श्रीगोंदवलेकर महाराज देहात असतानाची ही हकीगत आहे. एकदा काय झाले श्रीभाऊसाहेब केतकर गोंदवल्यास होते आणि त्यांना भेटण्यासाठी एक वर्तक नावाचे गृहस्थ आले. त्यांनी पाहिले श्रीमहाराजांभोवती हा सगळा गोंधळ बायका , मुलं इतर माणसं त्यांच्या भोवती होती. ह्या वर्तकांची कल्पना साधू म्हणजे गंभीर माणूस.
त्यांनी भाऊसाहेबांना विचारले "अरे तू काय पाहून यांच्याजवळ राहिलास ? " भाऊसाहेब म्हणाले " अरे आज मी नऊ वर्षे इथे आहे. पण या गृहस्थाच्या तोंडून मला अमुक हवं , हे मी ऐकलेले नाही. कुठल्याही प्रसंगात त्यांनी कधीही हे मला हवं असे म्हणाले नाहीत. त्यानंतर कोणीतरी श्री महाराजाना हे वरील संभाषण सांगितले. त्यावर श्रीमहाराज म्हणाले "अरे मी मागू कशाला? तहान लागली की कोणीतरी पाणी आणून देतो. भूक लागली की जेवायला बोलावतो. मग मी मागू कशाला?" हे कसं होतं ? असं श्री बेलसरे यांनी महाराजांना विचारले ( श्रीच्या वाणी आवतारा मधे ) तेव्हा महाराज म्हणाले " याला खात्री असते की मला जर जगवायचं असेल , तर मला भूक लागली आहे म्हणजे अन्न तयार असलंच पाहिजे . तहान लागली पाणी असलंच पाहीजे." काय दृष्टी आहे. याचा अर्थ असा की जिकडे ही वासना इच्छा होते, ती पुरवणारी व्यवस्था जगामध्ये आहे. तिथे आपण आड येतो अहंकारामुळे. ते येऊ नये हा परमार्थ. मला जे मिळायचं आहे ते मिळेल. माझ्या आत मध्ये ती इच्छा आली आहे ना , ती तृप्त झालीच पाहिजे. आपण काय करतो ? तर त्याला हट्ट लावतो, म्हणून सगळी भानगड होते.
२) प्रेमाचा दुसरा संबंध सख्य सखा म्हणजे मित्र. याचे नाव आले की त्याचे नाव आले. मनुष्य इतर काही गुप्त ठेवील. पण तो आपल्या मित्रांना पासून काही गुप्त ठेवणार नाही.
सत्पुरुष त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींना सख्यपणाने वागवीतात. श्रीमहाराज म्हणायचे " सगळ्या जगामध्ये राम भरला आहे तर येणाऱ्या माणसांमध्ये नाही का ?" सत्पुरुष कोणाची अवहेलना करत नाहीत अपमान करत नाहीत. हे संख्याचे लक्षण आहे.
3) प्रेमाचा तिसरा संबंध वात्सल्य.आई आणि मूल. वात्सल्यात म्हणावे मी तुझे मूल आहे. एक साधक बाई होत्या.त्या श्रीगोंदवलेकर महाराजांच्या शिष्या होत्या. अलीकडेच वारल्या त्या. प्रपंच मोठा असल्याकारणाने त्या रात्री उपासना व मानसपूजा करीत. ते झाल्यावर त्या म्हणायच्या " महाराज मी तुमची मुलगी आहे .
तुमच्या मांडीवर मी डोके ठेऊन नीजते असे म्हणून मी उशीवर डोके ठेऊन नीजते." रामाचे पाय उसे करून निजावे तशी ती बाई निजायची. त्या गेल्यानंतर त्यांचे यजमान श्रीबेलसरे यांना भेटायला आले होते. ते म्हणाले "एकदा मी तिला विचारले, तुझी स्थिती काय आहे ? " त्यावर ती म्हणाली " माझी मानसपूजा संपली आहे. श्रीमहाराजांच्या मांडीवर मी आहे. मी आता जप करते आहे. माझ्याशी कोणी बोलू नका." हे वात्सल्य आहे.
4) जो संबंध आहे तो मधुर संबंध नवरा आणि बायको. हा अतिशय मधूरच आहे नावाप्रमाणे. यात अतिषय शुद्ध प्रेम असते. हा प्रेमाचा मार्ग आहे.
