची मात्र हसून हसून मुरकुंडी वळली. संत ज्यांची आस्था,श्रद्धा असते त्यांनाच भेटतात.

        एकदा जीजीबाईच्या पाच-सहा वर्षाच्या ताई नावाच्या मुलीशी महाराज खेळत होते. ती महाराजांच्या शिवाय बिलकुल राहत नसे. असेच तिच्याशी सागर गोट्या खेळत असताना एक बैरागी महाराजांकडे आला. त्याला महाराज एका मुलीशी खेळताना पाहून तो परत जाऊ लागला. तोच महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने बोलावले. विचारले, आपले काय काम होते?

      तो म्हणाला, मला लहानपणापासून योगाभ्यासाची आवड आहे. बायको वारल्यानंतर संसार मुलावर सोपवून हिमालयात गेलो. तिथे एका सत्पुरुषा जवळ पाच सहा वर्षे योगाभ्यास शिकलो. मी काही अडचणी त्यांना विचारल्यावर, त्यांनी इथला पत्ता देऊन आपल्याकडे पाठवले. पण येथे येऊन माझी निराशाच झाली. आपल्याला काही ज्ञान असेल असे वाटत नाही. म्हणून मी परत जात आहे. 

      महाराज म्हणाले, आपण थोडं थांबा. बघा काही फायदा होतो का? असे म्हणून त्यांनी त्या लहान मुलीला म्हणाले, ताई पद्मासन घाल व समाधी लाव. ताईने पद्मासून घातले व समाधी लावली. पंधरा मिनिटांनी महाराजांनी तिला उठायला सांगितले. ती भानावर आल्यावर, वैराग्याला महाराज म्हणाले, तुमचे प्रश्न हिला विचारा. आणि त्यांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे ताईने दिली. बैरागी महाराजांना शरण गेला. म्हणाला, महाराज, क्षमा करावी. आपली योग्यता आज्ञानवश मी ओळखू शकलो नाही. क्षमा करा... क्षमा करा... मग महाराजांनी त्यांच्या सर्व समस्या, अडचणी सोडवल्या. वैरागी आनंदाने, समाधानाने परत गेला.

        महाराज इंदूरमध्ये येऊन सहा महिने झाले होते. त्यांना जायचे होते. पण इनामदार, जीजी, ताईचा प्रेमळ आग्रह त्यांच्या पायात बेड्या टाकत होते. जायचे तर होतेच. ते संधीच्या शोधात होते. आणि संधी मिळाली.

           एकदा रात्री एक गवळी महाराजांना भेटायला आला. महाराज नुकतेच पहुडले होते. जीजी म्हणाल्या, गवळीबुवा उद्या यावे. तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी गवळी सकाळी आल्यावर महाराजांनी विचारले, काल का नाही आलास? किती वाट पाहिली? गवळीने सहज रात्रीची हाकिकत सांगितली. बस महाराजांना निमित्त मिळाले. लागले अकांड तांडाव करायला. मी आता इथे क्षणभरी थांबणार नाही. मला कोणाला भेटायला देत नाही. माझा अगदी कोंडमारा होत आहे. घरी कोणालाच कळेना, महाराजांना एकाएकी काय झाले? इनामदार, जीजी, ताई सगळे त्यांना न जाण्याबद्दल विनवणी करू लागले. 

         इनामदार म्हणाले, आमचे काही चुकले असेल तर, क्षमा करा. पण जाऊ नका. महाराज शांत झाले. म्हणाले, आता मला जायला हवे. लवकरच परत येईल. असे म्हणून सर्वांचा निरोप घेतला. व इंदूर सोडले.

           इंदुर सोडल्यावर महाराज तीर्थाटण करत करत गोंदवल्याला आलेत. आई-वडिलांचे दर्शन झाले. पण ओळख दिली नाही. मोठ्या पहाटेचे सासरवाडी खातवळला गेले.

            तिथलाही मुक्काम गावा बाहेरच होता. लोक दर्शनाला येत होते. त्यांचे तेजस्वी रूप पाहून लोक त्यांना त्रिकालज्ञ म्हणू लागले. कोणाला औषधी दे, कोणाच्या समस्याचे समाधान कर. अशा प्रकारे सर्वांच्या अडचणी सोडवून समाधान करत होते.

            महाराजांच्या पत्नीचे नाव  " सरस्वती " होते. सरस्वतीच्या आईला कोणीतरी सांगितले की, गावाबाहेर आलेल्या सत्पुरुषाची भेट घे. म्हणजे तुम्हाला योग्य फळ व मार्गदर्शन मिळेल.

         क्रमशः 

संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

Monday, November 10, 2025

त्रिकालज्ञ

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                  भाग - ११.

                जिजीबाईंच्या घरी महाराजांचा मुक्काम होता. तिथे दर्शणार्थींची खूपच गर्दी होऊ लागली. त्यांच्यापासून सुटका होण्यासाठी महाराज मग रस्त्यावरून पळत सुटायचे. त्यांच्या मागे  मुलं लागायची. अहोऽ! " गुंडोजी बुवा "  म्हणून ओरडत मुले त्यांच्या मागे जात. महाराज पळत पळत दूरवर जाऊन थांबायचे. मुले पोहोचले की, मग महाराज त्या मुलांबरोबर खेळायचे. आणि त्यांना राम नाम घ्यायला लावायचे. सर्व मुले नाम घेत घेत नाचत असत. मुले फारच त्रास द्यायला लागली की, महाराज एखाद्या झुडपाआड लपायचे. शोधूनही सापडायचे नाही. मग मुलं काकुळतीने म्हणायचे, बुवा बाहेर या. आता आम्ही त्रास देणार नाही.

              एकदा इंदूरचे राजे होळकर महाराजांच्या दर्शनाला येत असल्याचे महाराजांना कळविण्यात आले. पण महाराजांना त्यांची भेट घ्यायची नव्हती. त्यांनी काय करावे तर, एका मोलकरणीचे लुगडं नेसले. डोक्यावर पदर घेतला. व जात्यावर दळायला बसले. ओव्याही म्हणू लागले. तेवढ्यात राजे येऊन पोहोचले. त्यांनी इनामदारांजवळ महाराजांची चौकशी केल्यावर आधीच पढवून ठेवल्यानुसार इनामदार म्हणाले, ते बाहेर गेले. कधी येतील सांगता येत नाही.

              निराश होऊन राजे महाराजांच्या समोरून निघून गेले. पण त्यांना महाराजांना ओळखता आले नाही. जिजीबाईची मात्र हसून हसून मुरकुंडी वळली. संत ज्यांची आस्था,श्रद्धा असते त्यांनाच भेटतात.

        एकदा जीजीबाईच्या पाच-सहा वर्षाच्या ताई नावाच्या मुलीशी महाराज खेळत होते. ती महाराजांच्या शिवाय बिलकुल राहत नसे. असेच तिच्याशी सागर गोट्या खेळत असताना एक बैरागी महाराजांकडे आला. त्याला महाराज एका मुलीशी खेळताना पाहून तो परत जाऊ लागला. तोच महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने बोलावले. विचारले, आपले काय काम होते?

      तो म्हणाला, मला लहानपणापासून योगाभ्यासाची आवड आहे. बायको वारल्यानंतर संसार मुलावर सोपवून हिमालयात गेलो. तिथे एका सत्पुरुषा जवळ पाच सहा वर्षे योगाभ्यास शिकलो. मी काही अडचणी त्यांना विचारल्यावर, त्यांनी इथला पत्ता देऊन आपल्याकडे पाठवले. पण येथे येऊन माझी निराशाच झाली. आपल्याला काही ज्ञान असेल असे वाटत नाही. म्हणून मी परत जात आहे. 

      महाराज म्हणाले, आपण थोडं थांबा. बघा काही फायदा होतो का? असे म्हणून त्यांनी त्या लहान मुलीला म्हणाले, ताई पद्मासन घाल व समाधी लाव. ताईने पद्मासून घातले व समाधी लावली. पंधरा मिनिटांनी महाराजांनी तिला उठायला सांगितले. ती भानावर आल्यावर, वैराग्याला महाराज म्हणाले, तुमचे प्रश्न हिला विचारा. आणि त्यांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे ताईने दिली. बैरागी महाराजांना शरण गेला. म्हणाला, महाराज, क्षमा करावी. आपली योग्यता आज्ञानवश मी ओळखू शकलो नाही. क्षमा करा... क्षमा करा... मग महाराजांनी त्यांच्या सर्व समस्या, अडचणी सोडवल्या. वैरागी आनंदाने, समाधानाने परत गेला.

        महाराज इंदूरमध्ये येऊन सहा महिने झाले होते. त्यांना जायचे होते. पण इनामदार, जीजी, ताईचा प्रेमळ आग्रह त्यांच्या पायात बेड्या टाकत होते. जायचे तर होतेच. ते संधीच्या शोधात होते. आणि संधी मिळाली.

