श्रीराम,
संन्याशाची वस्त्रे धारण करून राहण्यापेक्षा संन्यस्त वृत्तीने रहाणे म्हणजे गृहस्थाश्रमातील वानप्रस्थाश्रमच होय. सामान्यपणे असे दिसून येते की कितीही लहान किंवा मोठी व्यक्ती जेव्हा निवृत्त होते तेव्हा तिची आंतरिक अवस्था फार बिकट बनते. अनेक छंद लावून घेऊनही मन कशात रमत नाही. अप्रत्यक्षपणे का होईना परंतु व्यक्तीवर आणि भोवतालच्या परिस्थितीवर आपले येनकेनप्रकारेण नियंत्रण असावे अशी सुप्त मनिषा जोपासलेली दिसते. आपले अस्तित्व दखलपात्र ठरत रहावे ह्यासाठी घरी आणि दारी त्यांचे आटोकाट केविलवाणे प्रयत्न ही चालू असतात. असा मायेचा पसारा आणि तिचा प्रभाव फार विलक्षण असतो.
जे अवतीभवती दिसते व असते त्याचा एक दिवस आपल्याला निरोप घ्यायचा आहे. काळाच्या ओघात सर्व काही यथावकाश संपणार आहे. हा विवेक सतत जागा असेल आणि सच्चिदानंदाची प्राप्ती करून घेण्याचे ध्येय जर समोर असेल तर प्रत्येक क्षण आनंदात कसा जगायचा हे समजायला लागते आणि हळूहळू या संसारात अनासक्ती निर्माण होऊ लागते. हाच सारासार विवेक होय.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment