TechRepublic Blogs

Monday, September 30, 2024

मानवजन्म

 चिंतन 

             श्रीराम,

      दुर्लभ असा मानवजन्म लाभला आहे तो केवळ प्रपंचाच्या तापत्रयात न घालवता काहीतरी जीवन सार्थक करा असे समर्थ वेळोवेळी माणसाच्या मनीमानसी बिंबवत आहेत. पावलोपावली राग राग करून आपण स्वतःची किंमत कमी करून घेतो आणि रागाच्या भरात आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान करून बसतो. यावर उपाय एकच आहे ज्याक्षणी राग येईल, त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळावे आणि डोकं थंड व मन शांत झाल्यावर प्रतिसाद द्यावा. असे केल्यामुळे रागाची तीव्रता कमी होते आणि मनात उठलेल्या अनेक वादळाचा क्षणात निचरा होतो, म्हणून क्रोधाचा क्षण आवरणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तो आवरणे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.

                  संत सद्गुरू म्हणतात - मी जर सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे तर राग द्वेष माझ्या मनात कसे येतील? माझे मन हरिच्या प्रेमाने, त्याच्या कृपेने ओतप्रोत भरलेले असल्याने षड्रिपूंना आत यायला तीळभर पण जागा नाही.

                  आपले मात्र बरोबर याच्या उलटे होत असते. आपल्या ह्रदयात षड्रिपू, राग लोभ द्वेष असल्याने 'शांत आनंद स्वरूप हरि' स्थित व्हायला जागाच नसते.

                    ||श्रीराम ||

Sunday, September 29, 2024

मारुती

 *माझे सद्गुरुराव मारुती अवतार l*

*कोणी हो संदेह धरू नये ll*

*दया ती पहावी सद्गुरूनाथांची l*

*समर्थांचे परी शोभतसे ll*

*(श्रीब्रम्हानंद महाराज)*


*मारुतिरायाचे दर्शन*


*सन १९०५ साली अयोध्येस असताना श्रीमहाराज सहज बोलून गेले की, “या परिसरात मारूतिरायाचे वास्तव्य आहे.” कृष्णशास्त्री उप्पनबेटिगिरी यांना मारुतीचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली.त्यांनी ती* *श्रीमहाराजांच्या कानावर घातली. आज करू, उद्या करू म्हणून श्रीमहाराजांनी ती गोष्ट लांबणीवर टाकली. एक दिवस शास्त्रीबुवांनी आग्रह धरला. तेव्हा 'बरे' म्हणून श्रीमहाराज त्यांना घेऊन शरयूच्या पलीकडच्या तीरावर गेले.*


 *श्रीमहाराज बसले व समोर शास्त्रीबुवांना बसवले. त्यांना डोळे मिटावयास सांगितले.* *पाच मिनिटांनी ‘डोळे उघडा' म्हटल्यावर शास्त्रीबुवांनी डोळे* *उघडले मात्र, श्रीमहाराजांच्या ठिकाणी त्यांना मारुतीचे भव्य दर्शन झाले. शास्त्रीबुवांना ते सहन झाले नाही. लगेच ते रूप जाऊन श्रीमहाराजांचे सौम्य रूप दिसू लागले. तेव्हा श्रीमहाराज बोलले, “शास्त्रीबुवा, हे बाहेरचे दर्शन कामास येत नाही. अखेर खरे दर्शन स्वतःमध्ये होत असते." परत आल्यावर शास्त्रीबुवा भाऊसाहेबांना येवढेच म्हणाले, "भाऊसाहेब, महाराज हे महाराज नाहीत बरं का!"*

संकलन आनंद पाटील

Saturday, September 28, 2024

आत्मकेंद्रित

 आज माझी दृष्टी मी केंद्रित आहे ती आत्मकेंद्रित किंवा भगवदकेंद्रित झाली पाहिजे. स्वस्वरूपावर केंद्रित झाली पाहिजे. भक्ती भक्ती म्हणजे काय तर माझी दृष्टी मी केंद्रित आहे ती भगवदकेंद्रित झाली पाहिजे. ईश्वर माझ्या जीवनाच केंद्र बनलं पाहिजे. माझी काया, वाचा, मने जी कर्मे घडतात ही सगळी त्याच्या इच्छेने घडतात ही भावना झाली पाहिजे.  कर्मे करण्याची जी प्रेरणा आहे ती त्याच्या शक्तीने येते. परमात्मस्वरूपाला तीन गुण आहेत सच्चिदानंद  त्यापैकी एक आहेपणाचा गुण. हा तीनही अवस्थानमध्ये असतो. आता चित म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे प्रेम. भगवंताला एकसारखे स्फुरण आहे एक आहे ज्ञानाचे, म्हणून तो ज्ञानमार्ग व दुसरे आहे प्रेमाचे तो भक्तिमार्ग. हे दोन मार्ग परमात्मस्वरूपाला मिळवण्याचे आहे. मनुष्य जेव्हा कर्म करतो तेव्हा या दोन स्फुरणातूनच त्याच्या कर्माचं स्फुरण असत, नाहीतर कर्म होऊच शकत नाही. त्या कर्माला आतून काहीतरी प्रेरणा पाहिजे ती प्रेरणा आल्यानंतर ती ज्या रंगाने येते त्या रंगाप्रमाणे माणूस देहबुध्दीतून जातो. दिव्याला ज्या रंगांची काच असेल तसा त्यातून प्रकाश येतो. आपला प्रपंचाचआजो रंग असतो तो सोडून आपल्या प्रपंचाला गुरूचा प्रकाश आला पाहिजे. गुरूंची काच त्या दिव्याला (प्रपंचाला) लावली पाहिजे. याला अतिसावधानता पाहिजे. आसिड मध्ये काम करताना आपल्या बोटाना काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेता ना , तसं मला जी प्रेरणा होते ती कुठून येते आहे यावर सारखं लक्ष ठेवणे म्हणजे परमार्थ.माझी प्रेरणा स्वार्थातून येते की गुरूंकडून येते यावर सतत लक्ष ठेवावे लागते. गुरूंची प्रेरणा आतून येते त्याची खूण काय तर सुखदुःख राहणार नाही. जे काही व्ह्यायचे असेल ते होऊ दे. हे आतून येणे फार कठीण आहे.

हरिहाट

 *🌹 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌷कलकत्त्याचा हरिहाट 🌷*

* *श्रीमहाराज काशीहून अशा रीतीनें निघाले ते कुठेही न थांबता प्रयागला आले. तेथे कांहीं बैरागी लोक महंताच्या शोधांत फिरत होते. वय वीसच्या आसपास, दाढी व जटा वाढलेल्या, अंगावर ब्रह्मचर्याचें आणि अध्यात्माचें तेज फांकलेले, अशी महाराजांची मूर्ति पाहिल्यावर त्यांना त्या बैरागी लोकांनी आपला महंत करून टाकलें, प्रयागहून ही सर्व मंडळी मथुरा-वृंदावनाकडे गेली. काशी सोडून एक वर्ष होऊन गेलें होतें. तेथे असतांना ज्या बंगाली जमीनदाराला आशीर्वाद दिला होता त्याला मुलगा झाला असल्यानें तो सारखी श्रीमहाराजांची चौकशी करीत होता. त्याची माणसें त्यांच्या शोधार्थ क्षेत्रांमध्ये फिरत होतीं. त्यापैकी एक मनुष्य श्रीमहाराजांना मथुरेमध्ये भेटला आणि त्यानें आपल्या मालकाचें आमंत्रण त्यांच्या कानांवर घातलें. त्या आमंत्रणाला अनुरसरून आपल्या सर्व परिवारासह श्रीमहाराज कलकत्त्याला येऊन दाखल झाले. ते महंत म्हणून वावरत असल्यानें त्यांचा थाट आधींच एखाद्या राजासारखा होता, आणि त्यामध्ये त्या जमीनदाराच्या उपचारांची भर पडल्यावर तर श्रीमहाराज एखाद्या राजेंद्रासारखे शोभून दिसत. जमीनदारानें आपला छोटा मुलगा त्यांच्या पायावर घालून त्यांचा आशीर्वाद घेतला. तो श्रीमहाराजांना म्हणाला, "आपली कांहींतरी सेवा करावी अशी माझी फार इच्छा आहे. मी काय करूं तें मला सांगा." यावर श्रीमहाराज बोलले, "अरे, आम्ही बैरागी लोक ! आम्हांला खरोखर कशाचीहि जरुरी नाहीं. तूं आणि तुझी मंडळी आनंदांत राहा पण भगवंताला विसरू नका म्हणजे मला सर्व पोंचलें." हें सांगून जेव्हां तो आणि त्याची आई ऐकेनात, तेव्हां श्रीमहाराजांनी त्यांना हरिहाट करण्याची आज्ञा केली. हरिहाट म्हणजे भगवंताचा बाजार हा एक आठवडाभर चालतो. भगवंताच्या प्राप्तीचीं जीं जीं साधनें आहेत तीं तीं सर्व एकदम सुरू करून सात दिवस अखंड चालवायची. तसेंच एक अनछन्न सुरू करून सात दिवस तेथे मुक्तद्वार ठेवायचें असतें. विद्वान् व कलावंत मंडळींचा योग्य परामर्श घेतला जातो. हरिहाट करणें हे फार खर्चाचें, कष्टाचें आणि जबाबदारीचें काम असतें. परंतु श्रीमहाराजांनीं शब्द टाकल्याबरोबर त्या मायलेकांनीं एकदम होकार दिला. कलकत्त्यापासून दोन मैलांवर एक मोठा मांडव उभारला. देशांतल्या, विद्वानांना, शास्त्रीपंडितांना, आणि कलावंतांना आमंत्रणे गेली. पुष्कळ धान्य, कपडा आणि चांदीची भांडीं खरेदी केली. तयारीला पंधरा दिवस लागले. ज्या दिवशीं हरिहाट सुरू झाला त्या दिवशीं यजमानानें श्रीमहाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढली. मंडपामध्यें सुशोभित असें एक उच्च सिंहासन ठेवलें होतें, त्यावर श्रीमहाराज जाऊन बसल्यावर वेदमंत्रांनीं त्या अपूर्व समारंभाला सुरुवात झाली. मांडवाच्या निरनिराळ्या भागांमध्यें वेदपारायण, यज्ञ, जप, भजन, कीर्तन, नामस्मरण, पुराणवाचन, प्रवचन, योगासनें, पंचाग्निसाधन, शास्त्राध्ययन, ब्रह्मकर्म, अनुष्ठान, देवतार्चन, सत्संग, गुरुसेवा, मौनसेवन, वाममार्ग, तंत्रक्रिया, इत्यादि साधनें सुरू झाली. बाहेर अन्नछत्र होतें, त्यामध्यें चोवीस तास जेवण तयार ठेवून जो येईल त्याला मुक्तहस्तानें वाढणें चालू झालें. रोज नवीन पकान्न होई, आणि तें सर्वांना पोटभर मिळे. सात दिवसांमध्यें अक्षरशः हजारों बैरागी, प्रवासी, अतिथि, आंधळे, पांगळे, भिकारी, श्रीमंत, गरीब, पुरुष, स्त्रिया, आणि मुलें तेथून जेवून गेले. कलकत्त्यामधले बहुतेक सर्व लोक हा समारंभ पाहून गेले. श्रीमहाराज रोज सकाळ-संध्याकाळ मांडवामध्यें येऊन सर्व मंडळींची सोय झाली किंवा नाहीं याची स्वतः चौकशी करीत. विशेषतः अन्नछत्र आणि नामस्मरण बरोबर चाललें आहे कीं नाहीं हें मुद्दाम पहात असत. आठव्या दिवशीं यजमानानें श्रीमहाराजांची महापूजा केली. त्यांना महावस्त्र अर्पण करून एक हजार रुपयांनीं भरलेलें चांदीचें ताट दक्षिणा म्हणून त्यानें पुढें ठेवलें. तें वत्र श्रीमहाराजांनीं त्याच्या आईला प्रसाद म्हणून दिलें, आणि ते रुपये काशीच्या विद्वान् पंडितांना वांटून दिले. एकंदर समारंभाला पंचवीस हजार रुपये (त्या काळीं) खर्च लागला. "असा हरिहाट गेल्या पन्नास वर्षांत बंगालमध्यें आम्ही पाहिला नाहीं," असे तेथील वृद्ध लोक म्हणत असत.*


*चरित्र आणि वाड्मय*

Friday, September 27, 2024

चित् आनंद

 चिंतन 

            श्रीराम,

    खरा मी सत् चित् आनंद स्वरूप म्हणजे चिदानंद स्वरूप आत्मा आहे.. जसे अचेतन जड गाडी ड्रायव्हर शिवाय चालत नाही. तसेच या जड अचेतन देहाच्या आत देहाला चालवणारा देहाचा ड्रायव्हर 'जीवात्मा' हे चेतन तत्व आहे. माझे खरे स्वरूप शांत, तृप्त, समाधानी, आनंदी आहे.. पण अनंत जन्मांच्या संस्काराने, वासनेने, त्रिगुणामुळे आणि भ्रांतीने हे समजत नाही. देह सत्यत्व भ्रांतीने मनात द्वेष मोह मत्सर निर्माण होत असतात. मात्र ते लोकांना दाखवले जात नाही म्हणून ते सगळे क्रोधाच्या रुपात व्यक्त होतात.

                           येणाऱ्या क्रोधाचे विश्लेषण केल्यानंतर लक्षात येते की द्वेष मोह मत्सर माया आसक्ती अहंकार असे विविध भावनाविष्कार क्रोधाच्या माध्यमातून प्रगट होत असतात. जोपर्यंत या भावना प्रगटीकरणात मनुष्य अडकलेला असतो तो पर्यंत माझे स्वरूप म्हणजे चिदानंदरुपः शिवोऽहं शिवोऽहं आहे, इथपर्यंत पोहचत नाही.

                           ||श्रीराम ||

सत्समागम

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  

*सत्समागम  हा   सर्व  साधनांचा  राजा  !*


मनुष्यजन्माला येणे, संतांची भेट होणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचे कुठे राहते ? संत बनणे व्यावहारिक दृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते; पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. आत वावरणार्‍या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो, परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे, आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे, असे भगवंताचे सुख आहे. ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे. हा संतसंगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत, नव्हे प्रत्यक्ष भगवंत होय. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्यस्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने कायावाचामनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय.


आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसेदेखील, गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात; त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधली बिनतिकिटाची, म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य, आणि अयोग्य, अशी माणसेसुद्धा तरून जातात; मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती तीन प्रकारची असते : एक, संताचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास; दोन, संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास; आणि तीन, संताच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले; म्हणून त्यांना शरण जावे. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसर्‍याला देतात, हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत !


*११३ .    संतांजवळ  जे  समाधाम  असते  ते  आपल्याला  लाभले , म्हणजे  संताची  प्रचीती  आली  असे  समजावे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

खीर

 सज्जनगडावरील  प्रसादाची  खीर !


सज्जनगडावर भोजनप्रसादात मिळणारी गव्हाची खीर हा पीएचडीचा विषय होऊ शकतो . गेल्या शेकडो वर्षात गडावरील रामदासी लोक बदलले ,  त्यांची खीर करायची पद्धत देखील इतक्या वर्षांमधये   बदलली असेल पण खिरीची चव मात्र जैसे तैशीच ! 

लहानपणी गडावर जाण्याचे मुख्य आकर्षण असायचे ते या खिरीचे ..... आणि आता वयाने मोठं झाल्यावर .... खोटं कशाला बोलायचं ....आजही त्या खिरीचे आकर्षण तेवढेच आहे . काहीजण या खिरीला लापशी म्हणतात परंतु 'खीर' या शब्दात जो जिव्हाळा आहे तो 'लापशी' या शब्दात नाही.


भोजनप्रसादात या खिरीचे आगमन होण्यासाठी मोठी वाट पाहावी लागते . आधी प्रसादाच्या रांगेत उभे राहून आतून येणाऱ्या  सुगंधावरून आज पानात  भातासोबत फक्त  आमटी आहे की एखादी भाजी सुद्धा आहे याचा अंदाज लावायचा ...त्यानंतर थोड्या वेळाने ताटं-वाट्यांचा आवाज येतो .  नंतर भोजनगृहात प्रवेश मिळाला की नामस्मरण झालं की सर्वप्रथम भात -आमटी मीठ , चटणी यांचे पानात आगमन होतं .....आणि मग  खरपूस सुगंधाचा सांगावा आधी पाठवत त्यानंतर त्या बहुचर्चित खिरीच्या बादल्यांचे आगमन होते . ....पण सांभाळून ....डेक्कन एक्सप्रेसच्या वेगाने तुमच्याकडे येणारी खीर तुमच्या पानापर्यंत पोहचण्याआधी भात आमटी संपवून ताट चकचकीत करायचं कसब तुमच्याकडे हवं .  भोजन-प्रसादाला नियमित येणाऱ्या बंधू-भगिनींना हे अंगवळणी पडलेलं असतं.


अर्थात हा भोजनप्रसाद घेणारा मनुष्य सुद्धा चांगला बलदंड असला पाहिजे . उगाच 'नको-नको ' म्हणणारा ( आदरणीय मकरंद बुवांच्या शब्दात -'कायमचूर्णवाला' ) नको . त्यासाठी  पंगतीच्या त्या टोकाला खिरीने गच्च भरलेली बादली घेतलेले काका  दिसले की त्यांच्या वाढण्याच्या वेगाचा अंदाज घेऊन ते आपल्यापर्यंत पोहचण्याआधी आपल्या पानातील खीर संपविण्याचा वेग पाहिजे . टाईमपास करत - गप्पा मारत प्रसाद घेणाऱ्याचे हे कामच नाही .


