*एका चेंज ची गोष्ट .....*
बघा पटतय का ...
अडीच तीन वर्षा पूर्वीच्या
ह्या दोन्ही गोष्टी बरं कां ....
लेक इरा आणि मी गोखले रोडवर एका साडीसाठी फिरत होतो. ठराविक शेडची च साडी आणि त्यावर हटके ब्लाउज आणि हटके अक्सेसरीजसाठी अक्ख ठाण फिरलो मिळाली एकदाची ..
ज्या लग्नासाठी हा अट्टाहास केला होता. अगदी शारीरिक. मानसिक आर्थिक उलाढाली केल्या होत्या.
त्या लग्नात सगळं घालून लेक मिरव मिरव मिरवली. फोटो फोटो कित्ती कित्ती .. दिवसभर सगळं गोषवारा मिरवून घरी आल्यावर.
सर्वात आधी रूममध्ये गेली ,
सगळा फरारा सोडून घरच्या टी शर्ट आणि थ्री फोर्थ मध्ये आली आणि
*हुश्श आई आत्ता कुठे बरं वाटल गं.*
*कसल घट्ट घट्ट गं*
*आता रिलॅक्स एकदम .....*
मी मात्र ... 😳😳
अग बयो तुला ह्याच्यातच रिलॅक्स वाटणार होत तर मग तो गोखले रोड, तो जांभळीनाका, ते उन्हा तान्हातून फिरण, हेच नको तेच नको, त्या सगळ्या उलाढाली .....
हाय रे रामा ....
अर्थात मी हे सगळ मनातल्या मनातच म्हणाले बरं कां.
काही वर्षा पूर्वी आम्ही सगळया ग्रुप नी
नैनिताल ,दिल्ली अशी ट्रिप अरेंज केली. अगदी आम्हाला आता सगळ्या बायकांना कसा खूप कंटाळा आला आहे
आणि कित्ती ब्रेकची गरज आहे हे मृणालच पालुपद चघळून चघळून अखेर त्या ट्रिपच बुकिंग झालंच
मग हा मोठा ब्रेक साजरा करण्यासाठी ,खरेद्या,
नवीन कपडे,चपला, लिपस्टिक्स, मॅचिंग्ज सगळं सगळं काही आलंच की ओघाने,
ती सगळी प्रथा व्यवस्थित आर्थिक उलाढाल करून पार पाडून आम्ही ट्रिप ला निघालो,
निघताना पुन्हा एकदा गजर ...
*फारच गरज होती बैई ह्या ब्रेक ची*
आठ दिवस नुसत फिर फिर फिरण,
नटण,खाणं, पुन्हा खरेदी ,गप्पा टप्पा,
फोटो फोटो किती फोटो आणि व्हिडीओज ऐंशी जीबी स्टाॅक साठला
हे सगळं काही करून दहाव्या दिवशी
मृणालने घराचा दरवाजा उघडला ,
तिथल्या थ्री स्टार हाॅटेलातल्या
बाथरूम मधून घरातल्या न्हाणीघरात
थंडगार पाण्याने सचैल स्नान करून,
देवाला नमस्कार केला,
*हुश्श काय बरं वाटलं घरी आल्यावर*
*घर ते घर च बैई शेवटी .....*
आता मी आणि लेक ..... 😳😳
मग हा एवढा विमानाचा खर्च ,
ट्रिप, फिरण, खरेदी .....
यू नो मोठा ब्रेक साठी केलेला आटापिटा
एवढं करून घरी आल्यावरच बरं वाटलं 🤔
🤔 अर्थात तो ही हे मनातल्या मनात च
एकूण काय
चेंज हा फक्त चेंज च असतो
जगातल *अंतिम सत्य* हे फक्त
*घर, वरणभात तूप,आणि आपले रोजचे ढगळ पगळ कपडे ...*
😇
पटतंय कां ?
तुमचं ही असंच होत ना ?
*आपली मठी ती मठीच*
*बाकी सब कुछ झूठ है रे बाबाऽऽऽऽ....*
No comments:
Post a Comment