श्री.गोंदवलेकर महाराजांजवळ देहात असताना काही भक्त मंडळींनी पैसे ठेवले होते. श्री.महाराजांनी देह ठेवल्यावर काही दिवसांनी ती मंडळी श्री. अप्पासाहेब भडगावकर यांच्याकडे पैसे मागू लागली. कोणी किती पैसे ठेवले याची नोंद श्रीमहाराज यांच्या इथे सापडली नाही.
सुमारे तीन महिन्यात नंतर श्री.ब्रह्मानंद बुवा गोंदवले येथे समाधी मंदिराचे बांधकाम निमित्त आले. येताना त्यांनी रोकड दोन हजार रुपये बरोबर आणले होते. एकंदरीत ह्या ठेव पैशांची कुरबुर त्यांना कळली. त्यांनी काय केले ते जे पैसे आणले होते ते व
श्री.महाराज कडील पैसे तीन ताटातून रामराया समोर ठेवले.ते त्यांनी तीन दिवस तेथे ठेवले व मंडळीना सांगितले की ज्यांनी श्री.महाराजांकडे पैसे ठेवले असतील त्यांनी येथे येऊन मारुतरायाचे पायावर हात ठेऊन शपथ पूर्वक आपले अमुक एव्हढे पैसे ठेवले होते असा उच्चार करावा आणि तेव्हढी रक्कम ताटातून उचलून घेऊन जावी.
व्यवहार दक्षता म्हणून तेथे दोन माणसांचा भजनाचा पहारा बसविला होता. अशा रीतीने त्या तीन दिवसांत तीस चाळीस मंडळी येऊन पैसे घेऊन गेली. हे झाल्यावर पू.श्री.ब्रह्मानंद बुवा म्हणाले श्री.भडगावकर यांना म्हणाले " अप्पासाहेब आता आपण पितृऋणातून मुक्त झालो. आता त्या राहिलेल्या ताटातील ते उरलेले पैसे मोजून मला द्या."
श्री.भडगावकर यांनी मोजले तर ते बरोबर दोन हजार होते. हे पाहून श्री.ब्रह्मानंद बुवा म्हणाले " अप्पासाहेब आपला बाप इतका थोर होता की त्याने आपले ऋण मुलांच्यावर ठेवले नाही.
त्यांनी फक्त आपली परीक्षा पहिली." त्यावर श्री.अप्पासाहेब यांचा कंठ दाटून आला आणि ते इतकेच म्हणाले "बुवा आपण आणि श्री.महाराज दोघेही सिद्ध पुरुष आहात. तुमचे सामर्थ्य आम्ही बद्ध प्रापंचिकांना काय कळणार ?"
No comments:
Post a Comment