           एकदा रात्री एक गवळी महाराजांना भेटायला आला. महाराज नुकतेच पहुडले होते. जीजी म्हणाल्या, गवळीबुवा उद्या यावे. तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी गवळी सकाळी आल्यावर महाराजांनी विचारले, काल का नाही आलास? किती वाट पाहिली? गवळीने सहज रात्रीची हाकिकत सांगितली. बस महाराजांना निमित्त मिळाले. लागले अकांड तांडाव करायला. मी आता इथे क्षणभरी थांबणार नाही. मला कोणाला भेटायला देत नाही. माझा अगदी कोंडमारा होत आहे. घरी कोणालाच कळेना, महाराजांना एकाएकी काय झाले? इनामदार, जीजी, ताई सगळे त्यांना न जाण्याबद्दल विनवणी करू लागले. 

         इनामदार म्हणाले, आमचे काही चुकले असेल तर, क्षमा करा. पण जाऊ नका. महाराज शांत झाले. म्हणाले, आता मला जायला हवे. लवकरच परत येईल. असे म्हणून सर्वांचा निरोप घेतला. व इंदूर सोडले.

           इंदुर सोडल्यावर महाराज तीर्थाटण करत करत गोंदवल्याला आलेत. आई-वडिलांचे दर्शन झाले. पण ओळख दिली नाही. मोठ्या पहाटेचे सासरवाडी खातवळला गेले.

            तिथलाही मुक्काम गावा बाहेरच होता. लोक दर्शनाला येत होते. त्यांचे तेजस्वी रूप पाहून लोक त्यांना त्रिकालज्ञ म्हणू लागले. कोणाला औषधी दे, कोणाच्या समस्याचे समाधान कर. अशा प्रकारे सर्वांच्या अडचणी सोडवून समाधान करत होते.

            महाराजांच्या पत्नीचे नाव  " सरस्वती " होते. सरस्वतीच्या आईला कोणीतरी सांगितले की, गावाबाहेर आलेल्या सत्पुरुषाची भेट घे. म्हणजे तुम्हाला योग्य फळ व मार्गदर्शन मिळेल.

         क्रमशः 

संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

Sunday, November 9, 2025

आत्मन्नोतीकरिता

 *श्रीराम समर्थ*


*गुरुसेवेबद्दलचे गैरसमज*


         गुरुसेवा गुरु देहात असतांना प्रत्यक्षरूपानें व तो देहानें गेल्यावर त्याचे मंदिर वगैरे बांधून त्याचें वैभव वाढविणें, तेथें पूजा, अर्चा, उत्सव वगैरे करणें अशा स्वरूपाची अशी दोन प्रकारची असूं शकतें. यापैकीं विशेषतः दुसऱ्या प्रकाराबाबत गैरसमज असतात. एक म्हणजे मंदिराचीं शोभा वाढवणें, व्यवस्थेबद्दल विशेष जागरूक राहाणें वैगरेचे बाह्य उपचारच महत्वाचे वाटूं लागतात व पैसा सत्तां यांवर लक्ष केंद्रित होऊन मी पैसें देतों म्हणून संस्थान चालतें, त्यामुळें माझा तेथें हक्क आहे व म्हणून मला तेथें सत्तेंत भाग मिळाला पाहिजें वगैरेसारखे समज [म्ह. गैरसमज] फैलावत जाऊन अखेर आत्मन्नोतीकरिता,

 ज्या उपासनेच्या वाढीकरितां अहंकार कमी होऊन साधनाचें व तद्वारा भगवंताचें प्रेम उत्पन व्हावें या हेतूकरितां - गुरुंनी आयुष्य झिजविले व ज्याकरितां मंदिर वगैरे अस्थित्वांत आली ती उपासना मागें राहून भांडणतंट्यांत पर्यवसान होतें. 

याकरितां माझ्यामुळें काही होतें आहे ही कल्पना टाकून देऊन भगवंताच्या वा गुरूच्या प्रेमाकरितां म्हणून मान, सत्तावगैरेची अपेक्षा न ठेवतां माझे कल्याणाचें साधन व स्थान म्हणून पाहाणे जरूर आहे. पैसा देण्यांत संस्थानास मदत यापेक्षा माझी पैशाची आसक्ति जावी हा हेतू असावा व देहकष्ट करण्यांत अहंकार घालवण्याची भावना असावी. असे सर्व वागतील तर सर्वत्र प्रेमाचें राज्य होईल व  गुरूला त्याचें खरें प्रेम असल्यानें त्याची खरी सेवा केल्याचें श्रेय मिळेल व तो आपलें कल्याण करील. 

               *********


संदर्भः श्रीब्रह्मचैतन्य सुवर्ण महोत्सव ग्रंथातील परमार्थाबद्दल गैरसमजुती ह्या श्रीपरशराम गणेश गद्रे, पुणे २, ह्यांचा लेख 


*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

नामभारी

 *🍁🍁!!श्रीराम समर्थ!!🍁🍁*


*भगवंता इतके शुद्ध आणि पवित्र काही नाही. म्हणून देहाचे खाणेपिणे, त्याच्या सवयी, त्याचे आचरण उत्तम ठेवून त्याला शुद्ध आणि पवित्र ठेवावा. देहाला अपवित्र करणारे काम, क्रोध, द्वेष, लोभ, मत्सर इत्यादी विकारांना थारा देऊ नये. ते असेल तर वाईट वाटावे.

 देहाचे प्रत्येक कर्म म्हणजे भगवंताची सेवा आहे, हे भान विसरू नये व सर्व कर्मे मनापासून करावी. देहावर मालकी भगवंताची आहे ही पूर्ण खात्री ठेवावी. देहाचे सुखदुःख मान-अपमान विशेषता: देहदुःख भगवंताच्या इच्छेने आलेले आहे ही भावना ठेवून ते समाधानाने भोगावे.

 भगवंताचा सहवास देहाने नव्हे देहतील मनाने करायचा असतो. म्हणून २४ तास त्याच्या अस्तित्वाची आठवण ठेवण्यास त्याचे अखंड स्मरण ठेवावे. नामस्मरणाचा हेतू हाच आहे. आपल्या जीवनात जे घडते त्यात भगवंताची इच्छा पहावी. म्हणजे जे जे घडेल त्याचे कौतुक वाटेल. भगवंत सर्वांचा नियंता आहे. त्याची सत्ता सर्वांच्या जीवनावर चालते. तो आपल्याला बाहुली सारखा नाचवतो.हे जर विसरले नाही तर माणसांचा अहंकार केवळ नामभारी राहतो. माणूस आपल्या जीवनाकडे साक्षीपणाने पहायला शिकतो.*


*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*


*प. पू. सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*

Saturday, November 8, 2025

भाव

 सर्वहृदय निवासी, सर्वसाक्षी असा परमात्मा प्रत्येकाच्या अंत:करणातील भक्ती जाणतोच. भगवंत म्हणतात "मी भक्तांमध्ये लहानमोठा, गरीब श्रीमंत असे भेद करीत नाही. भक्ती मोजायलाf माप काय आहे ? गुंजभर सोनं आणि मणभर सोनं, कसाच्या अंगाने दोन्ही सारखंच असतं. 

माझ्यासाठी भाव महत्वाचा. भावाच्या ठिकाणी मी आधीन आहे. तेथे मी येऊन राहतो. तिथला पाहुणचार देखील स्विकारतो." ज्या ठिकाणी प्रेम नाही, आपुलकी नाही, तेथे पाहुणे देखील जायला तयार होत नाही. चुकून गेलाच तर लवकर काढता पाय घेतो. आपण हवे आहोत की नको , हे सामान्य माणसाला ही समजते तर भगवंतांना समजणारच. भगवंतांना श्रीमंतीचे, मान सन्मानाचे कोणतेही कौतुक नाही.

 भक्ताच्या एकनिष्ठ भावासाठी भगवंत विकले जायला तयार आहेत. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. धुतराष्ट्राच्या राजवाड्यात पांच पक्वानांचे भोजन सेवण्या ऐवजी भगवंतांनी विदुराच्या घरी कण्या सेवन करणे पसंत केले, कारण भगवंतांना भाव समजतो.

Friday, November 7, 2025

सामान्य स्थिती

 प.पु.श्रीनिंबर्गी महाराज आणि त्यांचे सर्वात शेवटचे शिष्य श्रीनरसप्पा शापेटी प्रवास करीत असताना एकदा एका रात्री एक देवळात मुक्काम केला. श्री नरसप्पांना बाहेर झोपायला सांगून पु.श्रीनिंबर्गी महाराज गाभाऱ्यात नेमाला बसले. नरसप्पा यांना विषाद वाटला. डास, किडे, गोचीड यांचा त्रास होऊ नये म्हणून श्रीमहाराज आत बसले आणि मला मात्र बाहेर झोपायला पाठवून दिले. सकाळी उजाडल्यावर नरसप्पा आत जाऊन निंबरगी महाराजांना पाहतात तो काय ? संपूर्ण अंगावर गोचीड बसलेले आणि श्रींनिंबरगी महाराज शांतपणे नेमात मग्न होते. 

श्रीनरसप्पानी नंतर सांगितले की भरपूर गोचीड  तरी श्रीमहाराजांच्या अंगावर बसलेले असावेत. देहभान हरपलेली, देवरूप झाल्याची ती अवस्था. त्या अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हटले आहे. श्रीभाऊसाहेब महाराज उमदिकर यांना नेमाची आतून जोराची प्रेरणा झाली, 

उर्मी आली की काहीवेळा ते श्री तात्या यादवाड यांना निरूपण करण्यास सांगून स्वतः नेमला बसत असत. वैकुंठ परम सर्वकाळ पु. श्रीगुरुदेव रानडे चित्रकूट येथे गेले असताना ते अशा आनंद अवस्थेला  पोहोचले होते की तो आनंद शरीराला सहन होईना, म्हणून तेथून सामान्य स्थितीला येण्यासाठी त्यांना काहीतरी वाचन करावे लागले. शरीराच्या कोणत्याही अवस्थेत ते देवाला सोडू शकत नाहीत, देव त्यांना सोडू शकत नाही.

