TechRepublic Blogs

Friday, June 27, 2025

लोभ

 लोभाची गंमत आहे अशी की लोभ चिकटतो. ज्याच्यावरती लोभ असतो ना तिथे त्या वस्तूवर आपण चिकटतो. भगवंताचा लोभ लागल्यावर तो अमर्याद हवा. अन्यथा लोभ ही आसक्ती आहे. सगळ्या पापाचं कारण लोभ आहे. श्री.तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे.

"विषयी विसर पडिला निःशेष

अंगी ब्रम्हरस ठासावला 

माझी मज झाली अनावर वाचा

छंद या नामाचा घेतलासे

लाभचिया सोसें पुढे चाले मना

धनाचा कृपण लोभ जैसा 

तुका म्हणे गंगासागर संयमी

अवघ्या जाल्या उर्मी एकमय

नामाने ,  विषय म्हणजे हे  दृश्य याचा विसर पडला आणि अंगात ब्रम्हरस भरून राहिला. मग भगवंताच्या नामाचा छंद घेतला  तो इतका की मला माझीच वाचा अनावर झाली की जसे  एखादा पैशाचा लोभी माणूस असला की सारखा पैसा पैसा करतो.तसं त्या ब्रह्मरसाचा आनंद भोगता भोगता माझं मन पुढे पुढे जाते. पुढे म्हणतात ती गंगा आहे सागर आहे , परमात्मा , ते दोघे एकत्र मिसळल्यामुळे वेगळेपण राहिलेच नाही. तसं मला ना लोभ झाला आहे. त्यामुळे सारखे परमात्मा पाहिजे त्याची संगत पाहिजे  हा लोभ झाला आहे. आपल्याला आपल्या गुरूंच सहवास एकसारखा मिळावा हे सारखं राहणं भक्तीच लक्षण आहे. 

कितीही सहवास केला तरी समाधान नाही. परमार्थात अहंकार नाहीस झाल्याशिवाय भक्त नाही. पण भक्तीमध्ये अहंकाराचे उदात्तीकरण होते. भक्त म्हणतो काय तर आम्ही भगवंताचे आहोत , आम्ही भगवंताचे भूषण आहोत.

 श्री.समर्थानी दास्य भक्तीचे उदात्तीकरण केले. दास कोणाचा तर रामाचा. तसं उदात्तीकरण होते याच्या अहंकाराचे. मी त्याचा आहे ना मग अहंकार काय तर मी त्याचा भक्त आहे .

No comments:

Post a Comment