श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात मन स्थिर होत नाही ना कितीही प्रयत्न केला तरी पळत तर त्याला उपाय निश्चय करावा. निश्चय म्हणजे त्याच्या विषयी संशय येत नाही. दुसरी बाजूच नाही. या निश्चयाचे रूपांतर कृतनिश्चयात करावे .कारण ध्येयाचे स्मरण करून देण्यासाठी. एवढे करून सुद्धा ते कच खातं.
परिस्थितीच्या जोर असा असतो की निश्चय टिकत नाही. पुढे म्हणाले मन ऐकेनसे झाले तर मनाला मोकळे सोडावे कारण त्या निश्चयाचे सामर्थ्यच असं असत की ते मनाला धरून आणील. म्हणून संत सांगताच आपला ध्येयाचा निश्चय झाला पाहिजे. कान्हनगडचे पु.स्वामी रामदास म्हणाले "मी मन आवरायचा प्रयत्न केला नाही. लोकांनी मन आवरा म्हणून सांगितलं."
पुढे म्हणाले " मी वेड्यासारखं एखाद्या यंत्रासारखा जप केला. पुढे म्हणाले शाई असते. तिचा डाग पडला तर तो निघत नाही .तसं नाम माझ्या जिभेवर लिहिलेले होते" हा कृतनिश्चय. पु.श्री.स्वामी रामदास म्हणाले " मी नाम नाही घेतलं की चैन पडत नसे , असं व्हायला लागलं. पुढे काही दिवस असं व्हायला लागलं की लिहिताना बोलताना नाम थांबत असे. नाहीतर सारखे नाम चाले.
अगदी रस्त्यातून चालताना सुद्धा मी नाम घेत चालत असे." ते एका लहानश्या टेकडीवर जात आणि नाम घेत असत पहाटेच्या वेळी. ते म्हणाले "एके दिवशी असं झालं की मी पाहिलं आणि मला प्रकाश दिसला आणि माझं मन नाहीसे होऊन गेले." हे ज्ञानेश्वर महाराजाना सांगायचे आहे मनाला मोकळे सोडा की, तो निश्चयच मनाला सहजपणे परत आणील आणि मन स्थिर होईल.
No comments:
Post a Comment