॥🌹जप🌹॥
जप करतांना नेहमी त्या परमेश्वराचेच चिंतन करावे -नाम आणि नामी एकरूप आहेत अशी धारणा ठेवावी. आपण ज्याचे नाव घेतो त्याच्याशी ते नाव अभिन्न असते, अर्थात नाम उच्चारताच ज्याचे ते नाव आहे त्याचाच बोध होतो. व्यवहारात हेच होते. तुम्ही एखाद्या माणसाला नावाने हाक मारली की तत्क्षणी त्याची प्रतिमा मनासमोर उभी राहते आणि ज्याला तुम्ही हाक मारता तो लगेच ओ देतो, बोलतो किंवा समीप येतो. जप म्हणजे दुसरेतिसरे काही नसून अगदी हेच आहे मात्र तो प्रभूवर चित्त एकाग्र करून आणि योग्य पध्दतीने झाला पाहिजे. माझी हाक त्या प्रभूपर्यत पोहोचेल आणि तो तिला प्रतिसाद देईलच देईल असा दृढ विश्वास असला पाहिजे. आर्ततेने आणि उत्कटतेने केलेली प्रार्थना देखील वर सांगितल्याप्रमाणे फलदायी होते. सतत जप केल्याने मनाला निश्चिती येते, ईश्वर अगदी समीप उभा असल्याची खात्री पटते, मन तन्मय होते त्याचे निश्चित अस्तित्व जाणवते. म्हणूनच शास्त्रातील वचन आहे
"जपात् सिध्दि "-अर्थात जप केल्याने ईश्वर साक्षात्कार होतो .
।। श्रीराम ।।
🌺🌸🙏🙏🙏🌸🌺
No comments:
Post a Comment