आज माझी दृष्टी मी केंद्रित आहे ती आत्मकेंद्रित किंवा भगवदकेंद्रित झाली पाहिजे. स्वस्वरूपावर केंद्रित झाली पाहिजे. भक्ती भक्ती म्हणजे काय तर माझी दृष्टी मी केंद्रित आहे ती भगवदकेंद्रित झाली पाहिजे. ईश्वर माझ्या जीवनाच केंद्र बनलं पाहिजे. माझी काया, वाचा, मने जी कर्मे घडतात ही सगळी त्याच्या इच्छेने घडतात ही भावना झाली पाहिजे. कर्मे करण्याची जी प्रेरणा आहे ती त्याच्या शक्तीने येते. परमात्मस्वरूपाला तीन गुण आहेत सच्चिदानंद त्यापैकी एक आहेपणाचा गुण. हा तीनही अवस्थानमध्ये असतो. आता चित म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे प्रेम. भगवंताला एकसारखे स्फुरण आहे एक आहे ज्ञानाचे, म्हणून तो ज्ञानमार्ग व दुसरे आहे प्रेमाचे तो भक्तिमार्ग. हे दोन मार्ग परमात्मस्वरूपाला मिळवण्याचे आहे. मनुष्य जेव्हा कर्म करतो तेव्हा या दोन स्फुरणातूनच त्याच्या कर्माचं स्फुरण असत, नाहीतर कर्म होऊच शकत नाही. त्या कर्माला आतून काहीतरी प्रेरणा पाहिजे ती प्रेरणा आल्यानंतर ती ज्या रंगाने येते त्या रंगाप्रमाणे माणूस देहबुध्दीतून जातो. दिव्याला ज्या रंगांची काच असेल तसा त्यातून प्रकाश येतो. आपला प्रपंचाचआजो रंग असतो तो सोडून आपल्या प्रपंचाला गुरूचा प्रकाश आला पाहिजे. गुरूंची काच त्या दिव्याला (प्रपंचाला) लावली पाहिजे. याला अतिसावधानता पाहिजे. आसिड मध्ये काम करताना आपल्या बोटाना काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेता ना , तसं मला जी प्रेरणा होते ती कुठून येते आहे यावर सारखं लक्ष ठेवणे म्हणजे परमार्थ.माझी प्रेरणा स्वार्थातून येते की गुरूंकडून येते यावर सतत लक्ष ठेवावे लागते. गुरूंची प्रेरणा आतून येते त्याची खूण काय तर सुखदुःख राहणार नाही. जे काही व्ह्यायचे असेल ते होऊ दे. हे आतून येणे फार कठीण आहे.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment