खडूस मुंबईकर.
आज सुनीलचा ७५ वा वाढदिवस.त्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत पण हा किस्सा फक्त खास मुंबई स्पेशल "मैदान क्रिकेट" खेळणाऱ्या प्लेअर्सनाच माहिती आहे.
देशातून किंवा परदेशातून रात्री कितीही उशीरा मुंबईत आला तरी मॅचला सकाळी ९ वाजता हजर असायचा हे सर्वांना माहीत आहे.
मुंबईचा माजी विकेटकिपर सुलक्षण कुलकर्णी नेच सांगितलेला हा किस्सा..
तो रिटायर होऊन ४ वर्षे झाली होती. त्याच्या दादर युनियनची अवस्था बिकट होती.जेमतेम ७-८ प्लेअर्स जमत. मी एकदा त्याला भेटलो.प्लेअर कमी पडला तर मला कळवा मी नक्की उतरीन असे आश्वासन त्याने दिले.तीनच दिवसांनी वानखेडे स्टेडियमवर तालीम शील्ड सेमी फायनल होती.समोर होते कट्टर वैरी "शिवाजी पार्क जिमखाना."
नेमका १ जण शॉर्ट होता.पब्लिक बूथ वरून सनीला SOS फोन केला. हा गडी व्हाईट्समध्ये हजर.क्रिकेट सोडून ४ वर्षे झाली होती. पण एकदम फिट्ट होता. अफलातून रनिंग बिटविन द विकेट्स, चपळाई दाखवून रन आऊटचे प्रयत्न, ज्युनिअर प्लेअर्सच्या चुकांवर हक्काने झापणे,कॅप्टन नसताना परिस्थिती प्रतिकूल असताना सूत्रे हातात घेऊन गेम कंट्रोल करणे हे सगळे टेस्ट मॅचचा सिरीयसनेस दाखवून केले.इतकेच नाही तर बॉलिंगचा ९ ओव्हर्सचा पूर्ण कोटा टाकून त्याच्या स्लो आऊट स्विंगवर चक्क २ विकेट्स काढल्या.
दादर युनियनने मॅच २ रन्सने जिंकली. नंतर ड्रेसिंग रूम मध्ये प्रचंड खुश होऊन सनी वावरत होता.त्याला विचारले की "सर या लोकल मॅच मध्ये इतक्या सिरियसली खेळलात, इतके खुश झालात."
त्याचं उत्तर होतं..
"अरे वेड्यांनो मॅच शिवाजी पार्क जिमखान्याविरुद्ध होती.."
ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो दादर युनियन आणि शिवाजी पार्क जिमखाना मॅच म्हणजे भारत पाकिस्तान मॅच..
मुंबई क्रिकेटची खरी ताकद म्हणजे मैदान क्रिकेट.. तिथून वर आलेला कोणताही प्लेअर कितीही वय झालं तरी मैदानातच रमतो.
सुनीलला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आनंद देवधर
No comments:
Post a Comment