TechRepublic Blogs

Monday, September 23, 2024

प्राण

 *रामनामाचा महिमा सदैव वृद्धिंगतच होत असतो.*


श्रीराम जयराम जय जय राम 


“राम” नाम वेदांच्या प्राणासमान आहे. सकल शास्त्रांचे आणि वर्णमालेचे देखील प्राण आहे. प्रणवाला वेदांचे प्राण मानले जाते. प्रणव म्हणजे तीन मात्रांचा ॐ कार, ज्यापासून त्रिपदा गायत्री बनली आणि त्यापासून वेदत्रय. ऋक, साम आणि यजुः – हे तीन प्रमुख वेद. अशा प्रकारे ॐ कार (प्रणव) वेदांचे प्राण आहे. “राम” नामाला वेदांचे प्राण मानले जाते, कारण राम नामाने प्रणव बनतो. जसे ‘प्रणव’ मधून “र” काढले तर केवळ ‘पणव’ होईल अर्थात त्याचा ढोल होईल. तसेच “ॐ”कारातून ‘म’ काढले तर ॐकार शोकवाचक होईल. प्रणवात ‘र’ आणि ॐ कारात ‘म’ म्हणणे आवश्यक आहे. म्हणून राम नाम वेदांचे देखील प्राण आहे.


नाम आणि रूप दोन्ही ईश्वराची उपाधि आहे. भगवंताचे नाम आणि रूप दोन्ही अनिर्वचनीय आहे, अनादि आहे. सुन्दर, शुद्ध, भक्तियुक्त बुद्धिनेच त्याचे दिव्य अविनाशी स्वरुप जाणले जाऊ शकते.


राम नाम लोकी आणि परलोकी निर्वाह करणारे असते. लोकी तो सुखकारक चिंतामणि आणि परलोकी भगवतदर्शन कारविणारा आहे. वृक्षातली शक्ति बीजापासून येते तसेच अग्नि, सूर्य आणि चन्द्रमा मध्ये जी शक्ति आहे ती राम नामातून येते.


या विश्वामध्ये सूर्य पोषणकर्ता आहेत आणि चन्द्र अमृतवर्षाकर्ता. ‘राम नाम’ विमल आहे. सूर्य-चंद्राला राहु–केतुचे ग्रहण लागते, पण रामनामाला कुणाचे कधीच ग्रहण लागत नाही. चंद्राचा आकार क्षय किंवा वृंधिगत होतो, परंतु रामनामाचा महिमा सदैव वृद्धिंगतच होत असतो. ते सदा शुद्ध आहे आणि निर्मल चन्द्र आणि तेजस्वी सूर्यासमान आहे.


श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम

No comments:

Post a Comment