TechRepublic Blogs

Thursday, September 19, 2024

पाप

 एकदा पु.श्री.ब्रह्मानंद महाराजांचे पुतणे श्री.भीमराव गाडगुळी, श्री.बेलसरे व अंतरकर असे बसले होते. श्री भीमरावांनी श्री.बेलसरे यांना विचारले की श्री.महाराजांनी काकांवर (ब्रह्मानंद महाराजांवर ) कृपा केली , आमच्यावर का नाही . त्यावर बेलसरे म्हणाले आपण हा प्रश्न श्री. महाराजांना (गोंदवलेकर) विचारू. श्री.महाराजांनी उत्तर दिले  "पश्चाताप  झाल्याशिवाय परमार्थ नाही आणि कृपा नाही." पुढे तीन गोष्टी सांगितल्या १) भगवंताला विसरण हा पहिला ताप २) हातून अनिती घडण ३) विकाराच्या आधीन होणं. १) भगवंताला विसरण याचा अर्थ दुसऱ्या कशाची तरी आठवण ठेवली म्हणून विसरलो. जे माझं नाही ते माझं धरून चाललो. माझं आहे असं धरून जगतो.हे भगवंताच्या बाबतीतले पाप. देहाला मी माझा म्हटला हे पाप. हे समजणे कळणे हे सत्पुरुषांना अभिप्रेत आहे. हे पाप नाहीसे करायला आणि भगवंताला आपलं म्हणायला स्मरण हाच उपाय आहे. भगवंताला विसरणे हे व्यवहारात विसरण्यासारखे नाही. व्यवहारात विसरणे कसे तर आधी अनुभव आणि मग त्याचे विस्मरण, आणि मग लक्षात येणं. पण येथे परमात्मस्वरूप माझे स्वरूप असल्याने त्याचे विसमरण कसं तर ते स्वरूप झाकलं गेलंय. विकाराच्या आधीन होणं म्हणजे आपण विकार भोगतो ते देहाच्या द्वारा त्यातून सुख मिळेल या भावनेने.अहंकाराच पोषण, पैसा यांत सुख आहे ही भावना म्हणून आपण म्हणतो " मला हे आवडत मला हे आवडत नाही".हे वाटणं अहंकाराचे पोषण करत. त्याचेच दुसरं स्वरूप म्हणजे दुसऱ्याचे दोष पाहणं टाकून बोलणं. श्री ब्रह्मानंद महाराजांवर कृपा केली म्हणजे ईश्वराची कृपा व्हायला जी मनाची स्थिती लागते ती आपल्याजवळ नाही. ही लागणारी  मन:स्थिती आतली आहे. " कृपेच्या आड पाप येतं. करायला नको ते केलं, मनाची अशी स्थिती झाली पाहिजे की मला या  पापाचा स्पर्श नाही, की कृपा अवतरेलच." अस श्रीमहाराज म्हणाले. हे कधी होईल तर असे जनोजन्मी भगवंताच्या स्मरणांत राहून वागलं तर माणसाला पापांचा स्पर्श नाही अशी अवस्था येईल.

No comments:

Post a Comment