काही गृहिणी म्हणतात की आम्ही आमच्या घरी सुद्धा अशी खीर करतो पण  तुम्ही  गडावर मिळते तशी  खीर  घरी करून दाखवली तर मी कसलीही पैज हरायला तयार आहे . मुळात रेसिपीची पुस्तके वाचून - "अमुक एवढा गुळ , अमुक एवढे पाणी , तमुक मुठी गहू , मंद आचेवर  इतका  वेळ  ठेवावी " असली वाक्ये वाचून करण्याचा हा पदार्थच नाही . 


गडावर मिळणारी खीर ही 'रेसिपी' नसते तर 'प्रसाद' असतो  . त्यात भिक्षाफेरीत रामदासी मंडळींनी दारोदारी अनवाणी जाऊन ,मनाच्या श्लोकांचा जागर करत गोळा केलेला आणि  असंख्य भक्तांनी प्रेमाने दिलेला  शिधा असतो , गडाच्या पायथ्यापासून घाम गाळत गव्हाची पोती गडावर पोहचविणाऱ्या सेवेकऱ्यांचे श्रम असतात , जमा झालेले गहू निवडून-पाखडून , त्याला ऊन  दाखवून वर्षभर जपून ठेवणाऱ्या माताभगिनींचे कष्ट असतात . 


या सर्वांसोबत मला सर्वाधिक आश्चर्य वाटतं ते भोजनप्रसादाची खीर  तयार करणाऱ्या बल्लवाचार्य मंडळींचे !  प्रसादाला नक्की किती लोक आहेत हे पहिली पंगत बसेपर्यंत सांगता येत नाही . तरीही आलेल्या सर्वांना पुरेल एवढी आणि नेमकी त्याच चवीची खीर रोज तयार करायची . या सेवकांच्या या  'स्कील'पुढे  तर नतमस्तकच व्हावेसे वाटते . ( आपल्या घरी एखादा पाहून अचानक आला तर जेवणासाठी आपली किती तारांबळ उडते याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे ).


आदर्श दिवसाची कल्पना काय असं विचारलं तर मी उत्तर देईन ," सकाळी प्रसादापूर्वी गडावर पोहचावे .  रामराया , मारुतीराय, समर्थ ,  परमपूज्य श्रीधर स्वामी  यांचे दर्शन घेऊन प्रसादाच्या रांगेत वेळेत उभे राहावे , भोजनप्रसादात खिरीची बादली आपल्यापुढे तीनचार वेळा यावी आणि त्यावेळी आपले पान चकचकीत असावे ,  भोजनप्रसादानंतर थोडा वेळ कलंडून दुपारचा चहा घेऊन धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन यावे . सायंउपासनेला , दासबोधवाचनाला हजर रहावे .शेजारती झाल्यानंतर रात्रीच्या पंगतीला पिठलं-भातासोबत  पुन्हा एकदा सकाळची मुरलेली खीर असावी  आणि त्यानंतर मुक्कामाला खोली मिळालेली असावी ......सगळं जग विसरून जाण्यासाठी यापेक्षा अधिक काय हवं ?🙏


( डॉ वीरेंद्र ताटके ) 

Wednesday, September 25, 2024

नाना

 *नाना* 👨🏼‍🦰 🍀


मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता.म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.अंगाने पैलवान असणारा गडी.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.

     त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता,वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची.त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची.पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं.आणि त्याचा परिणाम म्हणजे नाना दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा.आणि पोरं पण नानाला मारताना जोरात रट्टा द्यायची.नाना डोळे गच्च मिटून हाताची घडी घालून उभा राहायचा.पोरांनी कधीच नानावर दया माया दाखवली नाही.मला मात्र नानाची फार कीव यायची.

    तरीही नाना दररोज शाळेत न चुकता यायचा.उलट सर्वांच्या आधी नाना वर्गात हजर असायचा.सकाळी आलेला नाना व्यवस्थित दिसायचा.आणि शाळा सुटल्यावरचा नाना म्हणजे दोन्ही गाल लालभडक सुजलेले आणि डोळे पार रडून रडून खोल गेलेले दिसायचे.एक दिवस शाळा सुटल्यावर मी जवळ जाऊन नानाला विचारलं,म्हणलं नाना कशाला शाळेत येतो?तुला काही येत नाही.रोज पोरं मारतात तुला.तू कुणाला काहीच बोलत नाहीस.मला कळत नाही एवढं सहन करूनसुद्धा तू कधी शाळा चुकवत नाहीस.कशासाठी हे तू करतोस.?त्यावर नानाने माझ्या डोक्यावर हात ठेवून केसातून हळुवार बोटे फिरवली.माझ्याकडे पाहत त्याने डोळे गच्च मिटले.डोक्यावरचा हात काढून घेतला आणि नाना तसाच पाठमोरा होऊन झपझप पावले टाकत निघून गेला.मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर उत्तर नानाने दिलं नाही.

     रोज शाळा भरत राहिली.आणि रोज नाना न चुकता मार खात राहिला.तोंड सुजवून घेत राहिला.मास्तरने प्रश्न विचारला की आपोआप नाना मनानेच उभा राहायचा अगदी तसाच डोळे गच्च मिटून.आणि मग ज्या पोरानं उत्तर बरोबर दिलेलं असायचं ते उड्या मारत नानाजवळ जायचं आणि खाडकन नानाच्या जोरात मुस्काडीत द्यायचं.पाचही बोटे नानाच्या गालावर जशीच्या तशी उमटायची.आणि मी हे सगळं केविलपणे बघत बसायचो.


        आणि एक दिवस घडलं असं,मास्तरने एक प्रश्न विचारला,तो प्रश्न असा होता.

"गावाबाहेर बायका जिथं धुणं धुवायला जातात,त्या जागेला काय म्हणतात.?"

आम्ही सगळ्यांनी जमेल तशी उत्तरे दिली, कुणी सांगितलं,ओढा म्हणतात,नदी म्हणतात,वगळ,आड,विहीर,तलाव,तळं, डबकं,पोहरा म्हणतात तर कुणी कुणी खूप डोकं खाजवून काहीही उत्तरे दिली.पण मास्तर उत्तर चुकीचं आहे असंच सांगत होते.नाना शांत बसून सगळीकडे पाहत होता.सगळ्यांची उत्तरे चुकलेली होती.गोंधळ शांत झाला आणि नानाने हात वर केला.जसं नानाने हात वर केला तशी सगळी पोरं एकसाथ मान वळवून नानाकडे बघायला लागली.मास्तर ही नानाकडे एकटक बघतच राहिले.

     त्याच शांततेत नाना शांतपणे उभा राहिला.आणि हाताची घडी घालून नानाने मान ताठ करून उत्तर दिलं,

"गुरुजी गावाबाहेर बायका ज्या जागेवर धुणं धुतात त्या जागेला पाणवठा म्हणतात."

आणि एका झटक्यात गुरुजी म्हणाले,नाना लेका तुझं उत्तर बरोबर आहे.मास्तर जसं उत्तर बरोबर आहे म्हणाले तसा नानाने मोठा दीर्घ श्वास घेतला.वर्गातली सगळी पोरं थरथर कापायला लागली.आणि नानाने सगळ्यात आधी वर्गाचं दार लावून दाराची आतली कडी लावली.त्याने कडी लावल्याबरोबर सगळी पोरं मोठ्याने बोंबलायला लागली.मी शांतपणे नानाकडे पाहत होतो.मलाही एक त्याची मुस्काडीत बसणार होतीच.पण मनातून मी खूप आनंदी झालो होतो.नानाचा चेहरा लालबंद झाला होता.डोळे मोठे झाले होते,आणि नाना आता सगळ्या वर्गावर तुटून पडणार होता.मास्तरानीच नियम केलेला असल्यामुळे मास्तर नानाला अडवूच शकत नव्हते.तरीही नानाचा तो राग पाहून मास्तर दबकतच हळूच नानाला म्हणाले,"नाना जाऊ दे सोड लेकरं लहान....." मास्तरचं वाक्य पूर्ण झालंच नाही.त् नानाने अक्षरशः मास्तरला लहान मुलासारखं दोन्ही  हाताने उचलून घेतलं आणि अलगद खुर्चीवर नेऊन ठेवलं.

     आणि त्यानंतर गेल्या जवळजवळ सात वर्षाचा तो अन्याय नानाला आठवला.पोरं हात जोडून ओरडत होती.मास्तरला विनवण्या करत होती.पण त्यांचाही नाईलाज होता.आणि नानाने सुरवात केली.एक एक पोरगं कॉलरला धरून नानाने उभं केलं.आणि नानाने असं झोडपून काढायला सुरवात केली की बस्स.एका मुस्काडीत पोरगं खाली आडवं होऊन पडायचं.ते बघून बाकीचे सगळे जोरात बोंबलत होते.नाना पेटलेलाच होता.सगळा वर्ग ओला होताना दिसायला लागला.त्याच्या एका रट्याने पोरं चड्डी ओली होईस्तोवर बोंबलत होती.काही पोरं ते बघूनच मारायच्या आधीच लघवी करत होती.वर्गातला कालवा वाढतच राहिला.नानाने जितकं आजवर घेतलं होतं ते व्याजासहित परत केलं.

      सगळ्यात शेवटी नाना माझ्याजवळ आला.मला त्याची कसलीच भीती वाटत नव्हती.उलट मला मनातून खूप आनंद झाला होता.नानाने माझी कॉलर धरली.हिसका देऊन मला उभं केलं.मी उभा राहिलो.नानाकडे एकटक पाहत राहिलो.माझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद त्याने समजून घेतला.नानाने माझी कॉलर ढिली केली.मुस्काडीत मारायला उचललेला हात नानाने अगदी मायेने माझ्या गालावरून फिरवला.त्यावेळी माझ्या मोठ्या भावाची जागा नानाने घेऊन मनात घर केलं. गालावरून हात फिरवून त्याने अगदी  तसाच हात माझ्या डोक्यातून फिरवत म्हणाला,

"कळलं का?मी आजपर्यंत शाळा का बुडवली नाही ते? कारण मला माहित होतं एक  ना एक दिवस माझं उत्तर बरोबर येईल.आणि त्यादिवशी मी सगळा हिशोब चुकता करून टाकेन." 

      नानाने त्याचं दप्तर उचललं.कडी काढून त्याने दार उघडलं.आणि नाना वर्गाच्या बाहेर नव्हे नव्हे शाळेच्या बाहेर कायमचा निघून गेला.त्यानंतर नाना शाळेत कधीच दिसला नाही.


*तात्पर्य :- प्रत्येकाचा एक ना  एक दिवस येत असतो*


*-ˋˏ ༻•••••❁•••••༺ ˎˊ-*

_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*


*धन्यवाद ☞*


Monday, September 23, 2024

श्लोक

 मनातल्या मनात म्हणायचे मनाचे श्लोक


जगी सर्वसुखी असा तोच आहे|

नशिबी जयाच्या  गाढ झोप आहे||


ज्यांच्यावर ईश्वराची कृपादृष्टी होते|

त्यांचेच पोट सकाळी साफ होते||


पहिला चहा रोज मिळावा आयता|

अनंता तुला मागणे हेची आता||


आज कुठली भाजी व आमटी करावी|

रोज रोज मला ह्याची काळजी नसावी||


वाटेल तेव्हा वाटेल ते मी खावे|

तरी वजन माझे किंचितही न वाढावे||


मनावाटे तेव्हा शॉपिंग मी करावी|

कुठलीही ऑफर कधी न सोडावी||


सदा सर्वदा मन प्रसन्न रहावे|

कितीही राग आला तरी न चिडावे||


नको रे मना काळजी ती कशाची|

मला दे कला आनंदी राहण्याची||

😝😝😀😀🤣🤣😂😂😆😆

प्राण

 *रामनामाचा महिमा सदैव वृद्धिंगतच होत असतो.*


श्रीराम जयराम जय जय राम 


“राम” नाम वेदांच्या प्राणासमान आहे. सकल शास्त्रांचे आणि वर्णमालेचे देखील प्राण आहे. प्रणवाला वेदांचे प्राण मानले जाते. प्रणव म्हणजे तीन मात्रांचा ॐ कार, ज्यापासून त्रिपदा गायत्री बनली आणि त्यापासून वेदत्रय. ऋक, साम आणि यजुः – हे तीन प्रमुख वेद. अशा प्रकारे ॐ कार (प्रणव) वेदांचे प्राण आहे. “राम” नामाला वेदांचे प्राण मानले जाते, कारण राम नामाने प्रणव बनतो. जसे ‘प्रणव’ मधून “र” काढले तर केवळ ‘पणव’ होईल अर्थात त्याचा ढोल होईल. तसेच “ॐ”कारातून ‘म’ काढले तर ॐकार शोकवाचक होईल. प्रणवात ‘र’ आणि ॐ कारात ‘म’ म्हणणे आवश्यक आहे. म्हणून राम नाम वेदांचे देखील प्राण आहे.


नाम आणि रूप दोन्ही ईश्वराची उपाधि आहे. भगवंताचे नाम आणि रूप दोन्ही अनिर्वचनीय आहे, अनादि आहे. सुन्दर, शुद्ध, भक्तियुक्त बुद्धिनेच त्याचे दिव्य अविनाशी स्वरुप जाणले जाऊ शकते.


राम नाम लोकी आणि परलोकी निर्वाह करणारे असते. लोकी तो सुखकारक चिंतामणि आणि परलोकी भगवतदर्शन कारविणारा आहे. वृक्षातली शक्ति बीजापासून येते तसेच अग्नि, सूर्य आणि चन्द्रमा मध्ये जी शक्ति आहे ती राम नामातून येते.


या विश्वामध्ये सूर्य पोषणकर्ता आहेत आणि चन्द्र अमृतवर्षाकर्ता. ‘राम नाम’ विमल आहे. सूर्य-चंद्राला राहु–केतुचे ग्रहण लागते, पण रामनामाला कुणाचे कधीच ग्रहण लागत नाही. चंद्राचा आकार क्षय किंवा वृंधिगत होतो, परंतु रामनामाचा महिमा सदैव वृद्धिंगतच होत असतो. ते सदा शुद्ध आहे आणि निर्मल चन्द्र आणि तेजस्वी सूर्यासमान आहे.


श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम 

श्रीराम जयराम जय जय राम

Sunday, September 22, 2024

शहाणे

पेडगावचे शहाणे

बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ? दुसरे कुठलले गांव का नाही ?
      
६ जून १६७४ ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्या साठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-        

अहमदनगर जिल्ह्यात 'पेडगाव' नांवाचं एक गांव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नांवाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २०००चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे). 
कोणास ठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली, तेव्हा तो माजोर्डा चेष्टेने हसत  म्हणाला, "सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किले के दरवाजे खोल दो. अंदर आते ही खदेड देंगे, काट देंगे."
तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादुरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले. धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर, आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तो लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षित पणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली, खूप जवळ आली तशी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादुरखान स्वतः त्यांच्या समाचारास मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली. कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले. संपूर्ण २०००ची फौज वाचली..

खानाच्या फौजेत  एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावलं हे काही छोटं काम नाहीच. शिवबांची फौज हरली, पळ काढला ! ही जीत औरंगजेबास कळाल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादुगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, "अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है ?"  "कोई नही जहांपन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढाई करनी है ". आता किल्लेदार, सेनापती आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज आला.  आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं आणि ज्याची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला आणि "हुज़ूर ! गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २०००  मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके  सब लूट लेके चले गए हुजूर !        
                   
अशा प्रकारे  राज्याभिषेकाचा खर्च एक कोटी ही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात आणि हे सगळं नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही न सांडता. हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून पेडगावचे शहाणे आणि वेड पांघरून पेडगावला जाणे. हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.

छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.


बांधा

 *नेसा, बांधा, घाला*

•••--••--••--••--•••

🤔••--••🤔••--••🤔

---------------------------


••• वेगवेगळे  कपडे परिधान करण्यासाठी मराठीत वेगवेगळी क्रियापदं आहेत. हीच आपल्या मायमराठीची खरी भाषिक श्रीमंती आहे. 


••• पण त्यामुळे नवख्या माणसाची निश्चितच थोडी अडचण होऊ शकते.


••• कोणत्या कपड्याला कोणतं क्रियापद हे लक्षात राहत नाही आणि मग त्यातूनच *साडी घालणे* वगैरेसारखे चुकीचे शब्दप्रयोग गोंधळ निर्माण करतात.


••• एक युक्ती सांगतो, ती लक्षात ठेवा म्हणजे हे असे गोंधळ टळतील. कोणती ती युक्ती पाहू.


••• एक लक्षात ठेवा. शिवलेलाच कपडा *घालायचा.* म्हणून लेंगा, सदरा, टोपी, पगडी, पायजमा, पॅंट या सगळ्या गोष्टी *घालायच्या.* 


••• पण बिनशिवलेला कपडा चुकूनसुद्धा घालायचा नाही. म्हणून साडी, धोतर वगैरे घालणं शक्य नाही. असा बिनशिवलेला कपडा जर कमरेखाली परिधान करणार असू तर तो *नेसायचा.* म्हणून धोतर, सोवळं, साडी, लुंगी *नेसा*.


••• हाच जर बिनशिवलेला कपडा कमरेच्या वरील भागात परिधान करणार असू तर तो *घ्यायचा*. म्हणून ओढणी, उपरणं *घ्या.* अगदी पदरसुद्धा *घ्या.*


••• आता जर अशा बिनशिवलेल्या कपड्याने सगळं अंग झाकणार असू तर तो *पांघरायचा.* म्हणून शेला, शाल *पांघरा.*


••• तोच बिनशिवलेला कपडा जर डोक्यावर परिधान करणार असू तर तो *बांधायचा.* म्हणून मुंडासं, पागोटं, फेटा *बांधा.*


••• आता याखेरीज काही अगदी वेगळी क्रियापदं काही मोजक्याच ठिकाणी वापरतात. तीदेखील पाहू.


