एकदा एक इसम श्रीगोंदवलेकर महाराजांना भेटण्यास मालाडला (वाणी अवतारात) दुपारी साडेतीन ते चारचे सुमारास आला. श्री बेलसरे त्यावेळी तेथे हजर होते. श्रीमहाराजांनी त्या इसमाची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. व नंतर एकदम त्यास म्हणाले "जप एकदम वाढवू नये. त्रास होण्याचा संभव असतो." या संदर्भरहीत बोलण्याचा श्री बेलसरे यांना उलगडा झाला नाही व तो इसम तेथून उठल्यावर त्यांनी त्याबद्धल विचारले. तेव्हा तो म्हणाला " मी तेच विचारण्याकरिता आलो होतो. एरवी ऑफिसमधून आल्यावर पाच हजारापेक्षा जास्त जप होत नाही. म्हणून मी सध्या रजा घेवून घरी बसलो आहे आणि नेहमीच्या पांच हजाराच्या ऐवजी आता मी रोज वीस हजार जप करावयास सुरुवात केली. परंतु हल्ली माझे डोके दुखू लागले आहे. तेव्हा याचा जपवाढीशी काही संबंध आहे की काय ते मी श्री महाराजांना विचारण्यास आलो होतो. परंतु त्यांनी विचारण्यापूर्वीच उत्तर दिले. त्यानंतर श्री बेलसरे यांनी श्रीमहाराजांना पुन्हा भेटल्यावेळी त्याबद्धल विचारले तेव्हा ते म्हणाले " तो इसम समोर आल्यावर त्याच्या आत जपामुळे निर्माण झालेली स्पदने मला दिसत होती. माझ्याकडे माणूस येतो तेव्हा मी त्याच्या बाहेरचा देह न पाहता त्याचा सूक्ष्म देह पाहतो व मला त्याचा मागचा जन्म, हा जन्म व पुढचा जन्म असे तीनही जन्म दिसतात."
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment