*भावार्थ मनोबोध (भाग २)*
*श्री रविंद्रदादा पाठक*
संकलन आनंद पाटील
*मनुष्याचं सगळं जीवन हे त्याच्या नीतिमत्तेच्या आधारावर चालतं. त्यामुळे श्रीमहाराज म्हणाले, प्राण गेला तरी मनुष्याने आपली नीती सोडू नये.' पण मनुष्याच्या* *जीवनातली ही वासना, जी जन्मोजन्मी त्याच्या आतमध्ये आहे, ती मात्र सदैव कृतीशील होण्यासाठी, अग्रेसर होण्यासाठी वाटच बघत असते.*
*भरताने पुरुषाचं चरित्र कसं ओळखायचं हे सांगताना एक अतिशय सुंदर तत्व तुलसीदासांनी १६ व्या शतकात* *रामचरितमानसमध्ये लिहून ठेवलय, की एकांतामध्ये जो स्त्रीशी व्यवहार होतो त्यावरून पुरुषाचं चरित्र हे सांगता येऊ शकतं, हे संत भरताने* *सांगितलंय. अशी ही मनुष्याची अवस्था आणि ही वासना की मनुष्याचा लोभ हा कमी होऊ लागतो.*
*हा लोभ आपल्य*. *जीवनातून हद्दपार व्हावा किंवा जितक्या मात्रेमध्ये आज आहे* *तो कमी होत जावा असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी सत्संगाचा,* *निरूपणाचा,निरुपणातून केलेल्या सत्संगाचा मार्ग समर्थांनी सांगितलेला आहे.
बऱ्याचदा, श्रीमहाराजांचं प्रवचन* *वाचताना श्रीमहाराजांचे जे काही शब्द असतात, ते आपल्या हृदयाला असे काही जाऊन भिडतात की जणू ते फक्त आपल्यासाठीच लिहिलंय असं वाटतं. बऱ्याचदा लोकं म्हणतात की अहो, माझ्या मनामध्ये असा प्रश्न चालला होता, नेमकं श्रीमहाराजांनी त्याच्यामध्ये*
*मला त्याचं उत्तर दिलं. म्हणजे नेमकं काय होतं की या संतांचं मन हे विश्वमनाशी एकरूप झालेलं असतं आणि आपलं मन हा त्या विश्वमनाचा*
*एक भाग आहे. त्यामुळे आपली संवेदनाही थेट त्या संतांपर्यंत जाते आणि संत आपल्या वाणीतून, आपल्या ह्या प्रासादिक वाणीतून आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यासाठीच देत आहेत, अशी त्या ऐकणाऱ्याची भूमिका होते. त्यातून त्याचं* *देहमन हरपून जातं. त्याचा विवेक जागृत होऊ लागतो. जी आसक्ती पैशावरती असते तीच आसक्ती या* *निरुपणाच्या आधाराने त्याच्या देहबुद्धीचा -हास करण्यासाठी कारणीभूत ठरते.*
*त्यामुळं समर्थांचं म्हणणं एकच, 'सत्संग', बस्स. क्षणाच्या* *सत्संगापासून सुरूवात करावी आणि आपलं जीवनच मुळी सत्संगस्वरूप करून टाकावं. मनुष्याच्या वृत्ती या काम आणि लोभ या दृष्टीने बाहेर येत असतात, परद्रव्य आणि स्त्रीचा भोग घेण्यासाठी आसक्त झालेल्या असतात त्या वृत्तींना अंतर्मुखता*
*मिळते ती केवळ हरिकीर्तन आणि निरुपणामुळे. जसजसं हे कीर्तन हृदयात उतरतं, जसजसं ही निरुपणं आपल्या कानातून अंतःकरणापर्यंत जातात, तसतसं हे अमृत शरीरभर फिरू लागतं, धमन्यांमधून वाहू लागतं, रक्ताचा थेंब न थेंब ते अमृतमय करू लागतं, तसतशी माणसाची वृत्ती*
*ही सहज पालटते. ज्या तुलसीदासांचं रामायण मी आपल्याला मनोबोधातून सांगतो ते तुलसीदास देखील या* *कामविकारापासून असे काही मागं फिरले आणि ते 'तुलसीदास' होऊन गेले. ती कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हे ह्या हरिकीर्तनाचं, ह्या निरुपणाचं महत्त्व. आपण आपल्या* *जीवनामध्ये या शाश्वताचा संग करण्यासाठी*
*हरिकीर्तनाचा आधार घ्या, त्यामध्ये आपलं लक्ष हे रामचरणी लावा. निरूपणाचा आधार घ्या. त्यामध्ये आपल्या बुद्धीचा वापर न करता देहबुद्धी विसरून ते निरुपण आपल्या कानांनी श्रवण* *करत, हृदयस्थ करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या, असा समर्थांचा आपल्याला बोध आहे.*
संकलन आनंद पाटील
No comments:
Post a Comment