••• मफलर *गुंडाळतात.* कधीकधी घाईघाईत साडीदेखील *गुंडाळतात,*  निऱ्या *काढतात* आणि *खोचतात.* कामाला सुरुवात करण्यापूर्वी पदर *खोचतात.* नऊवारी साडीचा किंवा धोतराचा काष्टा *मारतात.* असो.


••• पूजा करताना पिवळे, लाल रंगाचे कपडे *परिधान* केल्याने मन स्थिर राहते. 


••• हा लेख संपला आणि त्याबरोबरच अनेकांच्या मनातला गोंधळ देखील ..! आता बिनधास्त शर्ट *घाला,* धोतर *नेसा* आणि कुठं बाहेर जायचं ते जा !!


"""""""""""""🤔"""""""""""""

Saturday, September 21, 2024

खाणे

 एकदा पु.श्री.बेलसरे म्हणाले  आई मुलांच्या आवडीचे करते. तसं आपलं होत नाही. कधी कधी वाटते स्वयंपाक चांगला करता आला असता तर गोंदवले येथे जाऊन स्वयंपाक करून श्रीमहाराजांना नैवेद्य दाखविला असता. खायला घालण्यात प्रेम आहे. श्री.गोंदवलेकर महाराजांना कर्नाटकात गेले असता एक म्हैसूरचा विद्वान सद्गृहस्थ भेटायला आला होता. तो म्हणाला आपण लोकांना फुकट खायला का घालता ? नंतर थोड्यावेळाने तो म्हणाला संध्याकाळी आमच्या घरी चहाला या. चहाबरोबर खाणे होतेच. खायला घालणे हे प्रेमाचे लक्षण आहे. श्री.बेलसरे म्हणाले "मानससपूजेत श्रींना जेवायला वाढतो पण प्रेम येत नाही."  श्री.समर्थ रामदासांनी जुन्या दासबोधात रायते कोशिंबिरी यांचे अनेक प्रकार सांगितले आहेत. ज्यांच्याकरता करायच त्याने थोडे तरी खावे असं वाटतं व त्यांने खाल्ले की तृप्ती होते. आपलं जगात खरं कोण आहे ? श्री.सद्गुरुंच्या आठवणीत रस आहे. गोपींच श्रीकृष्णांवर प्रेम होते. खरं तर त्या अडाणी बाया. पण आपल्या प्रेमाच्या जोरावर प्रत्येक गोपीने हृदयात असलेल्या कृष्णाला बाहेर काढून नाचविले. श्री.नारदांना सुद्धा भक्तीसूत्रांत "यथा ब्रजगोपिकानाम |" असं सूत्र लिहीण भाग पडले. अखंड चिंतन! चिंतन हिच सख्यभक्ती. श्री.तुकारामबुवा प्रेमाने म्हणतात "देवाहाती रूप धरवू आकार | 

होऊ निराकार नेदी त्यासी. ||

Friday, September 20, 2024

_कल्पवृक्षाखाली_

 *✍🏻 आई आणि बाबा म्हातारे होतात 😰🙏‼️*                                              *•═══════════════•*


*_आम्ही कांय तुम्हांला_* 

*_जन्मभर पूरणार_* 

*_आहोत कां❓_*

  

*_असं आई सहज_* 

*_म्हणून गेली.._*


*_ऐकून हे माझ्या काळजांत_*

*_आरपार एक कळ निघून_* 

*_गेली.._*


*_त्रिवार सत्य होतं. पण,_* 

*_पटतच नव्हतं मनांला.._*


*_कधीच विसरणार नाहीत_* 

*_आपण त्यांच्या सोबतच्या_* 

*_क्षणांला.._*


*_आई बोलून गेली. पण,_*

*_वडील पाहून हसत होते.._*


*_खरं सांगू कां,_* 

*_तेव्हा ते दोघंही मला_*

*_विठ्ठल रुक्मिणीच_*

*_वाटत होते.._*


*_लेकरांच्या सुखांतच_* 

*_त्यांचं सुख असतं_* 

*_दडलेलं.._*


*_आपण सुंदर_* 

*_शिल्प असतो,_* 

*_त्यांच्याच हातून_* 

*_घडलेलं.._*


*_मी म्हणालो, आईला_*

*_तू कीती सहज बोलून_* 

*_गेलीस.._*


*_तुमच्या शिवाय_* 

*_जगण्याची_* 

*_तू कल्पनाच_*

*_कशी केलीस.._*


*_जग दाखवलं_*

*_तुम्ही आम्हांला_* 

*_किती छान_*

*_बनवलंत.._*


*_अनेकदा ठेच_* 

*_लागण्यांपासून_*

*_तुम्हीच तर_*

*_सावरलंत.._*


*_तुमच्या चेहऱ्यावर_*

*_हसू पाहण्यासाठी_*

*_आम्ही कांहीही करू.._*


*_तुमच्या स्वप्नांतील_*

*_चित्रांत आम्ही_* 

*_यशाचेच रंग भरु.._*


*_आई वडील म्हणजेच_* 

*_घरांतील चालते बोलते_*

*_देव आहेत.._*


*_हे देव नैवेद्यापेक्षा फक्त_* 

*_प्रेम व आधाराचेच_*

*_भुकेले आहेत.._*


*_कल्पवृक्षाखाली_* 

*_बसलो होतो, फळं फुलं_* 

*_माझ्यावरच पडत होती.._*


*_आई वडील_* 

*_अनमोल आहेत,_* 

*_असं प्रत्येक पाकळी_* 

*_सांगत होती.._*


*_थकलीय आज_* 

*_आई प्रत्येकाची,_*

*_वडीलही थकले_*

*_आहेत.._*


*_घरट्यातल्या पिल्लानं_* 

*_उडू नये, फक्त एवढ्यांच_* 

*_त्यांच्या अपेक्षा आहेत.._*


*_माझ्या या विचारानं_*

*_आई खूप खूप_*

*_सुखावली होती.._*


*_वडीलांची नजर_* 

*_न बोलताही_*

*_सारं कांही सांगून_* 

*_जात होती.._*


*_कालाय तस्मै नम:_* 

*_वर्षे अशीच सरतात,_* 

*_आमचे संसार_* 

*_फुलू लागतात.._*


*_आणि बघता बघता,_*

*_आमचे आई बाप_* 

*_म्हातारे होतात.._*


*_हौसमजा, जेवण खाण,_*

*_त्याचं आतां कमी होत_* 

*_चाललंय.._*


*_पण, फोनवर सांगतात,_* 

*_आमचं अगदी उत्तम_* 

*_चाललंय.._*


*_अंगाला सैल होणारे कपडे,_*

*_गुपचूप घट्ट करून घेतात.._*


*_वर्षे अशीच सरतात,_* 

*_बघतां बघतां,_* 

*_आमचे आई बाप_* 

*_म्हातारे होतात.._*


*_कोणी समवयस्क_*

*_“गेल्या ”च्या बातमीनं_* 

*_हताश होतात.._*


*_स्वत:च्या पथ्य पाण्यांत,_*

*_आणखीन थोडी_* 

*_वाढ करतात.._*


*_आमच्या ‘खाण्यापिण्याच्या’_*

*_सवयींवर नाराज होतात.._*


*_वर्षे अशीच सरतात,_*

*_बघतां बघतां,_* 

*_आमचे आई बाप_*

*_म्हातारे होतात.._*


*_आधार कार्ड, पॅन कार्ड_* 

*/जीवापाड सांभाळतात.._*


*_इन्कम टॅक्सच्या भीतीनं_*

*_कावरे बावरे होतात.._*


*_मॅच्युर झालेली एफ.डी._*

*_नातवासाठी रिन्यू करतात.._*


*_वर्षे अशीच सरतात,_* 

*_बघतां बघतां,_* 

*_आमचे आई बाप_*

*_म्हातारे होतात.._*


*_पाठदुखी, कंबरदुखी_*

*_इत्यादीच्या तक्रारी_* 

*_एकमेकांकडे करतात.._*

 

*_ॲलोपॅथीच्या_*

*_साइड इफेक्टची_* 

*_वर्णनं करतात.._*


*_आयुर्वेदावरचे_*

*_लेख वाचतात.._*


*_होमिओपॅथीच्या_* 

*_गोळ्या खातात.._*

 

*_वर्षे अशीच सरतात,_* 

*_बघतां बघतां,_*

*_आमचे आई बाप_*

*_म्हातारे होतात.._*


*_कालनिर्णयची_* 

*_पानं उलटत,_* 

*_येणाऱ्या सणांची_*

*_वाट बघतात.._*


*_एरवी न होणाऱ्या_* 

*_पारंपारीक पदार्थांची_* 

*_जय्यत तयारी करतात.._*

 

*_आवडीनं जेवणाऱ्या_* 

*_नातवांकडं भरल्या_*

*_डोळ्यानं पाहतात.._*


*_वर्षे अशीच सरतात,_*

*_बघतां बघतां,_*

*_आमचे आई बाप_* 

*_म्हातारे होतात.._*


*_माहित आहे,_* 

*_हे सगळं, आता_*

*_लवकरच संपणार.._*


*_जाणून आहोत,_* 

*_हे दोघंही आता_*

*_एका पाठोपाठ_* 

*_जाणार.._*


*_कधीतरी तो_* 

*_अटळ प्रसंग_*

*_येणार.._*


*_कांळ असाच_*

*_पळत राहणार.._*


*_वर्षे अशीच_* 

*_सरत राहणार.._*


*_बघता बघतां_*

*_आम्ही देखील_*

*_असंच.._* 

 

*_आमच्या मुलांचे_*

*_म्हातारे आई बाप_*

*_होणार.._* 


*_असंच.._*

 

*_आमच्या मुलांचे_*

*_म्हातारे आई बाप_*

*_होणार..‼️_* 


                  

*✥●⊱✧⊰•☬ॐ☬•⊱✧⊰●✥*

   

🍃🍂🌷🙏🌷🍂🍃

  *❀꧁꧂🥳꧁꧂❀*

             *╔ ╦ ╦ ╗* 

             *┇ ┇ ┇ ┇*

             *┇ ┇ ┇ ┇*

             *┇ ┇ ┇ 🧡*

             *┇ ┇🤍*

             *┇ 💚*

             *❤️*

नाव

 *आपल्या आई वडिलांनी ठेवलेल्या या देहाच्या नामा बद्दल आपल्याला किती आत्मीयता वाटते, आपल्याइतकंच नश्वर असलेलं आणि मला दुसऱ्या कुणी तरी ठेवलेलं हे “नाव” त्याचा* *जप न करताही मला किती आपलंसं वाटतं! ते टिकावं म्हणूनच आपण   किती धडपड* *करतो. हे “नाम” टिकावं म्हणजे माझा नावलौकिक टिकावा, अशीच माझी सुप्त इच्छा असते. परमात्म्याच्या दिव्य नावाऐवजी* *आपण स्वत:च्या क्षुद्र अशा नावलौकिकातच अडकतो . ज्याने* *आपल्याला या भूतलावर पाठवले त्याचे नाव घेणे आपण का विसरतो? ते का पळायला परकं वाटतं? आपल्या स्वतः च्या* *नावाचा जय घोष सगळ्यांनी करावा, आपल्या नावाला* *काळिमा लागू नये म्हणून आयुष्य भर धडपडत असतो पण* *भगवंताची स्तुती करून त्याला आनंद होईल म्हणून आपण नाम का घेत नाही? सगळ्या संतांनी* *आपल्या* *अभंगांमध्ये म्हटलं आहे की, हात जर त्या भगवंताच्या सेवेत आणि पूजेत रत नसतील तर ते* *व्यर्थ आहेत. पाय जर त्या* *सद्गुरूस्थानी जात नसतील, तर ते व्यर्थ आहेत. डोळे जर त्याच्या दर्शनासाठी आतुर नसतील तर त्यांच्यात आणि काचगोळ्यात काहीच फरक नाही. कान जर* *त्यांचा बोध ऐकायला उत्सुक नसतील तर ते निव्वळ छिद्रवत आहेत. मुख जर त्यांचं नाम घेत नसेल तर ते असूनही काही* *उपयोग नाही. तेव्हा सत्संगात असूनही जर परम तत्त्वांची गोडी नसेल, तर तो माणूस नव्हेच, तो तर एखाद्या श्वापदासारखाच* *आहे. थोडक्यात नाम उच्चारीत नाहीं, त्यामुळे आपले जीवन व्यर्थ आहे, आयुष्य फुकट चालले आहे असे वाटायला पाहिजे.*

Thursday, September 19, 2024

पाप

 एकदा पु.श्री.ब्रह्मानंद महाराजांचे पुतणे श्री.भीमराव गाडगुळी, श्री.बेलसरे व अंतरकर असे बसले होते. श्री भीमरावांनी श्री.बेलसरे यांना विचारले की श्री.महाराजांनी काकांवर (ब्रह्मानंद महाराजांवर ) कृपा केली , आमच्यावर का नाही . त्यावर बेलसरे म्हणाले आपण हा प्रश्न श्री. महाराजांना (गोंदवलेकर) विचारू. श्री.महाराजांनी उत्तर दिले  "पश्चाताप  झाल्याशिवाय परमार्थ नाही आणि कृपा नाही." पुढे तीन गोष्टी सांगितल्या १) भगवंताला विसरण हा पहिला ताप २) हातून अनिती घडण ३) विकाराच्या आधीन होणं. १) भगवंताला विसरण याचा अर्थ दुसऱ्या कशाची तरी आठवण ठेवली म्हणून विसरलो. जे माझं नाही ते माझं धरून चाललो. माझं आहे असं धरून जगतो.हे भगवंताच्या बाबतीतले पाप. देहाला मी माझा म्हटला हे पाप. हे समजणे कळणे हे सत्पुरुषांना अभिप्रेत आहे. हे पाप नाहीसे करायला आणि भगवंताला आपलं म्हणायला स्मरण हाच उपाय आहे. भगवंताला विसरणे हे व्यवहारात विसरण्यासारखे नाही. व्यवहारात विसरणे कसे तर आधी अनुभव आणि मग त्याचे विस्मरण, आणि मग लक्षात येणं. पण येथे परमात्मस्वरूप माझे स्वरूप असल्याने त्याचे विसमरण कसं तर ते स्वरूप झाकलं गेलंय. विकाराच्या आधीन होणं म्हणजे आपण विकार भोगतो ते देहाच्या द्वारा त्यातून सुख मिळेल या भावनेने.अहंकाराच पोषण, पैसा यांत सुख आहे ही भावना म्हणून आपण म्हणतो " मला हे आवडत मला हे आवडत नाही".हे वाटणं अहंकाराचे पोषण करत. त्याचेच दुसरं स्वरूप म्हणजे दुसऱ्याचे दोष पाहणं टाकून बोलणं. श्री ब्रह्मानंद महाराजांवर कृपा केली म्हणजे ईश्वराची कृपा व्हायला जी मनाची स्थिती लागते ती आपल्याजवळ नाही. ही लागणारी  मन:स्थिती आतली आहे. " कृपेच्या आड पाप येतं. करायला नको ते केलं, मनाची अशी स्थिती झाली पाहिजे की मला या  पापाचा स्पर्श नाही, की कृपा अवतरेलच." अस श्रीमहाराज म्हणाले. हे कधी होईल तर असे जनोजन्मी भगवंताच्या स्मरणांत राहून वागलं तर माणसाला पापांचा स्पर्श नाही अशी अवस्था येईल.

