जगामध्ये अनंत जीवप्रणी देह धारण करतात आणि आपआपले जीवन जगत असतात. एक जीवनशक्ती सर्व प्राण्यांना जन्मास घालते आणि मरे पर्यंत त्यांची जीवनयात्रा चालवते.
यावरून असे अनुमान निघते की जीवनशक्तीचा एक महासागर विश्र्वामध्ये अफाट पणे पसरलेला आहे. प्रत्येक देहधारी प्राण्याच्या अंतरी त्या जीवनशक्तीचा एक अंश प्रभावीपणे वास करतो आणि जीवन चालवितो. हा महासागर हा त्या अंशाचे नव्हे प्रत्येक अंशाचे निजधम आहे.
त्यामुळे त्या निजधामापासून वेगळेपण आल्याने अंशाला (जीवाला) अंशपणाच्या जीवनामध्ये चैन पडत नाही. वासनेच्या रूपाने जीव आपली बेचैनी प्रगट करतो. महासागराला जीवाची जी हाक आहे तिला वासना म्हणतात. माणसाची वासना म्हणजे अपूर्णतेची पूर्णतेकडे किंवा अंशाची समग्रतेकडे जाण्याची , भेटण्याची जन्मजात आकांशा होय.
" मला अमुक हवे " असे वाटणे व त्या वाटण्यामुळे मनाचे समाधान भंगणे हे वासनेचे लक्षण ओळखावे. या मध्ये " मला काहीतरी कमी आहे " ही जाणीव असते. या जाणीवेच्या रूपाने माणसाचे अपूर्णपण प्रचीतीला येते.
No comments:
Post a Comment