*संग्रहित*
संकलन आनंद पाटील
*काही लोक अंत:करणात विनाकारण द्वेष करतात. ईर्ष्या व द्वेष या दोन गोष्टी अंत:करणातून द्वेष करणे ह्यामुळे आपले हृदय कमकुवत होते. मनुष्याला फार अल्प आयुष्य दिले आहे. ह्या वेळेत त्याला पुष्कळ चांगली व* *विधायक कामे विचारपूर्वक करता आली पाहिजेत. ह्या देहाला केव्हा कीड लागेल, रोग होईल, कॅन्सर होईल किंवा हृदयविकार होईल हे सांगता येत नाही. विज्ञान जरी पुढे*
*गेलेले असले तरी ह्या कोणत्याही रोगावर ते मात करू शकलेले नाही. ही सत्ता ईश्वराच्या हातात* *आहे, आपल्या हातात नाही. आपल्या हातात सत्ता आहे ती ही की, रोज काय काय व कसे घडते* *हे डोळ्यांनी पाहणे,*
*जेवणे व निवांत झोपणे. झोपण्याअगोदर नामजप* *करावा, नंतर देवाला प्रार्थना करावी की, देवा आपल्या* *कृपेमुळे आजचा दिवस चांगला गेला, उद्याचा दिवसही* *असाच चांगला जाऊ दे. तुम्ही सत्पुरूषांची संगत ठेवा, त्यांचे* *उपदेश ऐका. त्यावर विश्वास ठेवा. तुमचे कल्याण होईल. काही लोकांच्या मनात .
इतके असंबद्ध प्रश्न असतात की* *त्याला काही अर्थ नसतो. सद्गुरुंचे सांगणे असे की, सर्व भार ईश्वरावर ठेवा.* *सर्व चिंता सोडून द्या. जितके नामस्मरण करता येईल तितके करा व आनंदात राहता येईल तेवढे रहा. ईश्वर ही एकच अशी प्रभावी शक्ती आहे. तिचेशी सतत*
*अनुसंधान ठेवा. असे वागल्याने तुम्हाला जीवनात सुख व शांती मिळेल. कारण ती महान प्रभावी शक्ती आहे आणि त्या दिव्य शक्तीचा संतांनी अनुभव घेतलेला आहे. शक्यतो रोज पहाटे बाह्य मुहूर्तावर भगवंत स्मरण केल्यास पारमार्थिक प्रगती लवकर गाठते. सद्गुरुंचा उपदेश आठवा व चिंतन-मनन करा.
No comments:
Post a Comment