Wednesday, September 18, 2024

रत्न

 *या पृथ्वीवर खऱ्या अर्थाने तीनच रत्न आहेत असं म्हणतात, ते रत्न जल, अन्न आणि प्राणवायु.* *सुभाषिते हे एक चौथे मौलिक रत्न मनुष्याने आपल्या दृष्टीने मान्य केले आहे. विचार मनुष्यावर संस्कार करतात, त्यांना* *घडवितात. सुभाषितांचा मनुष्य जीवनावर चांगला परिणाम होतो, चांगले संस्कार होतात म्हणून ते चौथे रत्न! तप किंवा तपश्चर्या शारिरीक, मानसिक आणि बौद्धीक अशी एकत्रीत केल्याने आपले हेतु लवकर साध्य होतात. जीवनात लवकर यश येते. आत्मज्ञान आणि परब्रह्मज्ञान याच जन्मात मिळवता येते. आपण हे ज्ञान आत्मसात करण्यात कुठे कमी तर पडत नाही ना? याचे सतत मनन, चिंतन करायला हवे. भक्ती , पूजा पाठ, नामभक्ती यापैकी आपली जी बाजू* *कमकुवत असेल तिच्यावर लक्ष केंद्रीत करून प्राधान्याने ती मजबूत करण्याचा प्रयत्न* *करायला* *हवा. आपण शारिरीक श्रम करण्यात, मानसिक श्रम* *करण्यात आणि बौद्धीक श्रम* *करण्यात कुठेच कमी पडू नये असा मनाशी संकल्प करून पुढे परमार्थाची  वाटचाल करायला हवी. 'थांबला तो संपला' याचा मतितार्थ लक्षात घेऊन कार्य करावे.*


*आत्मज्ञानी मनुष्यास भय किंवा चिंता मूळीच नसते. तो स्वत:च्या मृत्यूबद्दल देखील निश्चिंत असतो. ते त्याला झालेल्या ब्रह्मज्ञानाचे एक प्रधान लक्षण असते. जिवंतपणीच देहाचे महत्त्व पूर्णपणे नाहीसे झाल्याने तो देह सोडल्यावर त्याचे पुढे काय होते तिकडे तो लक्ष देत नाही, त्याची चिंता करीत नाही.*

Tuesday, September 17, 2024

सहवास

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*




*संतांचा  सहवास ।  याहून  भाग्य  नाही  दुसरे  खास ॥*


बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधि । त्यांसी त्रासू नये कधी । हीच जाणावी उघड समाधि ॥

सावली मातीत पडली । तिला धु‍ऊन नाही घेतली ।

तसेच खरे आहे देहाचे । पण ते संतांनाच साधे ॥

सर्व संकल्प वर्ज्य करून । अवस्था असावी बालकवृत्तिसमान ॥

सतत विवेक अखंड चित्ती । रामनामी मनोवृत्ति । हेचि तुम्ही परमप्राप्ति ॥

मारुनी खोटी कल्पनावृत्ति । रामनाम अखंड चित्ती । समाधान संतोष शांति ॥

देवासी सर्व करी अर्पण । करी स्वानंदयुक्त परमात्मचिंतन । हीच साधूची खूण ॥

वासना जाळून शुद्ध चित्त । अहंभाव सोडून होई निभ्रांत ।

आता मी रामाचा, राम माझा । हे जाणावे पूर्ण ॥


संतसहवास त्याला पाही । जो देहबुद्धि टाकून राही ॥

संतास न पाहावे देहात । आपण देहापरते होऊन पाहावे त्यास ॥

नामात ठेवा प्रेम । हीच संतांची खूण ॥

जे जे आपले संगती आले । संताने त्यांचे सार्थकच केले ॥

साधूने देह ठेवला । तरी सत्तेने जागृत राहिला ॥

त्याची ठेवावी आठवण । सेवा करावी रात्रंदिन ॥

संतांचा सहवास । याहून भाग्य नाही दुसरे खास ॥

संतचरणी विश्वास । त्याने भगवंत जोडला खास ॥

लक्ष ठेवावे संताकडे । देह लावावा प्रपंचाकडे ॥

नाम घ्यावे श्वासोच्छ्वास । संत संतुष्ट होईल खास ॥

सांगावे संतास नमस्कार । जो जगताचा आधार ॥

संताच्या देहाची प्रारब्धगति संपली । काया आज दिसेनाशी झाली । परि अजरामर राहिली ॥

राम कर्ता हे जाणून चित्तीं । जगांत संत ऐसे वर्तती । जेणे दुसर्‍यास मार्गदर्शक होती ॥

संतांचे करावे अनुकरण । घ्यावे त्यांचे दर्शन ।

सांगावे आलो आहे आपण । विचाराव्या कठिण वाटा । जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता ॥

रामापरता नाही लाभ । हे धरले ज्याने चित्ती । त्यास लाभली खरी संतांची संगती ॥

त्यांचा आदर्श ठेवावा पुढे । कधी न होईल वाकडे ॥

स्वतःचे पावावे समाधान । त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्‍न करावा जाण ॥

संताशी व्हावे अनन्य शरण । दुसरीकडे जाण्याचे नाही कारण ॥

भाग्याने संत घरी आला । अभागी न मानी त्याला ॥

सूर्याचा प्रकाश झाला । आंधळ्याला उपयोगी नाही आला ॥

तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती । संताची संगत त्याला न लाभती ॥

रामनामावाचून ज्याचा वेळ जात नाही । तोच जीवन्मुक्त पाही ॥

देहाचे ठिकाणी विरक्त । विषयाचे ठिकाणी नसे अहंममत्व । त्यालाच म्हणतात मुक्त ॥


*१११ .   रामापरते  न  मानावे  हित ।  हे  सर्व  संतांचे  मनोगत ॥*

Monday, September 16, 2024

माहेर

 *माहेर...एकदा रहायला येना...*

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°


बाबांचा नेहमीप्रमाणे फोन आला, राखी पौर्णिमेला येतेस ना?

मी...बघू कसं ऍडजेस्ट होते ते.   

*ये ग थोडा वेळ काढून...* 


मग मी यांना विचारते.विचारले आणि राखी पौर्णिमेला गेले. आई-बाबांना,दादा-वहिनीला खूप बरे वाटले.

बेटा राहतेस का एखादा दिवस...?बाबा म्हणाले.

*नाही हो जमणार बाबा,यांच्या आणि मुलांच्या खाण्याचे हाल होतात.मुलं थोडी स्वावलंबी झाली की नक्की येईन राहायला.*  

आणि मी निघाले,*आई-बाबांचे आसुसलेले डोळे माझा पाठलाग करत माझ्यासोबत आले,पण माझी ओढ मुलांकडे आणि यांच्या कडे होती.*                                                   

         

या वेळी येतेस का रहायला?

बघते कसे अड्जस्ट होते ते... 


यात असे बरेच उगवते,मावळते दिवस निघून गेले.मुले मोठी झाली.मधल्या काळात बाबांकडे जाऊन भेटून येत होते.*पण राहणे कधी जमलेच नाही.*


परत येताना एकदा रहायला येण्याचा निश्चय...प्रत्येक वेळी माझा मात्र वेगळाच गुंता ठरलेला होता.

 

प्रत्येक गोष्ट त्यांना वेळेत सगळं लागतं,त्यांच्या मिटिंग्स आणि त्यांचं ऑफिस,मुलांना कॉलेजवर वेळेवर जायचं असतं,त्यांचे क्लास,लायब्ररी, जिम सगळं ठरलेलं रुटीन असतं.मुलं घरी आली की मी त्यांना घरीच लागते.नाहीतर घरात खूप गोंधळ उडतो.सगळं कसं वेळच्यावेळी व्हायला हवं.


*त्यामुळे रहायला जमणार नाही.*


मुलांचे शिक्षण होऊन एकदा का ते नोकरीला लागले की माझी जबाबदारी संपली,मग मी निवांत राहायला मोकळीच आहे.


आता कॉलेज संपवून मुलगा नोकरीला लागला,मुलीचे लग्न झालं.


अहो बाबा...

*आता ना याचे दोनाचे चार झाले की मी मोकळी झालीच बघा...!* 


तसे तर खूप काही बोलायचे आहे तुमच्या जवळ,निवांत बसायचे आहे,आईच्या मांडीवर डोकं ठेवून खूप गप्पा मारायच्या आहेत.खूप लाड करून घ्यायचे आहेत तुमच्याकडून.


अरे,तू ये तरी एकदा...

येते बाबा...


छान स्थळ सांगून आले,मुलाचे लग्न थाटामाटात पार पडले. आता मी हुश्...मोकळा श्वास घेतला. 

आता नवीन सुनबाईला घरात रूळवण्याची नवीन कसरत सुरू झाली.सगळे सणवार, घरातील रितरीवाज,*बऱ्याच गोष्टी माझ्या पद्धतीने साच्यात बसवण्याचे, कधी यशस्वी कधी अयशस्वी प्रयत्न करण्यात मी गुंतून गेले.* 


अहो बाबा...

आता ही नवीन पोर,घरात कोण आलं कोण गेलं,सण वार,तिला काय माहिती? तिला काय समजणार ?  


*इतक्यात नाही जमणार यायला....*

 

अगं.....*एकदा येऊन जा, कित्येक वर्ष हे घर तुझ्या राहण्याची वाट पाहत आहे बेटा...* 


बाबा माझ्यावर आता खूप जबाबदारी आहे....अहो,सुनेला एकटीला सोडून नाही ना येता येत.


बघू वेळ काढून मी नक्की येईन. 


*डोळे आणि मन थकले ग आता?*

 

होय बाबा...

 

उगवता, मावळता कधी थांबणारच नव्हता. तो युगानू युगाचा त्याचा प्रवास थोडाच थांबवणार  होता.?


आता सुनबाईला दिवस गेले.मी हरकून गेले.घरात नवीन पाहुणा येणार.तिची प्रकृती नाजूक, काळजी घ्यायला हवी.काय हवं ?काय नको ?डोहाळे पुरवायला हवे.


*मला माझ्या वेळी कळल्या नाहीत,त्या सगळ्या गोष्टी, सगळी हौस आता सुनबाईच्या रूपात पुरवून घेण्यात मी गर्क झाले.* तिचा प्रत्येक महिना, तपासणीसाठी दवाखाना, आवडेल ते खाणे,पिणे, वेळच्यावेळी औषधे आणि बरंच काही....


एक दिवस एक सुंदर बाळ आमच्या घरट्यात आले.त्याने मला आजी केले.मी विरघळून गेले...

आजी पणाच्या नात्यात त्याचे हसणे,रडणे,झोपणे,खेळणे.... 

*आता मी माझी राहिलेच नाही, मी आता फक्त आजीच होते.*

बाबा...आहो सगळा दिवस ह्याच्या बरोबरच जातो बघा. काही सुचत नाही.ना खाने ना इतर काही.माझ्या स्वतःसाठी सुद्धा आता माझ्याकडे वेळ राहिला नाही,बघा,...

हा बघा मस्ती करतोय बाळ.

यांना सोडून कुठे जाता येत नाही बघा आता...


*अगं,आम्ही काय आता पिकलं पान,कधीही बोलावणं येईल वरुन.ये ग,ये...*

*एक आर्त हाक.....* 


अहो,बाबा असं काय बोलताय? वाईट वाटते मला.


अहो हिला बाळाचं अजून काही नीट जमत नाही. उगीच काही वेड वाकड व्हायला नको.*रोजचं रुटीन बदललं की आजारी बिजारी पडायच बाळ.*

 

मला काय एवढ्यात यायला जमणार नाही.पण नक्की सवड काढून येईनच,पण आता मात्र वेळच नाही.मी तरी काय करणार ?

                                                  *आणि...... एक दिवस दादाचा फोन आला बाबा गेल्याचा.*


मी आहे तशीच उठून गेले.*बाबा मात्र कायमचे शांत झाले...*


आई निस्तेज,खूप घोकलं ग,खूप आठवण काढायचे तुझी.... म्हणायचे,तिला तिच्या खूप जबाबदा-या आहेत,पण आपला जीव तुटतो तिच्या भेटीसाठी....

तिच्या सोबत थोडा वेळ घालवावा वाटतो असे म्हणायचे.मी त्यांच्या शांत चेहऱ्याकडे पाहून अपराधी मुद्रेने म्हणाले,

*बाबा... मी आले,त्यांना न जाणवणारा स्पर्श करून हंबरडा फोडला.* 


एकदा म्हणा ना...ये ग...


मी आले "बाबा"....

मी आले राहायला...

बोला बाबा...बोला...


कृपया....वेळ आहे तोपर्यंत आपल्या माणसांना भेटून घ्या. वेळ गेल्यावर पश्चाताप करून वेळ परत येणार नाही.*हा आपल्याच विश्वात गुंतण्याचा पसारा आवरा,किती गुंतायचे ठरवा....*

कारण वेळ सांगून येत नाही, विचारून येत नाही,तर ती आणावी लागते.वेळीच सावध होऊन आपलेपणाच्या प्रेमाचा अनुभव घ्या.तसे तर कुणाचेच कोणा वाचून अडत नाही.हे सत्य स्विकारा.


*आवड सगळ्यांनाच असते किंवा नसते पण सवड मात्र काढावीच लागते हे निश्चित...*


⭐⭐⭐⭐⭐⭐

Sunday, September 15, 2024

परमात्मा

 कान्हनगडचे स्वामी रामदास (दुसरे) म्हणाले नाम हाच परमात्मा आहे. नाम हाच परमात्मा असल्याने  नामस्मरणा मुळे  पुढे असे होते साधक त्या परमात्म स्वरूपाला आणि गुरुंच्या शब्दाला किंवा नामाला आलिंगन द्यायला जातो. नाम हा परमात्मस्वरूपाचा हुंकार आहे. मनुष्य आहे केव्हा तर त्याला मीपणाची जाणीव होते तेव्हा. तो जो परमात्मा किंवा परब्रह्म म्हणून जे आहे ना त्याला मी पणाची जाणीव नाही. तो नुसता आहे. त्याला कोरे अस्तित्व आहे. पण तो जेव्हा सक्रिय होतो तेव्हा हे विश्व निर्माण करण्याचा संकल्प करतो तेव्हा त्याला ' अहं ब्रह्मास्मी ' ही जाणीव होते. हा जो हुंकार आहे ते नाम आहे. म्हणून पू.श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले " नामापरते तत्व नाही रे अन्यथा | वाया आणिक पंथा जाशी झणी || 

उगाच भलत्याच पंथाला जाशील त्या पेक्षा नाम घे. श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले " नाम हा माझा प्राण आहे." म्हणून श्री.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की की नामस्मरणाने तुमची ज्ञानेंद्रिये   त्या परमात्मस्वरूपाला आलिंगन द्यायला जातील पण तुमची कर्मेंद्रिये सुध्दा त्याला आलिंगन द्यायला जातील. नाम हेच परमात्म्याचे रूपच आहे. म्हणून परमात्म्याचा मार्ग हा त्याचा स्मरणाचा आहे आणि ते स्मरण नामानेच होते.

Saturday, September 14, 2024

हास्य

 🪴🏵️🦚🌻💠🌹☘️🍁♻️🌺🪴


             *😀 आपण का हसतो ? 😀*


*🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,*


हास्य ही एक निर्मळ आणि सार्वत्रिक भावना आहे. माणसामाणसांमधील संवादाचं ते एक महत्त्वाचं साधन आहे. अशा प्रकारच्या संवादासाठी लागणारी भाषा आपल्याला शिकावी लागते. मग ती मराठीसारखी मातृभाषा असो की इंग्रजीसारखी परकी भाषा असो. हास्य मात्र शिकावं लागत नाही. ते उपजतच प्रत्येकाच्या ठायी असतं. मूल साधारण साडेतीन-चार महिन्यांचं झालं की ते हसू लागतं. आपल्या आईबरोबर आणि इतर आप्तांबरोबर नातं प्रस्थापित करण्याचं शिशूचं ते एक साधन असतं. त्यामुळेच हास्य हे नेहमी उत्स्फूर्त असतं. म्हणजे तसं आपण ठरवून हसू शकतो पण ते हास्य निर्मळ नसतं किंवा इतरांशी नातं जोडणारं नसतं. अशा कृत्रिम हास्यापोटी नकारात्मक प्रतिसादच उत्पन्न होतो. उत्स्फूर्त हास्यापोटी सकारात्मक प्रतिसादच मिळतो.


व्यक्ती-व्यक्तीतील सामाजिक दृढ व्हायला त्यामुळे मदत मिळते. हास्यातून आपण इतरांना एक सकारात्मक संदेश पाठवत असतो. त्यामुळेच माणूस एकटाच असताना सहसा हसताना आढळत नाही. एखादं विनोदी पुस्तक वाचत असताना किंवा एखाद्या विनोदी प्रसंगाची आठवण होऊन माणूस एकांतात हसेल. एरवी एकांतात तो जसा आपल्याशीच बोलत नाही तसाच तो आपल्याशी हसतही नाही.


हसताना आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंची बरीच हालचाल होते. ते नवा आकृतिबंध धारण करतात. त्याला आवाजाचीही साथ मिळते पण हास्याच्या प्रकारानुसार शरीराच्या इतर अवयवांच्या स्नायूंचाही त्यात सहभाग असतो आणि या साऱ्याचं नियंत्रण मेंदूमधील निरनिराळ्या भागांकडून केलं जातं. सहसा आनंदाच्या भावनेला जागृत करणाऱ्या मेंदूमधील सगळ्या प्रक्रिया हास्याच्या वेळीही होत असतात. थोडक्यात, हास्यापोटी आनंदाच्या भावनेनं मन आणि शरीर उचंबळून येतं.


विनोदापोटी आपण हसतो, असा एक समज आहे. चांगल्या विनोदापोटी हास्य उमलत असलं तरी हास्य उमलण्यासाठी विनोदाची गरज असतेच असं नाही. अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील मज्जाशास्त्रज्ञ रॉबर्ट प्रोव्हाईन यांनी यासाठी एक सर्वेक्षणच केलं. तेव्हा अरे जॉन, होतास कुठं तू, ही पहा मेरी आली किंवा तुमच्याकडे एखादा रबरबँड मिळेल काय यांसारख्या साध्यासुध्या वाक्यांपोटीही हास्य उत्पन्न झाल्याचं त्यांना दिसून आलं. म्हणजेच त्या हास्याचा उगम विनोदात नसून ती एक उत्स्फूर्तपणे उमटलेली अभिव्यक्ती होती.


त्यामुळेच आपलं हास्य हा उत्क्रांतीचा वारसा आहे की काय, अशी शंका काही मानववंशशास्त्रज्ञांना आली होती. तो आपला सांस्कृतिक उत्क्रांतीचा ठेवा आहे, असं महादेव आपटे यांचं मत आहे. पण मनुष्यप्राण्याशिवाय इतर प्राण्यांना हसता येत नाही. म्हणजे त्यांना गुदगुल्या केल्या तर त्याची प्रतिक्रिया उमटते; पण ती वेगळी असते. चिम्पांझीसारख्या मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीच्या प्रवाहातल्या सर्वात जवळच्या नातेवाईक प्राण्याला गुदगुल्या केल्यास तो धाप लागल्यासारखा प्रतिसाद देतो. इतर काही प्राण्यांच्या तोंडून अशा वेळी काही चीत्कारही उमटतात. त्याचंच रूपांतर हास्यात झालं असावं, असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे.


हास्यापोटी शरीरक्रियांमध्ये काही चांगले प्रतिसाद उमटतात आणि त्यांची आरोग्य राखण्यासाठी मदत होते. त्यामुळंच लाफ्टर क्लबसारखे काही उपक्रम चालू आहेत. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन' म्हणतात ते यापोटीच. तरीही आपण का हसतो, हे एक गूढच राहिलं आहे. त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.

