पू.श्री.गुरुदेव रानडे यांचे शिष्य श्री.मंगेशराव रेगे यांच्या श्री.गुरूदेवांचा सत्संग या पुस्तकातील पू.श्री.उमदिकार महाराज यांची गोष्ट. पंढरपुरास जाताना वाटेत संख म्हणून गाव आहे. तेथे श्री.कुलकर्णी नावाच्या सद्गृहस्थांचे घर होते. त्यांच्या घरात चार पिढ्या एक समंध होता. त्याला रोज एक शेराच्या भाकऱ्या व वरण लागतसे.
तो जाण्यासाठी कुलकर्णी यांनी बरेच उपाय तंत्र मंत्र करून पाहिले पण उपयोग झाला नाही. श्री.उमदीकर महाराज बैलगाडीतून त्या गावावरून जाणार असे समजतात श्री.कुलकर्णी यांनी महाराजांना अतिशय आग्रह करून त्या दिवशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुढे जाण्याची विनंती केली.
अखेर श्री.महाराज त्याचे घरी उतरले. ज्या खोलीत समंध होता तीच खोली श्री.महाराजांना नेमासाठी दिली. बाकीच्यांना ओसरीवर नेमास बसविले. बाहेरच्या मंडळीना त्या खोलीत समंध आहे. तो खोलीत जाणाऱ्यास मारून टाकतो असे समजले.
असे समजताच ती मंडळी रडू लागली. रात्रीचे ८.३० वाजले तरी.श्री.महाराज बाहेर आले नाही. सर्व जण श्री.महाराजांना हाक मारू लागले. थोड्या वेळाने महाराजांनी दार उघडले. सर्वाँना आनंद झाला. मग पोठी सुरू झाली. तोच लांब अंगरखा पगडी घालून एक म्हातारा सद्गृहस्थ दरात येऊन पोथी ऐकू लागला.
महाराजांनी त्याला पुढे समोर बोलाविले. कापूर लावून आरती करून जा म्हणाले. तो पुढे येण्यास तयार होईना. मग आरती झाल्यावर तो सद्गृहस्थ गेला. तो समंध होता. तो पुन्हा काही त्या घरी आला नाही. हे सगळं झाल्यावर श्री.महाराज म्हणाले "माझे गुरू (श्री.निंबर्गी महाराज) एवढे मोठे असताना तुम्ही भिता का ?"
No comments:
Post a Comment