Thursday, November 6, 2025

भक्ती

 सर्वहृदय निवासी, सर्वसाक्षी असा परमात्मा प्रत्येकाच्या अंत:करणातील भक्ती जाणतोच. भगवंत म्हणतात "मी भक्तांमध्ये लहानमोठा, गरीब श्रीमंत असे भेद करीत नाही. भक्ती मोजायलाf माप काय आहे ? गुंजभर सोनं आणि मणभर सोनं, कसाच्या अंगाने दोन्ही सारखंच असतं. माझ्यासाठी भाव महत्वाचा. भावाच्या ठिकाणी मी आधीन आहे. तेथे मी येऊन राहतो. तिथला पाहुणचार देखील स्विकारतो." ज्या ठिकाणी प्रेम नाही, आपुलकी नाही, तेथे पाहुणे देखील जायला तयार होत नाही. चुकून गेलाच तर लवकर काढता पाय घेतो. आपण हवे आहोत की नको , हे सामान्य माणसाला ही समजते तर भगवंतांना समजणारच. भगवंतांना श्रीमंतीचे, मान सन्मानाचे कोणतेही कौतुक नाही. भक्ताच्या एकनिष्ठ भावासाठी भगवंत विकले जायला तयार आहेत. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. धुतराष्ट्राच्या राजवाड्यात पांच पक्वानांचे भोजन सेवण्या ऐवजी भगवंतांनी विदुराच्या घरी कण्या सेवन करणे पसंत केले, कारण भगवंतांना भाव समजतो.

Wednesday, November 5, 2025

सोबत

 # सोबत#भयकथा 

 वामन हा एका मध्यवर्गीय कुटुंबातील मुलगा होता त्याची आई ,बायको ,आणि मुले असे हसतखेळत कुटुंब होते. तो स्वभावाने मन मिळाऊ असल्यामुळे सगळे त्याला आपलेसे करत . त्याला दोन्ही मुली होत्या त्यांचा बद्दल त्याने अनेक स्वप्न रंगवली होती. तो कारखान्यामध्ये कामाला होता. 

संसाराची गाडी अशी चाललेली होती. रात्री ११,३० ची शिफ्ट असायची ते तिघे मित्र एकटेच जात आणि एकटेच येत असत . सदा,वामन आणि प्रकाश तिघेही खरेखुरे मित्र होते एकमेकाला कोणत्याही परिस्थितीत आधार देणारे. वामन आणि प्रकाश च्या घरापुढे जाऊन थोड्या अंतरावर सदा त्यांना येऊन मिळे . रात्री जरी जात असेल तरी एकमेकांच्या साथीमुळे भीती वाटत नसे. कारण रात्री रस्त्यातच स्मशान लागे . दुसरा रस्ता नसल्यामुळे कामासाठी ते जलद निघून जात.

  एक दिवस मात्र वामन आणि प्रकाश दोघेच निघाले सदा आजारी होता तो थोडा  उशिरा येणार होता आत्ता पर्याय नव्हता त्यामुळे ते पुढे गेले . कारखान्याचा भोंगा वाजला सगळे एकत्र आले . थोड्या वेळात सदा आला  नेहमी प्रमाणे काम सुरू झाले पहिल्या पाळीचे लोक गेल्यामुळे दुसऱ्या शिफ्ट मधील गर्दी कमी होती. काम सुरू झाले कामाच्या एका भागात प्रकाश आणि दुसरे काही कामगार कच्चा माळ जोडून पुढे वामन आणि सदा  होता तेथे देत असत  असेच कामाचे स्वरूप होते वामन आणि सदा सगळे भाग नीट आहेत का याचे टेस्टिंग करून शेल्फ वर ठेवत . आज सदाला बरे नसल्या मुळे वामन ने त्याला बैठे काम दिले तो खालून वर वस्तू देऊ लागला . २वाजत आले . तयार माळ भराभर वर जाऊ लागला . वामन चकित झाला कधीही कामाची चपळाई न करणारा सदा आज असा चपळ कसा झाला . वामन  माल  ठेवायला पुढे सरकला आणि सदा त्याला बसल्या नसल्याचं हात वर करून माल देऊ लागला. वामन हादरला कारण एवढा मोठा हात झाला होता. त्याला लक्षात आले हा सदा नाहीच त्याने  पाणी प्यायला  जाण्याचे नाटक करून तो तिथून निसटला. सदा नसून भुतं बरोबर काम करत होतो हे लक्षात आले . त्याची वेळझाली की ते निघून गेले

 मित्रांनी घरी फोन करून पाहिले तर सदा घरीच होता तो आलाच न्हवता.,,त्याला रस्त्यातच येताना दरदरून घाम आला आणि घरी गेला होता.सगळे सांगू लागले तुम्ही कोणत्या रस्त्याने आला वामन ने नेहमी प्रमाणे स्मशानभूमीची जागा सांगितली. सगळ्यांना  ऐकून धक्काच बसला . रात्र भर हा भुताबरोबर काम करत होता. पुढे तो कच्चा रस्ता मोडून हायवे झाला . पण हा अनुभव वामन चया कायम लक्षात राहिला.

                          अस्मिता माधव

Tuesday, November 4, 2025

भयकथा

 भयकथा#ती#सत्यकथा.  भाग २

 लेख लिहायच्या आधी मी थोडी पाश्वभुमी सांगू इच्छिते. ही कोणतीही दंत कथा नाही तसेच हया कथा काल्पनिक ही नाहीत  त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आहेत.

 प्रेमा वय वाढेल तसे त्या धक्यातून सावरू, लागली,घरातील काम भाच्यांची जवाबदारी आणि शाळा या मध्ये तिचे दिवस निघून जात होते.चांगली वाईट प्रसंगात हसत हसत पुढे जाणे हे ती शिकली होती. १५ ,१६ व्या वर्षीच तिला घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पेलायची सवय लागली .परिस्थिती माणसाला शहाणे बनवते.तिला भावाच्या ओळखीने एका ठिकाणी दवाखाना मध्ये मदतनीस ची नोकरी लागली. तिचे रोजची वेळ ही ६पर्यंत घरी यायची होती. प्रेमा दिवसा उजेडात घरी येई . घरी आल्यावर वहिनी कामाची यादी वाचतच. हे तिचे रोजचेच . 

     एक दिवस नेहमी प्रमाणे कामावर गेलेली प्रेमा ७ वाजले तरी परतली नाही. तिची आई जाम घाबरली .कारण इतक्या वर्षामध्ये तिला शहरातील काही जागाबद्दल माहिती होतीच. ती पटापट पाय उचलत प्रेमाकडे गेली. तिच्या आईला पाहताच कामावरच्या बाईंनी तिला घरी सोडले. दोघीही वाऱ्याचा वेगाने चालू लागल्या. त्यांचा रस्त्या मध्ये पुल लागत असे,ह्या पुलावर कोणीतरी वाट आड वते हे त्यांना ऐकून माहिती होते. 

वातावरणात गारवा होता दोघींनी वेग वाढवला पाऊले झपाझप पडू लागली,पुलावर कोणीही दिसत न्हवते गाडी ही एखादी तुरळक. त्यांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला. पुलाच्या वर पाऊल ठेवताच एक स्त्री त्यांचा बरोबरीने चालू लागली दोघींनी कळेना ही कोण अचानक बाई आली ,२५२६वर्षाची असावी ,पांढरी साडी नेसून केस सोडून चालत होती . ह्या दोघी पुढे जाऊ लागल्या तशी ही बोलायला लागली थांबा ना मला पण यायचे आहे पुला पलिकडे माझे घर आहे ,ह्या पुढे ती मागे शेवटी ती रडू लागली भयाण शोक करू लागली या मागे वळल्या नाहीत पुल पार झाला तशी ती थांबली ,यांनी आपली वाट धरली. पुढे लांबवर जाऊन या दोघींनी तिचा कानोसा घेतला तर ही बाई  येणाऱ्या वाहनांना दोन्ही हात पसरून अडवू लागली. तिचे हात एवढे मोठे झाले की अखा पुल अडवला जाऊ लागला ,लहान नाजूक दिसणारी ती  बाई खूप मोठी दिसू लागली प्रेमाला. हे पाहून प्रेमा चक्कर येऊन पडली. आईने तिला घरी आणले .पुढे तिला शुद्ध यायला बराच काळ लोटला. ती जागे पणी कोणाला ओळखेना .अशी शक्ती बघण्याची , जाणंवण्याची तिला शक्तीच होती जणू  . ...,...अस्मिता माधव

Monday, November 3, 2025

कांदेभजी

 *आज कांदेनवमी ! एक विलक्षण खाद्ययोग !!*


पूर्वी आषाढी एकादशीच्या आधीच्या दिवसात, घरात कांही तेल-तुपाचे पण पचायला हलके पदार्थ मुद्दाम तयार केले जात  असत. त्याला आषाढ तळणे असे म्हणत असत. पावसाळ्यात अनेक रोगांच्या साथी उद्भवतात. हा मरीआई देवीचा कोप मानला  जात असे आणि असा कोप होऊ नये म्हणून या देवीची पूजाअर्चा करून तिला नैवेद्य अर्पण केला जात असे. 


