TechRepublic Blogs

Sunday, September 29, 2024

मारुती

 *माझे सद्गुरुराव मारुती अवतार l*

*कोणी हो संदेह धरू नये ll*

*दया ती पहावी सद्गुरूनाथांची l*

*समर्थांचे परी शोभतसे ll*

*(श्रीब्रम्हानंद महाराज)*


*मारुतिरायाचे दर्शन*


*सन १९०५ साली अयोध्येस असताना श्रीमहाराज सहज बोलून गेले की, “या परिसरात मारूतिरायाचे वास्तव्य आहे.” कृष्णशास्त्री उप्पनबेटिगिरी यांना मारुतीचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली.त्यांनी ती* *श्रीमहाराजांच्या कानावर घातली. आज करू, उद्या करू म्हणून श्रीमहाराजांनी ती गोष्ट लांबणीवर टाकली. एक दिवस शास्त्रीबुवांनी आग्रह धरला. तेव्हा 'बरे' म्हणून श्रीमहाराज त्यांना घेऊन शरयूच्या पलीकडच्या तीरावर गेले.*


 *श्रीमहाराज बसले व समोर शास्त्रीबुवांना बसवले. त्यांना डोळे मिटावयास सांगितले.* *पाच मिनिटांनी ‘डोळे उघडा' म्हटल्यावर शास्त्रीबुवांनी डोळे* *उघडले मात्र, श्रीमहाराजांच्या ठिकाणी त्यांना मारुतीचे भव्य दर्शन झाले. शास्त्रीबुवांना ते सहन झाले नाही. लगेच ते रूप जाऊन श्रीमहाराजांचे सौम्य रूप दिसू लागले. तेव्हा श्रीमहाराज बोलले, “शास्त्रीबुवा, हे बाहेरचे दर्शन कामास येत नाही. अखेर खरे दर्शन स्वतःमध्ये होत असते." परत आल्यावर शास्त्रीबुवा भाऊसाहेबांना येवढेच म्हणाले, "भाऊसाहेब, महाराज हे महाराज नाहीत बरं का!"*

संकलन आनंद पाटील

No comments:

Post a Comment