*आपल्या आई वडिलांनी ठेवलेल्या या देहाच्या नामा बद्दल आपल्याला किती आत्मीयता वाटते, आपल्याइतकंच नश्वर असलेलं आणि मला दुसऱ्या कुणी तरी ठेवलेलं हे “नाव” त्याचा* *जप न करताही मला किती आपलंसं वाटतं! ते टिकावं म्हणूनच आपण किती धडपड* *करतो. हे “नाम” टिकावं म्हणजे माझा नावलौकिक टिकावा, अशीच माझी सुप्त इच्छा असते. परमात्म्याच्या दिव्य नावाऐवजी* *आपण स्वत:च्या क्षुद्र अशा नावलौकिकातच अडकतो . ज्याने* *आपल्याला या भूतलावर पाठवले त्याचे नाव घेणे आपण का विसरतो? ते का पळायला परकं वाटतं? आपल्या स्वतः च्या* *नावाचा जय घोष सगळ्यांनी करावा, आपल्या नावाला* *काळिमा लागू नये म्हणून आयुष्य भर धडपडत असतो पण* *भगवंताची स्तुती करून त्याला आनंद होईल म्हणून आपण नाम का घेत नाही? सगळ्या संतांनी* *आपल्या* *अभंगांमध्ये म्हटलं आहे की, हात जर त्या भगवंताच्या सेवेत आणि पूजेत रत नसतील तर ते* *व्यर्थ आहेत. पाय जर त्या* *सद्गुरूस्थानी जात नसतील, तर ते व्यर्थ आहेत. डोळे जर त्याच्या दर्शनासाठी आतुर नसतील तर त्यांच्यात आणि काचगोळ्यात काहीच फरक नाही. कान जर* *त्यांचा बोध ऐकायला उत्सुक नसतील तर ते निव्वळ छिद्रवत आहेत. मुख जर त्यांचं नाम घेत नसेल तर ते असूनही काही* *उपयोग नाही. तेव्हा सत्संगात असूनही जर परम तत्त्वांची गोडी नसेल, तर तो माणूस नव्हेच, तो तर एखाद्या श्वापदासारखाच* *आहे. थोडक्यात नाम उच्चारीत नाहीं, त्यामुळे आपले जीवन व्यर्थ आहे, आयुष्य फुकट चालले आहे असे वाटायला पाहिजे.*
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment