TechRepublic Blogs

Monday, September 16, 2024

माहेर

 *माहेर...एकदा रहायला येना...*

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°


बाबांचा नेहमीप्रमाणे फोन आला, राखी पौर्णिमेला येतेस ना?

मी...बघू कसं ऍडजेस्ट होते ते.   

*ये ग थोडा वेळ काढून...* 


मग मी यांना विचारते.विचारले आणि राखी पौर्णिमेला गेले. आई-बाबांना,दादा-वहिनीला खूप बरे वाटले.

बेटा राहतेस का एखादा दिवस...?बाबा म्हणाले.

*नाही हो जमणार बाबा,यांच्या आणि मुलांच्या खाण्याचे हाल होतात.मुलं थोडी स्वावलंबी झाली की नक्की येईन राहायला.*  

आणि मी निघाले,*आई-बाबांचे आसुसलेले डोळे माझा पाठलाग करत माझ्यासोबत आले,पण माझी ओढ मुलांकडे आणि यांच्या कडे होती.*                                                   

         

या वेळी येतेस का रहायला?

बघते कसे अड्जस्ट होते ते... 


यात असे बरेच उगवते,मावळते दिवस निघून गेले.मुले मोठी झाली.मधल्या काळात बाबांकडे जाऊन भेटून येत होते.*पण राहणे कधी जमलेच नाही.*


परत येताना एकदा रहायला येण्याचा निश्चय...प्रत्येक वेळी माझा मात्र वेगळाच गुंता ठरलेला होता.

 

प्रत्येक गोष्ट त्यांना वेळेत सगळं लागतं,त्यांच्या मिटिंग्स आणि त्यांचं ऑफिस,मुलांना कॉलेजवर वेळेवर जायचं असतं,त्यांचे क्लास,लायब्ररी, जिम सगळं ठरलेलं रुटीन असतं.मुलं घरी आली की मी त्यांना घरीच लागते.नाहीतर घरात खूप गोंधळ उडतो.सगळं कसं वेळच्यावेळी व्हायला हवं.


*त्यामुळे रहायला जमणार नाही.*


मुलांचे शिक्षण होऊन एकदा का ते नोकरीला लागले की माझी जबाबदारी संपली,मग मी निवांत राहायला मोकळीच आहे.


आता कॉलेज संपवून मुलगा नोकरीला लागला,मुलीचे लग्न झालं.


अहो बाबा...

*आता ना याचे दोनाचे चार झाले की मी मोकळी झालीच बघा...!* 


तसे तर खूप काही बोलायचे आहे तुमच्या जवळ,निवांत बसायचे आहे,आईच्या मांडीवर डोकं ठेवून खूप गप्पा मारायच्या आहेत.खूप लाड करून घ्यायचे आहेत तुमच्याकडून.


अरे,तू ये तरी एकदा...

येते बाबा...


छान स्थळ सांगून आले,मुलाचे लग्न थाटामाटात पार पडले. आता मी हुश्...मोकळा श्वास घेतला. 

आता नवीन सुनबाईला घरात रूळवण्याची नवीन कसरत सुरू झाली.सगळे सणवार, घरातील रितरीवाज,*बऱ्याच गोष्टी माझ्या पद्धतीने साच्यात बसवण्याचे, कधी यशस्वी कधी अयशस्वी प्रयत्न करण्यात मी गुंतून गेले.* 


अहो बाबा...

आता ही नवीन पोर,घरात कोण आलं कोण गेलं,सण वार,तिला काय माहिती? तिला काय समजणार ?  


*इतक्यात नाही जमणार यायला....*

 

अगं.....*एकदा येऊन जा, कित्येक वर्ष हे घर तुझ्या राहण्याची वाट पाहत आहे बेटा...* 


बाबा माझ्यावर आता खूप जबाबदारी आहे....अहो,सुनेला एकटीला सोडून नाही ना येता येत.


बघू वेळ काढून मी नक्की येईन. 