पण आषाढ शुद्ध नवमी ही कांदेनवमी म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात असे. या नंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी आणि तेव्हाच सुरु होणारा चातुर्मास हा एक मोठा धार्मिक-सामाजिक कालखंड असे. चार महिने कांदा, लसूण, वांगे असे वातूळ आणि पचायला जड असलेले पदार्थ खाणे वर्ज्य केले जात  असे. म्हणून या नवमीच्या दिवशी घरात असलेले सर्व कांदे हे संपविले जात असत, अर्थातच कांदाभजी ( आणि कांद्याचे अनेक पदार्थ ) करून ! 

यासोबतच बटाटा, वांगी, मिर्ची, ओव्याची पाने, मायाळूची पाने यांचीही भजी केली जात असत. घरातील सर्व मंडळी यात सामील होत असत. गावाकडे तुफान पडणारा पाऊस आणि गरमगरम भजी, हा एक विलक्षण खाद्ययोगच म्हणायचा  !      


कांदाभजी आणि पाऊस यांचे काय नाते आहे काही माहिती नाही. पण आता पावसाचा राग " मेघ " रंगत चालला आहे. भज्यांच्या आठवणींनी आणि काल्पनिक वासाने जीभ चाळविली गेली आहे. मसाल्याच्या वाफाळत्या चहाचा गंध पसरल्याचा  भास होतो आहे. अनेक मैफिलीत ऐकलेल्या पावसाच्या अनवट कविता आणि गीते मनात रुंजी घालतायत !  मन तरलतेने एका खाद्यात्मिक अनुभूतीचा शोध घेत आहे. 


कांदा हा तसा या भूतलावरचा  एक अजब पदार्थ आहे. अध्यात्मापासून आयुर्वेदापर्यंत आणि राजकारणापासून बुद्धिमत्तेपर्यंत याचा मोठाच दबदबा ! अध्यात्म हे कांद्यापासून सोवळे पाळून लांब राहते खरे पण खुद्द कांदा हा भलताच अध्यात्मिक आहे. आडवा कापला तर सुदर्शन चक्रासारखा दिसतो. उभा कापला तर शंखासारखा दिसतो. पातीसह हाती धरला तर गदेसारखा दिसतो. टोक तसेच ठेऊन उभ्या पाकळ्या चिरल्या तर कमळासारखा दिसतो. म्हणजे एकाच कांद्यामध्ये  शंख, चक्र, गदा आणि पद्म दिसणारा कांदा हा केवढा पवित्र ! आयुर्वेदामध्ये त्याला खूप मान आहे.  एखाद्याला तो शुद्धीवर आणण्याचे काम तो करतो. निवडणुका नसल्या तर तो शेतकऱ्यांना रडवतो आणि निवडणूका असल्या तर राजकारण्यांना घाबरवतो. एखाद्याच्या अकलेचा उणे निर्देशांक कांद्यामध्ये मोजला जातो. 


ते काहीही असले तरी या कांद्याची भजी आणि धुंद पाऊस यांचे मात्र एक नाशिले नाते आहे हे नक्की ! याची लज्जत आणि रंगत वाढविण्यासाठी काही शिष्टाचार आणि नियम पाळणे फार महत्वाचे आहेत. बाहेर तुडुंब पाऊस हवाच. तुम्ही त्यात थोडेतरी भिजलेले असायला हवे. निदान  पावसाच्या सान्निध्यात तरी हवे. तळणीच्या धगधगत्या होमकुंडावरील कढईत नाचणाऱ्या भज्यांच्या गंधाने  आसमंत व्यापलेला असावा. मित्रमैत्रिणी, आप्त, सहकारी अशा मंडळींसोबत गप्पा सुरु असतांना पुढ्यात गरमागरम भज्यांची प्लेट यायला हवी. सोबत हिरवी मिरची किंवा लसूण चटणी हवी. पाण्याच्या ग्लासाऐवजी मसाल्याच्या चहाचा ग्लास हवा. बाहेर पावसाचा, टेबलवर गप्पांचा आणि समोर भज्यांचा पुरवठा वाढत जायला हवा. हळूहळू आपण खाद्यात्मिक अनुभूतीची वरची वरची पायरी चढू लागतो. 


कधीकधी अशा भजी-मेहेफीलीचा बेरंग करणाऱ्या गोष्टी घडतात. भज्यांसोबत गोड चटणी देणे हा चव हक्कभंग आहे. कांही वेळा, कांही ठिकाणी सोबत येणारी गोड पातळ चटणी किंवा पातळ हिरवी चटणी या भज्यांचा, एखादा मांचुरियन अवतार करून टाकतात. एखाद्या ठिकाणी कांदाभजी खातांना त्यात धना घातलेला खावा लागतो. तो तर फार खटकतो. एखादा मस्त रंगलेला मल्हार राग ऐकतांना मध्येच चुकून कोमल रिषभ ऐकू आला तर जसे खटकते तसेच हे खटकते. ती भजी तुम्हाला नीट पचावीत म्हणून त्यात धणे  घालतात

आज कांदेनवमी आहे. हे आख्यान वाचून तरी हा कांदेभजी योग चुकवू नका .😃👌👍

Sunday, November 2, 2025

तो दिवस

 बारा वाजायला एक मिनिट


तो दिवस… अगदी वेगळा … 

सकाळीच निघाले होते ऑफिसला. नेहेमीप्रमाणे. तीच ट्रेन पकडायची होती. ८.१७. चर्चगेट. नेहेमीच्या लगबगीने कामं चालू होती. जास्त मेंदूला ताण न देता हात काम करत होते. नेहेमीच्या सवयीच्या कामांचं असंच असतं. त्यात फक्त हाताचा पायांचा सहभाग असतो. मेंदू काम नाही करत. त्याच्या सवयीचं काम असतं ना ते. चष्मा, मोबाईल, किल्ली सर्व काही पर्सच्या ठराविक जागेत गेलं. डबा वेगळ्या पिशवीत गेला. गॅस, गिझर बंद आहेत ना ह्याची खातरजमा केली नि पर्स खांद्याला लावली. निघणार तोच फोन वाजला. दुर्लक्ष करून निघणार होते. पण वाटलं नको. महत्त्वाचं काही असलं तर?  


फोन घेतला. सरितामावशीचा फोन होता. तिच्या सुनेच्या डोहाळजेवणाचं आमंत्रण. नाही म्हटलं तरी पाच मिनिटं गेलीच. काहींना मुळीच समजत नाही. नोकरी करणाऱ्या बायकांना सकाळी फोन करावाच का म्हणते मी? आधीच इतकी कामं उरकायची असतात, मस्टर मिळतंय का याचं टेन्शन असतं आणि त्यातून हे फोन …  


छे! उगाच फोन घेतला असं झालं मला. आता कुठली ८.१७ मिळायला? जाऊदे. आजचा लेट ठरलेला. लेटचं एकदा नक्की झालं की मन निवांत होतं. कारण आता काही करू शकत नाहीच. मग काय? लेट तर लेट. आता ९.१३ पर्यंतची कुठलीही ट्रेन चालेल. आता लेट लागणारच आहे तर बँकेचं एखादं काम उरकूनच जावं असं ठरवलं. लगेच बँकेचं पासबुक काढलं आणि निघाले.  


रस्त्यावरून चालताना नेहेमीप्रमाणे मोबाईल हातात होताच. व्हाट्स ऍप, फेसबुक आल्यापासून घाणेरडी सवय लागली आहे. वेळ वाचवण्याकरता चालताना, जिने उतरताना मेसेजेस वाचायचे. एक दोनदा जिन्यात पडलेही होते. पण सवय काही जात नाही. आजही तेच झालं. समोरून येणाऱ्या गाडीने करकचून ब्रेक लावला. तेव्हा भानावर आले. बाई माणूस म्हणून ड्रायव्हरने शिव्या घातल्या नाहीत पण नाराजी व्यक्त केलीच. मीही सॉरी सॉरी म्हणून मोबाईल पर्समध्ये टाकला. आजूबाजूच्या लोकांनी विचित्र नजरेने बघून ओशाळवाणं केलंच. पण तरीही तिकडे दुर्लक्ष करून देवाचे आभार मानले कारण एक अपघात टळला होता. बरं ती काही छोटी गल्ली नव्हती तर चांगला मेन रोड होता. त्याने ब्रेक लावला नसता तर कदाचित वरचा रस्ता धरावा लागला असता.  


