*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*पू. बाबा -- परमार्थ समजून केला पाहिजे. नाहीतर फसगत होण्याची शक्यता असते. साक्षित्वाचा अभ्यास केला पाहिजे. साक्षित्व येणे आवश्यक आहे. ते परमार्थाचे मर्म आहे. एक तर 'त्याची' इच्छा म्हणून वागावे. आपली इच्छा बाजूला ठेवून भक्ती करावी किंवा भक्ती, साक्षीभाव इत्यादी बाजूला सारून हा निसर्गाचा धर्मच आहे, जे जन्मते त्याचा नाश होणारच, म्हातारपण त्रास देणारच हे विचाराने पटवून घ्यावे म्हणजे त्रास झाला तरी त्याचे दुःख होणार नाही. हा दुसरा मार्ग अवघड आहे. त्यापेक्षा 'त्याची' इच्छा अशी शिकवण देत राहावे.*
*श्री. अण्णासाहेब मनोहर यांना अर्धांगाचा झटका येऊन गेला त्याबद्दल मी त्यांना विचारले होते. तेव्हां ते म्हणाले की, 'त्यांच्या' इच्छेनेच सर्व काही होते तेव्हां वाईट कशाला वाटून घ्यावयाचे ?*
*अध्यात्म संवाद*
No comments:
Post a Comment