TechRepublic Blogs

Sunday, September 22, 2024

बांधा

 *नेसा, बांधा, घाला*

•••--••--••--••--•••

🤔••--••🤔••--••🤔

---------------------------


••• वेगवेगळे  कपडे परिधान करण्यासाठी मराठीत वेगवेगळी क्रियापदं आहेत. हीच आपल्या मायमराठीची खरी भाषिक श्रीमंती आहे. 


••• पण त्यामुळे नवख्या माणसाची निश्चितच थोडी अडचण होऊ शकते.


••• कोणत्या कपड्याला कोणतं क्रियापद हे लक्षात राहत नाही आणि मग त्यातूनच *साडी घालणे* वगैरेसारखे चुकीचे शब्दप्रयोग गोंधळ निर्माण करतात.


••• एक युक्ती सांगतो, ती लक्षात ठेवा म्हणजे हे असे गोंधळ टळतील. कोणती ती युक्ती पाहू.


••• एक लक्षात ठेवा. शिवलेलाच कपडा *घालायचा.* म्हणून लेंगा, सदरा, टोपी, पगडी, पायजमा, पॅंट या सगळ्या गोष्टी *घालायच्या.* 


••• पण बिनशिवलेला कपडा चुकूनसुद्धा घालायचा नाही. म्हणून साडी, धोतर वगैरे घालणं शक्य नाही. असा बिनशिवलेला कपडा जर कमरेखाली परिधान करणार असू तर तो *नेसायचा.* म्हणून धोतर, सोवळं, साडी, लुंगी *नेसा*.


••• हाच जर बिनशिवलेला कपडा कमरेच्या वरील भागात परिधान करणार असू तर तो *घ्यायचा*. म्हणून ओढणी, उपरणं *घ्या.* अगदी पदरसुद्धा *घ्या.*


••• आता जर अशा बिनशिवलेल्या कपड्याने सगळं अंग झाकणार असू तर तो *पांघरायचा.* म्हणून शेला, शाल *पांघरा.*


••• तोच बिनशिवलेला कपडा जर डोक्यावर परिधान करणार असू तर तो *बांधायचा.* म्हणून मुंडासं, पागोटं, फेटा *बांधा.*


••• आता याखेरीज काही अगदी वेगळी क्रियापदं काही मोजक्याच ठिकाणी वापरतात. तीदेखील पाहू.


••• मफलर *गुंडाळतात.* कधीकधी घाईघाईत साडीदेखील *गुंडाळतात,*  निऱ्या *काढतात* आणि *खोचतात.* कामाला सुरुवात करण्यापूर्वी पदर *खोचतात.* नऊवारी साडीचा किंवा धोतराचा काष्टा *मारतात.* असो.


••• पूजा करताना पिवळे, लाल रंगाचे कपडे *परिधान* केल्याने मन स्थिर राहते. 


••• हा लेख संपला आणि त्याबरोबरच अनेकांच्या मनातला गोंधळ देखील ..! आता बिनधास्त शर्ट *घाला,* धोतर *नेसा* आणि कुठं बाहेर जायचं ते जा !!


"""""""""""""🤔"""""""""""""

No comments:

Post a Comment