ओह गॉड! नॉट अगेन! परत एकदा ठरवलं. चालत असताना, पायऱ्या चढत असताना अजिबात मोबाईल बघायचा नाही. बँकेत गेले. पासबुक अपडेट केलं. नेहेमीच्या सवयीने एफडी चा बोर्ड पाहिला. मागे पाहीले होते तेव्हा ६.५% होते. आता ७.५%. अरे वा ! एक टक्का वाढलाय. चौकशी केली तर समजलं. आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून रेट परत कमी होणारेत. बँकेत बॅलन्सही वाढलाच होता. एफडी करायला झालीच होती. लगेच निर्णय घेतला. करून टाकू आताच. फॉर्म घेतला. भरला. पण बँकेला आधार कार्ड वगैरे अजून काही डॉक्युमेंट्स हवी होती. मग ह्यांना फोन लावला आणि त्यांची वाट पाहात बसले. दहाव्या मिनिटाला हे हजर झाले. घड्याळाचा काटा भराभर पुढे सरकत होता. ९.१३ कशीही गाठायला हवीच होती. हे आले ते बरंच झालं. बरोबर स्कुटर असणार. काम झालं की रिक्षा शोधत रहायला नको. एफडीचं काम आटपून बाहेर पडलॊ.  


“मला जरा स्टेशनला सोडताय ना?” 


“हो. बस.” 


एरवी ड्रेस असला की मी दोन बाजूला पाय सोडून बसते पण आज नेमकी साडी होती. त्यामुळे कशी बशी एका बाजूला दोन्ही पाय घेऊन बसले.  


“जरा फास्ट हं. नाहीतर ९.१३ जाईल माझी.” ह्यांच्या कानात कुजबुजले.  


एरवी ‘हळू चालवा जरा.’ म्हणणारी मी आज फास्ट न्यायला सांगतेय त्यामुळे त्यांना बरंच झालं. सुसाट वेगाने स्कुटर निघाली. काय कसं माहीत नाही पण स्कुटरचं पुढचं चाक गर्रकन फिरलं आणि ती एका बाजूला कलंडली. आम्ही दोघंही पडलो. आणि क्षणात मागच्या बसने करकचून ब्रेक लावला. मी डोकं सावरलं होतंच. उचलून पाहिलं तर अक्षरशः तीन चार पावलांवर बस होती. दोघंही सुखरूप होतो. थोडंसं खरचटण्यापलीकडे काहीही इजा झाली नव्हती. ह्यांनी उठून परत स्कुटर चालू केली. ‘सावकाश’ मी परत ह्यांच्या कानात कुजबुजले. अजून हृदयात धडधडत होतं.  


९.१३ मिळाली एकदाची. खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूपच. नेहेमीपेक्षा डबल. शिवाय गाडी रडत खडत चालली होती. बाकीच्या बायका जे बोलत होत्या त्यावरून कळलं. ८.१७ ला अपघात झाला होता. लेडीज डबा घसरला होता रुळावरून. ऐकल्यावर छातीत धस्स झालं. ८.१७ म्हणजे आपली नेहेमीची ट्रेन जी आज सरितामावशीमुळे चुकली होती. तिला आपण नावं ठेवली सकाळीच फोन केला म्हणून. पण तिच्यामुळेच वाचलो आपण. आज हे काय होत होतं? तीन वेळा वाचलोय आपण आज. मृत्युच्या अगदी जवळ जाऊन परत आलोय. काय वाढून ठेवलंय आज? हे म्हणत होते तसं परतायला हवं होतं का घरी? नकोच पण. आज २ तारीख. शेड्युल्स, बँक रिको येतील आमच्या सगळ्या ब्रांचेसची. आमचं शेड्युल टॅली आहे पण आमचं हेड ऑफिस असल्याने आमच्या खालच्या ब्रॅंचेसचंही टॅली आहे की नाही हे पहायला लागतं. त्यांना मदत करणं ही आमची जवाबदारी असते.  


तेवढयात विचारे मॅडमचा फोन वाजला.  


“कुठे आहेस? आज रजा आहे का तुझी?” 


“नाही मॅडम. येतेय. निघायला उशीर झाला थोडा. पोहोचते अर्ध्या तासात.” 


“बरं बरं. काहीच हरकत नाहीय. फक्त आज आपल्या ऑफिसमध्ये नको येऊस. सरळ फोर्ट ब्रांच मध्ये जा.” 


“का हो ? काय झालं?” 


“अगं, सर्व्हर डाऊन आहे त्यांचा. त्यामुळे रिकंसिलेशन बॅक एंडला करावं लागेल. त्यांना ते जमत नाहीय. बाकी सर्वांचं सकाळीच आलंय रिको. त्या एका ब्रान्चचंच राहिलंय. त्यांचं झालं तर आपल्या डिव्हिजनला फ्लॅश मिळेल रिको प्रथम पाठवल्याचं.” 


चला. बरंच झालं. आपल्या ऑफिसमध्ये न जाता सरळ फोर्ट ब्रांचमध्ये जायचं  म्हणजे मला ऑन ड्युटी मार्क होणार. लेट वाचणार. नोकरी करणाऱ्यांचं हे असंच. एक लेटमार्क वाचला तर कोण आनंद? त्या आनंदात सकाळच्या त्या अपघातांचं मी विसरून गेले.  


ब्रान्चमध्ये माझी वाटच पाहात होते. मी रिकंसिलेशन करण्यात एक्स्पर्ट आहे. त्यात अगदी एका पैशाचा फरक जरी आला तरी तो शोधून ते टॅली करण्यात माझा हातखंडा आहे. त्यामुळे ब्रांचला अडचण आली की आमच्या विचारे मॅडम मलाच पाठवतात. एकंदरीतच विचारे मॅडम माझ्यावर खुश आहेत. मी यायच्या आधी आमचं डिपार्टमेंट खूप अस्ताव्यस्त होतं. पाच सहा महिन्यांची कामं शिल्लक होती. वरच्या ऑफिसमधून सारखे फोन यायचे. मी आल्यानंतर उशिरापर्यंत बसून सर्व शिल्लक कामं हातावेगळी केली. दोन तीन महिन्यातच सर्व सुधारलं. एवढंच नाही तर आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींकरता बक्षीसही मिळाली. आणि आता रिको, शेड्युल वगैरे वरच्या ऑफिसला पाठवण्यात आमचा नेहेमीच पहिला नंबर असतो. म्हणूनच विचारे मॅडम माझ्यावर खुश आहेत. मी त्यांच्याकरता लकी आहे असं त्या म्हणतात. ह्या लकी बिकी असण्यावर माझा मुळीच विश्वास नाही. हे सर्व आपल्या मानण्यावर असतं आमचे हे सुद्धा नशीब, ज्योतिष वगैरेवर फार विश्वास ठेवतात. म्हणूनच सकाळी आलेल्या अनुभवांमुळे ते मला आज ऑफिसला पाठवायला तयार नव्हते. आज महत्वाचं काम आहे. जायलाच हवं असं सांगून मी आले. तरी बरं ह्यांना अजून ती गोष्ट माहीत नाहीय. मुद्दामच बोलले नाहीय मी. अशा गोष्टी मी लगेच सांगून नाही टाकत. उगीच त्यांच्या डोक्यात तो किडा वळवळत रहातो मग.  


*** 


मी धापा टाकत ब्रँचमध्ये पोहोचले. मला पाहून तिथल्या ऑफिसरचा जीवही भांड्यात पडला. मी रिकंसिलेशन टॅली करूनच निघणार याची खात्री होती त्यांना. चहा वगैरे झाल्यावर त्या मला आयटी (कॉम्प्युटर) रूममध्ये घेऊन गेल्या. बॅक एन्ड काम करायचं होतं त्यामुळे त्या छोट्या आय टी रूम मध्ये बसूनच काम करावं लागणार होतं. खरं तर आयटी रूममध्ये सर्व्हर, राऊटर्स, स्विचेस वगैरे कॉम्पुटर संबंधित उपकरणं असतात. त्यामुळे तिथलं तापमान कमी असायला लागतं. त्याच्या मोठ्या मोठ्या बॅटरीज असतात त्या वेगळ्या खोलीत असायला हव्या असा नियम आहे. फायर फायटिंग (अग्निशामक) मशीनही तिथे असायलाच हवं आणि तेही चालू अवस्थेत. पण ही ब्रँच अगदी गचाळ होती. एक तर जागा फार कमी होती. शिवाय व्हेंटिलेशन अजिबात नव्हतं. उजेड वारा अतिशय कमी. कधी पाण्याचे प्रॉब्लेम्स तर कधी विजेचा. त्यामुळे एकंदरीतच कर्मचाऱ्यांमध्ये खूपच असंतोष होता. आम्ही हेडऑफिसवाले गेलो की आम्हाला त्यांची सर्व गाऱ्हाणी ऐकून घ्यावी लागत असत.  


आजही तसंच झालं. अर्थात ह्या त्यांच्या अडचणींशी माझं काहीच देणंघेणं नव्हतं. ते सांगत होते त्या गोष्टी माझ्या किंवा माझ्या डिपार्टमेंटच्या अखत्यारीतील नव्हत्या. मला माझ्या कामाशी मतलब होतं. त्यामुळे ते ज्या इतर समस्या सांगत होते त्या मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या आणि मी ज्या कामाकरता आले होते ते काम सुरु केलं. लंच नंतरही आमचं काम सुरुच होतं. घामाने आम्ही बेजार झालो होतो. त्यामुळे कामाला म्हणावा तसा वेग येत नव्हता. ह्या अशा वातावरणात रोज काम करणं खरंच अवघड होतं. मला तिथल्या कर्मचाऱ्यांची दया आली. प्रोग्रॅमरची तर खूपच. बिचारा अख्खा दिवस या छोट्याश्या आयटी रूम मध्ये काम करत असतो.  


