# सोबत#भयकथा
वामन हा एका मध्यवर्गीय कुटुंबातील मुलगा होता त्याची आई ,बायको ,आणि मुले असे हसतखेळत कुटुंब होते. तो स्वभावाने मन मिळाऊ असल्यामुळे सगळे त्याला आपलेसे करत . त्याला दोन्ही मुली होत्या त्यांचा बद्दल त्याने अनेक स्वप्न रंगवली होती. तो कारखान्यामध्ये कामाला होता.
संसाराची गाडी अशी चाललेली होती. रात्री ११,३० ची शिफ्ट असायची ते तिघे मित्र एकटेच जात आणि एकटेच येत असत . सदा,वामन आणि प्रकाश तिघेही खरेखुरे मित्र होते एकमेकाला कोणत्याही परिस्थितीत आधार देणारे. वामन आणि प्रकाश च्या घरापुढे जाऊन थोड्या अंतरावर सदा त्यांना येऊन मिळे . रात्री जरी जात असेल तरी एकमेकांच्या साथीमुळे भीती वाटत नसे. कारण रात्री रस्त्यातच स्मशान लागे . दुसरा रस्ता नसल्यामुळे कामासाठी ते जलद निघून जात.
एक दिवस मात्र वामन आणि प्रकाश दोघेच निघाले सदा आजारी होता तो थोडा उशिरा येणार होता आत्ता पर्याय नव्हता त्यामुळे ते पुढे गेले . कारखान्याचा भोंगा वाजला सगळे एकत्र आले . थोड्या वेळात सदा आला नेहमी प्रमाणे काम सुरू झाले पहिल्या पाळीचे लोक गेल्यामुळे दुसऱ्या शिफ्ट मधील गर्दी कमी होती. काम सुरू झाले कामाच्या एका भागात प्रकाश आणि दुसरे काही कामगार कच्चा माळ जोडून पुढे वामन आणि सदा होता तेथे देत असत असेच कामाचे स्वरूप होते वामन आणि सदा सगळे भाग नीट आहेत का याचे टेस्टिंग करून शेल्फ वर ठेवत . आज सदाला बरे नसल्या मुळे वामन ने त्याला बैठे काम दिले तो खालून वर वस्तू देऊ लागला . २वाजत आले . तयार माळ भराभर वर जाऊ लागला . वामन चकित झाला कधीही कामाची चपळाई न करणारा सदा आज असा चपळ कसा झाला . वामन माल ठेवायला पुढे सरकला आणि सदा त्याला बसल्या नसल्याचं हात वर करून माल देऊ लागला. वामन हादरला कारण एवढा मोठा हात झाला होता. त्याला लक्षात आले हा सदा नाहीच त्याने पाणी प्यायला जाण्याचे नाटक करून तो तिथून निसटला. सदा नसून भुतं बरोबर काम करत होतो हे लक्षात आले . त्याची वेळझाली की ते निघून गेले
मित्रांनी घरी फोन करून पाहिले तर सदा घरीच होता तो आलाच न्हवता.,,त्याला रस्त्यातच येताना दरदरून घाम आला आणि घरी गेला होता.सगळे सांगू लागले तुम्ही कोणत्या रस्त्याने आला वामन ने नेहमी प्रमाणे स्मशानभूमीची जागा सांगितली. सगळ्यांना ऐकून धक्काच बसला . रात्र भर हा भुताबरोबर काम करत होता. पुढे तो कच्चा रस्ता मोडून हायवे झाला . पण हा अनुभव वामन चया कायम लक्षात राहिला.
अस्मिता माधव
No comments:
Post a Comment