एकदा पु.श्री.बेलसरे म्हणाले आई मुलांच्या आवडीचे करते. तसं आपलं होत नाही. कधी कधी वाटते स्वयंपाक चांगला करता आला असता तर गोंदवले येथे जाऊन स्वयंपाक करून श्रीमहाराजांना नैवेद्य दाखविला असता. खायला घालण्यात प्रेम आहे. श्री.गोंदवलेकर महाराजांना कर्नाटकात गेले असता एक म्हैसूरचा विद्वान सद्गृहस्थ भेटायला आला होता. तो म्हणाला आपण लोकांना फुकट खायला का घालता ? नंतर थोड्यावेळाने तो म्हणाला संध्याकाळी आमच्या घरी चहाला या. चहाबरोबर खाणे होतेच. खायला घालणे हे प्रेमाचे लक्षण आहे. श्री.बेलसरे म्हणाले "मानससपूजेत श्रींना जेवायला वाढतो पण प्रेम येत नाही." श्री.समर्थ रामदासांनी जुन्या दासबोधात रायते कोशिंबिरी यांचे अनेक प्रकार सांगितले आहेत. ज्यांच्याकरता करायच त्याने थोडे तरी खावे असं वाटतं व त्यांने खाल्ले की तृप्ती होते. आपलं जगात खरं कोण आहे ? श्री.सद्गुरुंच्या आठवणीत रस आहे. गोपींच श्रीकृष्णांवर प्रेम होते. खरं तर त्या अडाणी बाया. पण आपल्या प्रेमाच्या जोरावर प्रत्येक गोपीने हृदयात असलेल्या कृष्णाला बाहेर काढून नाचविले. श्री.नारदांना सुद्धा भक्तीसूत्रांत "यथा ब्रजगोपिकानाम |" असं सूत्र लिहीण भाग पडले. अखंड चिंतन! चिंतन हिच सख्यभक्ती. श्री.तुकारामबुवा प्रेमाने म्हणतात "देवाहाती रूप धरवू आकार |
होऊ निराकार नेदी त्यासी. ||
No comments:
Post a Comment