*📌डाॅ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातुन,*


Friday, September 13, 2024

उणे.

 #आपुल्या वंशजाचे उणे..... 


©®दीपाली थेटे-राव


समृद्धी! अगsss

किती हे बेताल वागणं तुझं. 

कसंही... काहीही बरळतेस. 

आई आहे मी तुझी

 थोडा तरी विचार करून बोलत जा. उचलली जीभ...लावली टाळ्याला. 

तुम्ही कसेही वागायचं आणि आई-वडिलांना चिंता. 

अभ्यासात थोडंसं  जास्त लक्ष दिलं असतं तर आज अॅडमिशनसाठी इतकी पळापळ करायला लागली नसती..पण तुम्हाला कोणी सांगायचं? 

आई-वडिलांचं दुःख कळणार कधी ग? त्यांचा त्रास जाणवणार कधी तुम्हाला? तुम्ही आपल्याच मस्तीत.. 

वेळ निघून गेली की काही उपयोग नाही. 

फक्त पस्तावा.... 

................. 

आई प्लीsssज

 इतक  ओव्हर रिऍक्ट करण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये. 

तुला तर काय कारणंच लागतं बडबड करायला.  थोडसं समजून घेतलंस मला तर कळेल..

किती टेन्शन असतात आम्हाला सुद्धा..

ही इतकी कॉम्पिटिशन..त्यातून तुमच्या अपेक्षा... अगं  100%  पडले ना  तरीही काहीतरी कमी राहीलच...

आम्हीही प्रत्येक क्षणाला लढतोच आहोत. 

  गोष्टी तुमच्या काळाइतक्या सोप्या राहिल्या  नाहीयेत आता. 

'कस' लागतो प्रत्येक ठिकाणी. 

 त्यात तुझं भलतच चालू असतं काहीतरी. तुझ्यापेक्षा त्या मिताची आई बरी! 

कटकट तरी करत नाही तुझ्यासारखी.  कायमच भुणभुण माझ्या मागे. 

.............. 


हो! हो! जा मग त्यांच्याचकडे रहायला.

 ते काय एकदम श्रीमंत आहेत.  त्यांना काय फरक पडणार आहे. 

किती का मार्क मिळोत लेकीला. त्यांच्यासारखाच गडगंज जावई बघतील आणि लग्न करून देतील. 

तिला नोकरी थोडीच करायची आहे.... 

 आमच्या मागे कायमच वनवास..  मन मारून जगणं. .. 

तुझी देखील तीच गत व्हायला नको या चिंतेपाई ही कळकळ ग! 

पण नाही कळणार तुम्हाला....

 आई-वडील शत्रूच वाटतात. 

चार चांगल्या गोष्टी सांगतो...बंधनं घालतो...म्हणून मग आमचं बोलणं म्हणजे कटकटच वाटणार. ... 

 .......आई आणि लेकीची बोलणी रीमाच्या सासुबाई देवाची पूजा करता करता ऐकत होत्या. आताशा तर हे रोजचंच झालं होतं. 

समृद्धी वयात आली होती. तिला तिच्या मनाप्रमाणे जगायचं होतं आणि

 रीमा..आपला हेका सोडायला तयार नव्हती. तिला समृद्धीचा पूर्ण कंट्रोल हवा होता. ती मान्यच करायला तयार नव्हती की आता समृद्धी मोठी झाली आहे. तिचे निर्णय..काळजी....ती स्वतः घेऊ शकते. मग यावरून दररोजची खडाजंगी. त्याचं पर्यावसन रागात आणि भांडणात. 

वाईट वाटायचं त्यांना फार. 

चाळीशीत जाणाऱ्या वयामुळे की मनावरच्या ओझ्याने...आताशा रीमाचे शब्दही जहाल होत चालले होते.

 ताळ तंत्र उरायचं नाही तिला. मग   काहीही बोलू लागे..गत आयुष्यातलं  घडून गेलेलंही मग बर्याचदा ओठांवर आणि डोळ्यात यायला लागे. हळूहळू घरातलं वातावरण बिघडत चाललं होतं.   त्यांनी घट्ट डोळे मिटले आणि ओघळणारं पाणी पदराने पुसून घेतलं. इकडे रीमाचं  अजूनही चालूच होतं. .. 

आई झालीस ना ss मग कळतील माझ्या यातना.

होssऊ दे तुलाही असाच त्रास. होऊ देss

 तुझी मुलं अशीच वागली...तुला उद्धट, उलटी उत्तरं देऊ लागली की समजेल तुला. त्यांनी अभ्यास नाही केला आणि असं तुझ्यासारखं वागले की मग आठवतील माझे शब्द. 

तुझ्या मुलांनी तुला असा त्रास दिल्याशिवाय तुला माझा त्रास कळणार नाही. अशीच तळतळ होऊ दे तुझीही... 

देव करो आणि  असंच घडो...


रडता रडता रीमा बोलत होती. 


थांsssब रीमाss !!

पोथी वाचता वाचता ती अर्धवट सोडून सासुबाई बाहेर आल्या. 

आवर स्वतःला.

काय बोलते आहेस? 

शुद्ध आहे का तुझी तुला? 

स्वतःच्या त्रासापायी इतकी वेडी झालीस  की  सारासार विवेक बुद्धीही सोडलीस?

तोंडाला येईल ते बोलतीयेस फटाफट. अग पोथी वाचतेस ना तू सायंकाळची..मग काय लिहिले आहे त्यात. नुसते शब्द नका वाचू.. भाव जाणा आणि आचरणात आणा.. 

आज तिच्या सासुबाईंचा देखील पारा चढला होता. 


नको ग नको..नssको! 

मागे घे तुझे हे असे अविचारी शब्द. 

फार फाssर ताकद असते ग शब्दांमध्ये...

शेजारच्या मोरे काकू आठवतात?...

त्यांचा मुलगा लहान होता. मस्तीखोर होता. खूप त्रास द्यायचा...त्या सारख्या ओरडायच्या, मारायच्या त्याला. 

एकत्र कुटुंब...त्याने केलेल्या खोड्यां मुळे त्यांना फार ऐकून घ्यावं लागायचं.  प्रत्येक जण शेवटी...आईने वळण लावलं आहे की नाही?..या प्रश्नावर यायचा. 

अतिशय वाईट वाटायचं त्यांना..रडायच्या..स्वतःलाही मारून घ्यायच्या. 

मग नंतर नंतर मुलाची मस्ती आणि त्यांचा त्रागा इतका पराकोटीला गेला की त्या सतत त्याला मारताना....मरत का नाहीस तू एकदाचा?..म्हणायला लागल्या. 

        रागात त्या बोलून जायच्या...नंतर लेकाला जवळही घ्यायच्या...लाड करायच्या..खाऊपिऊ घालायच्या...

   पण...पण वास्तू देवतेनी त्यांच्या मनापासुन तळतळून रागाने बोललेल्या शब्दांना तथास्तु म्हटलं होतं. 

    एके दिवशी शाळेतून अमित घरी येत होता. सगळे मित्र मिळून गोटया खेळत खेळत चालत होते. मधेच भांडणं झाली आणि एकानं अमितला जोरात ढकललं. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांमध्ये जाऊन पडला. एक टोकदार दगड डोक्यात घुसला. मुलं रडत रडत घरी सांगायला आली. हे सगळेजण तिथे जाऊन पाहतात तोवर फार उशीर झाला होता. 

    अति रक्तस्त्रावामुळे अमित बेशुद्ध पडला होता...दवाखान्यात 

नेऊ- नेऊस्तोवर त्याचा खेळ संपला.  मोरे काकूंचा एकुलता एक मुलगा...आता त्यांना परत कधीच त्रास द्यायला येणार नव्हता. त्यांना छळणार नव्हता की खोड्या काढणार नव्हता. 

      त्या  सैरभैर झाल्या आणि तशातच डोक्यावर परिणाम झाला त्यांच्या. 


       म्हणून म्हणते ग! हात जोडते तुला. नको बोलूस वाईट भरल्या घरात. 

जा ! देवाजवळ जा. नमस्कार कर. 

चुकले म्हणून माफी माग आणि तुझे शब्द परत घे. त्याला सांग....सांग त्याला परत परत...चुकून बोललेलं मागे घे. वास्तू देवतेची विनवणी कर. तिला म्हणाव...नको म्हणूस तथास्तु. 

 जा आधी जा

... 

आता रीमालाही भान आलं होतं. आपण काय बोलून बसलो हे कळलं होतं तिला. लगबगीने ती देवाजवळ गेली...निरंजनातली वात मोठी केली आणि त्या उजेडात दिसणाऱ्या देवाला हात जोडून विनवणी केली, "देवा! चुकले मी. माफ कर.  या माझ्या संसारात सगळ चांगलच घडू दे. माझ्या समृध्दीला खूप मोठं कर. तिचं पुढचं आयुष्य सुख- समाधानाचं  असू दे बाबा! कशाचीही कमतरता नको.. उत्तम घर, नवरा, लेकरं मिळू दे माझ्या काळजाच्या तुकड्याला. कसल्याही विवंचना नको. "

नमस्कार करून ती बाहेर आली. सासुबाई समृद्धीलाही समजावित होत्या.."अगं नाही वागू असं. आईला मी आत्ता बोलले याचा अर्थ तू बरोबर आहेस असा होत नाही. चूक तर तुझी पण आहेच. तू योग्य वागलीस.. नीट अभ्यास केलास तर तिचा त्रागा होणार नाही. तिचंही वय वाढतंय ग आता! 

वय वाढतंय पण जबाबदाऱ्याही कमी होण्याऐवजी वाढतातच आहेत.  कळतं ग मलाही सगळं. मग माझ्या परीनं जेवढं करता येतं तेवढं करते. तुही का  नाही हे समजावून घेत. 

जा जवळ घे तिला आणि चुकलं म्हणून माफी माग तिची. पुन्हा असं वागणार नाही हेही कबूल कर. 

खूप अभ्यास करा..मोठे व्हा आई-वडिलांना आणखी काय हवं आपलं मूल आपल्या नजरे देखत जाणतं झालं..मार्गी लागलं..तर त्यातच त्यांचं समाधान. त्यांना काही नको हो तुमच्याकडून. "

    समृद्धीने  जाऊन आईला जवळ घेतलं. सॉरी म्हटलं. पुन्हा असं वागणार नाही..खुप अभ्यास करणार...हेही कबूल केलं. ©®दीपाली थेटे-राव

    नात्यांमधलं मळभ दूर झालं होतं.  प्रेमावर पडलेलं विरजण आजीनं हलकेच दूर करून त्याला नवीन झळाळी आणली होती. दोघी मायलेकी मग आजीच्या पाया पडल्या आणि हसत हसत रीमा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली. समृद्धी ही तिला मदत करू लागली

 समाधानाने आजी परत देवासमोर आली..पोथी वाचू लागली.. 

..... 

। चित्ती समाधान असो द्यावे सदासर्वदा। 

।आपुल्या वंशजाचे उणे पाहो नये कदा ।। 

 ....... 

.... 🙏🙏🙏

Thursday, September 12, 2024

रामरक्षामहात्म्य

 #रामरक्षामहात्म्य


माझे एक मित्र होते, *सुनील जोशी*. होते म्हणजे दुर्दैवाने आज हयात नाहीत. पण त्यांच्याबाबतीत प्रत्यक्ष घडलेली हकिगत सांगतो.


पूर्वी आम्ही ज्या सोसायटीत रहात होतो, त्या रस्त्याच्या सुरूवातीच्याच सोसायटीत ते रहायचे. त्याच सोसायटीच्या तळघरातील एका हाॅलमधे ते आणि त्यांची पत्नी असे दोघेजणं संस्कृतच्या शिकवण्या घ्यायचे. नंतर आम्ही काही काळाकरता गंगापूर रोडला रहायला जाऊन आमचं घर बांधून झाल्यावर परत कामठवाड्यात आलो. तोपर्यंत ते इंदिरा नगरला फ्लॅटमधे रहायला गेले होते. त्यामुळे बर्‍याच वर्षांत भेट नव्हती. ५-६ वर्षांपूर्वी आमच्या मागेच श्री. योगेशजी मांडे रहातात, त्यांनी सुनील जोशींना पॅरालिसीसचा अटॅक आल्याचे सांगितले. त्यातून ते बरे झाले. मला त्यांना भेटायला जायचे होते, पण कुठे रहातात हे माहिती नसल्याने एक दिवस योगेशजींबरोबरच त्यांच्या घरी गेलो. 

*आता इथून पुढचं काळजीपूर्वक वाचा.*


त्यांच्याकडे गेल्यावर आम्हाला दोघांनाही आनंद झाला. एखाद्या आजारातून बरं झालेल्या व्यक्तीला जसं आपण सहज विचारतो की काय झालं, कसं काय झालं, तसं मीपण विचारलं; 


*तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते असं-*


"मी सकाळी १० च्या सुमारास डिशमधे पोहे खात इथेच बसलो होतो. निम्म्याहून अधिक पोहे खाल्ले असतांना अचानक माझ्या हातातून डिश गळून पडली. पॅरालिसीसचा झटका आला होता. त्यामुळे एक बाजू गळाल्यासारखी झाली होती आणि तोंडही वाकडं व्हायला लागलं होतं. एरवी त्यावेळी घरात कोणीच नसतं, पण नशिबाने मुलाच्या क्लासला सुट्टी असल्याने तो घरी होता. तो लगेच धावत बाहेर आला. त्याला मी कसेबसे माझ्या मित्राला घेऊन यायला सांगितले, ज्याच्याबरोबर नाष्टा झाल्यावर मी कंपनीत जायला निघतो. मुलगा खाली गेला तर तो मित्र रोजच्याप्रमाणे स्कूटरवरून आलाच होता. मुलाने त्याला सांगितल्याबरोबर तो मला घेऊन खाली आला आणि जवळच्याच डाॅक्टरांकडे घेऊन गेला. तिथे तपासणी होईपर्यंत २ वाजले होते. डाॅक्टरांनी ताबडतोब न्युराॅलाॅजिस्टकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सुचविलेल्या हाॅस्पिटलमधे आम्ही गेलो. तिथे लगेच तपासणी होऊन अॅडमिट केले आणि प्राथमिक उपचार सुरु केले. संध्याकाळी डाॅक्टर येऊन तपासून गेले आणि स्टाफला सूचना देऊन गेले. त्याप्रमाणे आैषधोपचार सुरू झाले. रात्री ८-८॥ च्या बेताला एक फिजिओथिअरपिस्ट भेट ध्यायला आली. मला तपासल्यावर हिला सांगितले की मी उद्या सकाळी लवकर आठ वाजता येते, *तोपर्यंत यांना झोपू देऊ नका. यांच्याशी सतत बोलत रहा आणि जागं ठेवा.* ती निघून गेल्यावर मला जे काय थोडफार उच्चार करून बोलता येत होतं, तसं मी आणि ही, *आम्ही दोघेजणं संस्कृतमधून गप्पा मारत होतो.* (लक्षात घ्या हं, दोघं नवरा-बायको संस्कृतमधूनच एकमेकांशी बोलत होते.) 

*आणि विशेष म्हणजे अधुनमधुन मी रामरक्षा म्हणत होतो. अशा रितीने रात्रभर बर्‍याचवेळेस मी रामरक्षा म्हटली.*


सकाळी ती फिजिओथिअरपिस्ट जशी आली आणि मला जसं बघितलं, तसे तिचे डोळे विस्फारले गेले. तिने हिला विचारलं की *रात्रीतून तुम्ही काय केलं?* हिने थोडसं घाबरत सांगितलं की काही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ह्यांना रात्रभर जागं ठेवलं.


त्यावर ती म्हणाली की *नाही. तुम्ही नक्कीच काहितरी निराळं केलं असणार. कारण यांचं तोंड वाकडं झालेलं होतं, त्यासाठी मी माझ्याजवळच्या निरनिराळ्या आकाराच्या लाकडी गोळ्या गालात ठेवण्यासाठी आणल्या होत्या* (तोंड सरळ होण्यासाठी फिजिओथिअरपिमधला हा एक भाग असतो), *पण यांचं तोंड तर सरळ झालेलं दिसतंय. मला नक्की सांगा तुम्ही काय केलं?*


........ तेव्हा हिने सांगितलं की *आम्ही रात्रभर संस्कृतमधून थोड्या गप्पा मारल्या आणि ह्यांनी बर्‍याच वेळेस "रामरक्षा" म्हटली.*


तिला आश्चर्य वाटल्याचं तिच्या चेहेर्‍यावर दिसत होतं. ती लगेच निघून जातांना म्हणाली की मग आता माझं काही कामच नाही. यासाठीच मी आले होते. (म्हणजे त्या रोग्याच्या तोंडाच्या आकारानुसार योग्य अशा आकाराची लाकडी गोळी जिकडे तोंड वाकडं झालं असेल त्याविरूद्ध गालात काही तास ठेवली जाते, जेणेकरून तोंड सरळ होण्यास मदत होते.)


*फक्त रामरक्षा म्हटल्याचा आणि संस्कृत उच्चारांचा शरीरावर काय परिणाम होतो याचं हे माझ्यासमोरचं जिवंत उदाहरण मी पाहिलं. माझ्याशी ते अगदी व्यवस्थित बोलत होते. 

 *रामरक्षेच्या प्रभावाचा त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव, जो त्यांनी स्वतः मला सांगितला, तो मनांत ठसला आहे.*


©️श्री.संतोष गोविन्द जोशी.

