चिंतन
श्रीराम,
दुर्लभ असा मानवजन्म लाभला आहे तो केवळ प्रपंचाच्या तापत्रयात न घालवता काहीतरी जीवन सार्थक करा असे समर्थ वेळोवेळी माणसाच्या मनीमानसी बिंबवत आहेत. पावलोपावली राग राग करून आपण स्वतःची किंमत कमी करून घेतो आणि रागाच्या भरात आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान करून बसतो. यावर उपाय एकच आहे ज्याक्षणी राग येईल, त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळावे आणि डोकं थंड व मन शांत झाल्यावर प्रतिसाद द्यावा. असे केल्यामुळे रागाची तीव्रता कमी होते आणि मनात उठलेल्या अनेक वादळाचा क्षणात निचरा होतो, म्हणून क्रोधाचा क्षण आवरणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तो आवरणे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.
संत सद्गुरू म्हणतात - मी जर सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे तर राग द्वेष माझ्या मनात कसे येतील? माझे मन हरिच्या प्रेमाने, त्याच्या कृपेने ओतप्रोत भरलेले असल्याने षड्रिपूंना आत यायला तीळभर पण जागा नाही.
आपले मात्र बरोबर याच्या उलटे होत असते. आपल्या ह्रदयात षड्रिपू, राग लोभ द्वेष असल्याने 'शांत आनंद स्वरूप हरि' स्थित व्हायला जागाच नसते.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment