*सावध ऐका... पुढल्या हाका..!!!*
*योग, योगनिद्रेचे महत्त्व* 👏🏻 🧖🏻♀️
नुकतीच मी एक पोस्ट वाचली की एक महोदयांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला,सुदैवानं ते त्यातून वाचले,पण त्या साठी त्यांना दवाखान्यात ॲडमीट व्हावं लागलं,मग तिथलं वातावरण,उपचारातील संदिग्धता , तिथल्या स्टाफचे अरेरावी वागणं, घरच्यांचे चिंताक्रांत चेहरे , तब्येतीचं टेंशन इ. त्यांना फार त्रासदायक ठरलं... पुढे ते म्हणतात की मी जो त्रास भोगला तो कुणाच्याच वाट्याला येऊ नये...
अगदी खरंय त्याचं, आपणा सर्वांनाच वाटतं की असा त्रास आपल्यालाही होऊ नये आणि इतर कुणाच्याही वाट्याला येऊ नये....पण नुसते वाटून उपयोग नाही त्या साठी आपण काय करतो हे एकदा तपासून बघायला हवे...!!
आज social media च्या माध्यमातून कधी नव्हे इतका माहितीचा महापूर आपल्या भोवती वाहतो आहे, आपला सर्वांचा असा भ्रम आहे की आपल्याला आरोग्याची खूप माहिती आहे,आपण खूप जागरूक आहोत पण प्रत्यक्षात जितकी माहिती आपल्याला होतेय तितके आपण आपल्या शरीराबाबत उदासीन होत आहोत...
*पूर्वी वार्धक्याचे समजले जाणारे हृदयविकार, बी पी,डायबिटीस सारखे आजार आता तरुणपणीच होऊ लागलेत, प्रगत मेडिकल सुविधा उपलब्ध असूनही त्यांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे ...* याचाही विचार करायला हवा..
हृदयविकार, बी पी, डायबेटिस, कॅन्सर, हे चार आजार आज आपल्या दाराशी येऊन बसलेत, त्यांचा आपल्या घरात कधी शिरकाव होईल सांगता येत नाही..किंबहुना तो झाला ही असेल...
खरं तर हे सारे आजार एकदम येत नाहीत, क्वचित एखाद्या स्वस्थ व्यक्तीस, कांहीही लक्षणं नसतांना आलेला हृदयविकाराचा झटका जीवघेणा ठरू शकतो,पण हे प्रमाण फार कमी अगदी एक दोन टक्के बाकी सर्व आजार ते होण्या अगोदर किती तरी दिवस आपल्या शरीरात ठाण मांडून बसलेले असतात,तश्या सूचनाही आपलं शरीर देत असतं पण आपलं त्या कडे लक्ष असेल तर ना ?
कुठलाही आजार होण्या अगोदर आपलं शरीर सूचना (signals) देत असतं, गरज आहे ती आपण त्या कडे लक्षपूर्वक बघण्याची. फार नाही पण ह्या चार आजारांची कमीतकमी एक दोन तरी लक्षणं आपल्याला माहीत असायला हवीत,आपल्याला चांगला सल्ला देणारा एखादा फॅमिली डॉक्टर असायला हवा, माहीत असलेली काही लक्षणं आढळली तर, मी असं म्हणणार नाही की लगेच उठून तज्ञ डॉक्टर कडे जा, पण थोडा काळ घरगुती उपचार करूनही दुखणं थांबत नसेल तर मात्र आपल्या फॅमिली डॉक्टर कडे जा ते तुम्हाला योग्य त्या तज्ञ डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला देतील जितके लवकर आपण तज्ञ डॉक्टर पर्यंत पोहचू तितके त्यांनाही उपाय करणे सोपे जाते, कदाचित आपल्या आयुष्याची लांबीही वाढू शकते,अन्यथा आजार बळावल्यावर तज्ञांसाठीही ते कठीण होते.तेव्हां घरीच अंगावर काढू नका,
*🙏 तो काळ आता राहीला नाही..!!!*
एक योग शिक्षक म्हणून मी असं म्हणेन की आजार होऊ नये म्हणून सतर्क राहणे कधीही चांगले त्यासाठी ठराविक वयानंतर योग्य त्या तपासण्या नियमित करून घेणे, इतकं करूनही एखादा आजार झाल्यास स्विकारणे, योग्य उपचार घेणे, डॉक्टरांच्या उपचारा बरोबरच, *जीवनशैलीत बदल, योग्य आहार विहार, योग, मेडीटेशन, प्राणायाम, मनःशांती साठी ओंकार साधना, योगनिद्रा इ.* चा आधार घेणे ते तुम्हांला आजारांची तीव्रता कमी करण्यास आणि आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतील.
घाबरु नका..जागरूक रहा !!!
गाफील राहू नका..सावध रहा !!!
➖➖➖➖➖➖
🧘♂ *आयोजक* 🧘
*युगंधरा शिरढोणकर, पुणे*
सावध ऐका..पुढल्या हाका !!
*सर्वे भवंतू सुखिन: | सर्वे संतू निरामया;*
No comments:
Post a Comment