केवढी अडगळ होती तिथे. वायर्सचं जाळं पसरलेलं होतं. बॅटरीज नियमाप्रमाणे वेगळ्या रूममध्ये न ठेवता तिथेच ठेवल्या होत्या. नियमाप्रमाणे इथलं तापमान २४ डिग्रीपेक्षा कमी हवं. पण एसी काम करत नव्हता त्यामुळे ते तापमान ३२ डिग्री होतं. हाशहुश करत आम्ही कॉम्पुटर वर आमचं काम करत होतो.  


तेवढयात ‘फाट’ असा स्विच उडाल्यासारखा आवाज झाला. आणि क्षणात तिथे आगीचा मोठा लोळ उठला. आम्ही घाबरून दरवाजाच्या दिशेने गेलो. दरवाजा उघडायला गेलो तर तो दरवाजा एवढा घट्ट बसला की आम्हाला तो उघडताच येईना. किती प्रयत्न केला तरी दरवाजा उघडेना. इथे आग वाढत चालली होती. प्रोग्रॅमरने हुशारी करून तिथलं फायर फायटिंग मशीन वापरून आग कमी करायचा प्रयत्न केला. बाहेरचं कोणीतरी खालून वॉचमनला घेऊन आलं. त्याच्या जवळच्या आयुधांनी त्यांनी त्या रूमचा काचेचा दरवाजा चक्क फोडला आणि आम्हाला बाहेर काढलं.  


बाहेर पडल्या पडल्या माझ्याबरोबर कामाला बसलेल्या ऑफिसरला चक्कर आली आणि मलाही श्वासोश्वासाचा त्रास होऊ लागला. इथे आग आटोक्यात आली होती. त्यामुळे सर्वाचं लक्ष आमच्याकडे वळलं. डॉक्टरना बोलावलं. आम्हा दोघांचंही बीपी शूट झालं होतं. आम्हाला डॉक्टरानी इंजेक्शन देऊन विश्रांती घ्यायला सांगितली. मला तिथल्या कोणीतरी टॅक्सीत घालून घरी सुखरूप पोहोचवलं. ह्यांना फोन करून आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ते घरी आले होते. मला डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे शांत झोप लागली. उठले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. नुसती खिचडी कढी केली आणि भराभर आवरून बेडरूममध्ये आले. झोप झाली असली तरी डोकं दुखत होतं. दिवसभराच्या ताणामुळे असणार.   


आजचा दिवस फारच विचित्रपणे गेला होता. एकाच दिवसात मी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवातून गेले होते. त्याही साध्या सुध्या नव्हे तर मृत्यूच्या. मृत्युचं दर्शन मी आज अगदी जवळून घेतलं होतं. त्याला मी सकाळपासून हुलकावणी दिली होती. एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा. यामागे काय असेल? भूत प्रेत, कर्ण पिशाच्च, नशीब, पत्रिका, ज्योतिष कशाकशावर विश्वास न ठेवणारी मी आज पुरती गोंधळून गेले होते.  


दोन महिन्यापूर्वी आईकडे आलेला तो माणूस मला आठवला. बहिणीचा अशा सर्व गोष्टींवर भलताच विश्वास. तिची तब्येत सारखी बिघडायची म्हणून तिने त्याला बोलावलं होतं. त्याला म्हणे कर्णपिशाच्च येऊन समोरच्याचं भविष्य त्याच्या कानात सांगतं आणि तो ते आपल्याला सांगतो. त्या दिवशी तो माझ्याकडे बघून म्हणाला होता, “खूप जपावं लागेल. २ जानेवारीला अपघातामुळे जबरदस्त मृत्युयोग आहे. आडमृत्यू म्हणा ना.”  

त्यावर मी त्याला गप्प केलं होतं. बहीण म्हणत होती, “अगं, उपाय विचार ना.” पण मी तिच्यावरही रागावले होते. तो गेल्यावर आईला, बहिणीला मोठठं लेक्चरही दिलं होतं. आणि ह्यांना यातलं काही कळता कामा नये अशी सक्त ताकीदही दिली होती.  

त्याने सांगितलेलं मी काही मनावर घेतलं नव्हतं. एवढंच काय तर सर्व विसरूनही गेले होते. पण आज २ जानेवारीला हे सर्व घडल्यावर मात्र मला त्याची आठवण आली होती. ८.१७ च्या ट्रेनचा अॅक्सिडन्ट, मोबाईल बघत जाताना गाडीने लावलेला ब्रेक, स्कुटर उलटून पडले तेव्हाच अपघात आणि आता ब्रान्चमध्ये आगीतून सहीसलामत बाहेर पडले तो प्रसंग. लागोपाठ चार वेळा मी मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन परत आले होते. त्याला हुलकावणी दिली होती. केवळ माझं नशीब जोरदार होतं म्हणूनच मी वाचले होते.  


आजचा दिवस सरला होता. आता मी काही बाहेर नव्हते. माझ्या घरात मी सुखरूप होते. माझा अपघाती मृत्यु टळला होता. बिछान्यावर पडल्या पडल्या मला सर्व आठवत होतं. कर्णपिशाच्च खरंच येऊन कानात सांगत असेल त्याच्या? तारखेसकट सगळं? इतकं तंतोतंत? माझा थोडा का होईना त्या माणसावर विश्वास बसला होता. आज होताच माझ्या नशिबात आडमृत्यू. नक्कीच. आईला सांगावं का उद्या त्याला बोलाव म्हणून. अजून काही असेल आणि शांत वगैरे करायची असेल तर करून घेऊ. खूप रात्र झाली होती म्हणून. नाहीतर आताच फोन केला असता. तसंही त्या माणसाबद्दल मला ह्यांच्याशी बोलायचं होतं. ह्यांना सर्व सांगायचं होतं. पण हे अजून झोपायला आले नव्हते. ते अजून का येत नाहीत हे पाहण्याकरता म्हणून मी उठायला गेले तोच.....  

तोच वरचं छत वेगाने पंख्यासकट माझ्या दिशेने मला येताना दिसलं. मी बावरले. घाबरले. बाजूला होण्याइतकाही वेळ नव्हता. अंधारी येणाऱ्या डोळ्यासमोर फक्त समोरचं घड्याळ आलं. त्यात बारा वाजायला एक मिनिट होतं. फक्त एकच मिनिट होतं…  


***समाप्त***

नवल

डेड एन्ड ई-बुकमधून

कथेचा ऑडिओ

कथाविश्व - आपले कथांचे अनोखे विश्व🎉

Saturday, November 1, 2025

अन्नदान

 श्रीगोंदवलेकर महाराज देहात असतानाची ही हकीगत आहे. एकदा काय झाले श्रीभाऊसाहेब केतकर गोंदवल्यास होते आणि त्यांना भेटण्यासाठी एक वर्तक नावाचे गृहस्थ आले. त्यांनी पाहिले श्रीमहाराजांभोवती हा सगळा गोंधळ बायका , मुलं इतर माणसं त्यांच्या भोवती होती. ह्या वर्तकांची कल्पना साधू म्हणजे गंभीर माणूस.

 त्यांनी भाऊसाहेबांना विचारले "अरे तू काय पाहून यांच्याजवळ राहिलास ? " भाऊसाहेब म्हणाले " अरे आज मी नऊ वर्षे इथे आहे. पण या गृहस्थाच्या तोंडून मला अमुक हवं , हे मी ऐकलेले नाही. कुठल्याही प्रसंगात त्यांनी कधीही हे मला हवं असे म्हणाले नाहीत. त्यानंतर कोणीतरी श्री महाराजाना हे वरील संभाषण सांगितले. त्यावर श्रीमहाराज म्हणाले "अरे मी मागू कशाला? तहान लागली की कोणीतरी पाणी आणून देतो. भूक लागली की जेवायला बोलावतो. मग मी मागू कशाला?" हे कसं होतं ? असं श्री बेलसरे यांनी महाराजांना विचारले ( श्रीच्या वाणी आवतारा मधे ) तेव्हा महाराज म्हणाले " याला खात्री असते की मला जर जगवायचं असेल , तर मला भूक लागली आहे म्हणजे अन्न तयार असलंच पाहिजे . तहान लागली पाणी असलंच पाहीजे." काय दृष्टी आहे. याचा अर्थ असा की जिकडे ही वासना इच्छा होते,  ती पुरवणारी व्यवस्था जगामध्ये आहे. तिथे आपण आड येतो अहंकारामुळे. ते येऊ नये हा परमार्थ. मला जे मिळायचं आहे ते मिळेल. माझ्या आत मध्ये  ती इच्छा आली आहे ना , ती तृप्त झालीच पाहिजे. आपण काय करतो ? तर त्याला हट्ट लावतो, म्हणून सगळी भानगड होते. 

२) प्रेमाचा दुसरा संबंध सख्य सखा म्हणजे मित्र. याचे नाव आले की त्याचे नाव आले. मनुष्य इतर काही गुप्त ठेवील. पण तो आपल्या मित्रांना पासून काही गुप्त ठेवणार नाही. 

