*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*
*पू. बाबा : कृपा नाही कसे म्हणता? आज इतकी वर्षे तुम्ही नामस्मरण करत आहात ते कृपेशिवाय का आहे? कृपा आहेच. आता आपण धाडसाने पाऊल पुढे टाकले पाहिजे. 'देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी। तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥' हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे. याचा श्रीमहाराजांनी सांगितलेला अर्थ परवा काकड्याच्या वेळी ऐकलात ना ? पुन्हा सांगतो. देवाचिये द्वारीं म्हणजे जप पश्यंतीपर्यंत पोचतो. महाराज म्हणाले, वैखरीने जप करता करता तो मध्यमेपर्यंत जातो. स्थूल आणि सूक्ष्म यांना जोडणारी ही वाणी असल्यामुळे तिला मध्यमा म्हणतात. जप मध्यमेमधे स्थिर झाल्यावर वीज चमकताच क्षणात आजूबाजूचे सगळे स्पष्ट दिसावे तसा क्षण येतो आणि जप पश्यंतीमधे जाऊन भगवंताचे दर्शन घडते. पण ते स्थिर राहात नाही. त्यासाठी परेपर्यंत जप पोचावा लागतो.*
*🪷अध्यात्म संवाद🪷*
No comments:
Post a Comment