TechRepublic Blogs

Friday, June 6, 2025

भय कसलं?

 भगवान श्रीरामकृष्ण परमहंस यांचे अंतरंग लिलासहचर श्री.स्वामी शिवानंद त्यांना महापुरुष महाराज संबोधतात. त्यांनी निरनिराळ्या भक्त साधकांना उपदेश केले. त्यासाधकांनी ते लिहून ठेवले व त्याचे  पुस्तक प्रकाशित झाले.

 त्यातील हा उतारा. १९२३ साली पु स्वामी सुद्धानंद काशीला चालले होते. तर त्यांच्या बरोबर श्रीमहापुरुष महाराजाना येण्या करीता स्वामी सच्चीदानंद महाराजानी (दिनू) पत्र लिहिले. त्यासंदर्भात श्रीमहापुरुष म्हणाले की " दिनू म्हाताऱ्याची अशी धारणा झाली असेल की हा देह आणखी जास्त दिवस राहणार नाही.

 म्हणून तो मला शेवटच्या क्षणी काशीवास घडवू इच्छितो. पण बाबांनो आम्हाला सगळीच ठिकाणं काशी होत. कुठल्याही ठिकाणी कोणत्याही स्थितीत देह जाईना का ते आमच्यापाशी काशीतील मरणासारखंच आहे. श्रीठाकुर जो पर्यंत ठेवतील तोपर्यंत कोणी मारू शकणार नाही. 

परंतु ज्यावेळी ठाकूर हाक मारतील त्यावेळी कोणी ठेवू देखील शकणार नाही. आम्ही तर तयार होऊन बसलेलो आहोत. शेवटच्या क्षणी काशीवास घडावा ह्या साऱ्या गोष्टी प्रापंचिक माणसं करतील. आम्ही तर या जगातील माणसं नाही. ठाकुरांनी कृपा करून सर्व काही दिले आहे. त्यांचे भक्त कुठेही देहत्याग करीनात का  त्याने काही बिघडत नाही.

 त्यांच्यापाशी ते काशीतील मरणांसारखंच आहे. ज्याच्या हृदयी ते विश्वनाथ ठाकूर विराजत आहेत त्यांचं ह्रुदय हीच तर काशी.  त्याला परत भय कसलं?"

No comments:

Post a Comment