*डोळे आणि मन थकले ग आता?*

 

होय बाबा...

 

उगवता, मावळता कधी थांबणारच नव्हता. तो युगानू युगाचा त्याचा प्रवास थोडाच थांबवणार  होता.?


आता सुनबाईला दिवस गेले.मी हरकून गेले.घरात नवीन पाहुणा येणार.तिची प्रकृती नाजूक, काळजी घ्यायला हवी.काय हवं ?काय नको ?डोहाळे पुरवायला हवे.


*मला माझ्या वेळी कळल्या नाहीत,त्या सगळ्या गोष्टी, सगळी हौस आता सुनबाईच्या रूपात पुरवून घेण्यात मी गर्क झाले.* तिचा प्रत्येक महिना, तपासणीसाठी दवाखाना, आवडेल ते खाणे,पिणे, वेळच्यावेळी औषधे आणि बरंच काही....


एक दिवस एक सुंदर बाळ आमच्या घरट्यात आले.त्याने मला आजी केले.मी विरघळून गेले...

आजी पणाच्या नात्यात त्याचे हसणे,रडणे,झोपणे,खेळणे.... 

*आता मी माझी राहिलेच नाही, मी आता फक्त आजीच होते.*

बाबा...आहो सगळा दिवस ह्याच्या बरोबरच जातो बघा. काही सुचत नाही.ना खाने ना इतर काही.माझ्या स्वतःसाठी सुद्धा आता माझ्याकडे वेळ राहिला नाही,बघा,...

हा बघा मस्ती करतोय बाळ.

यांना सोडून कुठे जाता येत नाही बघा आता...


*अगं,आम्ही काय आता पिकलं पान,कधीही बोलावणं येईल वरुन.ये ग,ये...*

*एक आर्त हाक.....* 


अहो,बाबा असं काय बोलताय? वाईट वाटते मला.


अहो हिला बाळाचं अजून काही नीट जमत नाही. उगीच काही वेड वाकड व्हायला नको.*रोजचं रुटीन बदललं की आजारी बिजारी पडायच बाळ.*

 

मला काय एवढ्यात यायला जमणार नाही.पण नक्की सवड काढून येईनच,पण आता मात्र वेळच नाही.मी तरी काय करणार ?

                                                  *आणि...... एक दिवस दादाचा फोन आला बाबा गेल्याचा.*


मी आहे तशीच उठून गेले.*बाबा मात्र कायमचे शांत झाले...*


आई निस्तेज,खूप घोकलं ग,खूप आठवण काढायचे तुझी.... म्हणायचे,तिला तिच्या खूप जबाबदा-या आहेत,पण आपला जीव तुटतो तिच्या भेटीसाठी....

तिच्या सोबत थोडा वेळ घालवावा वाटतो असे म्हणायचे.मी त्यांच्या शांत चेहऱ्याकडे पाहून अपराधी मुद्रेने म्हणाले,

*बाबा... मी आले,त्यांना न जाणवणारा स्पर्श करून हंबरडा फोडला.* 


एकदा म्हणा ना...ये ग...


मी आले "बाबा"....

मी आले राहायला...

बोला बाबा...बोला...


कृपया....वेळ आहे तोपर्यंत आपल्या माणसांना भेटून घ्या. वेळ गेल्यावर पश्चाताप करून वेळ परत येणार नाही.*हा आपल्याच विश्वात गुंतण्याचा पसारा आवरा,किती गुंतायचे ठरवा....*

कारण वेळ सांगून येत नाही, विचारून येत नाही,तर ती आणावी लागते.वेळीच सावध होऊन आपलेपणाच्या प्रेमाचा अनुभव घ्या.तसे तर कुणाचेच कोणा वाचून अडत नाही.हे सत्य स्विकारा.


*आवड सगळ्यांनाच असते किंवा नसते पण सवड मात्र काढावीच लागते हे निश्चित...*


⭐⭐⭐⭐⭐⭐

No comments:

Post a Comment