Wednesday, September 11, 2024

चैत्र

 *लंगडी एकादशी आणि चंदन उटी*



चैत्र हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना. या वेळी अनेक गावांमध्ये त्या त्या दैवतांची यात्रा भरते. कोल्हापूरला ज्योतिबाची, जेजुरीला खंडोबाची, शिंगणापूरला शंभू महादेवाची. अशा अनेक तीर्थक्षेत्री चैत्र महिन्यात यात्रा असतात. पंढरपूरलाही चार मुख्य वाऱ्यांपैकी एक असणारी चैत्री वारी चैत्र शुद्ध एकादशीला भरते. ही वारी म्हणजे हरिहर ऐक्याची खूण आहे. बहुतांश भाविक प्रथम शिखर शिंगणापूरला जाऊन नंतर पंढरपूरला येतात. या चैत्री वारीची कथा मोठी रंजक आहे. आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे मानवीकरण दर्शवणारी आहे. 

       या एकादशीला विठ्ठल लंगडी एकादशी करतो. त्याचे काय झाले की विठ्ठल रूक्मिणी मातेसह शिंगणापूरला शंभू महादेव आणि पार्वतीमातेच्या विवाहाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतो. एकादशी म्हणून सकाळपासून उपवास केलेला असतो. पण विवाह सोहळ्याच्या धामधुमीत, विवाहास आलेल्या देव, ऋषीगण, इतर पै पाहुण्यांशी बोलताना, गप्पा मारताना आपला उपवास आहे हेच विसरून जातो. आणि दुपारच्या पंगतीत सगळ्यांच्या बरोबर जेवायला बसतो. रूक्मिणी माता त्याला सांगायचा प्रयत्न करते. पण देवाचे लक्षच नसतं.. मग त्याची लंगडी एकादशी होते. आम्ही पण लहानपणी लंगडी एकादशी करत असू.

आजही या प्रसंगाची आठवण म्हणून यादिवशी सकाळी देवाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. आणि दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य असतो..

देवही माणसासारखा विसरभोळा आहे. माणूस जशी एखादी गोष्ट विसरतो तसा देवही विसरतो. आपल्याप्रमाणे वागतो. विठ्ठल असा मानवी मनोव्यापारानुसार वागतो म्हणून तो अगदी आपला वाटतो. देव आणि मी हे द्वैतच संपते. विठ्ठल भक्तांची 'मी तू पणाची झाली बोळवण' अशी अवस्था असते. त्यामुळे तो आपल्या खूप जवळचा वाटतो. त्याचा देव म्हणून धाक वाटत नाही.

  या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जसं उकडतं तसं देवाला पण उन्हाचा त्रास होतो. म्हणून या दिवसात, मृग नक्षत्र निघेपर्यंत विठ्ठलाला आणि आईसाहेब रूक्मिणी मातेला गारव्या साठी अंगभर चंदनाची उटी लावतात. केशर पन्ह, वाळ्याचे सरबत, कलिंगड, खरबूज अशा थंड पदार्थांचा नैवेद्य दाखवतात.

 मोगऱ्याचे हार घालतात. पूर्वी देवळात बाजीराव पडसाळीत उटी साठी चार पाच माणसं चंदन उगाळत बसलेले असत. तिथून जाताना इतका सुंदर वास येत असे. या दिवसांतले उटी लावलेले विठ्ठल रूक्मिणीचे रूप नयनमनोहर दिसते आणि गाभारा अलौकिक सुगंधाने दरवळत असतो. ज्याचे भाग्य आहे त्याला हा सोहळा अनुभवता येतो. माझं पूर्वसुकृत म्हणून मी हा अलौकिक सुगंध श्वासात भरून घेतला आणि कायमचा मनात साठवला..



मीरा उत्पात-ताशी,



⁠Let's go

 "𝔻𝕚𝕤𝕥𝕣𝕚𝕓𝕦𝕥𝕚𝕟𝕘 𝕞𝕪 𝕓𝕠𝕠𝕜𝕤 𝕚𝕤 𝕥𝕙𝕖 𝕧𝕖𝕣𝕪 𝕙𝕖𝕒𝕣𝕥 𝕠𝕗 ℝ𝕒𝕕𝕙𝕒-𝕜𝕦𝕟𝕕𝕒. 𝕋𝕙𝕚𝕤 𝕚𝕤 𝕨𝕙𝕒𝕥 𝕥𝕙𝕖 𝕙𝕖𝕒𝕣𝕥 𝕠𝕗 𝕊𝕣𝕚𝕞𝕒𝕥𝕚 ℝ𝕒𝕕𝕙𝕒𝕣𝕒𝕟𝕚 𝕝𝕚𝕧𝕖𝕤 𝕗𝕠𝕣!"

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

_Srila Prabhupada orders HG Radha Kunda mataji in her dream_


All my life, consciously or unconsciously, I have been trying to distribute Srila Prabhupada's books. 

I had cancer, but by distributing his books, it went away. 

I had a husband who used to beat me, but I kept distributing books and those hardships passed. 

He had many children who abandoned him, but I continued to distribute books and I haven't lost anything.


But 

while living here in Vrindavan the last few years, _I started listening to a Radha-Kunda Babaji_. When he spoke, something happened in my heart, and I felt that this was really a holy man. I paid my respects to him and he gave me these instructions:

 

"Do you want to receive the mercy of Srimati Radharani?"

 

"Of course I do!" I replied.


"Then come every day to Radha-Kunda. I will give you a mantra to repeat, and one day Srimati Radharani will shower Her mercy on you."

 

And I was so stupid I said, "Okay!"

 

So the babaji gave me the mantra to repeat, I started coming to Radha-Kunda every day, _and I stopped distributing Prabhupada's books_.


🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

Then I received some amazing mercy. 

*Srila Prabhupada came to me in a dream*, gave me a very stern look, took my hand, and said: "⁠Let's go."


Prabhupada took me out of Krishna-Balaram Mandir and out of Vrindavan to Govardhan and Radha-kunda. _Still holding my hand, Prabhupada led me into the waters of Radha-kunda and down to the bottom, to the very heart of Radha-kunda where I received a vision._


*Srila Prabhupada was standing at a huge table, and on the table there were millions of his books in different languages, and there were millions of groaning, suffering souls with their hands outstretched and shouting: "⁠Me! Me!"*

 

*Srila Prabhupada was standing and single-handedly distributing hundreds and thousands of his books*. 

And 

_everyone who received one stopped moaning, took a spiritual form, and left this world._✨


In the dream I was standing there looking at all this, getting goose bumps and shaking. Then Srila Prabhupada gave me another stern look:⁠

*"How long will you stand there?*

*When will you start helping me distribute books?*

𝐅𝐨𝐨𝐥, 𝐡𝐨𝐰 𝐜𝐚𝐧 𝐲𝐨𝐮 𝐧𝐨𝐭 𝐫𝐞𝐚𝐥𝐢𝐳𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐝𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐧𝐠 𝐦𝐲 𝐛𝐨𝐨𝐤𝐬 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐯𝐞𝐫𝐲 ❤️𝐡𝐞𝐚𝐫𝐭💚 𝐨𝐟 𝐑𝐚𝐝𝐡𝐚-𝐤𝐮𝐧𝐝𝐚? 𝐓𝐡𝐢𝐬 𝐢𝐬 𝐰𝐡𝐚𝐭 𝐭𝐡𝐞 𝐡𝐞𝐚𝐫𝐭 𝐨𝐟 𝐒𝐫𝐢𝐦𝐚𝐭𝐢 𝐑𝐚𝐝𝐡𝐚𝐫𝐚n𝐢 𝐥𝐢𝐯𝐞𝐬 𝐟𝐨𝐫!

*If you really want to receive Srimati Radharani's mercy, distribute my books! Until your last breath!"*

 

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

I woke up all in tears. 

_I didn't go to Radha-Kunda again, and I didn't repeat that mantra again._ 

*I just decided that for the rest of my life, until my last breath, I will distribute Srila Prabhupada's books."*


- by HG Radha Kunda mataji (Disciple of Srīla Prabhupda)

जप

 पु.श्री.गोंदवलेकर महाराजांचे शिष्य श्री.ल.ग. तथा बापूसाहेब मराठे यांना त्यांच्या नातवाने प्रश्न विचारला " आज पन्नास वर्षे आपण जप करीत आहात, तुमचा साडेतीन कोटी जप सहज झाला असेल  तरी अजून तुमचे नाम स्थीर झालेले दिसत नाही असे का ?"  सहाजिकच श्री.बापूसाहेबांना पण हा प्रश्न पडला. पुढे ते नातवाला म्हणाले " तू म्हणतोस ते ठीक आहे . मी जप केलेला मोजतोस. जसे ब्यांकेत किती पैसे भरले याची बेरीज करतोस पण काढले किती ते बघत नाहीयेस.तसं मी जप किती केला याची संख्या मोजतोस पण त्यातून ती किती खर्च झाली हे बघत नाहीस" तेव्हा तो म्हणाला मला समजले नाही. तेव्हा ते म्हणाले कसे काढले ते सांगतो " 

सहासष्ट साली सौ.आजारी पडली. तेव्हा श्री.महाराजांना म्हटले हिला बरे करा.सगळा संसार व्हायचा होता. तेव्हा श्रीमहाराजानी दोन कोटी जप कमी करून तिला बरी केली. प्रपंचाची आसक्ती होती त्यामुळे ती प्रार्थना केली गेली. ती नको होती करायला.तेव्हा रक्कम काढली गेली. दुसऱ्यांदा मुलगी सुमा प्लुरसीने आजारी होती. त्यावेळी अपत्य प्रेमापोटी तीला वाचविण्यासाठी श्री.महाराजाना प्रार्थना केली. कारण हिचा संसार अर्ध्यावरच होता. सगळं अवघड होते. तेव्हा परत ती रक्कम काढली. त्यात एक कोटी खर्च झाले. आता पन्नास लाख आहेत शिल्लक. आता मरेपर्यंत पुन्हा तीन कोटी करेन तेव्हा जप स्थीर होईल. 

हा सगळा हिशोब बघ म्हणजे कळेल. मी हे करायला (वजावट)नको होते पण ते माझ्या हातून झाले. त्यामुळे नाम स्थीर झालेले दिसत नाही." हे लिहिण्याचा हेतू हा की आपण जो जप करतो त्याचे रिटर्न चुकून सुद्धा मागता कमा नये. आपण ते मागतो आणि तेथे घाटा येतो. असे बहारीचे उत्तर श्रीबापू साहेब यांनी दिले.

Tuesday, September 10, 2024

भवरोग

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*भवरोगापासून  मुक्ततेचा  उपाय  -  सत्संगती  व  नामस्मरण .*


एका गावात एक वैद्य राहात होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले. वैद्याने त्या माणसाला सांगितले की, " तुला एक भारी रोग झाला आहे; पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन तसे पथ्य पाळ म्हणजे तुझा रोग बरा होईल." वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्या वैद्याचे काही नुकसान होते का ? त्याप्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात, त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का ? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरिता संतसंग करा आणि नामात रहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल ? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की, नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे ? त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे; तरी त्याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना, ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे. त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्‍न करा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल.


एका मनुष्याने तीस वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, "भगवंताची पूजा आणि भक्ति कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो." त्याला विचारले, "ते कसे ?" तेव्हा त्याने उत्तर दिले, "नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते; मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही. म्हणजे आपलेपण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निःस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे." याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे.


*११० .   अनन्यतेशिवाय  भगवंताची  प्राप्ती  नाही ;  त्यातच  भक्ति  जन्म  पावते .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Monday, September 9, 2024

संध्या

 *आजी - आजोबा* 🟩


*आज्जी*

*"मी या म्हाताऱ्या बाईबरोबर शाळेत जाणार नाही."


आपल्या दहा वर्षांच्या मुलाचे, सार्थकचे शब्द ऐकून संध्या स्तब्ध झाली. तो काय म्हणतोय? तो आपल्या आजीला म्हातारी का म्हणतोय? असा उद्धटपणा तो कुठून शिकला असेल?


संध्या विचारात पडली…तेवढ्यात सार्थकचे काका बाजूच्या खोलीतून बाहेर आले आणि विचारले, "काय झालं बेटा?"


तेव्हा सार्थक म्हणाला, "काहीही झाले तरी मी या म्हातारीसोबत शाळेत जाणार नाही. ती मला नेहमी शिव्या घालते, माझे मित्र माझी चेष्टा करतात."


घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं…संध्याचा नवरा, दोन भाऊ आणि वहिनी, नणंद, सासरे आणि नोकर देखील!


सार्थकला शाळेत सोडण्याची जबाबदारी आजीची होती. तिचा पाय दुखत असे, पण तिने कधीही तक्रार केली नाही कारण तिच्या नातवावर तिचे खूप प्रेम होते. तो कुटुंबातील पहिला नातु होता.


पण अचानक सार्थकच्या तोंडून त्यांच्यासाठी असे शब्द ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्याला खूप समजावले होते पण तो आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला. सार्थकच्या वडिलांनी त्याला थप्पडही मारली. अखेर सगळ्यांनी ठरवलं की उद्यापासून आजी त्याला शाळेत सोडायला जाणार नाही. दुसऱ्या दिवसापासून दुसरं कोणीतरी त्याला शाळेत घेऊन जाऊ लागलं. पण संध्याला प्रश्न पडला की त्याने हे का केले?


संध्यालाही सार्थकचा खूप राग आला होता.


संध्याकाळ झाली होती. संध्याने दूध गरम केले आणि मुलाला देण्यासाठी त्याला शोधू लागली. टेरेसवर पोहोचल्यावर तिने मुलाला आजीशी बोलताना ऐकले तशी ती गुपचूप त्यांचे बोलणे ऐकू लागली.


आजीच्या मांडीवर डोकं ठेवून सार्थक सांगत होता…


"मला माहित आहे आजी, तू माझ्यावर रागावली आहेस, पण मी तरी काय करू? एवढ्या कडक उन्हातही ते तुला मला न्यायला आणायला पाठवतात. तुझा पायही दुखत आहे. मी आईला सांगितल्यावर ती म्हणाली की आजी स्वतःहून जाते येते. आजीला जे पाहिजे ते ती करते. मी खोटं बोललो... मी खूप चूक केली, पण तुला या त्रासातून वाचवण्यासाठी मला दुसरं काहीच सुचलं नाही गं!


तू आईला मला माफ करायला सांग."


सार्थक बोलत राहिला आणि संध्याचे पाय आणि मन सुन्न झाले. आपल्या मुलाच्या बोलण्याचा अर्थ तिला उमगला होता, घरातील कोणालाच न समजलेली गोष्ट त्या दहा वर्षांच्या मुलाने करून दाखवली होती.


संध्याने धावत जाऊन सार्थकला मिठी मारली आणि म्हणाली... "नाही बेटा. तू काही चुकीचे केले नाहीस. घरातल्या सर्व सुशिक्षित मूर्खांना समजावण्याचा हा योग्य मार्ग होता.


शाब्बास बेटा. शाब्बास."


सारांश :


घरातील वडीलधारी मंडळी म्हातारपणी झाडासारखी असतात, ज्याला फळ येत नाही पण सावली मिळते. आपली नवीन पिढी आपल्याला पाहून शिकते, म्हणून आपण त्यांचा आदर केला पाहिजे.



_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*



देवी शांता

 *"प्रभु श्रीरामचंद्रांना बहीण आहे ?"*


*कोण होती श्री रामाची बहीण ?*


प्रभु श्रीरामांची एकुलती एक बहीण कायमच रामायणाच्या कथेपासून आणि भक्तांच्या श्रद्धेपासून दूर राहिली. असं का घडलं? कोण होती ही बहीण? रामाच्या या बहिणीची नेमकी कथा काय? हे जाणून घ्या. 


प्रभु रामचंद्रांना बहीण आहे हेच अनेकांना ठाऊक नाही त्यामुळे जितक्या सहजेने रामायणातील इतर पात्र आपल्याला आठवतात, तितक्याच ताकदीने शांता हे नाव मात्र आपल्याला आठवत नाही.


कोण होती देवी शांता? तुम्हाला वाटत असेल की रघुकूल वंशात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा चार मुलांचाच जन्म झाला, मात्र त्यापुर्वीही दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता.


रघुवंश कुळातील ही सर्वात ज्येष्ठ कन्या होती. शांतेचा जन्म झाला आणि राणी कौसल्येच्या मांडीवर ती खेळू लागली. मात्र त्यानंतर पुढील तब्बल १२ वर्ष दशरथ राजाला मुलगा होत नव्हता.


शांता लहान असतानाच दशरथ राजाकडे कौसल्या राणीची बहिण वर्षीणी आणि तिचे पतीदेव राजा रोमपद आले होते. दशरथ राजा आणि कौसल्या राणी यांनी त्यांचे आगतस्वागत केले. मात्र चर्चादरम्यान राणी वर्षीणी दुःखी असल्याचे कौसल्या राणीला कळले.


विवाहानंतर अनेक वर्ष उलटली तरीही अपत्यप्राप्ती नसल्याने हे दाम्पत्य दुःखी असल्याचे कळताच राजा दशरथाने उदार मनाने आपली लाडकी लेक शांता या दाम्पत्याला दत्तक म्हणून देण्याचे जाहीर केले.


अर्थात शांता ही मावशीच्याच घरी राहणार असल्याने तिचे उत्तम प्रकारे संगोपन होईल याची कौसल्या राणीला खात्री होती. शिवाय या निर्णयाने आपली बहीण आनंदी राहील या विचारांनी राणी कौसल्येने राजाच्या निर्णयाला होकार दिला आणि तेव्हापासून लहानगी शांता रोमपद राजाच्या राजवाड्यात आनंदाने नांदू लागली.


अंगद देशाच्या राजा रोमपद यांच्या राजवाड्यात लाडाने वाढणाऱ्या शांतेला वेदशास्त्र, धनुर्विद्या, कला अशा वेगवेगळ्या विषयांचे ज्ञानही अवगत असल्याचे आख्यायिका सांगतात.


