TechRepublic Blogs

Wednesday, September 11, 2024

जप

 पु.श्री.गोंदवलेकर महाराजांचे शिष्य श्री.ल.ग. तथा बापूसाहेब मराठे यांना त्यांच्या नातवाने प्रश्न विचारला " आज पन्नास वर्षे आपण जप करीत आहात, तुमचा साडेतीन कोटी जप सहज झाला असेल  तरी अजून तुमचे नाम स्थीर झालेले दिसत नाही असे का ?"  सहाजिकच श्री.बापूसाहेबांना पण हा प्रश्न पडला. पुढे ते नातवाला म्हणाले " तू म्हणतोस ते ठीक आहे . मी जप केलेला मोजतोस. जसे ब्यांकेत किती पैसे भरले याची बेरीज करतोस पण काढले किती ते बघत नाहीयेस.तसं मी जप किती केला याची संख्या मोजतोस पण त्यातून ती किती खर्च झाली हे बघत नाहीस" तेव्हा तो म्हणाला मला समजले नाही. तेव्हा ते म्हणाले कसे काढले ते सांगतो " 

सहासष्ट साली सौ.आजारी पडली. तेव्हा श्री.महाराजांना म्हटले हिला बरे करा.सगळा संसार व्हायचा होता. तेव्हा श्रीमहाराजानी दोन कोटी जप कमी करून तिला बरी केली. प्रपंचाची आसक्ती होती त्यामुळे ती प्रार्थना केली गेली. ती नको होती करायला.तेव्हा रक्कम काढली गेली. दुसऱ्यांदा मुलगी सुमा प्लुरसीने आजारी होती. त्यावेळी अपत्य प्रेमापोटी तीला वाचविण्यासाठी श्री.महाराजाना प्रार्थना केली. कारण हिचा संसार अर्ध्यावरच होता. सगळं अवघड होते. तेव्हा परत ती रक्कम काढली. त्यात एक कोटी खर्च झाले. आता पन्नास लाख आहेत शिल्लक. आता मरेपर्यंत पुन्हा तीन कोटी करेन तेव्हा जप स्थीर होईल. 

हा सगळा हिशोब बघ म्हणजे कळेल. मी हे करायला (वजावट)नको होते पण ते माझ्या हातून झाले. त्यामुळे नाम स्थीर झालेले दिसत नाही." हे लिहिण्याचा हेतू हा की आपण जो जप करतो त्याचे रिटर्न चुकून सुद्धा मागता कमा नये. आपण ते मागतो आणि तेथे घाटा येतो. असे बहारीचे उत्तर श्रीबापू साहेब यांनी दिले.

No comments:

Post a Comment