नाम सगुणही आहे व निर्गुणही आहे. ती संधी आहे त्यामुळे सगुणाची कास धरत निर्गुणाची कास धरता येते. नंतर सगुणाची कास हळू हळू सोडता येते. हा प्रवास अलगद सोयीचा होतो. शब्द दिसतो म्हणून तो सगुण पण तो गुण आकाशाचा म्हणून निर्गुण म्हणून त्यात परब्रह्माचे गुण आहे.
पंचमहाभूतात आकाश सुक्ष्मम्ह्णून ते निर्गुण, म्हणून सगुण शब्दाला निर्गुणाची जोड देता येते त्यादृष्टीने नामस्मरण हे साधन सुरक्षित. नामाचं स्वरूपच अखंडच आहे. अनादिकाळपासून ते होत, ते आहे व ते राहणार. अशा अखंड नामाला खंडित आपण करून घेतो.
आपल्या देहातच नामाचा (आत्म्याचा) नाद अखंड चालू असतो. पण आपल्यास आपल्या वासनेमुळे त्याची जाणीव नसते. ही जाणीव होण्यास सद्गुरू आपल्यात असलेल्या नामाची (आत्म्याची) जाणीव करून देतात. त्याचा अभ्यास करून हळूहळू त्या खंडित नामास अखंडापर्यंत पोचवावयाचे आपले ध्येय पाहिजे.
No comments:
Post a Comment