चिंतन
श्रीराम,
खरा मी सत् चित् आनंद स्वरूप म्हणजे चिदानंद स्वरूप आत्मा आहे.. जसे अचेतन जड गाडी ड्रायव्हर शिवाय चालत नाही. तसेच या जड अचेतन देहाच्या आत देहाला चालवणारा देहाचा ड्रायव्हर 'जीवात्मा' हे चेतन तत्व आहे. माझे खरे स्वरूप शांत, तृप्त, समाधानी, आनंदी आहे.. पण अनंत जन्मांच्या संस्काराने, वासनेने, त्रिगुणामुळे आणि भ्रांतीने हे समजत नाही. देह सत्यत्व भ्रांतीने मनात द्वेष मोह मत्सर निर्माण होत असतात. मात्र ते लोकांना दाखवले जात नाही म्हणून ते सगळे क्रोधाच्या रुपात व्यक्त होतात.
येणाऱ्या क्रोधाचे विश्लेषण केल्यानंतर लक्षात येते की द्वेष मोह मत्सर माया आसक्ती अहंकार असे विविध भावनाविष्कार क्रोधाच्या माध्यमातून प्रगट होत असतात. जोपर्यंत या भावना प्रगटीकरणात मनुष्य अडकलेला असतो तो पर्यंत माझे स्वरूप म्हणजे चिदानंदरुपः शिवोऽहं शिवोऽहं आहे, इथपर्यंत पोहचत नाही.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment