आपण जर स्वधर्माला नीट भजलत म्हणजे स्वधर्म नीट पाळलात तर ते कामधेनू सारखं होईल आणि तुम्हाला भगवंत कधीही अंतर देणार नाही. हैद्राबाद मध्ये एक सद्गृहस्थ सरकारी नोकरीत होते. ते शिवभक्त होते आणि कामात फार चोख होते. त्यांचे टेबल कायम स्वच्छ असे. उशीर झाला तरी सर्व काम पूर्ण करून जात. तेथे एक मुसलमान अधिकारी बदलून आला. त्याच्या मनात तेथील कर्मचारी मंडळीनी ह्या सद्गृहस्थ विषयी काही नाही तरी सांगितले. पुढे असे झाले की ह्या सद्गृहस्थ दोन दिवसात नाही भेटला तर हा अधिकारी त्यांना बोलवायचा व म्हणायचा " दोस्त न मिले तो क्या मजा आहे." त्याला ह्या मंडळीनी विचारलं तुला ह्या माणसाविषयी प्रेम का वाटत.तर तो अधिकारी म्हणाला तुम्हाला जो पगार मिळतो त्यांचं पूर्ण काम तुम्ही करता का ? हा गृहस्थ ते करतो." हे साध्या व्यवहारात आहे तर आपण भगवंताला स्मरून जर वाट्याला आलेलं कर्म केलंत तर तर जी शक्ती विश्वाला चालविते ती काय स्वार्थी आहे का ? ती तुम्हाला मदत करणारच. तिचे चौफेर लक्ष असतं. म्हणून सत्परूषांला कधीही कमी पडत नाही. श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले की सत्पुरुष इतका कर्तव्यरत असतो स्वधर्माविषयी , की भगवंत पाहातच असतो याला कधी मदत करू? पण हा तर कधीच काही मागत नाही. या विश्वाला चालविणार जे विश्र्वमन आहे . त्या विश्र्वमनापाशी अशी शक्ती असते की योग्य व्यक्तीच्या मनामध्ये योग्य वेळी प्रेरणा करण. म्हणून सत्पुरुषांना कधीही अडiचण पडत नाही. त्याच्यावरती भार टाकला की जबाबदारी त्याच्यावर जाते. ते विश्र्वमन बरोबर काम करतं. स्वधर्माला इतकं महत्व आहे.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment