TechRepublic Blogs

Sunday, December 8, 2024

एकनिष्ठ

 पै भक्ती एकी मी जाणे | 

एकी भक्ती म्हणजे एकनिष्ठ भक्ती. पू.श्री.गोंदवलेकर महाराज उदा.देतात "

 आपल्या लहान बाळासमोर खेळणी टाकून आई घरातील कामे करते. मधून मधून त्याला हाका मारते, रडतं तेवढ्यापुरती ती समोर येते, काहीतरी बोलते.

परत आपल्या कामाला लागते. पण जेव्हा मुल सर्व खेळणी फेकून आईसाठी भोकाड पसरतं तेव्हा मात्र ती हातातली सर्व कामे टाकून मुलाला उचलते. मांडीवर घेते. मोठ्या प्रेमाने त्याची समजूत काढते " आई देखील एकनिष्ठ भाव जाणते.

 मग सर्वसाक्षी असा परमात्मा प्रत्येकाच्या अंत: करणातील भक्ती जाणतोच. वरची भाषा कशीही असली तरी एकनिष्ठ भाव आणि अविश्वास या दोन्ही गोष्टी समजल्या खेरीज राहत नाही. भगवंत म्हणतात "भक्ती मोजायला काय माप आहे ? गुंजभर सोने की मणभर सोने.

 दोन्ही सारखेच.माझ्या साठी भाव महत्वाचा.भावाच्या ठिकाणी मी आधीन आहे. मी तेथे येऊन राहतो. तिथला पाहुणचार देखीलस्विकारतो"  ज्या ठिकाणी प्रेम नाही, आपुलकी नाही तेथे पाहुणे सुध्दा जात नाही. 

हे जर सामान्य माणसाला समजते तर भगवंताला समजणार नाही का ? भक्ताच्या एकनिष्ठ भावासाठी भगवंत विकले जायला तयार होतात.

No comments:

Post a Comment