*या पृथ्वीवर खऱ्या अर्थाने तीनच रत्न आहेत असं म्हणतात, ते रत्न जल, अन्न आणि प्राणवायु.* *सुभाषिते हे एक चौथे मौलिक रत्न मनुष्याने आपल्या दृष्टीने मान्य केले आहे. विचार मनुष्यावर संस्कार करतात, त्यांना* *घडवितात. सुभाषितांचा मनुष्य जीवनावर चांगला परिणाम होतो, चांगले संस्कार होतात म्हणून ते चौथे रत्न! तप किंवा तपश्चर्या शारिरीक, मानसिक आणि बौद्धीक अशी एकत्रीत केल्याने आपले हेतु लवकर साध्य होतात. जीवनात लवकर यश येते. आत्मज्ञान आणि परब्रह्मज्ञान याच जन्मात मिळवता येते. आपण हे ज्ञान आत्मसात करण्यात कुठे कमी तर पडत नाही ना? याचे सतत मनन, चिंतन करायला हवे. भक्ती , पूजा पाठ, नामभक्ती यापैकी आपली जी बाजू* *कमकुवत असेल तिच्यावर लक्ष केंद्रीत करून प्राधान्याने ती मजबूत करण्याचा प्रयत्न* *करायला* *हवा. आपण शारिरीक श्रम करण्यात, मानसिक श्रम* *करण्यात आणि बौद्धीक श्रम* *करण्यात कुठेच कमी पडू नये असा मनाशी संकल्प करून पुढे परमार्थाची वाटचाल करायला हवी. 'थांबला तो संपला' याचा मतितार्थ लक्षात घेऊन कार्य करावे.*
*आत्मज्ञानी मनुष्यास भय किंवा चिंता मूळीच नसते. तो स्वत:च्या मृत्यूबद्दल देखील निश्चिंत असतो. ते त्याला झालेल्या ब्रह्मज्ञानाचे एक प्रधान लक्षण असते. जिवंतपणीच देहाचे महत्त्व पूर्णपणे नाहीसे झाल्याने तो देह सोडल्यावर त्याचे पुढे काय होते तिकडे तो लक्ष देत नाही, त्याची चिंता करीत नाही.*
No comments:
Post a Comment