सत्पुरुष त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींना सख्यपणाने वागवीतात. श्रीमहाराज म्हणायचे " सगळ्या जगामध्ये राम भरला आहे तर येणाऱ्या माणसांमध्ये नाही का ?"  सत्पुरुष कोणाची अवहेलना करत नाहीत अपमान करत नाहीत. हे संख्याचे लक्षण आहे. 

3) प्रेमाचा तिसरा संबंध वात्सल्य.आई आणि मूल. वात्सल्यात म्हणावे मी तुझे मूल आहे. एक साधक बाई होत्या.त्या श्रीगोंदवलेकर महाराजांच्या शिष्या होत्या. अलीकडेच वारल्या त्या. प्रपंच मोठा असल्याकारणाने त्या रात्री उपासना व मानसपूजा करीत. ते झाल्यावर त्या म्हणायच्या " महाराज मी तुमची मुलगी आहे .

 तुमच्या मांडीवर मी डोके ठेऊन नीजते असे म्हणून मी उशीवर डोके ठेऊन नीजते."  रामाचे पाय उसे करून निजावे तशी ती बाई निजायची. त्या गेल्यानंतर त्यांचे यजमान श्रीबेलसरे यांना भेटायला आले होते. ते म्हणाले "एकदा मी तिला विचारले, तुझी स्थिती काय आहे  ? " त्यावर ती म्हणाली " माझी मानसपूजा संपली आहे. श्रीमहाराजांच्या मांडीवर मी आहे. मी आता जप करते आहे. माझ्याशी कोणी बोलू नका." हे वात्सल्य आहे. 

4) जो संबंध आहे तो मधुर संबंध नवरा आणि बायको. हा अतिशय मधूरच आहे नावाप्रमाणे. यात अतिषय  शुद्ध प्रेम असते. हा प्रेमाचा मार्ग आहे.


*भगवंताला बांधुन ठेवण्याचा उत्तम मार्ग कोणता तर*

*"आपलेपणाने".  आता आपलेपणा म्हणजे काय तर याला ममत्व असा साधा शब्द आहे . ममत्व म्हणजे माझेपण , माझेपणाच मूळ मीपणामध्ये आहे . ममत्व म्हणजे मीपणाचा विस्तार आहे . It is extension of the self .  म्हणजे काय तर माझ घर , माझी माणसे , माझा देह  वगैरे .  हा जो विस्तार  झाला त्याला आपलेपणा म्हणायचा .  मग भगवंताला वश करण्यासाठी आपलेपणा शिवाय मार्ग नाही .  आपलेपणा  म्हणजे प्रेमानी भगवंतावर स्वामित्व गाजवण  हे आहे.*

      *भक्तीमध्ये जेंव्हा परमात्मा तुमचा मीपणा गिळतो त्यावेळेला तो मानवीरुप धरुन तुमच्या जीवनात शिरतो . The Divine becomes human to enjoy the devotion . तुमच्या भक्तीचा  रस घेण्याकरिता तो माणूस बनतो . भक्तीमध्ये जे आपलेपण असत तितक जगात इतर कुठेही आढळत नाही . समर्थ रामदास स्वामी  पंढरीला आले आणि विठ्ठलाला पाहिल्यावर म्हणाले,*

*"इथे उभा का श्रीरामा,* 

  *मनमोहन  मेघश्यामा !!"*

 *काय केली सीतामाई,*

 *इथे आणिली रखुमाई!!*

 *काय केला हनुमंत,*

 *इथे आणिला पुंडलिक!!"*

       *त्यांना आपल्या दैवता पलिकडे दिसायचच  नाही . याचा अर्थ काय तर हे  Extension of the self  नव्हे का ?   माझा विस्तार आहे तो माझ्या देवतेचा आहे . आपलेपणा याचा अर्थ असा की , आपल अंतरंग त्याने इतक भरुन गेले पाहिजे की , जगात तेच दिसत  सगळीकडे . माझा जो विस्तार आहे ना तो माझ्या  देवतेचा विस्तार आहे  . यालाच रामकर्ता असे म्हणतात . माझ उठण , बसण , जगण , माझा व्यवहार या सगळ्यांमध्ये भगवंत आहे . एक दर्द नावाचा मोठा भक्त बादशहा जफरच्या वेळेला होता .  तो दर्द साधूच होता . तो म्हणे,*

*"जिधर देखे उधर तू ही तू है !"  गालीबने पण असच म्हटल आहे , " जब के तुझ बिन नाही कोई मौजूद !"*

      *आपलेपणा म्हणजे मला प्रत्येक गोष्टीत माझ्या गुरुचा हात दिसला पाहिजे . हे घर महाराजांच आहे , मी मालक नाही . हे आपलेपण काय आहे ? तर  भगवंता तुझी मालकी आहे या घरावर .*

     *ज्ञानेश्वर महाराज म्हणाले,*

*"मी उपचारे कवणाही!*

  *ना कळे गा !!"*

  *माझी प्रपंचाची आसक्ती , माझेपण भगवंताला दिले आहे . म्हणजे काय तर त्या माझेपणाला दिव्य स्वरुप दिलेल आहे . माझ्या देहासकट सगळ जे असेल ते , भगवंता ,  तू आहेस . आपल्या प्रपंचाच्या आसक्तीला अस दिव्य स्वरुप दिल्यानंतर माझी मुलबाळ , माझ्या मुलींच लग्न , माझ्या मुलाची नौकरी , सगळ तुझ्या हाती आहे . भगवंत ठेवील तस मी राहीन , ही त्यातली भावना पाहिज.*

      *आपली ज्ञानेश्वरी फक्त ऐकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी आहे . मग भगवंत करतील ते बरोबरच करतील . सुख काय , दु:ख काय तुझ्या हातून येऊ दे . तू त्यात असल्यावर वाईट करणारच नाही .  ही मला खात्री आहे.*

*( ज्ञानेश्वरी ....प.पू. बाबा बेलसरे. )*


*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*


*प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज


*श्रींची अन्नपूर्णा*


         श्रीमहाराजांच्या वडिलोपार्जित वाड्यात पुढील भागी श्रीरामाचे मंदिर, पाठीमागे स्वयंपाकघर व कोठी होती. कोठीचे काम श्रीधरपंत कुलकर्णी पहात. श्रींच्या दर्शनाकरता आलेले भक्त तीन-चार दिवस मुक्काम करीत. शिवाय कायम सेवेकरी असतच. नित्य ७५-१०० मंडळी भोजनास असत. अन्नदान हे श्रींना प्राणप्रिय. 

आलेल्या भक्तमंडळींस आग्रह करून ते ठेऊन घेत, त्यांना जेवू घालून तृप्त करीत. नंतर श्रीरामनामाचे बीज पेरीत. त्यांनी कोणापुढे कधीही हात पसरला नाही. मग एवढा खर्च कसा चालत असे? श्री म्हणत, 'मी माझे काम करतो. श्रीरामराय निभवून नेतो.' कितीही मंडळी असोत, कोणतेही पक्वान्न असो, कधीही आचारीपाणके पहावे लागले नाहीत. सौ. तुळजाकाकू, बनुताई, गोदूताई, सुंदराबाई, मथुताई, पटाईत मावशी यांची पलटण तयार! रामनामाच्या गजरात केवढाही स्वयंपाक झपाट्याने होई. मुली, अनुभवी बायका वाढपाचे काम करीत. थकल्याची जाणीवही होत असे. श्रीधरपंत भांड्यात चमचा खडबडून तूप वाढीत. श्रीमहाराज हसून म्हणत, 'पहा कोठावळ्याचे कसे पोट दुखते! अंताजीपंत, तुम्हीच तूप वाढा'. 

        अंताजीपंत सांगत,'मी अनेक मोठमोठ्या श्रीमंत, सरदारांच्या पक्ती पाहिल्या, पण असा थाट कोठेच अनुभवावयास मिळाला नाही. अशा पंक्तीत कित्येक वेळा श्रीमहाराज स्वतः लाडू वाढावयास घेत. जेवण आकंठ झाले असले तरी 'गुरुप्रसाद' म्हणून प्रतेकजण एकतरी लाडू घेईच. दत्तमंदिराचे पुजारी श्री. बाळंभटजी यांच्या पानासमोर श्रीमहाराज बसत, आणि म्हणत, 'बाळंभटजी, एका लाडूस एक चांदीचा रुपया.'

         -------आणि आकंठ जेवण झालेले बाळंभटजी श्रींच्या कडून पंचवीस रुपये मिळवीत! 


               *********


संदर्भः चैतन्य-स्मरण १९८८ मधील श्री अरविंद बाळकृष्ण दाढे, मुंबई यांच्या लेखातून


*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

Friday, October 31, 2025

तळमळ

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


*पू. बाबा : पाच मिनिटे का होईना, इतर सर्व काम आणि विचार बाजूला ठेवून निश्चयाने सर्व लक्ष नामाकडे देता आले पाहिजे, म्हणजे मग नामस्मरणात थोडा हुकमीपणा येईल. तसेच आपल्या आड काय येते हे सावधानतेने पहावे म्हणजे मग ते बाजूला काढण्यासाठी उपाय सुचेल. थोडक्यात 'मला ते पाहिजे' ही तळमळ हवी. आज त्याचा अभाव आहे. ही तळमळ निर्माण होण्यासाठी सत्संगती हाच उपाय आहे. सज्जन तुम्हाला मदत करू शकतात.