का म्हणून रामायणात फारसा उल्लेख नाही. रामायणाची कथा सुरु होते ती दशरथ राजा आणि त्याच्या तिन्ही राण्यांना अपत्यप्राप्ती होत नसल्याच्या चिंतेपासून! शांताच्या जन्मानंतर पुन्हा एकदा आपल्या घरात बाललिला दिसू लागतील या विचारांनी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांनी आपल्या लेकीला बहिणीला दत्तक दिले, मात्र त्यानंतर अनेक वर्ष त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. अशातच राणी कैकयी आणि सुमित्रा यांच्याही पदरी मुलबाळ नव्हते.


राजा दशरथ यांनी श्रृंगी ऋषींच्या आदेशाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्याचेच फलित म्हणजे अयोध्येत चार बालकांचा जन्म झाला.


शांतेचा विवाह :- रोमपद राजाच्या घरी लाडाने वाढणाऱ्या शांता देवीच्या विवाहाबद्दलही एक आख्यायिका सांगितली जाते. रोमपद राजा मुलगी शांतेशी खेळण्यात, तिच्याशी गप्पा मारण्यात व्यस्त असताना एका याचकाने आपल्या शेतीसाठी राजाकडे याचना केली. मात्र राजाने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. राजाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने याचक चांगलाच संतापला. हा याचक इंद्र देवाचा भक्त होता. इंद्रदेवाला आपल्या याचकाच्या अपमानामुळे राग आला, त्यामुळे रोमपद राजाला अद्दल घडवण्यासाठी इंद्रदेवाने शाप दिला. यामुळे पुढील वर्षी रोमपद राजाच्या राज्यात पाऊस पडला नाही, दुष्काळामुळे राज्यातील जनता आणि पर्यायाने राजाही हैराण झाला.


या समस्येतून मार्ग काढण्यासाठी राज्याने श्रृंग ऋषींना पाचारण केले. ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्याच नेतृत्वाखाली हा यज्ञ भक्तीभावाने केला गेला आणि त्यानंतर दुष्काळाचे संकट टळले.


राज्यात सारं काही अलबेल झाल्याचे पाहून रोमपद राजाने खूश होत आपली कन्या शांता हिचा विवाह ऋषींशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शांता देवी आणि ऋषी श्रृंग हे कुल्लू येथे राहू लागले अशी कथा आहे.


कुल्लू येथून ५० किलोमीटर अंतरावर देवी शांता यांचे मंदिर आहे. या मंदिरात शांता देवीसह त्यांचे पती ऋषी श्रृंग यांचीही पुजा केली जाते. आजही देशातून अनेक भाविक या मंदिरात नित्यनियमाने पुजा करतात.


शांता देवी ही रामाची बहीण होती, हेच भरपूर लोकांना माहिती नाहीये, तर रामायणाचे प्रकार किती कसं माहिती असणार? यात मौखीक रामायण हे जास्त प्रचलित आहे. प्रांतानुसार वेगवेगळे रामायण येते. तसेच धर्मानुसार वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी नाती समोर येतात, किंवा तश्या लिहून ठेवल्या आहेत. जवळपास ३०० लिखित व अलिखित मौखीक रामायणाचे प्रकार जगभरात सापडतात.


जैन धर्माच्या मुनी विमलसूरी यांच्या प्राकृत भाषेतील रामायण हे जैन धर्मात अधिकृत मानले जाते, त्यात रामाचे नाव पद्म असे होते... दशरथ जातक या कथा बौद्धधम्म् नुसार रामायणच आहे असंही म्हटलं जातं.


आज साधारण लोकांच्या डोक्यात असते ते तुलसीदासकृत रामायण (१६-१७ व्या शतकात लिहले गेलेले) व ते ही कदाचित रामानंद सागर यांनी तयार केलेल्या धारावाहिक मध्ये त्याचा जास्त प्रभाव असल्यामुळे असेल.


वाल्मिकी रामायण हे सर्वात जुने रामायण (आर्ष रामायण) म्हटले जाते, ते काव्य स्वरूपात होते व लिखित स्वरूपात सापडत नाही. त्यात २४,००० श्लोक होते असं म्हणतात व ते ६ कांडांमध्ये विभागलेले होते. त्यात ७ वे उत्तरा कांड नव्हते, जे नंतर टाकण्यात आले आहे. 


या व्यतिरिक्त *अद्भुत रामायण, कृत्तिवास रामायण, बिलंका रामायण, मैथिल रामायण, सर्वार्थ रामायण, तत्वार्थ रामायण, प्रेम रामायण, संजीवनी रामायण, उत्तर रामचरितम्, रघुवंशम्, प्रतिमानाटकम्, कम्ब रामायण, भुशुण्डि रामायण, अध्यात्म रामायण, राधेश्याम रामायण, श्रीराघवेंद्रचरितम्, मन्त्र रामायण, योगवाशिष्ठ रामायण, हनुमन्नाटकम्, आनंद रामायण, अभिषेकनाटकम्, जानकीहरणम्* आदी रामायण कथा आहेत.


विदेशात सुद्धा *तिबेटी रामायण,* पूर्वी तुर्किस्तानात *खोतानी-रामायण*, इंडोनेशिया मध्ये *ककबिन-रामायण*, जावा मध्ये *सेरतराम, सैरीराम, रामकेलिंग, पातानी-रामकथा,* इण्डोचायना मध्ये *रामकेर्ति* (रामकीर्ति), *खमैर-रामायण,* म्यानमार मध्ये *यूतोकी रामयागन*, थाईलैंड मध्ये *रामकियेन* आदि रामचरित्रांचे शाश्वत वर्णन केले आहे.


या व्यतिरिक्त काही विद्वान असेही मानतात कि ग्रीसचे कवि होमर यांचे प्राचीन काव्य *इलियड*, रोमचे कवि नोनस यांचे *डायोनीशिया* व भारतातील *रामायणाची कथा* यांच्यात अतिशय अद्भुत समानता आहे.


।। श्री राम जय राम जय जय राम ।। 

।। जय श्री शांतादेवी ।।

Sunday, September 8, 2024

Vaisnava

 *A Vaisnava king to solve all problems of satanic government*


When a Vaisnava king like Dhruva Maharaja is the head of the government of the entire world, the world is so happy that it is not possible to imagine or describe. Even now, if people would all become Krsna conscious, the democratic government of the present day would be exactly like the kingdom of heaven. If all people became Krsna conscious they would vote for persons of the category of Dhruva Maharaja. If the post of chief executive were occupied by such a Vaisnava, all the problems of satanic government would be solved. The youthful generation of the present day is very enthusiastic in trying to overthrow the government in different parts of the world. But unless people are Krsna conscious like Dhruva Maharaja, there will be no appreciable changes in government because people who hanker to attain political position by hook or by crook cannot think of the welfare of the people. They are only busy to keep their position of prestige and monetary gain. They have very little time to think of the welfare of the citizens.


Srila Prabhupada

SB 4.9.66, Purport

Saturday, September 7, 2024

राम

 *|| स्त्रीच्या मनातला राम ||* 


*©️ कांचन दीक्षित* 


*प्रत्येक भारतीय स्त्री आयुष्यात कधी न कधी, मनातल्या मनात, रामाचा अर्थ शोधत असते ..!! मग ती शिकलेली असो वा अशिक्षित ..!! प्रत्येक स्त्रीला एकदा तरी रामाला भेटायचं असतं, आणि प्रश्न विचारायचे असतात ..!!* 


*लहानपणापासून आपण रामायण शिकत असतो .. समजून घेत असतो ..!! मी सुद्धा अनेक प्रश्न विचारत, रामाशी भांडलेले आहे ..!!तुझं सगळं मान्य आहे पण,   सीतेचा वनवास ..?? कां बरं ..?? हा प्रश्न कायम बोचत राहिलेला आहे ..!!* 


*एम.ए ला असताना, 'स्त्री-वादी साहित्य' हा एक विषय होता अभ्यासाचा. सीतेला पुन्हा एकदा, दुसरा वनवास भोगायला पाठवणं, हे आयुष्यभर बोचत राहीलं ..!!* 


*पण अगदी अलिकडे काही वर्षांपूर्वी, अचानक काहीतरी समजलं, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली ..!! ती माझ्या पुरती आहेत असं वाचणाऱ्यांना वाटलं तरी चालेल ..!! माझं मत सगळ्यांना पटलंच पाहिजे असा माझा आग्रह नाही ..!! मी फक्त माझे विचार शेअर करतेय .. अगदी सहज ..!!* 


*राम मला प्रिय आहे .. एक स्त्री म्हणून ..!! अगदी कृष्णापेक्षाही जास्त ..!! कारण, कृष्ण अनेकींचा आहे ..!! कधी कृष्णानं सांगितलं नाही की तो कोणाचा आहे ते ..!! कदाचित प्रत्येकीनं असं समजून घेतलेलं आहे की, कृष्ण माझा आहे ..!! अगदी राधेपासून ते कुब्जेपर्यंत प्रत्येकीला वाटतं की, कृष्ण माझा आहे ..!! पण सीतेला मात्र शंभर टक्के माहीत आहे की, 'राम माझा आहे' आणि रामासोबत नांव फक्त सीतेचं आहे ..!!* 


*दशरथाला तीन राण्या होत्या आणि त्यामुळे, रामासाठी दुसरा विवाह आणि तो देखील 'त्या काळात' ही अशक्य गोष्ट नव्हती ..!! पण रामानं दुसरं लग्न केलं नाही ..!! अगदी 'परिस्थितीची गरज' म्हणून देखील नाही ..!!* 


*ज्या क्षणी पूजा-विधीसाठी पत्नीची जागा रिकामी होती, तेव्हा सीतेची सोन्याची मूर्ती रामानं ठेवली आणि त्या मूर्ती शेजारी बसून, त्यानं पूजा केली, त्या क्षणी सीता जिंकली ..!! वैभवशाली राणी झाली ..!!* 


*रामाच्या मनात सीता कोण आहे .. काय आहे .. हे त्यानं या कृतीतून ज्या ग्रेसफुली, त्याच्या स्टाईलनं सांगितलंय, ते एका फिल्मी हिरोच्या छाती ठोकून सांगण्यातही नाहीये ..!! मला वाटतं, 'मर्यादा पुरुषोत्तम' रामानं जगाला ओरडून सांगितलेलं ते पहिलं 'I Love You' आहे ..!!*  

 

*राजाची भूमिका निभावताना, त्याग आणि कर्तव्याच्या अनेक परीक्षांना राम सामोरं गेलेला आहे ..!! पडलेली कोडी त्यानं 'मर्यादा पुरुषोत्तम' होऊन दरवेळी सोडवली आहेत ..!! पण हा एक निर्णय, ही एक गोष्ट, त्याच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकलं नाही .‌. ते म्हणजे सीतेवरचं प्रेम आणि नातं ..!!* 


*आजपर्यंत जगात पतिव्रता असणं, एकनिष्ठ असणं, यावर स्त्रियांची अनेक उदाहरणं आहेत, पण 'एकनिष्ठ पुरुष' म्हटलं की फक्त राम आठवतो ..!! 'एक-पत्नी' व्रताचं पालन करणारा तो खरा पती होता. चारित्र्याविषयी एका पुरुषासाठी असा आकाशाएवढा मोठा आदर्श जगात कुठलाही नाही ..!!* 


*जग Men Are Dogs म्हणत, पुरुषांना अतिशय हलक्या पातळीवर नेऊन ठेवत असताना,  आपल्याकडे मात्र राम आहे ..!! भविष्यात माणसाला कधीतरी 'राम-कथा' आकर्षित करेल आणि राम समजून घ्यावासा वाटेल, असा आशावाद बाळगायला हरकत नाही ..!!* 


*या मातीत एक असा पुरुष होऊन गेला, जो संपूर्णपणे फक्त एका स्त्रीचा होता ..!! सीतेचा होता ..!! 'अशी सीता' होऊन वनवासात जाण्यात देखील प्रतिष्ठा आहे, कारण वनवासात सुद्धा, सीतेला 'राम माझा असल्याची' खात्री आहे .. विश्वास आहे .. जे कमाल आहे ..!!* 


*'बाजीराव-मस्तानी' मध्ये काशीबाई तिची सर्वांत मोठी वेदना (दर्द) सांगते ..!! ती म्हणते, की,"तुमने तो मुझसे मेरा गुरुरही छिन लिया" ..!!* 


*एका स्त्रीचा हा जो 'गुरुर' असतो ना की, 'माझा' नवरा 'माझा' आहे ..!! ते स्त्रीचं बळ असतं, शक्ती असतं ..!!* 


*पत्नीचं तेज, तिचा अहंकार हा तिचा नवरा असतो ..!! तो नसेल तर जगणं, हा एक वनवासच असतो ..!! 'एकनिष्ठ पती' या एका बक्षिसाला मिरवत, ती गौरवानं सगळ्या जगाशी लढू शकते ..!! अनेक वनवास हसत-हसत सहन करू शकते पण ज्या क्षणी तिचा हा गुरुर तुटतो, त्या क्षणी ती संपते ..!! सगळं असूनही हारते ..!! तळाशी बुडते ..!! म्हणूनच, मला सीता भाग्यवान वाटते .. अगदी खूप खूप भाग्यवान वाटते ..!! तिच्या सुखाची कल्पनाही कुणाला करता येणार नाही ..!!* 


*ती राणी आहे आणि रामाच्या हृदयात तिचं सिंहासन आहे ..!! मानव-जन्मात भोगावे लागतात ते भोग तिनं भोगले पण, तिच्या वाट्याला जो राम आलेला आहे, तो हेवा वाटावा असाच आहे ..!!* 


*माणूसपणाच्या पलीकडे पोहोचलेला हा देव, आपला आदर्श आहे आणि पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचे संस्कार मिळणार आहेत, असा मला विश्वास वाटतो ..!!* 


*ज्या संस्कृतीत 'राम-कथा' आहे आणि पुरुषांसाठी रामाचा आदर्श आहे त्या भारत भूमीत, स्त्री म्हणून जन्म घेण्याचा मला अभिमान आहे आणि या जगात पुन्हा स्त्री म्हणून जन्माला यायचं असेल तर, मला भारतातच जन्म मिळावा असं मी मागेन ..!!*

Friday, September 6, 2024

भीती

 **पू .बाबा:  श्रीमहाराजांनी काय सांगितले आहे ते सांगतो. ते म्हणतात, माणसाला भीती आणि काळजी का आहेत ? लक्षात येईल की माणसाला जीवनात आशा असते. अमुक व्हावे आणि तमुक होऊ नये असे त्याला नेहमी वाटत असते. हवे ते मिळत नाही आणि नको ते टळत नाही असा अनुभव असून देखील तो आशा करीत असतो. आशेचे मूळ वासनांमधे आहे. वेदान्ताच्या भाषेत माणूस हा वासनांचा पुंज आहे. Man is a bundle of desires असे ब्रँडले म्हणतो. बरे, या वासनाही देहबुद्धीवर म्हणजे मी देह आहे या श्रद्धेवर आधारलेल्या असतात. जी दृश्यात नेऊन बसवते ती वासना*

*होय. विहिरीतून खारे पाणी उपसून टाकून विहीर कोरडी केली तरी झऱ्यातून पुन्हा खारे पाणीच यावे त्याप्रमाणे काही वासना पूर्ण होऊन किंवा अन्य कारणाने नाहीशा झाल्या तरी नवीन वासना तशाच म्हणजे देहबुद्धीच्याच येतात. माणसाच्या* *अपूर्णपणात वासनांचा उगम आहे. वासना पूर्ण झाल्या की*

*आपण सुखी होऊ असे त्याला वाटते. त्या पूर्ण होतीलच अशी खात्री नसते म्हणून काळजी* *आणि भीती पाठ सोडत नाहीत.*

संकलन आनंद पाटील *

Thursday, September 5, 2024

महत्व

 श्रीराम समर्थ


*थोरल्यारामा समोरील मारुतिचे प.पू तात्यासाहेब केतकर* यांनी सांगितलेलें महत्व.



         गोंदावल्यास असतांना एकदा बापूसाहेब मराठ्यांनी पू तात्यासाहेब केतकर यांस म्हटले की, *'श्रीमहाराज देहात असतांना १९०४ ते १९१३ या कालावधीत आपणांस श्रीमहाराजांच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. ते भाग्य आम्हास आत्ता कदापीही मिळणार नाही, याबद्दल मन उद्विग्न होते'.*


         उत्तरादाखल लगेच तात्यासाहेब म्हणाले, 'सोन्याबापू असे मन खट्टू करून घेण्याचे काय कारण आहे? ते भाग्य अजूनही आहे'. ते कसे काय असें बापूसाहेबांनी त्यांस विचारता पू तात्यासाहेब म्हणाले कीः


         'थोरल्या राम मंदिरातील राम तर श्रीमहाराजांना प्रत्यक्ष रामरायच वाटे, त्यामुळेच तर तीनदा त्याचे डोळ्यांतून अश्रुपात सर्व लोकांस पाहावयास मिळाला. *त्याचे पायावर आपण डोके ठेवले म्हणजे प्रत्यक्ष श्रीमहाराजांच्याच पायावार डोके ठेवल्यासारखे आहे.* तो सतत सोवळ्यांत असतो त्यामुळे देहांत जसे आम्हांला केव्हांही श्रींचे पायावर डोके ठेवतां येत होते तसे आता करता येणार नाही हे मी मान्य करतो.


