भयकथा#ती#सत्यकथा. भाग २
लेख लिहायच्या आधी मी थोडी पाश्वभुमी सांगू इच्छिते. ही कोणतीही दंत कथा नाही तसेच हया कथा काल्पनिक ही नाहीत त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आहेत.
प्रेमा वय वाढेल तसे त्या धक्यातून सावरू, लागली,घरातील काम भाच्यांची जवाबदारी आणि शाळा या मध्ये तिचे दिवस निघून जात होते.चांगली वाईट प्रसंगात हसत हसत पुढे जाणे हे ती शिकली होती. १५ ,१६ व्या वर्षीच तिला घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पेलायची सवय लागली .परिस्थिती माणसाला शहाणे बनवते.तिला भावाच्या ओळखीने एका ठिकाणी दवाखाना मध्ये मदतनीस ची नोकरी लागली. तिचे रोजची वेळ ही ६पर्यंत घरी यायची होती. प्रेमा दिवसा उजेडात घरी येई . घरी आल्यावर वहिनी कामाची यादी वाचतच. हे तिचे रोजचेच .
एक दिवस नेहमी प्रमाणे कामावर गेलेली प्रेमा ७ वाजले तरी परतली नाही. तिची आई जाम घाबरली .कारण इतक्या वर्षामध्ये तिला शहरातील काही जागाबद्दल माहिती होतीच. ती पटापट पाय उचलत प्रेमाकडे गेली. तिच्या आईला पाहताच कामावरच्या बाईंनी तिला घरी सोडले. दोघीही वाऱ्याचा वेगाने चालू लागल्या. त्यांचा रस्त्या मध्ये पुल लागत असे,ह्या पुलावर कोणीतरी वाट आड वते हे त्यांना ऐकून माहिती होते.
वातावरणात गारवा होता दोघींनी वेग वाढवला पाऊले झपाझप पडू लागली,पुलावर कोणीही दिसत न्हवते गाडी ही एखादी तुरळक. त्यांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला. पुलाच्या वर पाऊल ठेवताच एक स्त्री त्यांचा बरोबरीने चालू लागली दोघींनी कळेना ही कोण अचानक बाई आली ,२५२६वर्षाची असावी ,पांढरी साडी नेसून केस सोडून चालत होती . ह्या दोघी पुढे जाऊ लागल्या तशी ही बोलायला लागली थांबा ना मला पण यायचे आहे पुला पलिकडे माझे घर आहे ,ह्या पुढे ती मागे शेवटी ती रडू लागली भयाण शोक करू लागली या मागे वळल्या नाहीत पुल पार झाला तशी ती थांबली ,यांनी आपली वाट धरली. पुढे लांबवर जाऊन या दोघींनी तिचा कानोसा घेतला तर ही बाई येणाऱ्या वाहनांना दोन्ही हात पसरून अडवू लागली. तिचे हात एवढे मोठे झाले की अखा पुल अडवला जाऊ लागला ,लहान नाजूक दिसणारी ती बाई खूप मोठी दिसू लागली प्रेमाला. हे पाहून प्रेमा चक्कर येऊन पडली. आईने तिला घरी आणले .पुढे तिला शुद्ध यायला बराच काळ लोटला. ती जागे पणी कोणाला ओळखेना .अशी शक्ती बघण्याची , जाणंवण्याची तिला शक्तीच होती जणू . ...,...अस्मिता माधव
No comments:
Post a Comment