 ते तुमचे विकार बाजूला करतील पण तुम्हाला ते सहन झाले पाहिजे. विकार आपल्या अंगभूत झालेले असल्याने ते निघतांना फार त्रास होतो; ती तयारी हळूहळू होईल. पण आज साधनात एक किमान पातळी यावयास हवी. मागे जाऊ नये; पाऊल पुढेच पडले पाहिजे. आता साधनाच्याच मागे लागले पाहिजे. नामाच्या आड येणारे विचार खरें वाटतात म्हणून ते खरें असले तरी मला सुखाचे होणार नाहीत. 

मला नामाशिवाय दुसरे कशानेही सुख मिळणार नाही असे मनापासून वाटू लागले तर मन नामात रंगू लागेल. बहिर्मुखी निश्चय सोपा असतो पण अंतर्मुख व्हावयाचा निश्चय कठीण आहे. अशा निश्चयाच्या आड आपणच येत असतो. वास्तविक जगात आपल्यावाचून काहीच अडत नाही. म्हणून जगाची फारशी पर्वा करण्यात अर्थ नाही. श्रीमहाराज म्हणत की जे नामाच्या आड येते त्याची पर्वा करू नये. आता मनाशी सरळ समोरून युद्ध केले पाहिजे.*


*🍁अध्यात्म संवाद🍁*

Wednesday, October 29, 2025

गुरुभेट

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*



*तळमळ  लागल्यावर  गुरुभेट  निश्चित  !*


काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते, आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्टासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत : एक सद्विचार, दुसरी नामस्मरण, आणि तिसरी सत्संगती. संत ओळखणे फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हांच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत, पण याहीपेक्षा, आपल्याजवळ राहणारे असे त्याचे नाम घ्यावे. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात, तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता, संतच - अगदी हिमालयातले संत, तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको ! तुम्ही म्हणाल, 'आम्हाला ते करता येत नाही.' पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो, आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला, तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही ? त्याला एखादी विद्या आली नाही, तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही ? आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही ? तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का ? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरू प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहात असतो.


आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील; पण गुरू हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला, तरी तो नाही असे समजू नका. तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो. म्हणून तुम्ही केव्हांही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील-जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरुभेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही. मात्र, गुरूला अनन्य शरण जा. एक शिष्य मला भेटला, तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारले, "तुला एवढा कसला आनंद झाला आहे ?" त्यावर तो म्हणाला, "मला आता आनंदाशिवाय दुसरे काही उरलेच नाही, कारण मला आज गुरू भेटले !" जो असा झाला, त्यालाच खरी गुरूची भेट झाली. तरी, तुम्ही गुरूला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरूरी नाही.


*१९७ .   भगवंताची  तळमळ  हा  साधकपणाचा  प्राण  आहे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

हरीपाठ

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                 भाग  - ९.

               तो धनिक जिवंत झालेला पाहून, स्मशानभूमीत असलेले सर्वे लोक आश्चर्याने पाहू लागले. घरच्या लोकांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. दुःखी होऊन मनकर्णिका घाटावर आले होते, ते आनंदी होऊन धनिकासह परत जात होते. सगळेजण महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्याकडे धावू लागले. आणि महाराजांनी धावत जाऊन गंगेत उडी घेऊन दिसेनासे झाले. त्यांना प्रसिद्धी नको होती. त्या धनिकाला मात्र आपल्याला वाचवणार्‍याचा शेवटपर्यंत थांगपत्ता कळला नाही आणि भेटही होऊ शकली  नाही.

          एकनाथी भागवतात म्हटलेच आहे,

" जेवढी नामाची शक्ती। तेवढे पाप नाही त्रिजगती।।"

           पाप आणि पापाचा नाश करणाऱ्या नामाची स्पर्धा लागली तर, सर्व पापांचा नाश होऊन नामच शिल्लक राहील. नामामुळे पाप भस्मसात होतील.       हरीपाठात म्हटले आहे..... 

"तृण अग्निमेळे समरस झाले। तैसे नामे केले जपता हरि ।।"

           नामाचा अनुभव स्वतः महाराजांनी घेतला होता. घेत होते. आणि जगाला पटवून देत होते. लोकांना नामाला लावत होते. ते गुरुआज्ञेचे पालन तंतोतंत करीत होते.

             काही दिवसांनी महाराज प्रयागला गेले. तिथे साधूंचा एक जत्था होता. परंतु त्यांचा कोणी महंत नव्हता. महाराजांची साधना, मुखावरील तेज, बोलण्या, सांगण्याची त्यांची पद्धत, ज्ञान वगैरे पाहून, त्यांनी  महाराजांनाच आपला महंत केले. त्यांची अगदी राजासारखी बडदास्त ठेवू लागले. पण महाराजांवर काही परिणाम होत नव्हता. त्यांना तुकोबांची ओळ आठवली.....

" प्रारब्धेचा वाढे मान। प्रारब्धाची जोडी धन।

  वृथा सोस करीसी वाया। भज मना पंढरीराया।।" 

           जे प्रारब्धात आहे ते कधी चुकायचे नाही.

        नंतर तो जत्था व महाराज सगळे मिळून मथुरा वृंदावन करत कलकत्त्याला पोहोचले. 

              मागच्यावेळी महाराज काशीला असताना,  तिथल्या जमीनदाराची आई भेटायला आली. आणि अति दुःखाने म्हणाली, महाराज, मला नातू होण्याचा आशीर्वाद द्यावा. ती म्हणाली, महाराज, मुलाने तीन लग्न केलीत. पण पोटी संतान नाही. महाराजांनी मोठ्या सुनेला व मुलाला घेऊन यायला सांगितले. मुलगा व सून आल्यावर, दोघेही भक्ती भावाने महाराजांच्या पायी पडले. महाराजांनी सुनेच्या ओटीत नारळ घालून म्हणाले, पुढच्या वर्षी मुलगा होईल. हा नारळ मुलाच्या बारशाला फोडून सर्वांनी प्रसाद म्हणून भक्षण करावा.

          तो जमीनदार कलकत्त्याला राहत असे. तो त्या साधूच्या शोधात होताच. त्याला झालेला मुलगा एक वर्षाचा झाला होता. अचानक त्याची व महाराजांची गाठ पडली. म्हणाला, महाराज, आपली काय सेवा करू? महाराज म्हणाले, फक्त रामनाम घ्या. पण त्याच्या मातेला वाटे, महाराजांनी काहीतरी मोठी  मागणी करावी. तिने अतिशय आग्रह धरल्यावर, महाराज म्हणाले, ठीक आहे. आपण हरिहाट भरवू...

              हरिहाट म्हणजे, सर्व पारमार्थिक साधनांचा बाजार असतो. तिथे सर्व प्रकारच्या साधना चालू असतात. प्रवचन, कीर्तन, पूजा, पारायण, योग, ध्यान हे तर असतेच. शिवाय यज्ञ, जप, भजन, पुराणवाचन, पंचग्निसाधन, शास्त्रध्यापन, ब्रह्मकर्म, अनुष्ठान, देवतार्चन, सत्संग, गुरुसेवा, मौनसेवन, वाममार्ग तंत्रक्रिया इत्यादी चालू असते. पंडित लोकांचा योग्य सन्मान केला जातो.

        या सर्वांसाठी फार खर्च येतो. जमीनदार मोठ्या आनंदाने कबूल झाला. मोठा मांडव घातला गेला. सर्व व्यवस्था अगदी चोख ठेवली. हा.. हा .. म्हणता सात दिवस चाललेला हा समारंभ मोठ्या आनंदात, उत्साहात पार पडला. सर्व अगदी समाधान पावले. सहसा हरिहाट कोणी करत नाही.

        हरिहाट सुरू झाला तेव्हा महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यांच्यासाठी मोठे सिंहासन केले होते. त्यावर महाराज एखाद्या राजासारखी शोभून दिसत होते. अन्नदान व नामस्मरण सतत चालू आहे की नाही हे ते जातीने लक्ष घालून पाहत होते.

           आठव्या दिवशी समारंभाची सांगता करताना जमीनदाराने महाराजांची महापूजा केली. त्यांना भरजरी वस्त्रे व चांदीचे ताटात एक हजार रुपये दिले. महाराजांनी चांदीचे ताट जमीनदादाच्या आईला दिले. व रुपये पंडितांना वाटले. त्याकाळी या हरिहाट कार्यक्रमाला २५,०००  च्या वर खर्च आला होता.

           हरीहाट संपल्यावर पाच-सहा दिवस महाराज तिथे राहिले. पण दर्शनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली म्हणून, महाराजांनी बरोबरच्या बैराग्यांना अमरकंटकला जाण्याची आज्ञा केली. व एक दिवस कोणालाही न सांगता महाराज निघून गेले.

      फिरत फिरत महाराज सातपुडा पर्वतापाशी आले. नर्मदाच्या काठाकाठाने त्यांचा प्रवास सुरू होता. अंतर्मुख ते होतेच. अशातच वाटेत त्यांना घरून पळून आलेला मुलगा भेटला. तो महाराजांबरोबर राहू लागला....

            क्रमशः

 संकलन लेखन,

 मिनाक्षी देशमुख.