कान्हनगडचे स्वामी रामदास (दुसरे) म्हणाले नाम हाच परमात्मा आहे. नाम हाच परमात्मा असल्याने नामस्मरणा मुळे पुढे असे होते साधक त्या परमात्म स्वरूपाला आणि गुरुंच्या शब्दाला किंवा नामाला आलिंगन द्यायला जातो. नाम हा परमात्मस्वरूपाचा हुंकार आहे. मनुष्य आहे केव्हा तर त्याला मीपणाची जाणीव होते तेव्हा. तो जो परमात्मा किंवा परब्रह्म म्हणून जे आहे ना त्याला मी पणाची जाणीव नाही. तो नुसता आहे. त्याला कोरे अस्तित्व आहे. पण तो जेव्हा सक्रिय होतो तेव्हा हे विश्व निर्माण करण्याचा संकल्प करतो तेव्हा त्याला ' अहं ब्रह्मास्मी ' ही जाणीव होते. हा जो हुंकार आहे ते नाम आहे. म्हणून पू.श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले " नामापरते तत्व नाही रे अन्यथा | वाया आणिक पंथा जाशी झणी ||
उगाच भलत्याच पंथाला जाशील त्या पेक्षा नाम घे. श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले " नाम हा माझा प्राण आहे." म्हणून श्री.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की की नामस्मरणाने तुमची ज्ञानेंद्रिये त्या परमात्मस्वरूपाला आलिंगन द्यायला जातील पण तुमची कर्मेंद्रिये सुध्दा त्याला आलिंगन द्यायला जातील. नाम हेच परमात्म्याचे रूपच आहे. म्हणून परमात्म्याचा मार्ग हा त्याचा स्मरणाचा आहे आणि ते स्मरण नामानेच होते.
No comments:
Post a Comment