*भगवंताला बांधुन ठेवण्याचा उत्तम मार्ग कोणता तर*
*"आपलेपणाने". आता आपलेपणा म्हणजे काय तर याला ममत्व असा साधा शब्द आहे . ममत्व म्हणजे माझेपण , माझेपणाच मूळ मीपणामध्ये आहे . ममत्व म्हणजे मीपणाचा विस्तार आहे . It is extension of the self . म्हणजे काय तर माझ घर , माझी माणसे , माझा देह वगैरे . हा जो विस्तार झाला त्याला आपलेपणा म्हणायचा . मग भगवंताला वश करण्यासाठी आपलेपणा शिवाय मार्ग नाही . आपलेपणा म्हणजे प्रेमानी भगवंतावर स्वामित्व गाजवण हे आहे.*
*भक्तीमध्ये जेंव्हा परमात्मा तुमचा मीपणा गिळतो त्यावेळेला तो मानवीरुप धरुन तुमच्या जीवनात शिरतो . The Divine becomes human to enjoy the devotion . तुमच्या भक्तीचा रस घेण्याकरिता तो माणूस बनतो . भक्तीमध्ये जे आपलेपण असत तितक जगात इतर कुठेही आढळत नाही . समर्थ रामदास स्वामी पंढरीला आले आणि विठ्ठलाला पाहिल्यावर म्हणाले,*
*"इथे उभा का श्रीरामा,*
*मनमोहन मेघश्यामा !!"*
*काय केली सीतामाई,*
*इथे आणिली रखुमाई!!*
*काय केला हनुमंत,*
*इथे आणिला पुंडलिक!!"*
*त्यांना आपल्या दैवता पलिकडे दिसायचच नाही . याचा अर्थ काय तर हे Extension of the self नव्हे का ? माझा विस्तार आहे तो माझ्या देवतेचा आहे . आपलेपणा याचा अर्थ असा की , आपल अंतरंग त्याने इतक भरुन गेले पाहिजे की , जगात तेच दिसत सगळीकडे . माझा जो विस्तार आहे ना तो माझ्या देवतेचा विस्तार आहे . यालाच रामकर्ता असे म्हणतात . माझ उठण , बसण , जगण , माझा व्यवहार या सगळ्यांमध्ये भगवंत आहे . एक दर्द नावाचा मोठा भक्त बादशहा जफरच्या वेळेला होता . तो दर्द साधूच होता . तो म्हणे,*
*"जिधर देखे उधर तू ही तू है !" गालीबने पण असच म्हटल आहे , " जब के तुझ बिन नाही कोई मौजूद !"*
*आपलेपणा म्हणजे मला प्रत्येक गोष्टीत माझ्या गुरुचा हात दिसला पाहिजे . हे घर महाराजांच आहे , मी मालक नाही . हे आपलेपण काय आहे ? तर भगवंता तुझी मालकी आहे या घरावर .*
*ज्ञानेश्वर महाराज म्हणाले,*
*"मी उपचारे कवणाही!*
*ना कळे गा !!"*
*माझी प्रपंचाची आसक्ती , माझेपण भगवंताला दिले आहे . म्हणजे काय तर त्या माझेपणाला दिव्य स्वरुप दिलेल आहे . माझ्या देहासकट सगळ जे असेल ते , भगवंता , तू आहेस . आपल्या प्रपंचाच्या आसक्तीला अस दिव्य स्वरुप दिल्यानंतर माझी मुलबाळ , माझ्या मुलींच लग्न , माझ्या मुलाची नौकरी , सगळ तुझ्या हाती आहे . भगवंत ठेवील तस मी राहीन , ही त्यातली भावना पाहिज.*
*आपली ज्ञानेश्वरी फक्त ऐकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी आहे . मग भगवंत करतील ते बरोबरच करतील . सुख काय , दु:ख काय तुझ्या हातून येऊ दे . तू त्यात असल्यावर वाईट करणारच नाही . ही मला खात्री आहे.*
*( ज्ञानेश्वरी ....प.पू. बाबा बेलसरे. )*
*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*
*प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
*श्रींची अन्नपूर्णा*
श्रीमहाराजांच्या वडिलोपार्जित वाड्यात पुढील भागी श्रीरामाचे मंदिर, पाठीमागे स्वयंपाकघर व कोठी होती. कोठीचे काम श्रीधरपंत कुलकर्णी पहात. श्रींच्या दर्शनाकरता आलेले भक्त तीन-चार दिवस मुक्काम करीत. शिवाय कायम सेवेकरी असतच. नित्य ७५-१०० मंडळी भोजनास असत. अन्नदान हे श्रींना प्राणप्रिय.
आलेल्या भक्तमंडळींस आग्रह करून ते ठेऊन घेत, त्यांना जेवू घालून तृप्त करीत. नंतर श्रीरामनामाचे बीज पेरीत. त्यांनी कोणापुढे कधीही हात पसरला नाही. मग एवढा खर्च कसा चालत असे? श्री म्हणत, 'मी माझे काम करतो. श्रीरामराय निभवून नेतो.' कितीही मंडळी असोत, कोणतेही पक्वान्न असो, कधीही आचारीपाणके पहावे लागले नाहीत. सौ. तुळजाकाकू, बनुताई, गोदूताई, सुंदराबाई, मथुताई, पटाईत मावशी यांची पलटण तयार! रामनामाच्या गजरात केवढाही स्वयंपाक झपाट्याने होई. मुली, अनुभवी बायका वाढपाचे काम करीत. थकल्याची जाणीवही होत असे. श्रीधरपंत भांड्यात चमचा खडबडून तूप वाढीत. श्रीमहाराज हसून म्हणत, 'पहा कोठावळ्याचे कसे पोट दुखते! अंताजीपंत, तुम्हीच तूप वाढा'.
अंताजीपंत सांगत,'मी अनेक मोठमोठ्या श्रीमंत, सरदारांच्या पक्ती पाहिल्या, पण असा थाट कोठेच अनुभवावयास मिळाला नाही. अशा पंक्तीत कित्येक वेळा श्रीमहाराज स्वतः लाडू वाढावयास घेत. जेवण आकंठ झाले असले तरी 'गुरुप्रसाद' म्हणून प्रतेकजण एकतरी लाडू घेईच. दत्तमंदिराचे पुजारी श्री. बाळंभटजी यांच्या पानासमोर श्रीमहाराज बसत, आणि म्हणत, 'बाळंभटजी, एका लाडूस एक चांदीचा रुपया.'
-------आणि आकंठ जेवण झालेले बाळंभटजी श्रींच्या कडून पंचवीस रुपये मिळवीत!
*********
संदर्भः चैतन्य-स्मरण १९८८ मधील श्री अरविंद बाळकृष्ण दाढे, मुंबई यांच्या लेखातून
*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment