साधुंना, सत्पुरुष यांना देहाचे धर्म रहात नाहीत. त्याचं एक लक्षण असं आहे की ते कधीही सावकाश चालायचे नाही. त्यांचे कारण असं आहे की त्याच्या शरीरात पंचमहाभूतांची सूक्ष्म रूप जास्त प्रमाणात असतात. त्यातल्या त्यात जे आकाश तत्व आहे ते अधिक सूक्ष्म असत. त्याच्या खालोखाल वायू तत्व असत.
त्यामुळे त्यांचा देह हलका असतो, म्हणून ते भरभर चालतात. दुसर असं लक्षण आहे की ते जेव्हा आपल्याकडे पाहतात ना तर त्यांच्या डोळ्यात त्याच्या आतमध्ये काय आहे ते कळायचे नाही. ते कुठेतरी पाहत असतात. कारण त्यांचे दृष्याकडे लक्षच नसत. ते आतमध्ये गुंतलेले असतात. तिसरे लक्षण अस की त्यांच्या शरिराकडून वाईट कर्म कधी होणारच नाही. त्यांचा देह अत्यंत पवित्र असतो. त्यांना प्रारब्धाचे भोग कधीही चुकत नाही.
त्यांचे तिकडे लक्षच नसते. अशा महात्म्यांना इंजक्शने वगैरे औषधे चालत नाहीत. होमीओपाथीची औषधे चालतात. ती औषधे सूक्ष्म असतात. बारामतीला एक साधू होते.ते एकशे वीस वर्षे जगले.
त्यांना एकदा विचारले की तुम्ही इतकी वर्षे कसे जगलात. तेव्हा ते म्हणाले "मृत्यू म्हणजे काय? तर आपल्या शरीरातले पंचमहाभूतांचे महत्व आहे ते बिघडते.
मग जे तत्व शरीरात कमी असतं ते आम्ही विश्वातून घेतो. म्हणजे पुनः आपलं शरीर उत्तम. म्हणजे पंचमहाभूतांचे महत्व येते. " असा सत्पुरुषांचा देह सुक्ष्म असतो त्यामुळे ते जडान्न फार घेत नाहीत. ते फार बेतानेच खातात.
No comments:
Post a Comment