सदर हकीगत पू.श्री.गोंदवलेकर महाराजांच्या वाणी स्वरूपातील आहे. श्री.महाराजांचे शिष्य श्री.बापू साहेब मराठे यांनी सांगितली आहे. श्री.बापूसाहेब यांची मुंबईला बदली झाली. त्यामुळे ते वारंवार श्री.महाराजांना भेटायला जास्त असतं. त्यावेळी ते प्रपंचातील अडचण महाराजांना सांगत.
प्रपंच आणि रडगाणं एकत्रच असतं. ते गुरुं समोर गायचे नाहीतर दुसरीकडे कुठे सांगणार ? आपण आपल्या आईकडे सांगतो ना तसं. तसं ते रडगाणे त्यांनी दोन तीन आठवडे गायले. नंतर त्यांना वाटायला लागले की हे न संपणारे आहे.
प्रपंचाचा हा गुणधर्म आहे. त्यामुळे त्यांनी हे रडगाणे गाण्याचे थांबवले. त्याबद्दल ते विचारेनासे झाले. श्री.महाराज अंतर्ज्ञानी असल्याने बापूसाहेब दर्शनाला गेल्यावर महाराज रडगाणे उकरून काढायचे. मग ते त्यांना सांगावं लागायचे.
हे त्यांनी पू.तात्यासाहेब केतकरांना विचारले की " मी काही रडगाणे गात नाही. अस असताना ते उकरून काढतात ? तात्यासाहेबांनी उत्तर दिले " अरे लहान मुलाच्या नाकातला शेंबूड आई ने नाही काढायचा तर कुणी काढायचा?"
बापूसाहेब म्हणाले समजले नाही. त्यावर तात्यासाहेब म्हणाले " तू रडगाणे त्यांना सांगत नाहीस. पण ते सतत तुझ्या मनात आहे म्हणजे तो शेंबूड आहे. आणि तो सतत असल्याने जपामध्ये येतो आणि व्यत्यय येतो. त्यापेक्षा तो शिंकरून टाकलेला बरा नाही का ?
मग तो शेंबूड आईनी नको का काढायला ? त्याप्रमाणे ते तसं उकरून काढताहेत. तुझ्या जपात त्याचा व्यत्यय आहे म्हणून अत्यंत करूणेपोटी ते तसं करतात." काय सुरेख स्पष्ट करून सांगितलं.
No comments:
Post a Comment