**पू .बाबा: श्रीमहाराजांनी काय सांगितले आहे ते सांगतो. ते म्हणतात, माणसाला भीती आणि काळजी का आहेत ? लक्षात येईल की माणसाला जीवनात आशा असते. अमुक व्हावे आणि तमुक होऊ नये असे त्याला नेहमी वाटत असते. हवे ते मिळत नाही आणि नको ते टळत नाही असा अनुभव असून देखील तो आशा करीत असतो. आशेचे मूळ वासनांमधे आहे. वेदान्ताच्या भाषेत माणूस हा वासनांचा पुंज आहे. Man is a bundle of desires असे ब्रँडले म्हणतो. बरे, या वासनाही देहबुद्धीवर म्हणजे मी देह आहे या श्रद्धेवर आधारलेल्या असतात. जी दृश्यात नेऊन बसवते ती वासना*
*होय. विहिरीतून खारे पाणी उपसून टाकून विहीर कोरडी केली तरी झऱ्यातून पुन्हा खारे पाणीच यावे त्याप्रमाणे काही वासना पूर्ण होऊन किंवा अन्य कारणाने नाहीशा झाल्या तरी नवीन वासना तशाच म्हणजे देहबुद्धीच्याच येतात. माणसाच्या* *अपूर्णपणात वासनांचा उगम आहे. वासना पूर्ण झाल्या की*
*आपण सुखी होऊ असे त्याला वाटते. त्या पूर्ण होतीलच अशी खात्री नसते म्हणून काळजी* *आणि भीती पाठ सोडत नाहीत.*
संकलन आनंद पाटील *
No comments:
Post a Comment