         ही अडचण  येणार हे लक्षात घेऊन ती दुर करण्याकरतां, *रामरायासमोर जो मारुति आहे तो श्रींनी स्वतः तयार करून त्याची स्थापना स्वहस्ते रामासमोर केली आहे. तो कधी सोवळ्यात नसतो. त्यामुळे त्याच्या पायावर कधीही डोके ठेवतां येते. श्रीमहाराज प्रत्यक्ष मारुतीचेच अवतार होते, त्यामुळे त्या मारुतीचे पायावर कधीही तूं डोके ठेवलेस तर देहांत असताना आम्ही जसे श्रींच्या पायावर डोके ठेवीत होतो तेच भाग्य आतासुद्धा तुला पुर्णपणे लागेल हे ध्यानांत ठेव. मनातील एखादी रुखरुख श्रींचे कानावर घालावीशी वाटली तर ती या मारुतीरायाला सांगितली तर श्रींचेच प्रत्यक्ष कानावर घातल्यासारखे होईल.* नामस्मरण खूप करून मन जसजसे सूक्ष्म होईल तसतसे त्याचे उत्तरही तुला त्या मूर्तीकडून मिळेल.


         हे त्यांचे सांगणे माझ्या [बापूसाहेब मराठ्यांच्या] मनाला इतके पटले की गोंदवल्यास गेल्यावर मी [बापूसाहेब मराठे] *अगदी न चुकता थोरल्या राममंदिरात दर्शनासाठी रोज जातोच जातो, व तेथे गेल्यावर श्रीरामरायाचे दर्शन घेऊन मारुतिरायाच्या पायावर डोके ठेवतो.* त्यावेळी प. पूज्य तात्यासाहेबांचे वरील बोल लक्षात येऊन मनाला प्रसन्नता वाटते.


               *******

* *[थोरल्या रामासमोरच्या मारुतिची हकीकत अशी आहे की तडवळे या गावांवरुन राम, लक्ष्मण व सीता यांच्या मुर्ती गोंदावल्यास आल्या परंतु मारुतीरायाची मूर्ति भंगल्यामुळे ती गोंदवल्यास आणली नाही. तेव्हा श्रीमहाराजांनी स्वतः चुना, वाळू, व मेण यांच्या साहाय्याने आपल्या हातांनी मारुतीरायाची मूर्ति बनवली व थोरल्या रामरायासमोर स्थापन केली.]*


               *********

संदर्भः *चैतन्यराम १९९२* पान ११५, ११६ व ३५ 

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Wednesday, September 4, 2024

देहबुद्धि

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*संत  विषयात  देव  पाहतात ,  आपण  देवात  विषय  पाहतो .*


प्रत्येकजण भक्ति करीतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ति म्हणजे आवड. परमार्थात भक्ति म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एकपरीने विषयाची भक्तिच करीत असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून, देहबुद्धी वाढविणारी, आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ति उपजणे शक्य नाही. याकरिता भक्ति मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित, निष्काम, निःस्वार्थी परमात्मस्मरण करणे, आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धि विगलित होणे, ही होय. देहरक्षण परमार्थप्राप्तीकरिता करावे. केवळ विषय सेवनाकरिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट ?


जयंत्यादि उत्सव आपण करतो तो भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून. मुळात प्रेम नसेल तर, ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो, तो उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो, आणि यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दुःखच वाटते, पण त्यामुळे या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतःकरताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे ?


संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे, वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली, म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. तेरा कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात. त्याचा अर्थ, तेरा कोटी जप व्हायला रोज दहा-बारा तास या प्रमाणात जवळ जवळ दहा बारा वर्षे लागतात, इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही, तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे; मग ते विषयप्राप्र्तीकरिता असेल, किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल. विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे.


*  नाम  आपले  सर्वस्व  वाटले  पाहिजे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Tuesday, September 3, 2024

अवंती

 ❣️ *शिकवण* ❣️


 *अवंतीने गाडी रस्त्याच्या कडेला लावली अन खाली उतरत राघवचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा कॉल रिसिव्ह केला, तिला क्षणभरही हॅलो वगैरे म्हणण्याचा अवसर न देता प्रचंड उत्साहाने अन आनंदाने म्हणाला तो,* 


 *" कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, यु रॉक द वर्ड टुडे, आय ऍम व्हेरी हॅपी फॉर यु, बघ तुझ्या डेडिकेशनचं चीज झालं, मी म्हणालो होतो ना तुला. शीट यार, आय मिस्ड द मोमेंट...वाटतंय आत्ता यावं अन तुला कडकडून मिठी मारावी.."* 


" हो हो हो, किती बोलतोएस अरे, मला काही बोलू देशील? अन कोणी सांगितलं तुला, त्या प्रणवने ना, बघतेच त्याला उद्या थांब..मी सांगणार होते ना तुला.." काहीश्या लटक्या स्वरात अवंती म्हणाली.


" ए बाई, नको हं, घाबरतो बिचारा तुला, पण मस्त तयार झालाय हं तुझ्या तालमीत..म्हणत होता मॅम डिझर्व इट, हे त्यांना फार आधीच मिळायला हवं होतं...ए सांग ना, कसं वाटलं अवॉर्ड घेताना? अन काय बोललीस तू मनोगत व्यक्त करताना?"


" तुझा प्रश्नांचा भडीमार संपला तर सांगेन ना मी मला कसं वाटलं ते..बाकी सगळं जाऊ दे, ते सांगते शांततेत फोन केल्यावर. पण तू हवा होतास मला...मला खूप एकटं एकटं वाटलं, माझ्या एवढ्या मोठ्या अचिव्हमेंटला साक्षीदार असं माझ्या जवळचं कोणीच नव्हतं, म्हणजे स्पेशली तू. खूप व्हॅकन्ट वाटत होतं मला. आय रियली मिस्ड यु अ लॉट.."


 *" अगं मग आपल्या ठकूबाईला का नाही नेलंस? तेवढंच बरं वाटलं असतं ना तुला, ओह येस तिच्या युनिट टेस्ट चालू आहेत ना? बरं फार नाही ना त्रास देत ती, मला फोन केला की सारखी कुरकुरत असते, कधी येतोस कधी येतोस विचारून हैराण करत असते..."* 


त्याचं बोलणं मध्येच तोडत अवंती म्हणाली,


 *" बरं चल संध्याकाळी बोलते, एक महत्त्वाचा कॉल यायचाय मला.."* 


 *तिने फोन ठेवला व बाजूच्या बाकड्यावर जाऊन बसली ती, क्षणभर स्तब्ध...सकाळचा प्रसंग आठवला तिला..* 


अवंती राघव कश्यप एक प्रथितयश कॉर्पोरेट ट्रेनर होती, राघव एका एम.एन.सी. मध्ये सिनियर आर्किटेक्ट.. आणि त्यांची अकरा वर्षांची मुलगी स्वरा, असं सुखी त्रिकोणी कुटुंब. राघवचे आई बाबा गावाकडे आपली शेती सांभाळत असत. वर्षातून दोन तीन चकरा होत त्यांच्या शहरात अन राघव अवंती देखील मोठ्या सणांना, कार्यांना किंवा गरज पडेल तेंव्हा तेंव्हा गावात चक्कर मारत. स्वरालाही खूप आवडत असे तिथे राहायला.


स्वरा तिच्या बाबाच्या म्हणजे राघवच्या अतिशय जवळ, अगदी लहान असताना पासूनच. तिला आईपेक्षा जास्ती बाबा लागायचा. त्यात अवंतीचे कॉर्पोरेट ट्रेनिंग्स, बाहेर व्हिझिटला जावं लागायचं, दिवस दिवस बाहेर राहावं लागायचं, त्यामुळे राघव स्वराचं सगळं काही बघायचा.    त्याचं रुटीनही तिच्या रुटीनला मॅच होईल असं बसवलं होतं त्याने. 

स्वराही अतिशय समंजस होती. अवंती तर नेहमीच म्हणायची की नावाला मी आई आहे तिची, पण आईच्या सगळ्या भूमिका तर तू वठवतोस. राघवचे ऑन साईट जायचे ठरले तशी आधीपासूनच एक ओळखीतली, विश्वासू मुलगी मदतनीस म्हणून ठेवली..फक्त स्वरासाठी. राघव तिकडे गेल्यानंतर जरा तारांबळच उडाली अवंतीची पण तिनेही तिच्या वेळा ऍडजस्ट केल्या स्वराच्या दृष्टीने..


अवंतीला बेस्ट ट्रेनर अवॉर्ड मिळणार असल्याचं आयोजकांनी पूर्वसूचित केलं होतं, खूप मोठी अचिव्हमेंट होती ही तिच्यासाठी. तसंही राघव नेहमीच म्हणायचा तिला की तू तुझ्या फिल्ड मध्ये एवढी परफेक्ट आहेस, कितीतरी लोक शिकतात तुझ्याकडून, तुला नक्कीच मोठं अवॉर्ड मिळेल या सगळ्यासाठी. तिने मुद्दामच हे राघवला सांगितलं नव्हतं, त्याला सरप्राइज द्यायचं होतं तिला.

 हा आठवडा अतिशय बिझी होता तिचा, एकावर एक ट्रेनिंग सेशन्सही लाईन्ड अप होते. अवॉर्ड फंक्शनसाठी म्हणून जरा तयारीही करायची होती.त्यात राघव नव्हता म्हणून अगदीच एकटीवर पडलं होतं तिच्या सगळं..


 *स्वराला नीट मॅनेज केलं होतं खरंतर तिने राघवच्या अनुपस्थितीत, अर्थात त्या मदतनीस मुलीशिवाय हे सारं काही शक्य झालं नसतंच म्हणा, पण या आठवड्यात काहीतरी वेगळंच चाललेलं स्वराचं. सारखं आई आई..तरी अवंती सगळं तिच्या मनासारखं करत होती, तिला जास्तीतजास्त वेळ देण्याचा प्रयत्नही करत होती.*

 *फंक्शनच्या आदल्या दिवशी स्वराला आईशी खूप काही बोलायचं होतं, तिला काय काय दाखवायचं होतं, स्कूल मधलं, ड्रॉइंग क्लास मधलं. अन नेमके अवंतीचे फोन वर फोन सुरू होते.*    *झालं...* 

 *त्यामूळे त्या ठकूबाई रुसल्या, आईशी काहीही न बोलता जाऊन झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अवंतीने पटापट सगळे आटोपले, स्वराच्या आवडीचा ब्रेकफास्ट करून तिला आवज दिला,* 


" मन्या, बघ तुझ्या आवडीचे सँडविचेस केले आहेत, चला पटापट आवरा, मला जायचंय हं आज लवकर, बरं मी काय म्हणतेय स्वरा, तू पण चल ना माझ्या सोबत, मम्मा साठी आज स्पेशल डे आहे..आपण पटकन आवरू अन निघू.."


स्वरा एक नाही अन दोन नाही..


" काय झालं पिलू, अशी बसू नकोस बरं एका ठिकाणी, मला उशीर होतोय..मी निघू का? निशाताई थांबेल आज दिवसभर, मला उशीर करून चालणार नाही. स्वरा ऐकतेस ना मी काय म्हणतेय ते.." असं म्हणून अवंती स्वराच्या अगदी समोर जाऊन उभी राहिली..


" मी नाही बोलणार तुझ्याशी, मला बाबा हवाय आत्ताच्या आत्ता, तुला तर अजिबात वेळ नसतो माझ्यासाठी..जा.." गाल फुगवून स्वरा म्हणाली..


" हो बाळा, कळतंय मला, आय एम सॉरी, आणि बाबा येतोच आहे ना महिन्याभरात.."


अवंतीचं बोलणं पूर्णही न होऊ देता स्वरा म्हणाली,


" ते काही नाही, मला आत्ता हवाय बाबा, तुझं नेहमीचं आहे,  फक्त सॉरी म्हणतेस, मला नाही बोलायचं तुझ्याशी.."


" स्वरा..." जरा दटावणीच्या सुरात अवंती म्हणाली तशी पुन्हा मोठ्या आवाजात बोलत स्वरा आपल्या खोलीत निघून गेली..


 *" आय हेट यू मम्मा.. आय हेट यू.."* 


 *खरंतर खूप राग आला होता अवंतीला, पण त्या विषयावर फारसा विचार करायला वेळच नव्हता तिच्याकडे..ती आपलं सगळं आवरून कार्यक्रमासाठी निघून गेली.* 


 *त्या बाकड्यावर बसून हा सकाळचा प्रसंग पुन्हा आठवला अवंतीला, अन स्वराचे " आय हेट यू मम्मा " हे शब्द कानात घुमले तिच्या, गाडीच्या फ्रंट सिटवर ठेवलेली ती ट्रॉफी अन मोठ्या बुकेकडे बघत विचार करू लागली ती,* 


 *" काय चुकतंय आपलं..का करतोय आपण हे सगळं?"* 


तोच तिला कोणाच्यातरी खळखळून हसण्याचा आवाज आला, जरा बाजूलाच एक साधारण तिच्याच वयाची बाई अन स्वराच्या वयाची मुलगी एकमेकींकडे तोंड करून बसल्या होत्या, टाळ्या देत हसत होत्या..अवंती मुद्दामच उठून जरा त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिली, फार प्रसन्न वाटलं तिला त्यांचं ते हसणं.. 

एका कागदाच्या तुकड्यावर छोट्या छोट्या पाचसात जिलब्या होत्या, त्या मुलीने त्यातली एक जिलबी त्या बाईला भरवायला हातात घेतली होती, आपल्या दुसऱ्या हाताने ती तिचे डोळे पुसत होती. अवंतीला पाहताच ती बाई जागेवरुन उठली, एक जिलबी तिच्या पुढ्यात धरत म्हणाली,


" घ्या ना ताई.."


" नको गं, थॅंक्यु, तुमचा दोघींचा हसण्याचा आवाज आला म्हणून सहज बघायला आले..चालू देत तुमचं.. " 


असं म्हणून अवंती निघणारच होती तोच ती बाई बोलायला लागली.


" लेक हाय ताई माझी, बारा वर्षाची हुईल आता..तशी लय गुनी हाय, परिषदेच्या शाळेत पन जाती...कधीकधी तरास पन देती..आमचं तुमच्यासारखं नाई ताई, आमच्या लेकरांना पायजे ते पायजे तेवा नाई मिळत..मग देतात कधीकधी तरास, विचित्रच वागत होती या हाफत्यात, काल तर कहरच केला, नवं दप्तर पायजे म्हनून अडून बसली, माझ्याशी भांडू लागली, खूप खूप समजावली पन ऐकेच ना, संताप संताप झाला माझा अन हात उगारला मी....मग मनात आलं पोर मोठी व्हतीय, आतून बाहेरुन बदल होतात...शरीर बदलतं..मन बदलतं.. त्यानं वागत असल अशी..

     खस्सक्कन हात मागे घेतला अन छातीशी कवटाळली, मायेनं गोंजारली, टपटप दोन आसू पडले तिच्या अंगावर अन कशी कोन जाने ती क्षनात शाहनी झाली, हट्ट बिट्ट पार विसरली. ही लेकरं आपल्या परता शहानी असतात ताई, मायेनं समजावलं की मोठ्या मानसाहून मोठी असल्यासारखी वागतात, आपलेच पालक असल्यासारखे आपल्याला समजून घेतात..म्हनून जिलबी आनली आज तिच्यासाठी, आवडते तिला, नवं दप्तर पन आनिल पैसा जमला की.."


बोलतानाही त्या बाईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं, अन आपसूकच अवंतीचंही मन भरून आलं होतं..


 *" चला ताई, पाहते मी पोरगी कुठं गेली हुंदडत ते, तुमचा वेळ घेतला मी.."* 


 *असं म्हणून ती बाई निघून गेली. अन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने बघत नंतर अवंतीही निघाली घरी जायला..* 

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

 *स्वरा शाळेतून आली तेच मुळी नाचत अन उड्या मारत,* 


 *" वॉव मम्मा, कसला मस्त वास येतोय...पास्ता अन शिरा, तोही मम्मामेड..खालपर्यंत वास येत होता. दे ना मला लगेच खायला. "* 


" ए थांब थांब, नीट हातपाय धुवून ये..तुझं आवडतं कॉम्बिनेशन आहे ना हे, पास्ता विथ शिरा..लवकर घरी आले मग करून ठेवलं तू येण्याआधी.. कसं होतं सरप्राईज?"

एक भुवई उंचावत विचारलं अवंतीने स्वराला..स्वराने फ्रेश होऊन ताव मारला दोन्हींवर, तिचा सकाळचा रुसवा कुठच्या कुठे गायब झाला होता, चेहरा आनंदानं फुलला होता. अवंती म्हणाली,


" बरं मी काय म्हणते, मस्त तिकिटं काढू का इव्हनिंगच्या मुव्हीची, तुला बघायचा होता ना तो टर्निंग रेड की कुठला, हवं तर तन्वीला घे तुला सोबत म्हणून.."


" खरंच मम्मा, तू येणारेस?"


" हो मग.."


" मग कोणी नको, फक्त तू अन मी.. यु आर द बेस्ट मदर इन द वर्ड..."


 *असं म्हणत स्वरा जाऊन बिलगली अवंतीला अन उड्या मारत निघूनही गेली, तिचा आनंद पाहून अवंतीचे डोळे भरून आले, " यु आर द बेस्ट मदर इन द वर्ड " हे तिचे शब्द खूप मोलाचे वाटले अवंतीला, अगदी आज सकाळच्या अवॉर्डपेक्षाही जास्ती मोलाचे..* 


 *मोठमोठ्या ऑडीटोरियम मध्ये, मोठाल्या कंपन्यांना, वयाने आपल्यापेक्षा लहान मोठ्या असलेल्या अनेकांना ट्रेन करणाऱ्या अवंतीला आज रस्त्यावरच्या एका साध्या स्त्रीने जगण्यातले खरे तत्वज्ञान शिकवले होते..* 


 *प्राजक्ता राजदेरकर* ✍️